पुस्तक-परिचय लेख -
अरुण वि .देशपांडे
जरूर वाचावे असे काही ..
-----------------------------------------------------------
अंतर्मनाचा डोळस प्रवास ....."
दौंड -पुणे शटल..ले- डॉ.अमित बिडवे
-----------------------------------------------------------------------
एखादे पुस्तक वाचण्यासाठी म्हणून आपण हाती घेतो ..यातील लेखन वाचन झाल्यावर आपल्या मनाला एक वेगळेच समाधान वाटू लागते , हा आनंद आणि अनुभूती असते पुनर्प्रत्याची .." असेच काहीसे माझ्या मनाने नुकतेच अनुभवले ..निमित होते डॉ.अमित बिडवे यांच्या "दौंड -पुणे शटल" या ललित लेख असलेल्या संग्रह-वाचनाचे.
एक वाचक- लेखक -कवी म्हणून .मी नेहमीच नव्या -.नव्या पुस्तकांचे परिचय लेख आवडीने लिहित असतो., डॉ.अमित बिडवे यांचे हे पुस्तक मात्र मे-२०१० साली प्रकाशित झालेले आहे तसे जुन्या आवृतीचे पुस्तक ..
पण यातील लेखन आजच काय , यापुढे कधीही वाचले तरी सदा टवटवीत वाटावे असेच बहारदार आहे..छोटे-छोटे
लेख यात आहेत ..आणि या लेखनाची निर्मिती होण्याचे सारेच क्षण लेखकाने केलेल्या .दौंड-पुणे-दौंड "या प्रवासातले आहेत.निमित्त कोणते ही असो..दिसणाऱ्या प्रसंगातून त्यांनी आपल्या जीवनातील अविस्मरणीय घटना , व्यक्ती, आणि,प्रसंग यांची सुसंगत अशी छान घट्ट वीण विणली आहे की ..त्यांच्या भाव-विश्वाचे अतिशय सुंदर -भावपूर्ण असे दर्शन वाचकांना घडते .
या पुस्तकाचे उप शीर्षक आहे ते इंग्रजीत - A Journey Within .." हे अगदी यथार्थ ठरावे असेच आहे..कारण हा प्रवास कोरड्या मनाने , व्यावहारिक मनाने पोटभरी करण्यासठी प्रवास करणाऱ्या माणसाचा -व्यक्तीचा नसून " तो एका डोळस आणि हळव्या मनाच्या माणसाने केलेला डोळस असा प्रवास आहे.
पारिवारिक जीवन, वैयक्तिक जीवन , सामुहिक आणि सामाजिक जीवन " असे सर्व संदर्भ या लेखनातून येतात ,ते रुक्ष वाटणारे अजिबात नाहीत..कारण या लेखनाला आपुलकी -स्नेह- जिव्हाळा , कृतज्ञता , समाधान , या भावनांचा स्पर्श झाला आहे ..त्यामुळे यातील व्यक्ती- आपले मित्र आहेत असे वाचकाला लगेच जाणवू लागेल.
एकूण २३ लेख या संग्रहात आहेत.आणि त्यांचे ४ विभाग आहेत..
१.अनुभव , २-दौंड -पुणे शटल, ३-आप्त , ४-दोन कथा ..
कोणता ही लेख वाचा ..काही फरक पडणार नाही..कारण या लेखनाचे एक अंतरसूत्र आहे.. ते म्हणजे या लेखकाला सहवासात आलेलेया व्यक्ती कडून खूप काही असे जीवन विषयक तत्व -ज्ञान , विचार घेता आले आणि जीवनाकडे पाहण्याची विधायक अशी दृष्टी मिळाली आहे " हे सगळे कसे मिळाले ? कुणामुळे मिळाले ,याचे स्मरण म्हणजे हे सुरेख लेखन आहे.
दौंड -पुणे शटल" या विभागात सर्वात जास्त म्हणजे २३ लेख आहेत ..यात मानवी मनाचे वृत्ती दर्शन लेखकाने घडवतांना स्वतःला घडवण्याची प्रक्रिया कशी सुरु झाली ..याचे वर्णन खूप छान केले आहे ..या लेखनाची जी शैली आहे तिचे वर्णन मी "भावूक -हळवी -प्रांजल लेखन शैली " असेच करीन ...कारण हा लेखक -इतका भावूक आणि हळव्या मनाचा आहे की ..त्याला हमखास रडू येते ...आणि त्याच्या मनोसक्त रडण्याचे प्रसंग अनेक लेखात आहेत ,,हे भावुकपण अर्थातच वाचकांच्या मनाला भिडणारे आहे .
या १७ लेखातील मला विशेष भावलेले लेख आणि त्यांचे शीर्षक-
"सासुरवाडी ..(पृ..४८ ), " बबल्या"..(पृ..५६ ), " भिकारी ..(पृ..६५ ), माझ्या आज्ज्या .." (पृ..७५ ), पूल .."(पृ.८५ )
"आप्त " मध्ये ४ लेख आहेत ..बाबा , अम्मा, दोस्त आणि पाठ्क्या ..,
सरस व्यक्तिचित्रणे " असे का वाक्यात या लेखांचे वर्णन करता येईल.
सुरवातीच्या .अनुभव "मध्ये ६ लेख आहेत..जे खूप काही सांगणारे आहेत...हेच लेख नव्हे तर एकूणच हे लेखन आणि पुस्तक वाचकांना एकाच वेळी ..आठवणीचा आनंद, अनुभवांचे मोल , जीवन जगणे कसे असावे ?या बद्दलचा सकारात्मक विचार आणि माणूस किती महत्वाचा आहे " इतक्या गोष्टी बद्दल सांगते .
व्यवसाय आणि माणसाचे अंतरंगी मन .यांचा काही एक संबंध नसतो ..म्हणून डॉ.अमित बिडवे नावाचा माणूस एक ललित-लेखक आहे " याचे उत्तम उदाहरण म्हणजे -..दौंड -पुणे शटल ", हे पुस्तक आहे.
१७ ऑक्टोबर २०१० ला या पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघाली होती.. आता लवकरच तिसरी आवृत्तीची तयारी करावी ..अशी विनंती एक वाचक -मित्र म्हणून मी नक्कीच करतो.
डॉ. अमित बिडवे ..खूप खूप लेखन शुभेच्छा.
स्नेहांकित -
अरुण वि.देशपांडे -पुणे.
