Tuesday, May 12, 2020

#संवादिनीकथासंग्रहपरिचयलेख - भाग-९ वा . ले- अरुण वि.देशपांडे

#संवादिनीकथासंग्रहपरिचयलेख -
 भाग-९ वा . ले- अरुण वि.देशपांडे 
कथा लेखक - १.प्रसन्नकुमार , २.जयश्री दाणी, ३.आरती मोरे -दरेकर 
-----------------------------------------------------------------------------------------
नमस्कार -
कुबेरकर आणि वाचक - मित्र हो 
----------------------------------------------------------
वाचकांना कथा-परिचय करून देण्याच्या निमित्ताने -कुबेर समूह प्रकाशित संवादिनी "
या कथासंग्रहाचे अनेकदा वाचन करण्याचा योग आलाय  

मित्रांनो ..प्रत्येक कथा एक जीवनानुभव देणारी , माणूस आणि व्यक्ती यातील फरक 
जाणवतो हे वेगवेगळे दर्शन थक्क मनाला थक्क करून जाणारे असेच आहे. 
मानवी जीवन किती आणि कसे गुंता -गुंतीचे असते ..हे जीवन जगतांना माणसाला 
किती वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या पद्धतीने वागावे लागत असते "
असे खूप काही  या सगळ्या कथा-लेखनातून लेखकांनी नेमक्या -शब्दातून मांडलाय 

मित्र हो ,आज खालील तीन कथांबद्दल तुम्हाला सांगायचे आहे -
--------------------------------------------------------------------------------------------------
१. अनोखं लग्न - (पृ.११४ ), ले- प्रसन्नकुमार -  बंगळुरू
------------------------------------------------------------------------------------
कथा -आशयाला थेटपणे भिडणारी ही कथा तशी अनोखीच आहे असे म्हणता येईल.

कथा-नायिका -सुधाच्या स्वभाव-गुणाबद्दल सांगत सांगत ही कथा वेगाने पुढे सरकत जाते ,
 भीती हा शब्दच जिच्या कोशात नाहीये , लहानपणापासून धाडसी असलेल्या सुधाच्या 
स्वभ्वात "जिद्द ! या गुणाची भर पडलेली आहे , या श वर्णनामुळे  सुधा .ही व्यक्तिरेखा चार-चोघीसारखी 
सामन्य नाहीये हे लेखकाने वाचकांच्या मनावर छान ठसवले आहे.
ती कशी सामन्य नाहीये .! .हे कथेतून आपल्याला उलगडत जाते.  -नोकरीच्या क्षेत्रात न रमणारी 
 सुधा " समाजकार्याची आवड असणारी आहे. 
आवड असणे आणि प्रत्यक्ष  कृती-प्रवण असणे "  यात किती फरक असतो
हे- दाखवून  देणारी   सुधाची "-व्यक्तिरेखा लेखकाने ठसठशीतपणे रेखाटली आहे.

समाज-कार्यात स्वतःला झोकून देत कार्य करीत राहण्याची -सुधाची वृत्ती " खूप प्रेरक अशी झाली आहे ",
हे सगळे कार्य एखाद्या धडधाकट व्यक्तीने करणे काही आश्चर्याचे नाही .
सुधाच्या पायाचे हाड मोडल्यामुले ,  तिच्या पायामध्ये रॉड टाकावे लागले "
 या अपघाताने .सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही "

तरीही अनोखी सुधा ..खचली तर नाहीच - ती नाउमेद होऊन बसली नाही .. तिच्या स्वभावाला अनुसरून 
ती कार्यात सतत व्यस्त असते "
या कथेतून लेखकाने ..अनेक सकारत्मक असे संदेश ..सुधाच्या व्यक्तीरेखेतून  देण्याचा छान प्रयत्न केला 
आहे . कथेतील हे सकारात्मक वातावरण ..आपल्या मनात एक उमेद नक्कीच निर्माण करणारे आहे "
असे म्हणावेसे वाटते.
कथेत येणारे प्रसंग .आणि त्यातील सुधाचे वागणे , त्यातून काही नवीनच साधण्याचे उद्देश ",आणि 
तिच्या स्वभावातील निग्रही वृत्ती .. या सगळ्यासाठी ..ही कथा वाचायला पाहिजे ..
कथेचे शीर्षक - "अनोखी सुधा " असे असते तरी ते समर्पकच झाले असते. असे कौतुकाने म्हणतो बरे का !

लेखक -प्रसन्न कुमार लिखित ही कथा वाचकांना "प्रसन्न "करून टाकणारी आहे.
त्यांना लेखन शुभेच्छा ..!
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२.
कथा - शिर्षक- धुरांच्या  रेषा  (पृ- १३१ ) , ले- जयश्री दाणी - नागपूर 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नागपूरच्या-साहित्यकार  जयश्री दाणी- इंटरनेटवरील आणि प्रिंट -मिडीया मधील एक प्रसिध्द असे व्यक्तिमत्व आहे.
कथा-कविता -लेख ..अशा स्वरूपातील त्यांचे विपुल लेखन वाचकांच्या पर्यंत सातत्याने येत असते .
अशा या लेखिकेचा कथा सहभाग ..संवादिनी "संग्रहात आहे.

संग्रहातील "धुरांच्या रेषा "ही त्यांची कथा  अतिशय हळवी -भावोत्कट अशी ललित -शैलीतील कथा आहे ..
या कथेतील सुमती ..अतिशय भावूक , तरल आणि हळव्या  मनाची आहे . वास्तव आयुष्यात आणि स्वप्नवत दुनियेत 
जगणाऱ्यां माणसांच्या भावनिक -विश्वातली मानसिक तडफड लेखिका जयश्री दाणी यांनी  व्यक्त केली आहे.
ती मनाला स्पर्शून जाणारी आहे.

खरे तर सुमती ही  एक प्रातिनिधिक व्यक्तिरेखा आहे .. असे उध्वस्त भावविश्व सोबत घेऊन .वर्तमानात दुखः भोगणारी 
माणसे आपण भवताली पाहतच असतो . अशा माणसांच्या अबोल मनाच्या  भावना जणू लेखिकेने सुमितच्या माध्यमातून जणू बोलक्या केल्या आहेत.
 आपल्याच जोडीदारा कडून सतत भावनिक अवहेलना होत रहाणे हे फार मोठे असह्य दुखणे आहे . संवदेनशील माणसाच्या वाट्याला ..असे वास्तव-आयुष्य 
आले तर काय होते ? त्याचेच उत्तर सुमतीच्या भाव -विश्वाच्या झालेल्या दुर्दशेतून आपल्याला मिळते .

सुमितीचा स्मृती उत्सव ..तिच्या सोबतच्या माणसाना स्मृती-भृंश वाटणे " या पेक्षा दुसरे दुर्दैव काय असणार ?
तिच्या अंतरंगातले हे मानसिक -दुखः वाचकांना भाव-व्याकूळ करणारे आहे.
सुमितच्या घरातली माणसे भले ही तिच्या स्मृती उत्सवात तिच्या सोबत नसतील ..पण.या कथेचा वाचक .अगदी सहजपणे 
तिला  सोबत करील .

लेखिका जयश्री दाणी यांना लेखन -शुभेच्छा .
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

३.
कथा - शिर्षक-  Mercurous - (पृ. १३६  )- ले- आरती मोरे -दरेकर - पुणे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
इंग्रजी शीर्षक असलेली ही कथा ..या संग्रहातील एक वेगळी कथा आहे. ज्याला मर्डर- मिस्ट्री " म्हणतात .या  रहस्यमय शैलीतील कथेच्या लेखिका 
आहेत  आरती मोरे -दरेकर . 
नेहमीच्या कथा वाचतांना ..परिचित शब्दातील प्रसंग-वर्णानातून  कथा पुढे जाते आणि काय असेल याचा अंदाज वाचक सहजपणे करू शकतो .
आरती मोरे -दरेकर यांची कथा ..वाचकाला  चकवे देत ..पुढे पुढे नेते .. हे या कथेचे यश आहे.

उच्चभ्रू वातावरण , श्रीमंत माणसाचे विश्व उभे करतांना ..त्यातील माणसांच्या वृत्तीवर लेखिका मार्मिक भाष्य करते .
आणि देश-विदेशाचे संदर्भ येतात त्यावरून ,,ही फार मोठ्या श्रीमंत व्यक्तीची कथा आहे ही सतत जाणवते . आणि यातली 
माणसे समान वृत्तीची आहेत .
सारे काही पैश्यासाठी " असे वागणार्या माणसांचे सूत्र एकच असते .हवे ते मिळवणे  ते . बाय हूक ऑर क्रूक ! 

या कथेतील व्यक्तिरेखा . श्रीयश , हंसाबेन , युवराज  आणि रावसाहेब "त्यांचे वागणे ,वावरणे .
कथेतील रहस्य अधिक गडद करणारे आहे. अशी थ्रिलर कथा लिहिणे सोपे नसते ,आणि ही 
कथा तशी तर अगदी छोटी कथा आहे, असे असून ही ..ही कथा गूढ आणि उत्कंठावर्धक वाटते याचे श्रेय लेखिकेचे आहे..

नेहा आणि आशिष यांच्या तपास कार्याचे पुढे काय झाले असेल ? वाचक हा विचार नक्कीच करेल 

लेखिका -आरती मोरे -दरेकर यांना लेखन शुभेच्छा .
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
  #संवादिनीकथासंग्रहपरिचयलेख -
 भाग-९ वा . ले- अरुण वि.देशपांडे - पुणे.
9850177342
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment