पुस्तक-परिचय लेख-
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
------------------------------ -----------------
भावविश्व संपन्न करणारे लेखन - "
ललित लेख संग्रह -
कवडसे सोनेरी ..अंतरीचे ! -
------------------------------ ------------------------------ ------------------------------
प्रसन्नचित्त करून टाकणारे लेखन -वाचनास मिळणे " वाचकांसाठी हा नक्कीच एक खूप वाचन-आनंद योग असतो .ललित लेखनात हे सामर्थ्य
असते ", याची अनुभूती एक वाचक म्हणून मी नुकतीच अनुभवली ..
या ललित लेखसंग्रहाचे नाव आहे "कवडसे सोनेरी ..अंतरीचे ! याचे लेखक आहेत लेखक-कवी -विस्वास देशपांडे . त्यांचे हे पहिलेच पुस्तक .
.
लेखकाविषयी अधिक सांगावेसे वाटते की -
चाळीसगाव येथील - आ.बं. हायस्कूलचे ते मुख्याध्यापक होते .कनिष्ठ महाविद्यालयात त्यांनी इंग्रीजीचे अध्यापन केले .
"आदर्श शिक्षक " पुरस्काराने सन्मानित विस्वास विष्णू देशपांडे - म्हणजे एक विद्यार्थीप्रिय शिक्षक " ही त्यांची खरी ओळख आहे .
इंटरनेटवर म्हणजेच .. फेसबुक आणि त्यावरील विविध साहित्यिक समूह या सोशल माध्यमावर सुद्धा देशपांडेसर सात्याने विपुल लेखन करीत असतात .
"प्रभातपुष्प ," "विचारप्रभात " ,संवादिनी " या त्यांच्या काही लोकप्रिय लेखमाला आहेत.
वाचन, लेखन, प्रवास आणि संगीत हे विश्वास देशपांडेसरांचे आवडते छंद आहेत . त्यांच्या या छंदास आणि आवडीस .त्यांच्यातील .अभ्यासपूर्ण ,चिंतनशील
आणि सहजतेने काही चांगले सांगावे अशी आंतरिक तळमळ असणार्या हितचिंतक -शिक्षकाची साथ लाभली आहे .
नेमक्या या विशेष गुणांमुळे ..या लेखनातून एक व्यासंगी जेष्ठ मार्गदर्शक संवाद साधतो आहे असे जाणवत राहते .
काही वेळा आपण असे म्हणतो की ..लेखक आणि त्याचे लेखन ..खूप नशीबवान असते .ज्या पुस्तकातून त्यांचे लेखन प्रसिद्ध झालेले असते ,ते पुस्तक ,
त्यातील लेखन अल्पावधीतच वाचकप्रिय ठरते ", देशपांडेसरांच्या या संग्रहाबद्दल अगदी असेच म्हणावेसे वाटते . सगळीच भट्टी मस्तपैकी
जमून आलेली आहे . १६७ पृष्ठांच्या या ललित लेख संग्रहात ..५४ लेख आहेत ..एका पेक्षा एक असे सरस लेख आहेत.
या संग्रहास प्रस्तावना दिली आहे ..प्रा.प्रवीण दवणे यांनी . जे स्वतःच एक उत्तम ललित लेखनकार आहेत, लेखक विश्वास देशपांडे यांच्या
ललित लेखनाबद्दल लिहितांना त्यांनी जे विचार व्यक्त केले आहेत ..त्यातून ललित लेखन "या लेखन-प्रकाराबाद्ल आपल्याला माहिती होते आणि
लेखक विश्वास देशपांडे यांच्या या लेखनाचे व्यापक असे साहित्यिक स्वरूप आणि त्यातील सौंदर्य उलगडले आहे.
प्रा.दवणे सर म्हणतात..
"अंतरीचे हे सोनकवडसे ..एकाएकी प्रगट झालेले नाहीत . त्यामागे तीन तपांचे जीवनचिंतन आहे. अध्यापनाच्या व्यवसायाने दिलेले मनन आणि त्या आधी
निरीक्षणाची शिदोरी आहे. जगण्या बद्दलचा सकारात्मक दृष्टीकोन व विश्वास हाहि विश्वास देशपांडे यांच्या प्रस्तुत लेखनाचा विशेष आहे. मनाला उभारी देणाऱ्या
प्रकाशात्म्क लेखांमुळे या ग्रंथाला समुपदेशात्मक लेखनाचं वेगळ मूल्य प्राप्त झालं आहे . हे सोनेरी कवडसे जीवनातील शाश्वत मुल्यांकडे घेऊन जातात ,
हे मला महत्वाचे वाटते. "
या लेखनाचा एक वाचक म्हणून मला काय वाटले - तर ,
मी माझ्या शाळेत असतानंचे दिवसच मला पुन्हा या पुस्तकाच्या निमित्ताने आठवले ..कारण ..एखाद्या दिवशी वर्गावर एखाद्या तासाला नियमित शिक्षक येऊ शकले नाही
की तो तास साक्षात हेड-सर घेत असत .आणि त्या तासात जे काही कानावर पडायचे ",ते कायमचे मनात साठवले जायचे ", .
अग्दी तसेच मी हे लेख वाचत असतांना अनुभवले ..कारण लेखक - विश्वास देशपांडे हे विद्यार्थीप्रिय शिक्षक होते ", मुख्य म्हणजे हेड-सर होते "
या पुस्तकातील एकेक लेख म्हणजेच या हेड - सरांनी घेतलेला तास आहे ", आणि वाचक सहजपणे या सरांचा विदार्थी होऊन जातो.
असे विलक्षण आणि वेगळे असे काय आहे या लेखनात ?
सहजता आहे, आत्मिक -जवळीक साधणारे हितगुज आहे, मोठ्या व्याक्तीमात्वाब्द्द्ल व्यक्त होतांना आदरभाव कसा असावा याचे उदाहरण आहे. सामन्य व्यक्ती असो
वा असामन्य व्यक्तिमत्व असो ..दोन्हीबद्दल अंत:करणपूर्वक जपलेली कृतज्ञता आहे, जी व्यक्त करतांना या लेखनातून आदर्श -व्यक्तिमत्व साकारले गेले आहेत..
लेखक विश्वास देशपांडे ..स्वतःच्या लेखनाबद्दल म्हणतात -
आशावादी आणि सकारात्मक विचात ठेवून जीवनाला आनंदाने सामोरे जायचे असते . माझ्या या सगळ्या लेखांमध्ये असाच प्रकारची सकारात्मकता ,आशावाद आपल्याला
आढळेल . निरासेचा ,दु:खाचा स्वर आढळणार नाही ".
सरांच्या या मनोगतातून एक स्पष्ट झाले आहे की.. जीवनात शोधायचा तो आनंद , यश, कार्यपूर्तीचा आनंद , स्वप्नपूर्तीचा आनंद, कठोर परिश्रमांना मिळालेले रसाळ फल ,
हे सगळ वाट्याला केव्हा येतं ? , त्याच्याच यशोगाथा म्हणता येतील असे अनेक लेख या संग्रहात आहेत.
हे सर्व लेख अगदी नेटके आणि सुबक आकाराचे आहेत. त्यातील विषयाला अन्रुरूप असे शीर्षक ,आपल्या जवळच्या व्यक्तीविषयी सांगतांना जी आस्था असते , त्या आस्थेतुंच
लेखक पूरक माहिती देतो , आणि त्या माहितीचा आपल्या मनावर सकरात्मक परिणाम होईल .असे चिंतनपर भाष्य करून लेखाचा शेवट करतो..
खरेच ..हे सर्व परिणामकारक असे लेखन आहे.
साहित्य , संस्कृती , लोककला , संगीत , समाजिक पर्यावरण , व्यक्ती-विशेष ..यात सर्व क्षेत्रातील अलौकिक ,असामन्य , थोर ,कीर्तिवंत आणि लोकप्रिय व्यक्तींबद्दल "
असे लेख आहेत .. ही अशी विविधता म्हणजे लेखकाच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवणारे आहे.
लेखन मजकूर - उदाहरणे देणे म्हणजे.. पुस्तकाचे वाचन अगोदरच केल्या सारखे होईल ,कारण तुम्ही हे पुस्तक नक्कीच वाचावे असे आहे .म्हणून या ठिकाणी मी
काही लेखांची शीर्षके - आपल्याला सांगतो..
स्वप्न साकारले " (पृ..१६ ), "सोशल मिडीया : एक दुधारी शस्त्र (पृ.२५ ),
एक अवलिया गायक - किशोर कुमार (पृ..४१ ) , " लाईफ इज ब्युटीफुल (पृ..४६ ), "विंदा : कवीमनाचा माणूस (पृ,५२ ), , "एक दुजे के लिये - (पृ.६४ ),
"बापमाणूस - (पृ,७६ ), " रहस्य गीतारहस्यच - (पृ,८२ ), "मन प्रसन्न करणारी गाणी ..(पृ.९० ), " आपल्या मुलांचे पालक व्हा ..मालक नको (पृ. १०२ ),
गदिमा आणि गीतरामायण ", (पृ..१०६ ), तरुणांनी ज्ञानेश्वरी का वाचावी ? (पृ.१३४ ), गानसरस्वती "(पृ..१४८ ), गानसम्राज्ञी (पृ..१५८ ).
विश्वास देशपांडेसर, तुमच्या या लेखनाने खूप आनंद दिलाय , तुमच्या आगामी पुस्तकाची प्रतीक्षा आहे, त्यासाठी शुभेच्छा .
कवडसे सोनेरी ..अंतरीचे !, संग्रहाचे सुरेख मुखपृष्ठ करणाऱ्या कलावंत चैताली नाचणेकर यांच्या कामगिरीचे खूप खूप कौतुक केले पाहिजे .
पुण्याच्या विश्वकर्मा पब्लिकेशन यांनी या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे.
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ----------------------------
पुस्तक-परिचय लेख-
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२
------------------------------ -----------------
ललित लेख संग्रह -
कवडसे सोनेरी ..अंतरीचे ! -
पृ -१६७ , मूल्य-रु.२२५ /-
ले- विश्वास देशपांडे
संपर्क -९३७३७११७१८
------------------------------ ------------------------------ ------------------------------
प्रकाशक - विश्वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे.
संपर्क - ९१६८६८२२००
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ --
