#संवादिनीकथासंग्रह - परिचय लेख -भाग -७ वा . ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
कथालेखक - १. नितेश पाटील. २. तुषार नातू . ३. केदार विलास दिवेकर .
------------------------------ ------------------------------ ------------------------------ --------------------------
नमस्कार वाचक मित्र हो-
#संवादिनीकथासंग्रह - परिचय लेख -भाग -७ वा . आजच्या लेखात खालील तीन कथांचा आस्वाद -परिचय करून देतो आहे.
१. कथा - स्वप्न धुमारे - (पृ.८२ )
लेखक - नितेश ज्ञानेश्वर पाटील (नित ) -पालघर
------------------------------ ------------------------------ ------------------------
लेखक नितेश पाटील यांनी "स्वप्न धुमारे "या कथेत ..मनाच्या अंतरंगात शिरून ..स्वप्न आणि त्या स्वप्नांची वैज्ञानिक
स्वरूप ,मनाशी त्याचा संबंध अशी चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला आहे..
.कथेची नायिका .."राघवी ", हिला कायम वाटत
असते की तिला पडणारी स्वप्न ", ही सूचक आहेत
..त्यामागची कारणे शोधणे तिच्या विचार- कक्षातले नाहीये
.तिच्या विचारांना मर्यादा आहेत "याची तिला जाणीव आहे.,
या स्वप्नाबाद्ल कुणाला कसे सांगावे ? या विचारांचे संकट
तिच्या मनावर गडदपणे असते.
राघवीला स्वप्नात जे काही दिसत असते..ते विचित्र आणि वाईट अशा स्वरुपाचेच असते. त्यामुळे तिची मनोवस्था उदासवाणी
असते.. या तिच्या अवस्थेच्या वर्णनाने कथा सुरु होते . या वर्णनात राघवीला नेहमीचा सुरूप - सुंदर असा नेहमीचा निसर्ग किती
कुरूप दिसतो याचे वर्णन लेखकाने विरुध्द -स्वरूपाच्या प्रतिमा -शब्दातून केले आहे ..
जे खूप लक्षवेधी आणि मनात ठसणारे आहे.
नितेश पाटील यांची लेखन-शैली आकर्षक आहे हे या कथेतून जाणवते.
सतत पडणारी दु:स्वप्न तिला नेहमीच पूर्वसूचना देणारी आहेत असे वाटू लागते , पण, ती सांगितल्याने ही स्वप्न ज्यांनी पाहिली नाहीत ",
लोकांचा संभ्रम कशाला वाढवायचा असाही प्रश्न तिला पडतो ..त्यामुळे तिला पडणारी स्वप्न आणि त्यातला अर्थ "दोन्ही तिच्या पुरते
मर्यादित राहतात
अशी मानसिक आणि वैचारिक गोंधळाची अवस्था ..असली म्हणजे व्यक्तीला स्वतःशी किती वेवेगळ्या पातळीवर मनाला
सांभाळण्याची कसरत करावी लागते ." .हे अतिशय प्रभावीपणाने "राघवी " या व्यक्तिरेखेतून लेखकाने दाखवून दिले आहे.
निसर्ग नियमानुसार ..आयुष्यची अखेर होणे हे सर्वमान्यच आहे.. पण, हिरवे पान ..अकाली गळून पडणे ", त्याचे जाणे ..
हे यातना देणारेच आहे ना !
राघवी ची ही खंत , हे दु:क्ख या कथेतून सतत जाणवते.
जाणीव -संपन्नमन " राघवीला एका विचाराप्रत आणून ठेवते ..तिच्या मनात होणारी वैचारिक जागृती , ज्ञान -विज्ञान निष्ठा "
या दोन्हीमुळे..स्वप्नांच्या -धुमाऱ्यातून बाहेर पडणे , मनाला पडणार्या प्रश्नांना बगल देत पुढे गेलेलं बरं .. हे तिचे स्वतःशी कबूल करणे "
खूप काही सांगून जाणारे आहे ".
नायिका - .राघवी ,तिची मैत्रीण शालिनी ..आणि दोघींचा विद्यार्थी पूर्वेश ..यांच्याबद्दल जाणून घेण्यसाठी 'स्वप्न धुमारे ही कथा
जरूर वाचावी .
लेखक नितेश पाटील यांना लेखन शुभेच्छा .
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ---------
कथा - २
शिर्षक - सिंड्रेला (पृ..८७ )
ले- तुषार पांडुरंग नातू - नागपूर
------------------------------ ------------------------------ ----
सिंड्रेला "ही अतिशय परिचित अशी जग-प्रसिध्द लोकप्रिय -स्वप्न -कथा आहे. प्रस्तुतच्या संग्रहात .याच शीर्षकाच्या कथेत .. सायली नावाच्या ."सिंड्रेलाची
हळवी आणि भावूक प्रेमकथा .वाचावयास मिळते .
सहजसुंदर लेखन शैलीचे लेखक म्हणून..तुषार नातू वाचकांना परिचित आहेत. त्याची प्रचीती या ही कथेतून वाचकांना येईलच.
सिंड्रेला " ही कथा .सायलीच्या आयुष्यात आकाशच्या रूपाने "प्रेम-भावना " येते . हे सगळे होण्यासाठी सायलीला ..मदत झालेली आहे ती
इंटरनेट - फेसबुक या माध्यमाची .
आकाशशी . मैत्र होण्या आधीचे सायलीचे आयुष्य आणि वास्तवातले जगणे ..तसे खडतरच आहे.. शारीरिक व्यंग असणे , अपंगत्व येणे "
या माणसाच्या दुर्दैवाने वाट्याला येतात .त्यात या व्यक्तींचा काही दोष नसतो . नशिबाचे भोग " म्हणत जगायचे ,
सायलीला .सावत्र आईच्या येण्याने ..सगळी दु:खः ,यातना , वेदना सोसाव्या लागलेल्या आहेतच.
आभासी जगात झालेल्या मैत्रीने सायलीचे आयुष्य बदलून जाते . कविमनाच्या सायलीला.आकाशच्या अनुरूप मैत्री मुळे.हवेहवेसे वाटणारे ,
पण..तिच्या सारख्या व्यंग असलेल्या ,अपंगत्व असलेल्या मुलीसाठी स्वप्नवत वाटणारे आणि अप्राप्य असे प्रेम आकाशमुळे मिळते
पण, जेव्हा आकाश सायलीला
समक्ष भेटेल , तिला पाहिलं तेव्हा मात्र नक्कीच , सायलीचे खरे व्यक्ती-रूप "पाहून नक्कीच तो दुरावेल ..हे सायलीची भीती ...
सायलीची ही व्याकूळ , हळवी भाव-व्यथा .. सिंड्रेला : कथेतून लेखक तुषार नातू यांनी अतिशय रोचकपणाने लेखन केली आहे.
त्यामुळे .... सायली "चे काय होणार ? या बद्दल वाचक आस्थेने ही कथा नक्की वाचेल . सायली " सर्वार्थाने .."सिंड्रेला "म्हणून शोभते .
छोटीशी असली तरी ..सिंड्रेला " कथा छान जमली आहे .
अशा भावनिक कथा वाचकांच्या मनाला सहज भावून जातात .
लेखक - तुषार नातू यांना लेखन शुभेच्छा .
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------
3.
कथा -
शिर्षक- काकपक्ष (पृ. ९१ ), ले- केदार विलास दिवेकर - मुंबई
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------
संवादिनी कथासाग्रहातील मोजक्या अशा ..वेगळ्या ..धाटणीची "काकपक्ष " ही कथा ..यातील विषय परिचित आहे ,पण तो ज्या
वेगळ्या पद्धतीने परिणामकारकरीत्या लेखकाने मांडला आहे ..ती पद्धत वाचकांसाठी नवी अशीच असणार आहे.
पंचतंत्र -कथा , इसापनीती , चांदोबा ..
आणि बालमित्रांच्या साहित्यातून आपल्याला
. बोलणारे पक्षी आणि प्राणी "नित्य भेटतात असतात . या स्वप्न-जगात बालमने
सहजतेने रमून जाणे .नैसर्गिक आहे.
पण..केदार दिवेकर या लेखकाने .काकपक्ष " या कथेत .कावळा " आणि कावळ्यांची जमात ,कावळे-समाज ,
यांच्या अव्यक्त भावनाना बोलते करून .. त्याचा संबंध थेट माणूस आणि त्याच्या समाजाशी जोडला आहे.तो विलक्षणआहे.
पक्ष , पितृपक्ष , पक्ष - पंधरवडा " हे दिवस " माणसांच्या भावनिक विश्वातले अतिशय महत्वाचे दिवस समजले जातात .
पारिवारिक कर्तव्य म्हणून म्हणा हे पक्ष -कार्य ..मनापासून आणि मनाविरुद्ध " "अस दोन्ही प्रकाराने करणारी माणसे दिसतात .
पक्ष " करणे ,आणि पक्ष -कार्य " एकदाचे उरकून टाकणे ",
असे सर्व प्रकार " कसे होत असतात
.. हे या कथेतून वाचतांना कावळ्यांनी ..माणसांच्या वृत्ती आणि प्रवृत्तीवर बोचरे प्रहार केले आहेत ,
.
माणूस आणि त्याचा समाज , कावळे आणि कावळ्यांच्या समाज - यांच्या बद्दल लिहितांना .लेखक केदार दिवेकर यांनी कथेत .एक उपहासात्मक
असे वातावरण उभे केले आहे असे म्हणावेसे वाटते
, कावळ्यांच्या समाजाबद्दल कावळे जे व्यक्त होतात , त्यावरून कावळे-समाज असो की मानव-समाज " दोन्हीत साम्य आहे असे जाणवते
..ते असे की .. सामुहिक जीवनावर , सामाजिक रूढी -
आणि परंपरा " यांचा विपरीत असाच प्रभाव असतो " आणि त्यातून "नवी पिढी
कावळ्यांची असो की माणसांची .. .संघर्ष होतच असतो .प्रस्थापित -आणि विस्थापित " होणे हा त्याचाच परिणाम आहे.
कावळे आणि माणसांची ही "रूपकात्मक-कथा " माणसाला अस्वथ करणारी आहे.
छोट्याश्या कथेतून मोठा आशय व्यक्त करण्याची किमया लेखक केदार दिवेकार यांना छान साधली आहे.
त्यांच्या लेखन-प्रवासासाठी शुभेच्छा.
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------
#संवादिनीकथासंग्रह - परिचय लेख -भाग -७ वा .
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
9850177342
No comments:
Post a Comment