Thursday, June 4, 2020

#संवादिनीकथासंग्रहपरिचय - लेख-१३ वा . ले-अरुण वि.देशपांडे .

#संवादिनीकथासंग्रहपरिचय - समारोप- लेख 
-----------------------------------------------------------------------------------------
लेख-१३ वा . ले-अरुण वि.देशपांडे .
----------------------------------------------------------------------
या भागातील लेखक-
१.राधा पंडित , २.संगीता चव्हाण , ३.शोभा दळवी . ४.हरीश दत्तात्रेय कांबळे -साळी
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नमस्कार मित्र हो ,
संवादिनी कथासंग्रह  -परिचय लेख " ,या उपक्रमाने खूप समाधान दिले .
आपल्याच परिवारातील गुणवंत साहित्यिकांच्या बद्दल , त्यांच्या कथा -लेखनाबद्दल
अभिप्रायपर व्यक्त होणे .."हे काम मला स्वतःला -एक पारिवारिक कार्य केल्याचा  आनंद देणारे वाटले आहे.

कारण कुबेर समूह एक मोठा परिवार आहे",या भावनेतून ", या समूहातले कार्य आणि उपक्रम संपन्न होत असतात .
अशा उपक्रमात माझा हा खारीचा लेखन-वाटा आहे", ही भावना मला मोठी सुखद वाटणारी आहे.

मित्र हो -आत्ता पर्यंतच्या बारा- लेखातून  - ३६ कथांचा परिचय लिहितांना  एक वाचक म्हणून , एक कथा लेखक म्हणून 
मला खूप काही शिकायला मिळाले , कथा -या साहित्य प्रकारातील विविधता पाहून मन थक्क झाले . व्यक्ती तितक्या 
प्रवृत्ती , आणि व्यक्ती तितक्या प्रकृती " या दोन्हीं उक्तींची प्रचीती मला या कथांच्या वाचनातून घेता आली.
कुबेर समुहाचा पहिला कथा-संग्रह .."आरंभ " असो ,आणि प्रस्तुत  दुसरा संग्रह .संवादिनी .हा कथा संग्रह असो ,
दोन्ही संग्रहातील सगळ्याच कथा मला वाचावयास मिळाल्या आहेत याचे
कारण म्हणजे-
आरंभ "संग्रहाच्या संपादन -कार्यात मला सहभागी होता आले , आणि " संवादिनी" संग्रहाचे आस्वादन लेखन करता आले आहे.
हे सांगण्याचे प्रयोजन असे आहे की .. कुबेर समूहातील साहित्यिकांच्या लेखनाचा मी एक समग्र वाचक " नक्कीच झालो आहे.
मित्र हो-
संवादिनी "संग्रहाचा हा १३ वा लेख आता-"समारोपाचा लेख आहे",
म्हणून हे मनोगत व्यक्त करावेसे वाटले.
आजच्या या लेखात शेवटच्या चार कथांच्याबद्दल लिहितो आहे त्या खालील प्रमाणे -

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

१.कथानुक्रम -३७ - कथा -शीर्षक - चिकूआजी , (पृ- १८० ), ले- राधा पंडित -ठाणे .
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
माणसातील घट्ट अशा नाते-बंधाचे भावस्पर्शी चित्रण लेखिका-राधा पंडित ..यांनी चिकूआजीच्या व्यक्तिरेखेतून  मोठ्या मनस्पर्शी शब्दातून रेखाटले आहे.

ही कथा चिकुआजीची जीवन-संघर्ष   कहाणी सांगते .  कथा -फ्रेममध्ये अगदी बंदिस्त म्हणता येईल अशी ही  कथा.चीकुआजीच्या भोवतीच फिरते , त्यांच्याबद्दल 
जे सांगते ते खूप  जिव्हाळ्याने सांगते . जिथे आपलेपणा असतो , तिथेच जीव लावला जातो. कधी हे पारिवारिक- नाते असते , कधी त्याचे स्वरूप  मैत्रीतुन आणि सहवासातून जडलेले 
भावनिक नाते असते . अशा नात्यांची हे कथा आहे.

लेखिका राधा पंडित यांच्या कथेतून हा भावनिक प्रवाह वाचकांना जाणवतो कुसुम आजीच्या नशिबात लौकिक  अर्थाचे सगळे वैभव होते हे सांगतांना
 ..तिच्या दुर्दैवी नशिबाबद्दल ..कुसुम आजीची ही लाडकी नात ..भावव्याकुळ होऊन आजीची कहाणी सांगते .
काही व्यक्ती ..जन्मास येतात तेच .कम-नशीब घेऊन .मग ..त्यांचे आयुष्य ,दुर्दैवी असे म्हणवले जाते 
..कुसुमआजीच्या वाट्याला असेच नशीब आलेले आहे, आणि भोग भोगणे ही तसेच ",  पण, नशीबासमोर हतबल न होणारी .
कुसुमाजी तिच्यातील कणखर वृत्तीच्या बळावर सगळ्या गोष्टीवर मात करीत हसतमुखाने जगत आलेली आहे .
लाडक्या नातीवरचे या आज्जीचे प्रेम ..चिकू या फळासारखे गोड आणि रसाळ आहे..चिकू म्हटले की गोड फळ, आणि त्या उलट "चिक्कू " म्हटले की वृत्ती ,

आणि ही कुसुमाजी " चिक्कू "नाहीये ..
ती मोठ्या मनाने सर्वांना आनंदच वाटत फिरणारी आहे, शापित कुसुमआजीच्या आयुष्याची ही रुपेरी किनार .. लेखिका राधा पंडित यांनी खूप छान रंगवली आहे.

आपलेपणाच्या भावनेत चिंब भिजलेली कथा आणि यातील कुसुमआजी ,त्यांची लाडकी नात .. दोघी वाचकांच्या मनात नक्कीच घर करतात.

 लेखिका राधा पंडित यांना लेखन शुभेच्छा .

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

२. कथानुक्रम - ३८ -  कथा -शीर्षक -निर्णय  (पृ .१८३ ) , ले- सौ.संगीता चव्हाण - गोवा 
--------------------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रीचे व्यक्तिमत्व एकाच वेळी किती स्वरूपात पहावयास मिळते ,? त्यासाठी लेखिका -संगीता चव्हाण यांची "निर्णय "
ही कथा जरूर वाचली पाहिजे . माणसाच्या मनाच्या दोन अनावर अशा भुका असतात ..एक असते शारीरिक सुखाची ..
या भूकेतच जीवनाची , जगण्याची इतिकर्तव्यता असते " असेच मानणारे आपल्या भवताली आहेत .कारण ."या शारीरिक 
सुखापायी ..त्याच्या हव्यासापायी , लालसेपोटी .. स्त्री-पुरुषांच्या आयुष्यात वादळे आलेली आहेत ,संकटे उदभवली आहेत ".
पुरुषी-मनात स्वतःसाठीच फक्त
शारीरिक सुख "या भावनेची प्रबलता इतकी आहे की .."मानसिक सुखाच्या भावनेला .कवडीची किंमत द्यायची गरजच 
नसते " ' या दृढभावनेतून ..स्त्री मनाची , आणि वैवाहिक जीवनात .पुरुष जोडीदार .आपल्या स्त्री जोडीदाराची कधीच कदर करीत 
नाहीत " 
अशा अत्यंत महत्वाच्या विषयावर ..लेखिका संगीता चव्हाण यांनी कथा लेखन केले आहे. "निर्णय " या कथेतील नायिका "ती "
एकाच वेळी सगळ्या स्त्री रूपाचे प्रतिनिधित्व करते आहे..तिच्या वैवाहिक जीवनाला बारा वर्षे झालीत , पण ती वनवास "भोगत होती .

लग्न होऊनही ..पतीने ..बायको म्हणून तिचा स्वीकार केलेला नाहीये ..किती जीवघेणी शिक्षा भोगावी लागली आहे "तिला ",
आणि तिच्या ..मनाची भावनिक गरज .दुसरी तिसरी नसून ..शारीरिक सुखाची भूक "आहे ..हे सुद्धा समजून न घेणारा नवरा असणारी 
दुर्दैवी .पत्नी ..हे तिचे स्त्री रूप ..फारच क्लेशदायी आहे..

"सोडून जा " हे शब्द ऐकून मन बंद करण्यास प्रवृत्त होते .आणि दुसऱ्याच क्षणी तिचा  जाण्याचा निर्णय " विरघळून जातो ",
या प्रसंगी "तिच्यातले ..कोणते "स्त्री -रूप " दिसते ? या साठी ही कथा वाचलीच पाहिजे .

मित्र हो .संवादिनी संग्रहातील कथा शब्द संख्येने दिसतात खूप लहान ..पण, त्यातील आशय ..मोठा गहन असतो ",
लेखिका -संगीता चव्हाण ..यांच्या निर्णय" कथेबद्दल असेच म्हणता येईल.
त्यांना लेखन शुभेच्छा .

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

३. कथानुक्रम - ३९ .शीर्षक - ज्ञानोत्सव  (पृ.१८५ ) - ले- सौ.शोभा दळवी - मुंबई 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
बाल-कुमार मित्रांसाठी असावी अशी ही छान -सुंदर- प्रेरक कथा आहे.. नीता नावाच्या गुणवंत मुलीची गोष्ट लेखिका शोभा दळवी 
अगदी सहज शैलीत सांगितली आहे. 

नीताला ..तिच्या शेजारच्या दहावीत शिकणाऱ्या अजिंक्य दादा मुळे "अभ्यास कसा केला पाहिजे ,
अभ्यास आणि पूर्वतयारी " हे किती महत्वाचे आहेत .हे देखील नीताला या दादामुळेच कळते 
एका अर्थाने  नीताला ..योग्य संगतीचा लाभ झाला , आणि खुल्या मनाने तिच्या मनाने या गोष्टीचा स्वीकार केला , विद्यार्थ्याचे 
कर्तव्य " "ज्ञानोत्सव " ही कथा सांगते .

नीताच्या आचरणातून ..त्याचे फळ तिला काय मिळते ..त्याची ही सुंदर अशी बोध-कथा आहे.

लेखिका - शोभा दळवी यांनी या संस्कारक्षम कथेचे बाल-कुमार मित्रांसाठी अभिवाचन करावे , हे संस्कार -कार्य "त्यांच्या हातून होवो ,
यासाठी शुभेच्छा .

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कथानुक्रम -४० . कथा -शीर्षक - अबोल - एक प्रेम कथा  (पृ-१८८ )- ले- हरीश कांबळे - दापोली 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संग्रहातील बहुसंख्य कथा कमी शब्द- संख्येच्या त्याची सवय झालेली असतांना .. ले- हरीश कांबळे लिखित ..अबोल..एक प्रेमकथा " 
ही शेवटची कथा इतर कथांच्या  तुलनेने ..दीर्घ अशी ..एक भावूक ..प्रेम कहाणी ..आहे.
 ... यातील नायक  "तो ज्याचा असाच उल्लेख पूर्ण कथानकात लेखकाने 
 "तो " असाच  केला आहे .

 "तो " म्हणजे राधेवरच्या एकतर्फी प्रेमात दिवाना झालेला , प्रेम-रोगाने पछाडलेला ..प्रेमवीर आहे.. त्यामुळे ..त्याचीप्रदीर्घ व्यथा
म्हणजेच ही कथा ,आपण  वाचीत जातो .. 
  एकतर्फी -प्रेमाची .ही शोकांतिका आहे हे कथा -रहस्य (?) माहिती झाल्यामुळे 
सहनशील वाचक-मित्र ही भूमिका स्वीकारून ही कथा वाचावी लागते .

 "नायिका ..राधा " .तिचे वर्णन .. लेखकाने .प्रेमकथेत शोभावे असे अगदी यथोचित शब्दात केली आहे.
.त्यात पुन्हा , हा कथानायक  "तो " ..राधाच्या "  प्रेमात (एकतर्फी ) इतका बुडून गेलेला आहे की
. एकतीस वर्ष नंतर ,त्याच्या प्रेमाची ओढ  तीच आहे ..फक्त ..आता त्यात थोडी अपराधाची जाणीव आहे ..
ती म्हणजे .त्याच्यात  उणीवाच उणीवा असून ही ..राधेवर प्रेम करण्याचा अपराध "तो -च्या  "हातून घडला आहे.अशी त्याची भावना होत जाते ,
या अपराधाबद्दल राधेने त्याला माफ करावे " बस इतकेच . 
कारण  जीवनप्रवसात  "तो " मध्ये खूप बदल होतात , त्यामुळे या जीवनाच्या प्रवासात तो पुढे खूप प्रगल्भ 'वगरेझालेला आहे असे लेखकच आपल्याला सांगतो..
आणि अचानक ..राधा आणि त्याची समोरासमोर भेट होणार ..तो क्षण ..
एकतीस वर्ष नंतर लाभला आहे ..या एकतर्फी ..प्रेमाचे काय होते ?, 
राधा ..त्याला अपेक्षित असलेला प्रतिसाद कसा देते ..ही उत्सुकता 
वाचक म्हणून आपल्याला असतेच ..त्यासाठी ,,हे कथा जरूर वाचावी.

लेखक हरीश कांबळे यांची ही लेखन शैली ..कथालेखना इतकीच -कादंबरी लेखनास अनुकूल आहे "असे सुचवावे वाटते.

लेखकाची ही कथा - जुन्या काळातील एखाद्या लोकप्रिय चित्रपटाची आठवण करून देईल ..अशी ..फिल्मी- स्टोरी नक्कीच झाली आहे.

प्रदीर्घ लेखन करण्याची क्षमता हरीश कांबळे या लेखकात आहे हे जाणवते ..त्यामुळे ..भविष्यात ..या लेखकाकडून एखादी बहारदार प्रेम -कादंबरी यावी अशी शुभेच्छा करू या .
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 #संवादिनीकथासंग्रहपरिचय - समारोप - लेख -
लेख- १३ वा 
 ले-अरुण वि.देशपांडे .पुणे.
९८५०१७७३४२ 
----------------------------------------------------------------------

Wednesday, May 27, 2020

#संवादिनीकथासंग्रहपरिचय - लेख -१२ -वा. ले-अरुण वि.देशपांडे

#संवादिनीकथासंग्रहपरिचय - लेख -१२ - वा. ले-अरुण वि.देशपांडे .
लेखिका -  १. ऋतुजा उमेश कुलकर्णी , २..डॉ.जयश्री बारई- गिरडकर , ३. अंजली मराठे 
--------------------------------------------------------------------------------------------------------

नमस्कार मित्र हो -
संवादिनी कथा संग्रहातील कथांचे वाचन करतांना एक वाचक म्हणून मला या कथांनी खूप 
वाचन -आनंद दिला . यातील कथा लेखकांनी   आपल्या लेखन -गुणांचा परिचय कथेतून करून देत
कथा वाचनीय व्हावी " याचे लेखकीय भान ठेवले आहे ",हे सांगावेसे वाटते.
या वैशिष्ट्यामुळे संवादिनी कथा-संग्रहातील कथा वाचकांच्या स्मरणात दीर्घकाळ असतील "


आजच्या लेखात ज्या कथांबद्दल सांगणार आहे त्या कथा खालील प्रमाणे -
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

१. कथानुक्रम -३३ -, शिर्षक- योगायोग  (पृ.१६६ ), ले- ऋतुजा उमेश कुलकर्णी - रत्नागिरी 
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वामनराव आणि त्यांची पत्नी यांच्या सहजीवनाची  ही कथा .. 
 हळव्या भावकवितेने कथेचा आरंभ होतो  .
आणि कवितेच्या आशयातून कथेत काय असेल ? याचा अंदाज वाचकांच्या मनात सुरु होतो , ही प्रेम-कथा 
आहे असे म्हणता येईल ,पण ती तरुणाईची नसून ..परिपक्व -समंजस अशा एका जोडप्याच्या सह-प्रवासाची आहे.

या सह-जीवनाच्या प्रवासात ..जोडीदाराचे अचानक मध्येच साथ सोडून निघून जाणे " हे संकट , वियोग , वामनरावांच्या 
वाट्याला येणे . ही घटना चुटपूट लावणारी , मन व्याकूळ करणारी आहे. तसेच या कथेतील "योगायोग " असाच 
चटका लावणारा आहे..

वामनरावांच्या संजीवानीचा हट्ट, तिचा संकल्प , तिची अट " त्याची पूर्तता कोणत्या योगायोगाने पूर्ण होते "
हे सगळे कथा वाचून जाणून घेण्याची गोष्ट आहे.

लेखिका ऋतुजा उमेश कुलकर्णी .यांची ही कथा आजकालच्या  "अलक -अति लघुकथा " श्रेणीतली नसेल ही ,
पण,  "योगायोग " या कथेला लघुत्तम कथा " असे सर्वार्थाने म्हणता येईल .
 " मोजक्याच  शब्दात -नेमकेपणाने लेखन "हे त्यांचे वैशिष्ट्य या कथेतून नक्कीच जाणवते 

लेखिका- ऋतुजा उमेश कुलकर्णी या  कथा -कविता -ललित लेखन सातत्याने करणाऱ्या साहित्यकारा आहेत, 
वाचकांना त्यांचे लेखन परिचित आहे.त्यांना लेखन-शुभेच्छा .

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

२. कथानुक्रम - ३५ - शिर्षक - वळवाच्या पावसाची सर .. (पृ.१७३ ),ले-  डॉ. जयश्री बारई- गिरडकर - नागपूर 
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कवितेची ,किंवा एखाद्या भावगीताची  ओळ वाटावी असे हे काव्यमय कथा शिर्षक ..लक्ष वेधून घेणारे आहे.,
प्राध्यापक असलेल्या श्रीकांतची असफल प्रेमाची कथा -एक शोकांतिका आहे असे वाटू लागते , पण 
कथानकातील  अनपेक्षित वळणाने कथेचा आशय बदलतो आणि ती एक वेगळ्या प्रेमाची कथा होऊन जाते ,
प्रेमाच्या या नात्यास ..उदात्त भावनिक नात्यातील प्रेम " असे आपण म्हणू या.

श्रीकांत आणि प्राजक्ता .. कोवळ्या मनाची ,अबोध आणि स्वप्नाळू मने  असणारी  युवा -जोडी .
त्यांची भेट , सहवासाचे क्षण , श्रीकांतच्या मनात प्राजक्ता विषयीच्या निर्माण झालेल्या भावना " हा सगळा 
भाग तरुण वयातील प्रेम भावनेचा रम्य-भावूक असा अविष्कार " लेखिका डॉ.जयश्री बारई यांनी सुंदर शब्दात 
मांडला आहे 
नंतरच्या एका प्रसंगाने .श्रीकांत आणि प्राजक्ताच्या आयुष्याला कलाटणी मिळते ..हा प्रसंग , ती घटना 
कोणती ,?श्रीकांत स्वतःला क्षमा करू शकत नाही , असे काय झाले असावे ?
याची उत्तरे ही छान कथा वाचूनच मिळतील .

श्रीकांत -प्राजक्ता आणि स्पृहा ..तीनही व्यक्तिरेखा कथेचे आकर्षण -बिंदू आहेत. ललित-लेखनास अनुकूल असलेली 
रम्य -वर्णनप्रचुर लेखन शैली लेखिकेस लाभलेली आहे . 
श्रीकांतची ही कथा .खरोखरच ,,वळवाच्या पावसाची सर "
आहे, ज्यात आपण कोरडे राहूच शकत नाहीत , भिजणार हे नक्की .

डॉ. जयश्री बारई- गिरडकर यांच्या लेखन-प्रवासास शुभेच्छा .

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

३.कथानुक्रम -३६ - शिर्षक - आदर्श  (पृ. १७७  ), ले- अंजली आशुतोष मराठे - गुजरात 
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या आयुष्याला , आपल्या जगण्याला अर्थपूर्ण करणाऱ्या व्यक्तींचा सहवास लाभणे हा खरोखर एक मोठा भाग्य-योग 
असतो . संपन्न व्यक्तिमत्व आणि जीवनाचे सार्थक झाले "  असे .. वाटणाऱ्या कर्मयोगी व्यक्ती सगळ्यासाठी 
प्रेरक -आदर्श -उदाहरणे असतात . 

आदर्श " या कथेतून .नेहा आपल्या सुधा आज्जीच्या आदर्श जीवनाचे मर्म जाणून घेते . समारंभ नंतर या दोघींचे 
जे बोलणे चालू असते .ते संवाद विलक्षण मन-स्पर्शी आहेत.

लेखिका अंजली मराठे यांनी या कथेत ..आजी-आणि तिची नात  या नात्याचे सुंदर असे भावनिक पदर उलगडून दाखवतांना
सुधाआजीच्या आगळ्या-वेगळ्या आयुष्याची गोष्ट सांगितली आहे.

देशभक्ती ,देशप्रेम , देशाभिमान , देशासाठी त्याग "या प्रखर भावना सुधाआज्जीच्या कुटुंबातच होत्या , त्याचे सुरेख 
वर्णन नेहा आणि सुधा आज्जीच्या संवादातून आपल्याला होते .
 सैनिकाचे कुटुंब आणि त्या घराची धीरोदात सुधाआज्जी ...
हे सगळेच विलक्षन रसायन असलेली व्यक्तिमत्व आहेत हे आपल्याला जाणवते आणि मन भारावून जाते.
ताठ मानेने सलाम करणाऱ्या सुधाआज्जी समोर आपण आपोआप नतमस्तक  होऊन जातो..  सैनिक कुटुंबाची ही कथा वेगळेपणामुळे लक्षात रहाते.

कुमार -वयोगटातील बालमित्रांसाठी ही एक उत्तम अशी "आदर्श "कथा नक्कीच आहे.. हे वेगळेपण मला जाणवले .

लेखिका अंजली मराठे यांनी या कथेचे अभिवचन बाल-मित्रांसाठी जरूर करावे , खूप छान होईल हे.
इथे ही कथा ..मोठ्यांच्या कथा -संग्रहात आलेली  असली तरी ..कथेचे "आदर्श -रुप  " सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारे  आहे.

लेखिका अंजली मराठे यांना लेखन -शुभेच्छा .

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------.
#संवादिनीकथासंग्रहपरिचय - 
लेख -१२ -वा.
 ले-अरुण वि.देशपांडे -पुणे.
९८५०१७७३४२ 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

#संवादिनीकथासंग्रहपरिचय - लेख -११ वा. ले-अरुण वि.देशपांडे

#संवादिनीकथासंग्रहपरिचय - लेख -११ वा. ले-अरुण वि.देशपांडे .
लेखिका - १. प्रतिभा टेकाडे  , २..गीता विश्वास केदारे , ३. स्मृती पाटील 
---------------------------------------------------------------------------------------------
नमस्कार मित्र हो., कुबेर प्रकाशनच्या 
संवादिनी या कथासंग्रहाचा परिचय करून देणार्या लेखमालेची वाचकांना सवय झालेली आहे ,
ही  गोष्ट  माझ्या या लेखन-उपक्रमास प्रोत्साहन
 देणारी आहे , त्यासाठी आपणा सर्व वाचकांचा
मी आभार आहे .

आजच्या लेखात आपण ज्या तीन कथांचा परिचय वाचणार आहात , त्या लेखिकांनी लिहिलेल्या या कथा आहेत. तसे पाहिले तर संवादिनी कथासंग्रहात लेखिकांनी लिहिलेल्या कथा संख्येने जास्त आहेत.

 १. या संग्रहातील कथानुक्रम२९.असलेलीकथा
भूक  (पृ.१५२ ) ले- प्रतिभा टेकाडे - बंगळुरू
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखिका -प्रतिभा टेकाडे या कवयित्री म्हणून देखील वाचकांना परिचित आहेत. त्यांच्या काव्य-रचना संग्राह -रुपात 
प्रसिध्द झाल्या आहेत . कथा आणि काव्य .साहित्याचे हे दोन्ही महत्वाचे प्रकार सहजतेने लिहिणे साध्य झालेल्या 
साहित्यिका - प्रतिभा टेकाडे .. यांनी लिहिलेली कथा .भूक ..
माणसाच्या आदिम भावनेवर भाष्य करते .  

भुकेला माणसाला .गरज असते ती फक्त चार घास पोटात जाण्याची ",
मग हे अन्न  आणि त्यातले पदार्थ ..ताजे की शिळे , उष्टे की चांगले ..या शंका त्याच्या भुकेल्या मनात येतच नसतात ,
त्याच्या पोटातली भुकेची आग शमली पाहिजे बस्स.!

अशा या भुकेचा " विषय लेखिका -प्रतिभा टेकाडे यांनी ..भूक " या कथेत अतिशय परिणामकारक रित्या मांडला आहे.
यातील प्रसंग खूप दुर्दैवी आणि दुखाचा आहे ..त्यामुळे कथेतील वातावरण करुण"वाटावे असे आहे .

 दोन व्यक्तींमधले  मालक आणि नोकर हे नाते किती ही व्यावहारिक असले तरी . काही माणसे आपल्या स्वभावामुळे अशी नाती सुद्धा 
कशी भावनिक आणि जिव्हाळ्याची बनवतात .. हे मोठ्या मालकीणबाई-आनंदी बाई आणि त्यांच्याकडे असणारी 
कामवालीबाई - रुक्मिणी "यांच्यात निर्माण झालेल्या नातेबंधाचे चित्रण लेखिकेने छान केलेलं आहे .

अशा आनंदीबाईंच्या आकस्मिक जाण्याने रुक्मिणीच्या समोर जी परिस्थिती निर्माण झालीय .
.त्याला रूपामैडम मुळे अधिक गंभीर वळण  लागते ..तिच्या मनातील आंदोलन  माणसांच्या स्वभावावर आहे.

भूक " आणि माणूस , ही लढाई तर आपण पाहतोच , या कथेतील आई- रुक्मिणी तिच्या दोन लहान ..भुकेल्या मुलांची 
भूक कशी भागवते .आणि त्या पसंगी तिच्या मनात काय विचार चालू असतात .. त्यासाठी कथाच वाचायला हवी आहे.

नेमकेपणाने केलेले लेखन "  लेखिका प्रतिभा टेकाडे यांचा लेखनविशेष या कथेच्या निमित्ताने जाणवतो.
त्यांच्या  लेखन-प्रवासास  शुभेच्छा .
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

२. कथानुक्रम -३० - कथा - प्रकाशमय झाली दिवाळी  (पृ.१५५ ) - ले- गीता विश्वास केदारे - मुंबई 
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
.विविध लेखन प्रकार सातत्याने लिहिणाऱ्या साहित्यकारा . विविध नियतकालिके , कवी-संमेलने आणि 
साहित्यविषयक संस्थामक कार्यात सक्रीय सहभाग असणार्या लेखिका,अशी ओळख  
मुंबईच्या गीता विश्वास केदारे यांची आहे.

प्रकाशमय झाली दिवाळी " ही त्यांची कथा ..समीर आणि मयुरी या जोडप्याच्या सहजीवनाची प्रेमळ भावनिक कथा आहे.
समीरच्या आयुष्यात मयुरी येते आणि त्याचे भावविश्व उजळून जाते ..त्यांच्यातील पती-पत्नीचे नाते लेखिकेने खूप छान 
शब्दात रंगवले आहे. 

समीरच्या अशा सुखी आणि आनंदी पारिवारिक जीवनाला ..अचानक ग्रहण "लागते ..आणि 
या घटनेमुळे उध्वस्त झालेला समीर ..वास्तवात तर जगत असतो ..पण, मानसिकदृष्ट्या तो मयुरीशी बोलत असतो,
हे आभासी जगणे "समीर आणि मयुरीच्या आयुष्यचे चित्र दाखवणारे आहे. 

समीर आणि मायुरीचे जीवन आनंदात सुरु असतांना ..त्याची ही जीवन कहाणी एक शोकांतिका कशी होते ?
याची कथा लेखिका गीता विश्वास केदारे वाचकांना हळव्या आणि भावूक शब्दात सांगतात .

कथेतील समीर ,मयुरी आणि या जोडप्याची मुलगी -परीराणी " या व्यक्तिरेखा वाचकांच्या मनावर प्रभाव पाडणाऱ्या आहेत.
लेखनाला शोभेल अशी चमकदार भाषा आणि शब्दरचना "कथेला वाचनीय बनवते 
शोकात्मक कथानकाची ही ..कथा प्रभावी झाली आहे.

त्यांच्या लेखन प्रवासास  शुभेच्छा 
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

३. कथानुक्रम - ३१ - कथा - आवेश (पृ.१५९ ). ले- स्मृती अभिजीत पाटील 
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
मुलांचे भावविश्व आणि त्यातील त्यांचे प्रश्न ,असणार्या समस्या ..याबद्दल लिहिणे हे प्रबोधन कार्य करण्या इतके महत्वाचे आहे.
- स्मृती अभिजीत पाटील - मुंबई .. या लेखिकेची 
आवेश " या शीर्षकाची कथा हे महत्वाचे कार्य करते .आवेश "नावाच्या छोट्या मुलाची ही छोटी कथा आहे ,
पण याचा आशय खूप व्यापक आहे. काही विषय ,समस्या असतातच अशा की,
त्यांचे होणारे परिणाम हे जास्त गंभीर आणि व्यापक असतात.

 महानगरातील जीवनशैली , त्याचा मुलांच्या जगण्यावर होणारा  -, -अनिष्ट परिणाम  कसा होतो आहे , 
या बद्दल सर्वांनी विचार करणे ही आजच्या आई-बाबांची , पालकांची गरज आहे "
याबद्दल गंभीरपणे विचार केला जावा असा इशारा  हे कथा देते ..हे या कथेचे मोठेच सामाजिक -संदेश कार्य आहे "

मुलांचा होणारा भावनिक कोंडमारा कस होतो ' हे सांगताना शेवटी लेखिका सांगते आहे की-
समाजात कित्येक आवेश आहेत. त्यांना मोकळं आकाश देणं , मुलांना त्यांचं शिक्षण हे हसत खेळत मिळवून देणं  उज्ज्वल 
भारताचा पाया भक्कम करण्या सारखे नव्हे काय ?
अशा वेगळ्या दृष्टीकोनातून या विषयाला कथेतून व्यक्त करणाऱ्या लेखिकेचे - स्मृती पाटील यांचे अभिनंदन केले पाहिजे.

त्यांच्या लेखन-प्रवासास शुभेच्छा 
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#संवादिनीकथासंग्रहपरिचय - 
लेख -११ वा.
 ले-अरुण वि.देशपांडे -पुणे.
९८५०१७७३४२ 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Tuesday, May 12, 2020

#संवादिनीकथासंग्रहपरिचय- लेख - १० वा . ले- अरुण वि.देशपांडे

#संवादिनीकथासंग्रहपरिचय- लेख - १० वा . ले- अरुण वि.देशपांडे
लेखक - १.सुहास कुलकर्णी , २.वृंदा कुलकर्णी , ३. राजश्री भावार्थी
--------------------------------------------------------------------------------------------
नमस्कार वाचक-मित्र हो ,
कुबेरसमूह प्रकाशित  -हा दुसरा संग्रह - संवादिनी , 
यातील  चाळीस (४०) कथांचा परिचय करून  देणाऱ्या
लेखमालेचा आजचा हा दहावा भाग सादर  करतांना ,असे वाटते आहे - की -

कथा -कादंबरी म्हणजे आपल्या जीवनाचे अनेक रंग दाखवणारे साहित्य असते .लेखक आपले
जीवनानुभव , जीवन विषय दृष्टीकोन , आणि त्यातून आपले स्वताचे विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करीत 
असतो . 
कथा हा लेखन प्रकार या वैशिष्ट्यामुळे वाचकप्रिय आहे. संवादिनी " मधील कथा देखील  अशाच आहेत.
या कथा लेखना वाचकांशी संवाद साधणाऱ्या आहेत " असेच वाचकांना वाटते .
संग्रहाचे  संवादिनी "शीर्षक त्यामुळे समर्पक वाटणारे आहे . 

या लेखात - खालील 3 कथांचा परिचय करून घेऊ या-  
------------------------------------------------------------------------------------------
१.कथा - निकाल -(पृ.१४० ), ले- सुहास कुलकर्णी - मुंबई 
------------------------------------------------------------------------------------------------------------
एस.टी.महामंडळातील कर्मचारी "अण्णा ", त्यांच्या सौभाग्यवती निर्मला -ज्या गृहिणी आहेत, या जोडप्याची 
एकुलती एक कन्या रेवती यांची ही कथा आहे.

 सुरक्षित जीवनशैलीच्या चौकटीत राहणाऱ्या  कुटुंबाला  ज्यावेळेस आजच्या विपरीत असुरक्षित
 अशा वातावरणाच्या वाढत चालेल्या प्रभावाचा फटका बसतो 
"आणि मोठेच संकट "समोर  उभे राहते .मग 
अण्णा आणि त्यांचे कुटुंब या संकटाचा सामना कसा करतात त्याची ही थ्रिलर कथा आहे.

वाईट-प्रवृत्तीच्या माणसाना  कुणाचा कसा छुपा वरदहस्त असतो " ही  लपून न राहणारी गोष्ट 
असते " पण ,म्हणतात न , सामन्य माणसाचा कुणी वाली नसतो ..याची जाणीव होते , मग, अशा संकटातून 
बाहेर कसे पडायचे " ?

त्यासाठी जीवावर उदार होतात माणसे " आणि स्वताच्या कुटुंबाची सुटका करून घेतात .आणि प्रश्नाचा "निकाल " लागतो .
पण, त्यासाठी त्यांनी निवडलेला  मार्ग ..योग्य की की अयोग्य ? 

लेखक सुहास कुलकर्णी  यांनी हाच विषय  वेधकशैलीत मांडतांना -  पोलीस ,पोलीस कारवाई ,
असामाजिक घातक घटक , त्यांच्याकडून महिलांना होणारा त्रास हे नेमकेपणाने मांडले आहे ,त्यामुळे हे लहानशी कथा 
खूप लक्षवेधक झाली आहे.
लेखक सुहास कुलकर्णी यांना लेखन-शुभेच्छा .
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२. कथा - पाहुणा  (पृ. १४४ ), ले- वृंदा पठाडे -कुलकर्णी - बोईसर 
-------------------------------------------------------------------------------------------
आपल्या संस्कृतीत ..अतिथी "हा देवोभव आहे . आलेला "पाहुणा " त्याचा उत्तम पाहुणचार " करायचा असतो "

या गोष्टी आपल्या विचार - आचार यांचा भाग आहेत . प्रत्येकजण आपल्या ऐपती प्रमाणे योग्य तो पाहुणचार "करीत असतो .
आपल्याकडे येणाऱ्या "पाहुण्यांचे  अनेक प्रकार आहेत ,त्या त्या प्रमाणे "पाहुणचार केले जातात आणि त्याची  बडदास्त ठेवली जाते .

प्रस्तुत संग्रहातील 
पाहुणा " या कथेत जो पाहुणा आहे ..तो कोण ? यासाठी ही कथा आवर्जून वाचायला हवी . कथेच्या शेवटी लेखिका - वृंदा 
पठाडे -कुलकर्णी या पाहुण्या बद्दल आपल्याला सांगतात. त्यामुळे इथे या पाहुण्याबद्दल तुम्हाला काहीच न सांगता उत्कंठा कायम ठेवणे योग्य ठरेल.

कथा व्यक्तीच्या मनातील पाहुण्या विषयी असलेल्या भावनिक आपलेपणाची आहे. हक्काच्या आणि जवळच्या आपल्या माणसा ला 
आपण मनातले खूप काही ..मनापासून सांगत असतो.
अण्णा " ही व्यक्तिरेखा  खूप छान रेखाटली गेली आहे. त्यांच्या व्यक्त होण्यातून वाचकांना -एक रसिक, बहुश्रुत ,आणि कुटुंब वत्सल 
गृहस्थ भेटल्याची अनुभूती येईल .
 अशी पारिवारिक कथा ..भावनावश करणारी आहे.
लेखिका वृंदा पठाडे -कुलकर्णी यांच्या लेखन-प्रवासास शुभेच्छा .
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

३.कथा -मनोमिलन - (पृ.१४८ )  ले- राजश्री  भावार्थी - पुणे.
------------------------------------------------------------------------------
आपले कौटुंबिक जीवनमान  नाती आणि त्यातील संबंध यावरच चालते .कोण, कुणाला , कशा शब्दात , कोणत्या  उद्देशाने बोलतो  ?
त्या बोलण्यातुन मग "घडले -बिघडले "चा  खेळ चालू होतो. 

या सगळ्यात  गोंधळ न करता आपला  भावनिक  तोल सांभाळणे जमत असते  " अशी माणसे ,"  खरी समजूतदार माणसे " असतात असे म्हणू या. 
मनोमिलन ही कथा  अशाच समजूतदार माणसांची आहे.
लेखिका -राजश्री भावार्थी "यांनी लिहिलेली ही कथा आहे.

रोजच्या दैनंदिन प्रसंगात आपणकौटुंबिक जीवनात वावरतांना इतरांशी  कसे वागत असतो .आणि प्रत्येक प्रसंग त्यात आपले काय ?
 असे - स्व-केंद्रित होऊन वावरत असतो. हे सगळे काही कथेतून अतिशय सध्या .सरळ आणि भावनिक शब्दातून लेखिकेने मांडले आहे.
शरयू " ही व्यक्तिरेखा ..प्रातिनिधिक आहे, आजूबाजूच्या घरात शरयुचे हे असणे , दिसणे  सहज संभव आहे.

समजूतदारपणा , समंजसपणा  हे  गुण आपल्यातील "माणूसपणा " मोठाच करीत असतात.. हे शरयूला तिच्या मैत्रिणीनी 
योग्यवेळी खूप छान समजावून दिले आहे. शरयू ला हे पटलेले आहे हे जास्त सुखद आहे .
लेखिका राजश्री भावार्थी यांनी हे अतिशय सुरेख लिहिले आहे.

कथेचे ओघवतेपण .मन प्रसन्न करणारे आहे.
लेखिका - राजश्री भावार्थी यांच्या लेखनास शुभेच्छा .
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#संवादिनी परिचय लेख - 
लेख- १० वा . 
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
९८५०१७७३४२ 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पुस्तक-परिचय लेख - ले- अरुण वि.देशपांडे - पुणे- काव्यज्योत " कविता संग्रह .

पुस्तक-परिचय लेख -
 ले- अरुण वि.देशपांडे - पुणे.  
--------------------------------------------------------------------------------

"परिसर उजळून टाकणाऱ्या कविता "
 काव्यज्योत " कविता संग्रह .
बाल-कवयित्री  कु.साक्षी सीताराम लाड 
--------------------------------------------------------------------------------------------------------
कवी ,कविमन आणि कविता ..या तीनही गोष्टीसाठी आवश्यक असते ते अनुकूल परिस्थिती ,प्रेरक आणि 
मार्गदर्शक व्यक्तींचा सहवास ,
असे काहीसे पूरक असे वातावरण ..देशिंग-हारोली- या गावात असलेल्या श्री महालक्ष्मी हायस्कूलची  
विद्यार्थिनी असलेल्या कु.साक्षी सीताराम लाड ..हिच्या मनातल्या कवीला कविता लेखनासाठी  मिळाले आहे.

या शाळेत तिला प्रोत्साहन देणारे मार्गदर्शक भेटलेत , कवितालेखन करणार्या वर्गमैत्रिणी भेटल्या आहेत .
 साहजिकच 
कु.साक्षी या बाल-कवयित्रीच्या कविता लेखनाला एक खुले आकाश मिळाले , सुंदर सुंदर पक्षांचे थवे जसे 
विशाल गगनात विहरू लागतात ..तशा या बाल-कवियीत्रीच्या कविता सर्वांना शब्दरूपात पहायला मिळू लागल्या .

मुळातच कविमन लाभलेल्या व्यक्तीला ..तो वयाने मोठा आहे म्हणून कविता लिहू शकतो ..असे मुळीच नाही ..
तर उपजत प्रतिभा , कविता लेखनाची उर्मी , , शब्दातून व्यक्त होण्याची धडपड , आणि मनात असलेली तळमळ ",
हे सगळं कवीच्या ठायी दिसत असते ".
असा एक  कवी " आपल्याला  साक्षी लाड सारख्या शालेयविद्यार्थिनी मध्ये दिसू लागतो ",आणि तिच्या कविता मधूनही जाणवतो .
नव्या पिढीच्या प्रगल्भतेचे एक छान उदाहरण म्हणून बाल-कवयित्री- साक्षी लाड हिचा उल्लेख करता येईल.

कवी अस्वथ मनाचा असतो ..त्याला जे दिसले ..त्याने जे पाहिले ..त्यातले काय वाईट आहे, काय मंगलमय आहे ..हे तो ज्या 
पद्धतीने आणि ज्या अचूक शब्दातून सांगत असतो ..त्यालाच आपण वाचक- "कविता " असे म्हणतो .
बाल-कवयित्री कु.साक्षीच्या अशा अनेक कवितां
तिच्या " .काव्य ज्योत " नावाच्या संग्रहातून आपल्या भेटीस येतात " हे सगळे खूप   कौतुकाचे आहे. 

श्री.वसंत पाटील सरांनी आपल्या प्रस्तावनेत ..साक्षीच्या कविता लेखनाबद्दल फार छान  म्हटलेले आहे..
" साक्षीच्या कवितेत नवखेपण असले तरी तिची हळवी संवेदनशीलता तिच्या कवितेला निश्चित नवे आयाम देईल असा विश्वास वाटतोय."

साक्षी  माती आणि नाती विसरत नाही " ,तिला शेतकऱ्यांची व्यथा , स्त्रियांची दुखे  व्यथित करतात .

स्वप्नील मृगजळाच्या मागे न लागता वास्तव जगण्यातील प्रश्नांची तिला जाणीव आहे "

वाचक मित्र हो ..वरील विवेचन वाचून आपल्याला साक्षीच्या कविता -लेखन स्वरूपाची कल्पना येते .आणि उद्याची एक आश्वासक कवयित्री 
आज विद्यार्थिनी असलेल्या  साक्षी लाड या बाल -कवयित्रीत आपल्याला दिसू लागते .

साक्षीच्या मुख्याध्यापिका  सौ .प्रतिभा सतीश भोसले आपल्या विद्यार्थिनीला शुभेच्छा आणि आशीर्वाद देतांना म्हणतात -
"भविष्यात मोठी झेप ,साक्षीला घ्यायची आहे.. शब्दांनी तिला भेटावे व तिने मायेने तिला जवळ घ्यावे ", हीच माझी तिला शुभेच्छा आहेत."

हे वाचून वाटते की - असे गुरुजन भेटलेली बाल-कवयित्री - साक्षी लाड  सारख्या कलावंत मनाच्या विद्यार्थिनी खूप नशीबवान असतात.

साक्षीच्या महालक्ष्मी हायस्कूल मधल्या कवयित्री -शिक्षिका - सौ. सुरेखा  निवास कांबळे यांनीही   लेखन -आशीर्वाद दिला आहे .

तसेच शिक्षिका -मनीषा पाटील म्हणताहेत -
विविध विषय हाताळण्याची मुलींची हातोटी कौतुकास्पद आहे. कविता फुलत राहो, लेखनाच्या जाणीवा प्रगल्भ होवोत .याच शुभेच्छा आहेत.

स्वतहा कवयित्री आपल्या मनोगतातून म्हणते की -
 हा माझा "काव्यज्योत पहिला काव्यसंग्रह आहे ",माझ्या सर्व कवितेवर मी  खोलातखोल 
विचार करून लिहिण्याचा प्रयत्न केला आहे ". साक्षीचा हा मनो-विचार तिच्या कवयित्री असण्याचे मोठे महत्वाचे लक्षण आहे.

कवी जितका खोल विचार करतो ,चिंतन करतो .तितकी कवीची कविता अगदी खूप आतून आलेली असते " ,
 याची प्रचीती  बाल-कवयित्री -साक्षी सीताराम लाड हिचा काव्य ज्योत कविता संग्रहातील ५० कविता वाचतांना वाचकांना नक्कीच येईल.

 काही कवितांची उदाहरणे ..देतो म्हणजे ..कवयित्रीच्या कवीमनाचे प्रतिबिंब कसे स्पष्ट उमटले आहे हे  दिसून  येईल .

अत्याचार - ( पृ,१० ) या कवितेतून वास्तव समस्येवर कवयित्री प्रश्न विचारते आहे ..
-------------------------------------------------------------------------------------------------
वंशाच्या दिव्यासाठी का 
विजवता तुम्ही पणती 
सुनो दुनियावालो 
बेटी बोझ नाही होती ...

स्त्रीमन लाभलेली ही कवयित्री .स्त्री -विषयक कविता अगदी तळमळीने लिहिते .कारण तिच्या स्वतःच्या जाणीव तीव्रपणे व्यक्त होतात .
स्त्रीवर होणार्या अन्यायाबद्दल तिची ही कविता पुरेशी बोलकी आहे.

 "उमलती कळी " (पृ. ११.)
-----------------------------------------
"आधीपासून न्याय मिळाला असता तर 
किती पुढे गेली असती मुलगी 
मुलगी 
असते स्वामिनी 
जगू दे तिला 
बनून मानिनी ...

---------------------------------------------------------------------------------
माणसा-माणसातला वाढ जाणारा दुरावा .हे पाहून कवी दुखी मनाने व्यक्त होतो -
आणि हताशपणे म्हणतोय ..
"विसरत चाललोय ..( प्र.१३ ) या कवितेत 
-------------------------------------------------------
विसरत चाललोय 
माणसाशीच माणसा सारखे 
वागायला व स्वतहा माणूस 
म्हणून जगायला ..

आपले जगणे अर्थपूर्ण असावे असे सगळ्यांना वाटते .. ते नेमके कसे असते ते 
"जगणं माझं  (पृ. १७) .या कवितेतून कळते 
---------------------------------------------------------------------------------------------------
रडणाऱ्याला हसवण  हे 
कर्तव्य माझं 
असचं आहे 
जगणं माझं ..

माणसे सगळी सारखीच असतात "असे आपण म्हणतो खरे ..पण माणसातली विषमतेची दरी पाहून 
कवयित्री म्हणते ..
"नशीब (पृ. २७ )
-----------------------------------------------------------------------
देवा गरिबाला  का दुखः 
दे त्याला जरातरी सुख 
श्रीमंताकडे आहे सुख 
का गरीबाकडे  फक्त आणि फक्त दुखः

आपण आपल्या आई-वडिलांच्या बद्दल मनात सदैव आदर बाळगला पाहिजे ,प्रेम असावे आपल्या मनात .
"आई-बाप " ( पृ.३१ ) या कवितेत .कवयित्री म्हणते ..
"साथ देणारी आई तर 
खरा आधार बाप 
जीवनाला आकार देणारी आई तर 
जीवन घडवणारा बाप "

रसिक हो ..बाल-कवयित्री .कु.साक्षी सीताराम लाड हिच्या काव्य विश्वाची ही एक झलक वाचून ..तुम्हाला नक्कीच  एक छान 
कविता अनुभूती येईल.
तिच्या उज्वल कविता -लेखनास खूप खूप शुभेच्छा .

फिनिक्स पब्लिकेशन व प्रकाशक -प्रा.अर्जुन गोपाळ कर्पे (सर ) यांनी "काव्यज्योत "हा कविता संग्रह प्रकाशित केला आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय लेख-
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
९८५०१७७३४२ 
-----------------------------------------------------------------------------------

कवयित्री - कु.साक्षी सीताराम लाड 
संपर्क-
७८७५२६९७६६ 
------------------------------------------------------------------------
कविता -संग्रह 
काव्य ज्योत 
पृ.  ५४   .मूल्य- रु. ५०/-

फिनिक्स पब्लिकेशन 
संपर्क-9096722790
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------



पुस्तक-परिचय लेख- -अरुण वि.देशपांडे -पुणे. "जिव्हाळा "- कविता संग्रह .

पुस्तक-परिचय लेख-
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
---------------------------------------------------------------------------

अंतरीच्या  जिव्हाळ्याच्या बोलक्या कविता -

 "जिव्हाळा "- कविता संग्रह . 
बाल -कवयित्री - कु. लक्ष्मी बनसोडे 
---------------------------------------------------------------------------------
नमस्कार -
 रसिक वाचक मित्र हो ,
----------------------------------------------------
पुस्तक-परिचय लेखन करणे माझ्या सारख्या कविता -वाचकासाठी एक कविता अनुभूती असते .
प्रत्येक कवी , त्यचे कवी -मन , आणि त्याला लाभलेली कवी-दृष्टी , त्याचा जगाकडे पाहण्याचा 
स्वतंत्र असा दृष्टीकोन .. या सगळ्या गोष्टी कविता संग्रह वाचतांना जाणून घेतांना ,
दरवेळी  एक नवा जीवन अनुभव घेत घेत आपल्यातला  कवी रसिक संपन्न होत जातो .

अशाच एका कवयित्रीच्या अद्भुत काव्य-लेखन-प्रतिभेचा अविष्कार पुस्तक रुपात पाहण्याचा छान 
योग माझ्या वाट्याला आले. या कविता संग्रहाचे शीर्षक आहे ..जिव्हाळा " आणि कवयित्रीचे नाव आहे-
कु.लक्ष्मी बनसोडे ., जी बाल-कवयित्री म्हणून परिचित झाली आहे.

शालेय विद्यार्थिनी  असलेल्या या बाल - कवयित्रीच्या कविता संग्रहातील कविता वाचतांना एक जाणवले 
की '' प्रतिभा " ही एक देणगी आहे ..जी जन्मताच लाभलेली असते ..म्हणूनच तिचा अविष्कार अगदी 
सहजतेने  होत असतो . "
अशा सहज आविष्कृत झालेल्या कवितांचा  जिव्हाळा " हा कविता संग्रह  जाणकारांचे 
आणि वाचकांचे लक्ष वेधून घेईल असाच झालेला आहे. या बद्दल बाल -कवयित्री -लक्ष्मीचे अभिनंदन करू या .

पिढी दर पिढी .सगळेच बदलून जात असते ...आजची उमलती पिढी असो व तरुणाई असो ..
गेल्या पिढीतील याच वयोगटातील त्या कालच्या- उमलत्या पिढीच्या आणि तरुणाईच्या मानसिकतेत खूप मोठा 
फरक आहे ..जो आपल्याला चिंतन करण्यास भाग पाडणारा आहे.आणि हे बदल जाणवून आपले मन  थक्क होऊन जाते .
या नव्या पिढीची मानसिकता , विचार करण्याची पद्धत , आणि समोरच्या प्रत्येक गोष्टींचा अन्वयार्थ लावण्याची 
धडपड मोठीच कौतुकास्पद आहे . अशा या नव्या पिढीची प्रतिनिधित्व करणारी ही कवयित्री आहे असे म्हणता येईल.

या कविता लेखनात एक सूत्र आहे - जे मोठे भावनिक आहे .. आपल्या जगण्यावर ज्यांचा सर्वाधिक प्रभाव असतो ,
ज्यांच्यामुळे आपण घडतो , सावरतो , जीवनाची वाटचाल सुकर आणि सुलभतेने करतो ..अशा आपल्या माणसांच्या 
बद्दल अतिशय जिव्हाळ्याने कवयित्री आपल्या कवितेतून कृतज्ञता व्यक्त करते .

स्वतःच्या कविता लेखना बद्दल कवयित्री कवितेतूनच म्हणते -
"जो पर्यंत शेवटचा श्वास आहे 
तो पर्यंत लिहिण्याची जिद्द आहे  "

आणि जगण्याबद्दल ,आयुष्याबद्दल  ही कवयित्री अतिशय जागरूक आहे - त्यामळे मनातील भाव-भावना , विचार -कल्पना 
मांडण्याचा तिचा प्रयत्न आहे . आपल्या जीवनातील प्रवास कसा असतो  व आजची वस्तुस्थिती  कशी आहे "
हे काव्य संग्रहातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
कवीमनाची अशी वास्तवाशी असलेली बांधलकी " कवितेचे स्वरूप एक जाणीव -असलेली कविता असे होऊन जाते .
कवयित्रीची ही भूमिका प्रामाणिकपणे व्यक्त होते . तिच्या कवितेतील ठामपणा , विचारांशी बांधिलकी  हे खूप  विशेष आहे.
गंभीर , चिंतनशील ,वैचारिक आणि सामाजिक भान असलेली ही कवयित्री ..आणि तिच्या कविता एकेमेकास अनुरूप आहेत .

प्रसिध्द कवी श्री.दयासागर बन्ने -यांची प्रस्तावना - 
कवयित्रीच्या कविते बद्दल अचूक व्यक्त होते .
धनापेक्षा मनाचा विचार , विचारपूर्वक  आपल्या ओंजळीत देणारा काव्य संग्रह म्हणजे - जिव्हाळा "हा  संग्रह .
निसर्ग ,सृष्टीबद्दल "जिव्हाळा " जपण्याचं भान ही कविता देते. प्रेमाचे उदात्त रूप म्हणजे विश्वबंधुता असा विशाल 
विचार करणारी कविता आहे.

कवयित्री -लक्ष्मी बनसोडे ,देशिंग -हरोलीच्या  श्री.महालक्ष्मी हायस्कूलची विद्यार्थिनी .
या शाळेतील तिच्या गुरुजनांनी तिच्या कविमनाला कविता लेखनासाठी खूप प्रेरणा दिली आहे.
 श्री. मोहन रघुनाथ चव्हाण सर, कवयित्री - सौ.सुरेखा निवास कांबळे टीचर ,सौ. मनीषा पाटील -टीचर 
यांनी देखील आपल्या शाळेतील या गुणी कवयित्रीला लेखन -शुभेच्छा दिल्या आहेत.

या संग्रहातील काही  कविता अंश -उदाहरण म्हणून देतो -

नागरी जीवनाचे यथार्थ वर्णन करणारी एक कविता -

शहरी जीवन 
फार बिकट 
येथे कोणी कोणाची 
पहात नाही वाट 
सर्वांची असते 
एक सारखीच गत ..( माझे मत ..पृ..३४ ).,

जगाचा पोशिंदा ..शेतकरी , हा बळीराजा , त्याबद्दलच्या कवितेत विचारलेला रोखठोक सवाल 

"शेतकऱ्याला आत्महत्या करायला 
भाग पाडता तुम्ही 
सगळी शेतकरी असेच करायला 
लागले तर काय खाल तुम्ही ..(शेतकरी कर्जमाफी ..पृ.३५ )

एकत्र कुटुंब ..विभक्त झाले .आणि काय हाल 
झालेत. एका महत्वाच्या समस्येवर ही कविता -

"बाहेर व्हा घरातुनी 
हे शब्द पडताच कानी 
आईबापाच्या मनी 
दुखाचा डोंगर कोसळी ... ( वृधाश्रामाची वाट..पृ..३७ ),

मुलासाठी अतिशय जिव्हाळ्याचे नाते ..ते कोणते ? त्याची कविता ..
"ज्यांच्या मुळे मी आज सन्मानाने जगू शकले 
त्यांनी मला या जगात जगायला शिकवले 
असे ते 
म्हणजे माझे बाबा .... माझे बाबा 
आणि फक्त माझे बाबा ....( असे ते ..पृ..२७ ),

माझी आई "ही कविता अतिशय हृदयंगम अशी आहे ..
घर हे मंदिर .आणि त्यातील देवता .आई .. किती छान ना !

"कृतज्ञतेचे प्रतिक ती 
जणू मायेचा सागर ती 
कृताज्ञेतेने वंदन करतो 
देवतेस या घरराउळी ... (माझी आई ..पृ..९ )

राष्ट्र -रक्षणार्थ प्राणाची बाजी देणारे आपले जवान आपला अभिमान 
त्यांच्या विषयी व्यक्त होणारी एक वेगळीच भावनिक कविता ..

"स्वतःच घालतो देशासठी धोक्यात बह्विश 
ते आहे भारत मातेच्या जवानांचे आयुष्य "  (जवानाचे आयुष्य ..पृ..११ ),

विद्यार्थिनी असलेली बाल-कवयित्री कु.लक्ष्मी बनसोडे 
,शालेयजीवनात ती काव्य लेखन करते आहे  आणि ..या बाल-कवयित्रीत  उद्याच्या एका 
एक परिपक्व ..जाणीवेच्या कवयित्रीचे असणे या संग्रहातील कवितातून जाणवणारे आहे..

३३ कवितांचा समावेश असलेल्या .जिव्हाळा .कविता संग्रह प्रकाशित केला आहे..फिनिक्स पब्लिकेशन  यांनी.
बाल -कवयित्रीच्या कविता संग्रहाचे त्यांनी केलेले हे प्रकाशन कार्य अनुकरणीय असेच आहे..

बाल-कवयित्री - कु.लक्ष्मी बनसोडे ..हिच्या काव्य-लेखन - प्रवासास  खूप खूप शुभेच्छा .
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पुस्तक परिचय लेख -
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२ 
--------------------------------------------------------------

 "जिव्हाळा "- कविता संग्रह . 
कवयित्री - कु. लक्ष्मी बनसोडे 
संपर्क - ८९९९९४५०६८८ 
-------------------------------------------------------------------------------
जिव्हाळा - कविता संग्रह 
कवयित्री - कु.लक्ष्मी बनसोडे 
पृ. ४० , मूल्य- रु.४० /-
फिनिक्स पब्लिकेशन 
संपर्क - ९०९६७२२७९० 
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------



#संवादिनीकथासंग्रहपरिचयलेख - भाग-९ वा . ले- अरुण वि.देशपांडे

#संवादिनीकथासंग्रहपरिचयलेख -
 भाग-९ वा . ले- अरुण वि.देशपांडे 
कथा लेखक - १.प्रसन्नकुमार , २.जयश्री दाणी, ३.आरती मोरे -दरेकर 
-----------------------------------------------------------------------------------------
नमस्कार -
कुबेरकर आणि वाचक - मित्र हो 
----------------------------------------------------------
वाचकांना कथा-परिचय करून देण्याच्या निमित्ताने -कुबेर समूह प्रकाशित संवादिनी "
या कथासंग्रहाचे अनेकदा वाचन करण्याचा योग आलाय  

मित्रांनो ..प्रत्येक कथा एक जीवनानुभव देणारी , माणूस आणि व्यक्ती यातील फरक 
जाणवतो हे वेगवेगळे दर्शन थक्क मनाला थक्क करून जाणारे असेच आहे. 
मानवी जीवन किती आणि कसे गुंता -गुंतीचे असते ..हे जीवन जगतांना माणसाला 
किती वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या पद्धतीने वागावे लागत असते "
असे खूप काही  या सगळ्या कथा-लेखनातून लेखकांनी नेमक्या -शब्दातून मांडलाय 

मित्र हो ,आज खालील तीन कथांबद्दल तुम्हाला सांगायचे आहे -
--------------------------------------------------------------------------------------------------
१. अनोखं लग्न - (पृ.११४ ), ले- प्रसन्नकुमार -  बंगळुरू
------------------------------------------------------------------------------------
कथा -आशयाला थेटपणे भिडणारी ही कथा तशी अनोखीच आहे असे म्हणता येईल.

कथा-नायिका -सुधाच्या स्वभाव-गुणाबद्दल सांगत सांगत ही कथा वेगाने पुढे सरकत जाते ,
 भीती हा शब्दच जिच्या कोशात नाहीये , लहानपणापासून धाडसी असलेल्या सुधाच्या 
स्वभ्वात "जिद्द ! या गुणाची भर पडलेली आहे , या श वर्णनामुळे  सुधा .ही व्यक्तिरेखा चार-चोघीसारखी 
सामन्य नाहीये हे लेखकाने वाचकांच्या मनावर छान ठसवले आहे.
ती कशी सामन्य नाहीये .! .हे कथेतून आपल्याला उलगडत जाते.  -नोकरीच्या क्षेत्रात न रमणारी 
 सुधा " समाजकार्याची आवड असणारी आहे. 
आवड असणे आणि प्रत्यक्ष  कृती-प्रवण असणे "  यात किती फरक असतो
हे- दाखवून  देणारी   सुधाची "-व्यक्तिरेखा लेखकाने ठसठशीतपणे रेखाटली आहे.

समाज-कार्यात स्वतःला झोकून देत कार्य करीत राहण्याची -सुधाची वृत्ती " खूप प्रेरक अशी झाली आहे ",
हे सगळे कार्य एखाद्या धडधाकट व्यक्तीने करणे काही आश्चर्याचे नाही .
सुधाच्या पायाचे हाड मोडल्यामुले ,  तिच्या पायामध्ये रॉड टाकावे लागले "
 या अपघाताने .सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही "

तरीही अनोखी सुधा ..खचली तर नाहीच - ती नाउमेद होऊन बसली नाही .. तिच्या स्वभावाला अनुसरून 
ती कार्यात सतत व्यस्त असते "
या कथेतून लेखकाने ..अनेक सकारत्मक असे संदेश ..सुधाच्या व्यक्तीरेखेतून  देण्याचा छान प्रयत्न केला 
आहे . कथेतील हे सकारात्मक वातावरण ..आपल्या मनात एक उमेद नक्कीच निर्माण करणारे आहे "
असे म्हणावेसे वाटते.
कथेत येणारे प्रसंग .आणि त्यातील सुधाचे वागणे , त्यातून काही नवीनच साधण्याचे उद्देश ",आणि 
तिच्या स्वभावातील निग्रही वृत्ती .. या सगळ्यासाठी ..ही कथा वाचायला पाहिजे ..
कथेचे शीर्षक - "अनोखी सुधा " असे असते तरी ते समर्पकच झाले असते. असे कौतुकाने म्हणतो बरे का !

लेखक -प्रसन्न कुमार लिखित ही कथा वाचकांना "प्रसन्न "करून टाकणारी आहे.
त्यांना लेखन शुभेच्छा ..!
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२.
कथा - शिर्षक- धुरांच्या  रेषा  (पृ- १३१ ) , ले- जयश्री दाणी - नागपूर 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नागपूरच्या-साहित्यकार  जयश्री दाणी- इंटरनेटवरील आणि प्रिंट -मिडीया मधील एक प्रसिध्द असे व्यक्तिमत्व आहे.
कथा-कविता -लेख ..अशा स्वरूपातील त्यांचे विपुल लेखन वाचकांच्या पर्यंत सातत्याने येत असते .
अशा या लेखिकेचा कथा सहभाग ..संवादिनी "संग्रहात आहे.

संग्रहातील "धुरांच्या रेषा "ही त्यांची कथा  अतिशय हळवी -भावोत्कट अशी ललित -शैलीतील कथा आहे ..
या कथेतील सुमती ..अतिशय भावूक , तरल आणि हळव्या  मनाची आहे . वास्तव आयुष्यात आणि स्वप्नवत दुनियेत 
जगणाऱ्यां माणसांच्या भावनिक -विश्वातली मानसिक तडफड लेखिका जयश्री दाणी यांनी  व्यक्त केली आहे.
ती मनाला स्पर्शून जाणारी आहे.

खरे तर सुमती ही  एक प्रातिनिधिक व्यक्तिरेखा आहे .. असे उध्वस्त भावविश्व सोबत घेऊन .वर्तमानात दुखः भोगणारी 
माणसे आपण भवताली पाहतच असतो . अशा माणसांच्या अबोल मनाच्या  भावना जणू लेखिकेने सुमितच्या माध्यमातून जणू बोलक्या केल्या आहेत.
 आपल्याच जोडीदारा कडून सतत भावनिक अवहेलना होत रहाणे हे फार मोठे असह्य दुखणे आहे . संवदेनशील माणसाच्या वाट्याला ..असे वास्तव-आयुष्य 
आले तर काय होते ? त्याचेच उत्तर सुमतीच्या भाव -विश्वाच्या झालेल्या दुर्दशेतून आपल्याला मिळते .

सुमितीचा स्मृती उत्सव ..तिच्या सोबतच्या माणसाना स्मृती-भृंश वाटणे " या पेक्षा दुसरे दुर्दैव काय असणार ?
तिच्या अंतरंगातले हे मानसिक -दुखः वाचकांना भाव-व्याकूळ करणारे आहे.
सुमितच्या घरातली माणसे भले ही तिच्या स्मृती उत्सवात तिच्या सोबत नसतील ..पण.या कथेचा वाचक .अगदी सहजपणे 
तिला  सोबत करील .

लेखिका जयश्री दाणी यांना लेखन -शुभेच्छा .
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

३.
कथा - शिर्षक-  Mercurous - (पृ. १३६  )- ले- आरती मोरे -दरेकर - पुणे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
इंग्रजी शीर्षक असलेली ही कथा ..या संग्रहातील एक वेगळी कथा आहे. ज्याला मर्डर- मिस्ट्री " म्हणतात .या  रहस्यमय शैलीतील कथेच्या लेखिका 
आहेत  आरती मोरे -दरेकर . 
नेहमीच्या कथा वाचतांना ..परिचित शब्दातील प्रसंग-वर्णानातून  कथा पुढे जाते आणि काय असेल याचा अंदाज वाचक सहजपणे करू शकतो .
आरती मोरे -दरेकर यांची कथा ..वाचकाला  चकवे देत ..पुढे पुढे नेते .. हे या कथेचे यश आहे.

उच्चभ्रू वातावरण , श्रीमंत माणसाचे विश्व उभे करतांना ..त्यातील माणसांच्या वृत्तीवर लेखिका मार्मिक भाष्य करते .
आणि देश-विदेशाचे संदर्भ येतात त्यावरून ,,ही फार मोठ्या श्रीमंत व्यक्तीची कथा आहे ही सतत जाणवते . आणि यातली 
माणसे समान वृत्तीची आहेत .
सारे काही पैश्यासाठी " असे वागणार्या माणसांचे सूत्र एकच असते .हवे ते मिळवणे  ते . बाय हूक ऑर क्रूक ! 

या कथेतील व्यक्तिरेखा . श्रीयश , हंसाबेन , युवराज  आणि रावसाहेब "त्यांचे वागणे ,वावरणे .
कथेतील रहस्य अधिक गडद करणारे आहे. अशी थ्रिलर कथा लिहिणे सोपे नसते ,आणि ही 
कथा तशी तर अगदी छोटी कथा आहे, असे असून ही ..ही कथा गूढ आणि उत्कंठावर्धक वाटते याचे श्रेय लेखिकेचे आहे..

नेहा आणि आशिष यांच्या तपास कार्याचे पुढे काय झाले असेल ? वाचक हा विचार नक्कीच करेल 

लेखिका -आरती मोरे -दरेकर यांना लेखन शुभेच्छा .
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
  #संवादिनीकथासंग्रहपरिचयलेख -
 भाग-९ वा . ले- अरुण वि.देशपांडे - पुणे.
9850177342
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Friday, April 24, 2020

#संवादिनीकथासंग्रहपरिचयलेख - भाग -८ वा . ले- अरुण वि.देशपांडे .

#संवादिनीकथासंग्रहपरिचयलेख - भाग -८ वा . ले- अरुण वि.देशपांडे .
कथा लेखक -१.साधना मोरे - आरोटे २.संध्या हिंगे . ३. राहुल घायमुक्ते 
-------------------------------------------------------------------------------------------------------- 
वाचकमित्र हो - नमस्कार -

या लेखमालेतून आपल्याशी हा लेखन संवाद साधतांना ,मला खूप काही साधता आल्याचा आनंद मिळतोय .
 संवादिनी कथा संग्रहातील ..कथा वाचून मग त्यावर लिहायचे ..त्यासाठी या कथा मन लावून  वाचत जातोय ,
तस तसे कथा लेखन , कथा-आशय , विषयानुरूप कथा लेखन, कथा रंगतदार कशी होते ? ,
कथा  आकर्षक   पद्धतीने कशी लिहायची ?
 कथेचा शेवट ..कोणता असावा ? जो  वाचकांच्या मनावर परिणाम करणारा असेल.,
मला माझ्या या सगळ्या प्रश्नाची उत्तरं ..संवादिनी "कथा संग्रहातील ..संवादी" कथांच्या वाचनातून मिळते आहे.'

कथालेखन करणार्यांना "संवादिनी "कथा संग्रहाची    शिफारस     कथा -लेखनासाठी .एक स्टडी -प्रोजेक्ट  म्हणून करीन ,
या निमित्ताने  वाचकांच्या वतीने पुन्हा एकदा ..
कुबेर प्रकाशन , प्रकाशक - श्री.संतोष जगन्नाथ लहामगे, आणि संवादिनी "कथा संग्रहातील सहभागी कुबेरकर 
साहित्यिकांचे अभिनंदन करतो.

आजच्या लेखात  खालील तीन कथांचा आस्वादक परिचय करून देतो आहे.

१. कथा - पोरखेळ ", (पृ. ९४ ) ले- साधना मोरे -आरोटे - मुंबई 
-------------------------------------------------------------------------------------------------------
पोरखेळ " ही कथा .एका दुर्दैवी "ती "ची आहे . या नायिकेच्या वाट्याला दुर्दैवाचे दशावतार आलेले आहेत , तिच्या "पोरवयात 
नशिबाने तिच्या आयुष्यात ..हा "पोरखेळ " सुरु केला आहे. लेखिका साधना मोरे -आरोटे यांनी कथेतील "ती " ही व्यक्तिरेखा 
अतिशय चपखल शब्दातून उभी करतांना .."ती "च्या नशिबाचे भोग वाचून वाचकांच्या मनात सहानुभूती निर्माण केली आहे.

अशा कथेतील भावुकता कधी कधी अतिरंजित वाटण्याचा धोका आसतो आणि सगळीच कथा कृत्रिम वाटण्याचा संभव असतो ",
पण लेखिकेने  "पोरखेळ " कथेतील  "ती " ची दुर्दैवी कहाणी सांगतांना मनस्पर्शी लेखन शैलीत ही कथा   फुलवली आहे ".

पोरखेळ " मधली "ती " ही व्यक्तिरेखा ,मराठी सिनेमातील .." सोशिक -नायिकेची " आठवण करून देते ".

या कथेची सुरुवात -पाहू या -
जवळपास पंचाहत्तरी पार केलेली ती  !
पांढरे स्वच्ह नऊवारी पातळ , पांढरं स्वच्छ नीटनेटक पोलकं  आणि ...
..आणि पांढरं कपाळ....!
 हो .. असंच म्हणयचे त्याकाळी उपहासाने लोक...

लेखिकेने  -या पाच ओळीतच .. नशिबाचा "पोरखेळ " आणि त्या खेळाने जिचे आयुष्य उध्वस्त झाले ,
 त्या " ती " चे व्याक्तिरूप  वाचकांच्या डोळ्यासमोर उभे केले आहे.
 शब्द  किती अर्थवाही असतात "त्याचे हे उदाहरण आपल्या समोर ठेवावे  वाटले .
स्त्री विषयक सर्व भाव-भावना ..या कथेतून पाहण्यास मिळतात . जरूर वाचावी अशी ही कथा आहे.

लेखिका साधना मोरे -आरोटे यांना लेखन शुभेच्छा.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


२. कथा - अव्यक्त प्रेम , (पृ. ९९ ), ले- संध्या सु.हिंगे - गोवा 
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
ज्यांना त्यांचे इच्छित प्रेम मिळते ..ते नशीबवान असतात असे म्हणतात ", असे सुदैवी प्रेमी कमीच असतात म्हणून तर 
"प्रेमाची कोडे " सोडविणे अनेकांच्या नशिबात नसते . तसे पाहिले तर माणसाच्या आयुष्यात .."प्रेमाचे येणे " अकल्पनीय 
असेच असते . कधी योग्य वेळी तर कधी नको त्या वेळी " आयुष्यात प्रेम जडणे "  असे घडून जाते .

प्रस्तुतच्या
अव्यक्त प्रेम "या भाव-कथेतील अनुजाच्या वाटयाला आलेले प्रेम थोडे जगा वेगळेच आहे , म्हणूनच ते प्रत्यक्षात स्वीकारले जाणारे नाहीये ",
ही जाणीव ..अनुजाला आहेच ..कारण ते वास्तवातील कटू सत्य आहे. अनुजाची कहाणी वाचतांना आपल्याला हे कळून चुकते.
तेव्हा ..आपल्याला ..अनुजाच्या ..या -प्रेमाच्या भावने बद्दल वाटू लागते की.. खरेच ..माणूस कम-नशिबी असला की ..
सुख त्याच्या पासून लांब -लांबच राहते.

अनुजाच्या कथेतून लेखिकेने .. स्त्री - पुरुष  यांच्यातील  सुखाच्या बद्दल  -मन आणि शरीर , भावनिक आणि शारीरिक ..इच्छा आणि गरज , 
या बद्दल  वेगवेगळ्या दृष्टीकोनातून विचार मांडले आहेत ..
किती ही खुली जीवन शैली येवो , समाजिक - बंधनं " या नावाखाली ..
या सुखापासून  "एकट्या स्त्री ला  वंचितच ठेवले जाते , स्त्री या बाबतीत कधीच व्यक्त होऊ शकत नाही .. अव्यक्त भावना ..कधीच 
 बोलक्या करता येणार नाहीत ..हे  काटेरी सत्य .. मोठे बोचरे आहे.
लेखिका संध्या हिंगे ..यांची कथा नायिका -अनुजा . याच सामाजिक वातवरणात .रहाणारी आहे.
तिचे अक्त प्रेम ..ते सुद्धा .."एकतर्फी असलेले प्रेम",  कधी ही व्यक्त करू शकणार नाहीये .
अनुजाची ही अव्यक्त प्रेमाची शोकांतिका , वाचकांच्या लक्षात राहील अशीच आहे.

लेखिका संध्या हिंगे यांना लेखन -शुभेच्छा .

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

३.
कथा - सैलोमन काका  (पृ..१०४ ), ले- राहुल अरुण घायमुक्ते - पुणे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखक राहुल अरुण घायमुक्ते .. यांची कथा ..उत्तम असे व्यक्ती -चित्रण आहे . त्यांच्या भोवती फिरणारी कथा ..,त्यातील 
सगळी वर्णने , मनोगत , निवेदक सांगतो त्यातून .. आपल्या डोळ्यासमोर .कथेतील सैलोमन काका " अगदी 
हुबेहूब साकारून येतात . 
अतिशय समरसतेने हे लेखन झाल्यामुळे ..सैलोमन काका ..ही व्यक्तिरेखा .रसरशीत आणि 
जिवंत वाटू लागते .

लेखक -राहुल घायमुक्ते यांची लेखन शैली अतिशय प्रवाही आहे..कथा ओघवती आहे ..त्यामुळे .कथा वाचतांना 
कथेतील ..मी , आणि सैलोमन काका यांच्या सोबत आपण ही त्या वातावरणातील एक भाग बनून जातो .
 आणि सैलोमनकाकांच्या सोबत त्यांच्या ऑफिसात , वाड्यात , जुन्या घरात , सध्याच्या रहात्या बंगल्यात जाऊन सगळे काही 
पाहतो . ...हा लेखन ओघ , वेगवान कथनक ..अनुभवण्यासारखे आहे.

माणूस .आपले आयुष्य जगतांना ..किती पातळीवर .एक व्यक्ती म्हणून वागत असतो ..त्याचा स्वभाव , त्याचे वेळोवेळीचे 
वागणे ,घेतलेले  विसंगत निर्णय ,त्याचा जीवन विषयक दृष्टीकोन , असे खूप काही ..
 काकांच्या व्यक्तिरेखेतून लेखकाने अतिशय  सहृदयतेने रेखाटले आहे...ज्यातून माणूस कसा असतो  हे अनुभवणे खूप वेगळे आहे.

या कथेचा एकूणच बाजहा - "  माणूस , त्याचे  आयुष्य , जीवनानुभव " यावरती  चिंतनपर व्यक्त होण्यावर आहे , त्यामुळे ही 
तशी कथा गंभीर -आणि विचार-प्रवर्तक झाली आहे असे म्हणावेसे वाटते. 

"लाखो -करोडोंच्या संपत्ती पेक्षा  प्रेम ,आपुलकी  आणि मायेचे ते दोन शब्द  आपल्याला उंच झेपावण्यासाठी पुरेसे असतात ",
नाही तर लाखमोलाचा हिराही  त्याच कोळशाच्या खाणीत पडून रहातो .सैलोमनकाकांसारखा  !!
कथेचा हा शेवट ..कथेच्या चरित्र -नायकाला " खूप उंचीवर नेऊन ठेवतो.

लेखक -राहुल अरुण घायमुक्ते यांना लेखन शुभेच्छा .

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लवकरच भेटू पुढच्या लेखात .अजून काही कथा बद्दल सांगेन.

#संवादिनीकथासंग्रहपरिचयलेख - भाग -८ वा . 
ले- अरुण वि.देशपांडे .
९८५०१७७३४२ 


---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

#संवादिनीकथासंग्रह - परिचय लेख -भाग -७ वा . ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.

#संवादिनीकथासंग्रह - परिचय लेख  -भाग -७ वा . ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
कथालेखक - १. नितेश पाटील. २. तुषार नातू . ३. केदार विलास दिवेकर .
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
नमस्कार वाचक मित्र हो-
#संवादिनीकथासंग्रह - परिचय लेख  -भाग -७ वा . आजच्या लेखात  खालील तीन कथांचा आस्वाद -परिचय करून देतो आहे.
 
१. कथा - स्वप्न धुमारे - (पृ.८२ )
लेखक - नितेश ज्ञानेश्वर पाटील (नित ) -पालघर 
------------------------------------------------------------------------------------
लेखक नितेश पाटील यांनी "स्वप्न धुमारे "या कथेत ..मनाच्या अंतरंगात शिरून ..स्वप्न आणि त्या स्वप्नांची वैज्ञानिक 
स्वरूप ,मनाशी त्याचा संबंध अशी  चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला आहे.. 
.कथेची नायिका .."राघवी ", हिला कायम वाटत   असते की तिला पडणारी स्वप्न ", ही सूचक आहेत
..त्यामागची कारणे शोधणे तिच्या विचार- कक्षातले  नाहीये   .तिच्या विचारांना मर्यादा   आहेत "याची तिला जाणीव आहे., 
या स्वप्नाबाद्ल कुणाला कसे सांगावे ? या विचारांचे संकट  तिच्या मनावर गडदपणे असते.

राघवीला स्वप्नात जे काही दिसत असते..ते विचित्र आणि वाईट अशा स्वरुपाचेच असते. त्यामुळे तिची मनोवस्था उदासवाणी 
असते.. या तिच्या अवस्थेच्या वर्णनाने कथा सुरु होते . या वर्णनात  राघवीला नेहमीचा सुरूप - सुंदर असा नेहमीचा निसर्ग किती 
कुरूप दिसतो याचे वर्णन लेखकाने विरुध्द -स्वरूपाच्या प्रतिमा -शब्दातून केले आहे ..
जे खूप लक्षवेधी आणि मनात ठसणारे आहे.  नितेश पाटील यांची लेखन-शैली आकर्षक आहे हे या कथेतून जाणवते.

सतत पडणारी दु:स्वप्न तिला नेहमीच पूर्वसूचना देणारी आहेत असे वाटू लागते , पण, ती सांगितल्याने  ही स्वप्न ज्यांनी पाहिली नाहीत  ", 
लोकांचा संभ्रम कशाला वाढवायचा असाही प्रश्न तिला पडतो ..त्यामुळे तिला पडणारी स्वप्न आणि त्यातला अर्थ "दोन्ही तिच्या पुरते 
मर्यादित राहतात 
अशी मानसिक आणि वैचारिक गोंधळाची अवस्था ..असली म्हणजे व्यक्तीला स्वतःशी किती वेवेगळ्या पातळीवर मनाला 
सांभाळण्याची कसरत करावी लागते ." .हे अतिशय प्रभावीपणाने  "राघवी " या व्यक्तिरेखेतून लेखकाने दाखवून दिले आहे.
निसर्ग नियमानुसार ..आयुष्यची अखेर  होणे हे सर्वमान्यच आहे.. पण, हिरवे पान ..अकाली गळून पडणे ", त्याचे जाणे ..
हे यातना देणारेच आहे ना !   राघवी ची ही खंत , हे दु:क्ख या कथेतून सतत जाणवते. 

जाणीव -संपन्नमन " राघवीला एका विचाराप्रत आणून ठेवते ..तिच्या मनात होणारी वैचारिक जागृती , ज्ञान -विज्ञान निष्ठा "
या दोन्हीमुळे..स्वप्नांच्या -धुमाऱ्यातून बाहेर पडणे , मनाला पडणार्या प्रश्नांना बगल देत पुढे गेलेलं बरं .. हे तिचे स्वतःशी कबूल करणे "
खूप काही सांगून जाणारे आहे ".
नायिका - .राघवी ,तिची मैत्रीण शालिनी ..आणि दोघींचा विद्यार्थी पूर्वेश ..यांच्याबद्दल जाणून घेण्यसाठी 'स्वप्न धुमारे ही कथा 
जरूर वाचावी .
लेखक नितेश पाटील यांना लेखन शुभेच्छा .

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कथा - २

शिर्षक - सिंड्रेला  (पृ..८७  )
ले- तुषार पांडुरंग नातू - नागपूर 
----------------------------------------------------------------
सिंड्रेला "ही अतिशय परिचित अशी जग-प्रसिध्द लोकप्रिय -स्वप्न -कथा आहे.  प्रस्तुतच्या संग्रहात .याच शीर्षकाच्या  कथेत .. सायली नावाच्या ."सिंड्रेलाची
हळवी  आणि भावूक प्रेमकथा .वाचावयास मिळते .
 सहजसुंदर लेखन शैलीचे लेखक म्हणून..तुषार नातू वाचकांना परिचित आहेत. त्याची प्रचीती या ही कथेतून वाचकांना येईलच.

सिंड्रेला " ही कथा .सायलीच्या आयुष्यात आकाशच्या रूपाने "प्रेम-भावना " येते . हे सगळे होण्यासाठी सायलीला ..मदत झालेली  आहे ती 
इंटरनेट - फेसबुक या माध्यमाची .
आकाशशी . मैत्र होण्या आधीचे सायलीचे आयुष्य आणि वास्तवातले जगणे ..तसे खडतरच आहे.. शारीरिक व्यंग असणे , अपंगत्व येणे "
या माणसाच्या दुर्दैवाने वाट्याला येतात .त्यात या व्यक्तींचा काही दोष नसतो . नशिबाचे भोग " म्हणत जगायचे ,
सायलीला .सावत्र आईच्या येण्याने ..सगळी दु:खः ,यातना , वेदना सोसाव्या लागलेल्या आहेतच.

आभासी जगात झालेल्या मैत्रीने सायलीचे आयुष्य बदलून जाते . कविमनाच्या सायलीला.आकाशच्या अनुरूप मैत्री मुळे.हवेहवेसे वाटणारे ,
पण..तिच्या सारख्या व्यंग असलेल्या ,अपंगत्व असलेल्या मुलीसाठी स्वप्नवत  वाटणारे आणि  अप्राप्य असे प्रेम आकाशमुळे मिळते 
पण, जेव्हा आकाश सायलीला 
समक्ष भेटेल , तिला पाहिलं  तेव्हा मात्र नक्कीच , सायलीचे खरे व्यक्ती-रूप "पाहून नक्कीच तो दुरावेल ..हे सायलीची भीती ...

 सायलीची ही व्याकूळ , हळवी भाव-व्यथा .. सिंड्रेला : कथेतून लेखक तुषार नातू यांनी अतिशय रोचकपणाने लेखन केली आहे.
त्यामुळे .... सायली "चे काय होणार ? या बद्दल वाचक  आस्थेने ही कथा नक्की वाचेल . सायली " सर्वार्थाने .."सिंड्रेला "म्हणून शोभते  .
छोटीशी असली तरी ..सिंड्रेला " कथा छान जमली आहे .
अशा  भावनिक कथा वाचकांच्या मनाला सहज भावून जातात .
लेखक - तुषार नातू यांना लेखन शुभेच्छा .

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 3.
कथा -
शिर्षक- काकपक्ष  (पृ. ९१  ), ले- केदार विलास दिवेकर - मुंबई 
------------------------------------------------------------------------------------------------------
संवादिनी कथासाग्रहातील मोजक्या अशा ..वेगळ्या ..धाटणीची "काकपक्ष " ही कथा ..यातील विषय परिचित आहे ,पण तो ज्या 
वेगळ्या पद्धतीने परिणामकारकरीत्या लेखकाने मांडला आहे ..ती पद्धत वाचकांसाठी नवी अशीच असणार आहे. 

पंचतंत्र -कथा , इसापनीती , चांदोबा .. आणि बालमित्रांच्या साहित्यातून आपल्याला
. बोलणारे पक्षी आणि प्राणी "नित्य भेटतात असतात . या स्वप्न-जगात बालमने  सहजतेने रमून जाणे .नैसर्गिक आहे.
 पण..केदार दिवेकर या लेखकाने .काकपक्ष " या कथेत .कावळा " आणि कावळ्यांची जमात ,कावळे-समाज , 
यांच्या  अव्यक्त भावनाना बोलते करून .. त्याचा संबंध थेट माणूस आणि त्याच्या समाजाशी जोडला आहे.तो विलक्षणआहे.

 पक्ष , पितृपक्ष , पक्ष - पंधरवडा " हे दिवस " माणसांच्या  भावनिक विश्वातले अतिशय महत्वाचे दिवस समजले जातात .
पारिवारिक कर्तव्य म्हणून म्हणा  हे पक्ष -कार्य  ..मनापासून आणि मनाविरुद्ध " "अस दोन्ही प्रकाराने करणारी माणसे दिसतात .
पक्ष " करणे ,आणि   पक्ष -कार्य " एकदाचे उरकून टाकणे ",  असे सर्व प्रकार " कसे होत असतात
.. हे या कथेतून वाचतांना कावळ्यांनी ..माणसांच्या वृत्ती आणि प्रवृत्तीवर बोचरे प्रहार केले आहेत , 
.
माणूस आणि त्याचा समाज , कावळे आणि कावळ्यांच्या समाज - यांच्या बद्दल लिहितांना .लेखक केदार दिवेकर यांनी  कथेत  .एक उपहासात्मक 
असे वातावरण उभे केले आहे असे म्हणावेसे वाटते 
, कावळ्यांच्या समाजाबद्दल कावळे जे व्यक्त होतात , त्यावरून  कावळे-समाज असो की  मानव-समाज " दोन्हीत साम्य आहे असे जाणवते 
 ..ते असे की .. सामुहिक जीवनावर , सामाजिक रूढी -  आणि परंपरा " यांचा विपरीत असाच प्रभाव असतो " आणि त्यातून "नवी पिढी 
कावळ्यांची असो की माणसांची .. .संघर्ष होतच असतो .प्रस्थापित -आणि विस्थापित " होणे हा त्याचाच परिणाम आहे.
कावळे आणि माणसांची ही "रूपकात्मक-कथा " माणसाला अस्वथ करणारी आहे.
छोट्याश्या कथेतून  मोठा आशय व्यक्त करण्याची किमया लेखक केदार दिवेकार यांना छान साधली आहे.

त्यांच्या लेखन-प्रवासासाठी शुभेच्छा.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#संवादिनीकथासंग्रह - परिचय लेख  -भाग -७ वा .
  ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
9850177342

#संवादिनीकथासंग्रह -परिचय -भाग-६ वा -ले- अरुण वि.देशपांडे

#संवादिनीकथासंग्रह -परिचय -भाग-६ वा -ले- अरुण वि.देशपांडे
कथालेखक -१.राहुल दत्तात्रय राजोपाध्ये २. राहुल करुरकर  ३. मीनाक्षी आडे
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
कुबेर समूह प्रकाशित .संवादिनी कथासंग्रहाच्या प्रस्तुतच्या परिचय लेखमालेमुळे ,या संग्रहाच्या वाचकांच्या संख्येत
लक्षणीय भर पडते आहे. हे जाणवले आहे.

याचे कारण म्हणजे..संवादिनी संग्रहातील कथासाहित्य वाचनीय आहे ",त्यासाठी 
सर्व वाचकांच्या वतीने मी पुन्हा एकदा 
या सर्व कथालेख्कांचे अभिनंदन करतो.

आजच्या या लेखात आपण ज्या कथांचा आस्वाद घेणार आहोत ..त्या कथांचे एक विशेष सांगावेसे वाटते ,ते म्हणजे-
 या तीन ही कथा अगदी वेगवेगळ्या विषयावरच्या 
आहेत . या कथा वाचून झाल्या नंतर वाचकांच्या मनात संमिश्र भावना दाटून येतील "असे मी म्हणेन.

कथा -१ 
शीर्षक - परतफेड 
ले- राहुल दत्तत्रय  राजोपाध्ये -सांगली 
-----------------------------------------------------------------------------------
पाउस आणि महापूर ही निसर्ग -आपत्ती तर आहेच . पण यात भर घातली आहे ती  माणसाने .आपल्या स्वार्थापोटी ,हव्यासापोटी माणूस जे काही 
करून ठेवतो आहे ..त्यामुळे हे संकट जीवघेणे होऊन बसले. ते कसे ?

लेखक राहुल राजोपाध्ये यांची  "परतफेड " ही कथा " याच विषयावर व्यक्त होणारी आहे. 
या कथेतील किशोर आणि सपना " हे  अतिशय सामन्य जीवन जगणारे जोडपे आहे,

 हलाखीचे जीवन जगणार्या किशोरच्या आयुष्यात  "सपना " येते आणि किशोर ..मोठी स्वप्ने  पाहू लागतो
 अधिक सुखाच्या मागे लागलेल्या किशोरच्या,लोभापायी ..त्याची सारासार विचारशक्ती काम करीत नाहीये ..हे पाहून 
सपना "त्याचे मन वळवायचा  प्रयत्न करते ..

अवैध धंदे ,त्यातील धोके ,त्यातून उद्भवणारे संकट ",याचा किशोर काही एक विचार न करता ..पुढे पुढे जातो खरा ..पण ,
निसर्ग आणि नशीब .यांचे तडाखे ..कसे आणि कधी बसतील ..हे सांगता येणे कठीण असते .

महापुरात ..किशोरचे सर्वस्व वाहून जाते , त्याची प्रिय पत्नी .त्याच्या डोळ्यासमोर महापुरात वाहत जाते,बेपत्ता होते , आणि 
पूर ओसरल्यावर महापूर-ग्रस्तासाठीचे शिबीर सोडून किशोर ..घराकडे येतो ...आणि पुढे ?

मानवी स्वभाव आणि मानवी वृत्ती ..यामुळे माणूस स्वतःचे जीवन किती धोक्यात आणतो ,याचे उदाहरण किशोर या व्यक्तिरेखेतून 
लेखकाने दाखवले आहे. "परतफेड " या शीर्षकात अजून एक अर्थ ..लेखकास सुचवायचा असावा ..असे मला जाणवले , तो म्हणजे.
जैसी करणी -वैसी भरणी " हा तो अर्थ .

किशोरच्या दुष्कार्माची परतफेड निसर्गाने केली खरी .पण..त्याची किंमत ? किती ?

आततायीपणे चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या   किशोरला  सावरण्याचा प्रयत्न करणारी सपना  ,"
सपनाची   ही व्यक्तिरेखा मनाला खूप चटका लावून जाणारी आहे.  त्यासाठी किशोर-सपना "ची कथा वाचायला हवी.  

या कथेत .लेखकाने -महापुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे वर्णन मोजक्याच आणि परीणामकारक शब्दात केले आहे.
ओघवती अशी लेखनशाली  लेखकास  लाभली आहे . त्यांच्या लेखनास हार्दिक शुभेच्छा.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२.
कथा 
शिर्षक- मुराद 
ले- राहुल करुरकर - लंडन 
------------------------------------------------------------------
कुबेर समुहातील अनेक सदस्य हे नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने  विदेशात वास्तव्यास आहेत .या पैकी राहुल करुरकर आहेत ,
.संवादिनी संग्रहात .वेगळ्या  विषयावरील ज्या काही कथा आहेत ..त्यातली .
राहुल करुरकर लिखित ."मुराद " ही कथा " ,तिच्या एकूणच कथा-रूपाने   वेगळी वाटणारी आहे.

अवयव -दान , अवयव -प्रत्यारोपण " हे  विषय माहिती होण्यास सहज-सुलभ नाहीयेत  ,याच विषयवार ही कथा आहे.
त्यात माहौल हॉस्पिटल , ऑपरेशन , ऑपरेशन -थियेटर " ,पेशंट,
रुग्ण , रुग्णसेवा , रुग्णाची नातेवाईक मंडळी " , डॉक्टर , त्यांचे निर्णय आणि मुख्य म्हणजे त्या त्या वेळी उद्भवणारी आणीबाणीची परिस्थिती  "
या सर्व गोष्टी ..लेखक राहुल करुरकर यांच्या कथेची परिणामकारकता इतकी वाढवतात की. 
या कथेतील -
आबिद आणि शायना हे एक जोडपे , आणि सतीश आणि अपर्णा  हे दुसरे जोडपे ", यांना ज्या भयानक परिस्थितीतून जावे लागते आहे, ज्या 
तणावाचा असह्य भार सहन करीत समोर आलेल्या संकटाशी सामना करायचा  , त्यातून मार्ग काढायचा आहे "
सगळ काही फारच कठीण वाटणारे ,मानसिक आणि भावनिक स्ट्रेस आहेत, त्यांची अवस्था कशी असेल ? 
वाचक सुद्धा या भयावह परिस्थितीचा साक्षीदार बनून ..आता पुढे काय होणार रे बाबा ..! असे नक्कीच म्हणेल.

आबिद-सायनाचा - जिगर का टुकडा "- मुराद ,, आणि सतीश -अपर्णाचा "बाळ " हे दोन अबोध नायक , या छोट्या जीवावर आलेले  मृत्यूचे सावट "
आणि अशा प्रसंगी .वागणार्या , विचार करणार्या माणसांच्या भवती .ही कथा केंद्रित होते .
.माणूस , त्याची वृत्ती , असाह्यता , हतबलता ,आणि चिवट आणि दुर्दम्य अशी आशावादी वृत्ती ',यांच्यावर .ही कथा व्यक्त होत जाते .

आबिद -शायना , सतीश -अपर्णा " यांच्यातील भावनिक आंदोलने " कथेतून येणारा एक अकल्पनीय अनुभव ठरावा .

कथेतील प्रमुख व्यक्तिरेखा या भिन्न -धर्मीय व्यक्ती आहेत " म्हणून या कथेतला तणाव अधिक वाटणारा आहे का " ?
एक वाचक म्हणून मला असे वाटले नाही .

प्रसंगातून माणूस वेगळा दिसतो , वेगळा व्यक्त होतो   , माणूस म्हणून त्यांच्यातील भावना  त्याचे व्यक्त होणे " यातच या कथेच्या विषयाचे आणि आशयाचे  वेगळेपण आहे.

लेखक राहुल करुरकर ..याच्याकडून असेच सरस कथा लेखन होवो, यासाठी त्यांना लेखन -शुभेच्छा .

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
३.
कथा -
शीर्षक - घननिळा
ले- मीनाक्षी आडे- सुरत 
-----------------------------------------------------
ललित रम्य निबंध सुरुवात असावी अश्या ..घननिळा "कथेत .
आरंभी सुंदर  असे निसर्गवर्णन आहे , सर्व परिचित असा श्रावणमहिना ,
त्यातला श्रावण सोमवार , या निमित्ताने शिवभक्त ,शिवदर्शन , श्रावणात सोमवारी भरणारी यात्रा " असा श्रावण -महिमा वाचावयास  मिळतो .

या कथेचा  नायक आहे  "गजा "नावाचा किशोरवयीन मुलगा .
श्रावण-सोमवारची  यात्रा " कथेच्या  नायकासाठी खूपच महत्वाची आहे.   
 
आपल्या धाकट्या भावासाठी -राजू साठी , बहिण -चिमीसाठी .मोटर आणि बाहुली "घेणे "गजाच्या आवाक्याबाहेरचे असते ,पण गजा हार न मानता 
जत्रेतल्या  सोमवारी ..महादेवाच्या  मंदिरासमोर दिवसभर बसून राहतो .
.बेलपान आणि फुले " त्याचे पैसे जमा करून ठेवायचे पोते " हे दोन्ही सोडून तो अजिबात हलत नाही .

प्रतिकूल परिस्थिती माणसाला स्वप्ने पाहू देत नसते , मनातल्या इच्छा अपुर्या राहतात ,पण, म्हणून इच्छापूर्तीसाठी काहीच करायचे नसते का ?

 झगडत , संकटाशी  सामना करीत , अडचणीवर मात करून ..
आपल्या स्वप्नाची  पूर्तता होणे "इच्छा पूर्ण होणे "  हा झगडून मिळवलेला आनंद  काही वेगळाच असतो .

.हे सर्व मिळवतांना . गजाला काय काय भोगावे लागले  ?,काय सहन करावे  लागले  ?
या सर्व प्रश्नांची उत्तरे ..  
.हार न मानता , चिकाटीने , प्रयत्न करीत रहाणार्या गजाच्या कथेत मिळतात .

लेखिका मीनाक्षी आडे..यांनी कथेतून ..गजाची वेगवेगळी भावना -रूपं खूप छान दाखवली आहेत. 
हिरमुसलेला गजा ,भूक लागल्यावर भाकरी नाही 
म्हणून खूप पाणी पिऊन पोटाला गप्प ठेवणारा गजा , 
गोळा केलेला बेल ,पोत्यात जमा केल्यवर पळून जातांना ,तारेचा काटा ,मांडीत घुसून 
रक्त निघाले तरी दुर्लक्ष करून पाळणारा गजा ,",   
 पैसे जमा झाल्याचे डोळे भरून पाहिल्यावर बाहुलीच्या दुकानाकडे पाळणारा गजा ".

ही कथा वाचल्यावर वाचक ... शाब्बास रे गजा " असे नक्कीच म्हणतील.

छान -नेटके असे लेखन "  लेखिका मीनाक्षी आडे  यांच्या अगोदर पुस्तकरूपाने प्रसिध्द झालेल्या  साहित्यातून वाचकांनी 
अनुभवलेले आहेच.
पुढील लेखन-प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा .
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
  #संवादिनीकथासंग्रह -परिचय -भाग-६ वा -
ले- अरुण वि.देशपांडे  -पुणे.
9850177342 
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Tuesday, March 31, 2020

संवादिनी कथासंग्रह परिचय लेख- भाग -५ वा

#संवादिनीकथासंग्रह - परिचय लेख- भाग -५ वा . ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
कथा लेखक- १. अमित सोनवणे , २.शशांक गिरडकर , ३. रुपाली मोनीष खैरनार
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
रसिक वाचक-मित्र हो -
कुबेर समूह प्रकाशित संवादिनी कथासंग्रह -आतापर्यंत आपण या लेख-मालिकेचे चार भाग वाचले आहेत . या कथासंग्रहातील
कथा-लेखन हे वाचनीय आहे : हे आता वेगळ्याने पुन्हा-पुन्हा सांगायचे प्रयोजन राहिलेले नाही.
कुबेरकर लेखक आणि लेखिका यांचे पुस्तक-रूपाने आलेले कथा लेखन वाचकांच्या अपेक्षा नक्कीच वाढवणारे आहे ".
आजच्या लेखात आपण खालील कथांचा आस्वाद घेऊ या .
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१.कथा -
शिर्षक- एक धागा सुखाचा (पृ. ४८ ), ले- अमित सोनवणे -नंदुरबार
------------------------------------------------------------------------------------------------
माणसाचे आयुष्य हे एक जरतारी वस्त्र आहे ..यात दु:खाचे धागे शंभर काय , हजारो असतात ,आणि सुखाचा धागा
मात्र एकच असतो , "
या अर्थाची प्रचीती यावी अशी एक सुंदर कथा या संग्रहात आहे.."एक धागा सुखाचा .."
..अभ्यंग "या तरुणाच्या कलात्मक ध्यासाची आणि त्या ध्यासाच्या पूर्ततेसाठी त्याने केलेल्या परिश्रमपूर्वक अशा वाटचालीची
कथा लेखक- अमित सोनवणे यांनी अतिशय सुरेख पद्धतीने खुलवली आहे.
सुख पाहता जवापाडे | दु:खः पर्वताएवढे || हेच अभ्यंगच्या आयुष्याचे गमक आणि सत्य आहे ..या वाक्याने कथेचा आरंभ होतो.
अभ्यंगचे वडील एक निष्णात असे हातमाग- कारागीर , पैठणी विणून ऐश्वर्य कमावणारे आपले वडील त्यांच्या संसाराचा सारीपाटाचा
डाव अर्ध्यावर टाकून .त्याला आणि त्याच्या आईला सोडून गेलेत ..नातेवाईक आणि इतर लोकांच्या त्रासामुळे अतिशय हलाखीचे
असे आयुष्य त्याच्या आईच्या वाट्याला आले ..आणि इथून अभ्यंगच्या आणि त्याच्या आईच्या संघर्षमय आयुष्य प्रवासास सुरुवात होते.
डॉक्टर होण्याचे स्वप्न बाजूला ठेवीत पैठणीच्या व्यवसायात काम करण्याची सक्ती त्याची आई करते , तो देखील हे काम करू लागतो ,
त्याच वेळी सर्वांना जाणवते ..त्याच्या बोटा मध्ये धागा विणायची अजब जादू पांडुरंगाने त्याला दिली आहे.
अप्रतिम काम करायचा ध्यास " ही देणगी अभ्यंगला त्याच्या वडिलांच्या कडून वारश्याने मिळाली आहे.
.
अभ्यंग "ही फक्त एका माणसाची व्यक्तिरेखा नाहीये ..
ही कथा आहे- ती एका .स्वप्नाळू आणि तितक्याच हळव्या मनाच्या तरुणाची ,
जो एक निष्णात कारागीर आहे, आपल्या हातातील जादुई कलेचे मोल किती आहे "याची जाणीव त्याला आहे.
परिश्रम , कल्पकता ,जिद्द आणि आत्मविश्वास असला की एरव्ही सामन्य वाटणारा माणूस किती अफाट असे सुंदर कलात्मक कार्य करू शकतो "
हे अभ्यंग " या व्यक्तिरेखेतून लेखक अमित सोनवणे यांनी खूप छान रेखाटले आहे.
, त्याच्या जीवनात त्याची स्फूर्ती बनून आलेली वैष्णवी ,त्यांच्यातील प्रेम ..हे सगळ या कथेला वेगळ परिमाण देऊन जातात .
अभ्यंग ची स्वप्नपूर्तीची ही कथा वाचकांना सुखद अनुभव देणारी आहे.
लेखक- अमित सोनवणे यांना लेखन शुभेच्छा .
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२.
कथा -
शिर्षक- गण्या . (पृ. ५४ ) ले- शशांक गिरडकर , वर्धा .
--------------------------------------------------------------------------------------------
लेखक - शशांक गिरडकर यांची "गण्या " ही कथा ..एक उत्तम अशी व्यक्ती -चित्रण "असलेली छान अशी कथा आहे.
दोन जिवलग मित्रांची ही कथा ..माणूस ,त्याचे आयुष्य , तो करीत असलेला आयुष्य-प्रवास "यावर आहे.
"गरीब-श्रीमंत " या भेदाचा परिणाम या दोन मित्रांच्या मैत्रीवर कधीच झालेला नाहीये,
क्रिकेट आणि सिनेमाची आवड " इतकेच साम्य असलेले हे दोन मित्र अगदी भिन्न स्तरावरचे आयुष्य जगणारे असले तरी
त्यांच्यातील मैत्री आणि मनातील मैत्र-भाव कायम आहे .
आयुष्य आणि आयुष्यात माणूस निर्णय घेत असतो . " काही निर्णय आयुष्यात आमुल्राग बदल करतात ", कथेतील हे वाक्य
फार महत्वाचे आहे , आणि गण्याच्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकणारा हा निर्णय घेणारी ..गण्याची ..प्रेमिका ,जी पुढे
त्याच्या आयुष्याला सावरणारी , घडवणारी अशी त्याची बायको होऊन त्याची कायमची सोबती , सहचरी झालेली आहे.
लेखक तिच्या विषयी भावनिक मनोगत यक्त करतो ..पण या शब्दातून गण्याच्या मैत्रिणीचे " प्रेमिका आणि पत्नी " अशा
दोन्ही स्वरूपातील व्यक्तिमत्वाचे सुरेख असे दर्शन आपल्याला लेखक घडवतो ,ते खूप छान आहे.
विमानात बसून प्रवास करणारा ..गण्या ..कायम जमींवर पाय असलेला गण्या , आणि , जरा ही न बदललेला तसाच "निरागस मित्र ..गण्या ,
गणेश आहे " ही भावनिक प्रचीती ..मनाला भारावून टाकणारी आहे.
आपण ही सहजपणे म्हणून जातो ..हे गणराया !
"गण्या " आहे तशी छोटीशी कथा ..पण मित्र -प्रेमाने अगदी काठोकाठ भरून गेलेली ही कथा मनस्पर्शी झाली आहे.
लेखक - शशांक गिरडकर यांना लेखन -शुभेच्छा .
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
३.
कथा -
शिर्षक- मुक्त (पृ.६३ ), ले- रुपाली मोनीष खैरनार - मुंबई .
----------------------------------------------------------------------------------------------------------
संवादिनी या कथासंग्रहात ..मोजक्याच अशा काही कथा आहेत ..ज्या चाकोरीबाहेरच्या विषयावर आहेत, अशा विषयावर लिहिणे
म्हणजे ..कथेच्या परिचित अशा परिघाच्या बाहेर जाऊन एखाद्या चर्चित विषयावर लेखन करणे असते .
लेखिका ..रुपाली मोनिष खैरनार ..यांनी त्यांच्या "मुक्त " या कथेतून ..समलिंगी मनोवृत्तीच्या "व्यक्तीचे चित्रण केलेलं आहे.
पायल आणि राशी "या दोन युवतींच्या मैत्री सहवासाची कथा ..यात मानसिक आंदोलने , मानसिक पातळीवर मनामध्ये सुरु झालेले
विरोधी आणि अकल्पनीय असे मनो-व्यापार सुरु झाल्याची चाहूल लागते .
राशीत होत जाणारे हे बदल जाणवतात आणि..त्यामुळे पायल तिला आधार द्यायला जाते, एका वेगळ्या भावनिक स्तरावर
या दोघी जगू लागतात , अशा क्षणी आपणच एकेमेकीसाठी कसे नि किती महत्वाचे आहोत हे दोघीना कळू लागते ..पटायला लागते.
स्वतःच्या नव्या विश्वात ..राशी जितकी खोल खोल गुंतत जाते, तितकीच आपल्या सोबत ती पायलला पण खेचून नेत असते ,जणू काही
राशीच्या सहवासात पायल संमोहित होऊन गेलेली आहे. अशा मनोवास्थेत राशी ..म्हणते ..पायल ..तुही माझ्या सारखीच आहेस ..
"homosexual..."समलिंगी !!!!!
पायल आणि राशी .या तसे पाहिले तर उमलू पहाणार्या कालिका आहेत, पण.. किती भयानक चक्रात त्या सापडल्या आहेत, या जाणीवेने
आपणपण अस्वथ होऊन जातो .
या चक्रातून राशी आणि पायल "या मुलींना बाहेर काढणाऱ्या पायलच्या आईची ..नामिताची सुद्धा ही कथा आहे...
या कथेतील आगळे-वेगळे भाव-विश्व , पायल आणि राशी, पायलची जागरूक - आई -नमिता , दोन्ही मुलींचे परिवार ,
समुपदेशक डॉक्टर निशा ..आपल्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहतील.
पूर्ण कथा वाचून पहा , खूप वेगळा अनुभव येईल .लेखन आणि शब्द योजना एकदम अचूक आहे, ज्यामुळे कथा तीव्र परिणाम साधून जाते.
आधुनिक जीवनशैलीच्या आहारी गेलेल्या समाज-समुहात ..या समस्येने आपले अस्तिव दाखवायला सुरु केले आहे.
अशा या समस्येवर लेखन करून
लेखिकेने "अतिशय महत्वाच्या अशा प्रश्नाकडे लक्ष वेधून धोक्याचा इशारा दिला आहे.
"मुक्ता " त्यांच्या लेखन-प्रवासातील एक लक्षणीय कथा ठरेल असे म्हणावेसे वाटते.
लेखिका रुपाली मोनीष खैरनार याना लेखन शुभेच्छा.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
भाग -५ वा .
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
9850177342
-----------------------------------