Monday, May 18, 2015

पुस्तक परिचय लेख- अमृताचा घनु..! राम शेवाळकर ..!

पुस्तक -परिचय लेख-
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
-------------------------------------------------
गुरुवर्यांचे स्मरण-
अमृताचा घनु -
राम शेवाळकर
-------------------------------------------------------------------
गुरुवर्य , आदरणीय सर "- अशा संबोधनाने ज्यांनी जनमानसांच्या हृदयात स्थान मिळवले आहे अशा प्राचार्य -राम शेवाळकर यांच्या जीवन-प्रवासाचा आलेख पुस्तक रूपाने सादर करण्याचा प्रयत्न लेखक -नागेश सु.शेवाळकर यांनी केला आहे. त्यांच्या लेखनाचे आपण कौतुक करू या.

कविवर्य -लक्ष्मीकांत तांबोळी यांनी प्रस्तुतच्या लेखनाबद्दल म्हटले आहे की - अमृताचा घनु " मध्ये राम शेवाळकरांच्या लेखक , वक्ता , कवी , प्राचार्य ,शिक्षणतज्ञ , संघटक , प्रशासक ,आचार्यकुलाचा उपासक इत्यादी पैलूंचा मोठ्या आपुलकीने , आदराने परामर्श घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ".
लक्ष्मीकांत तांबोळीसर - या यांच्या अभिप्रायाची प्रचीती हे चरित्र -लेखन निश्चितच देते . नागेश शेवाळकर ही साहित्य-क्षेत्रातील सात्यायाने लेखन करणारे एक परिचित लेखक आहेतच .त्यांच्या लेखन-प्रवासाच्या आरंभीच नांदेड येथे त्यांना राम शेवाळकर सरांच्या सहवासाचा ,आणि लेखन-शुभेच्छांचा लाभ झाला .
गुरुवर्य राम शेवाळकर यांच्या विविध कार्याविषयक अनेकांनी लेखन केले आहे. असे असले तरी त्यांच्या विषयी असलेल्या अपार आदरापोटी - अजूनही अनेकांना शेवाळकर सर यांचे बद्दल लिहावेसे वाटत असते .प्रस्तून लेखन सिध्द करण्यात याच आपलेपणाचा आणि आदराचा मोठा भाग आहे. नागेश शेवाळकर यांनी मनोगतात याबद्दल लिहिलेले आहेच.
उत्तंग व्यक्तिमत्व " -याचे उदाहरण द्याचे असेल तर आपण प्राचार्य राम शेवाळकर "यांचा उल्लेख सह्जेतेने करतो. सरांच्या अफाट व्यासंगाचे ,विद्वत्तेचे ,व्यक्तिमत्वाच्या अष्टपैलू दर्शनाने .सर्वांना प्रभावित केले आहे. अशा या थोर व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलूवर नागेश शेवाळकर यांनी समरसून लिहिले आहे. वाचकांना आनंद देणारे असे हे लेखन झाले आहे.
एक दृष्टीने नागेश शेवाळकर यांनी नव्या पिढीतील वाचकांना एका थोर गुरूंचे चरित्र कथन केले आहे.ही कथन शैली खूप हृद्य आणि रसाळ अशी झाली आहे. हे लेखन म्हणजे गुरु परंपरेला केलेले अभिवादनच होय.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक परिचय -
-अरुण वि.देशपांडे -पुणे .
मो- ९८५०१७७३४२
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अमृताचा घनु
राम शेवाळकर -
ले- नागेश सू. शेवाळकर - संपर्क - ९४२३१३९०७१
प्रकाशक -
दत्ता डांगे
इसाप प्रकाशन -नांदेड.- संपर्क - ९८९००९९५४१
पृ.११२ , मूल्य - रु. १२०/
------------------------------------------------------------------------------------------------------------

Saturday, May 16, 2015

पुस्तक-परिचय - आत्मभान -कविता संग्रह.

पुस्तक परिचय लेख-
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- ९८५०१७७३४२
-----------------------------------------------------------------.
आत्मबल देणारी कविता -"
-आत्मभान ..!
-------------------------------------------------------------------
फेसबुक -जगतात -कालिदास चवडेकर हे सातत्याने कविता -लेखन करणारे एक कवी आहेत.संग्रह-रुपात कवीचे आपल्या कविते साहितचे येणे "एक अतिशय आनंददायक घटना असते. तितकीच ती त्याच्या कवितेची एक प्रकारे परीक्षा असते. कौतुक -प्रवास संपवून ही कविता पुढच्या प्रवासाची जाणीवपूर्वक तयारी करते आहे की नाही.याच्या खाणाखुणा संग्रहातील कवितेतून दिसू लागतात. म्हणून कवीच्या पहिल्या कविता -संग्रहाचे महत्व खूप असते.

कवी -कालिदास चवडेकर -- सोलापूरचे कवी म्हणून आता परिचित झाले आहेत. "आत्मभान " हा त्यांचा पहिलाकविता संग्रह -मार्च -२०१५ ला - प्रकाशित झाला आहे.त्यांचे या निमित्ताने मन:पूर्वक स्वागत आणि अभिनंदन करू या.
कवीचा पहिला संग्रह आला म्हणजे अनेक अर्थाने कवीला प्रसिद्धी मिळते , असे असले तरी त्याची "कवी-म्हणून जबाबदारी वाढते " हे कवीने मनात ठसवले पाहिजे. "चवडेकर -यांच्या ८० पृष्ठांच्या संग्रहात विविध स्वरूपाच्या कविता आहेत.
डॉ.लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी या कवितेबद्दल शुभेच्छा देतांना म्हटले आहे.की- या कवीच्या कविता विचाराला प्रगल्भ करणाऱ्या, चिंतनाची खोली नि व्याप्ती वाढवणाऱ्या आहेत. त्यांची प्रसन्न शब्दकळा ", अर्थवाही प्रतिमा आणि काव्याला असलेली अंगभूत लय " यामुळे या कविता ओठावर घोळ्वाव्या अशा वाटतात .".
रसिक हो -
कविमनाला अनेक प्रश्न पडत असतात .आणि कवी आपल्यापरीने या प्रश्नांची उत्तरे शोधू पाहतो .यात कधी त्याच्या हाती निराशा हाती येते, कधी खंत -तर कधी खेद वाटून जातो .अशा वेळी मनास व्यक्त झाल्या शिवाय राहवत नाही. कवी चवडेकर सुद्धा - "जाणिवेचे भान" असलेला हा कवी - आपल्या कवितेला "आत्मभान " असे नाव देऊन व्यक्त होतो आहे.
तसे पाहिले तर
कवी -कालिदास चवडेकर यांच्या कवितेचा आरंभ २५ वर्षापूर्वी झालेला आहे.. त्या आठवणी इथे कवितेतून व्यक्त झाल्या आहेत ही जाणवते.
" घाव त्यांचे सोसणे आता जमाया लागले
आसवांना रोखणे आता जमाया लागले ....! (पृ. ७५)
"कुठला तरी हवाच मुखवटा
हे जगण्याचे सोंग
वठवीन्यासाठी ...! (पृ- ७२ ),
" कळत नाही
कोणते ते धागे
ओढताहेत अजून
आतल्या आत ... (पृ ..५५ )-
ही काही उदाहरणे पुरेशी आहेत. बाकी कविता संग्रहातून जरूर वाचल्या पाहिजेत.
रसिक हो - अशा या कविता कवी -कालिदास चवडेकर यांच्या पुढील आश्वासक प्रवासाची साक्ष देणाऱ्या आहेत.
त्यांच्या लेखनास आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय -
-अरुण वि.देशपांडे -पुणे .
मो- ९८५०१७७३४२ .
-------------------------------------------------------------
आत्मभान -(कविता -संग्रह )
-कालिदास चवडेकर - संपर्क- ९०२१४१९६७१
प्रकाशक-
विजय बुक सर्व्हिसेस -सोलापूर -
संपर्क- ९०२१७२७३३२
पृष्ठ - ८० , मुल्य- रु. ७०/-
------------------------------------------------------------------------------------