Friday, April 24, 2020

#संवादिनीकथासंग्रहपरिचयलेख - भाग -८ वा . ले- अरुण वि.देशपांडे .

#संवादिनीकथासंग्रहपरिचयलेख - भाग -८ वा . ले- अरुण वि.देशपांडे .
कथा लेखक -१.साधना मोरे - आरोटे २.संध्या हिंगे . ३. राहुल घायमुक्ते 
-------------------------------------------------------------------------------------------------------- 
वाचकमित्र हो - नमस्कार -

या लेखमालेतून आपल्याशी हा लेखन संवाद साधतांना ,मला खूप काही साधता आल्याचा आनंद मिळतोय .
 संवादिनी कथा संग्रहातील ..कथा वाचून मग त्यावर लिहायचे ..त्यासाठी या कथा मन लावून  वाचत जातोय ,
तस तसे कथा लेखन , कथा-आशय , विषयानुरूप कथा लेखन, कथा रंगतदार कशी होते ? ,
कथा  आकर्षक   पद्धतीने कशी लिहायची ?
 कथेचा शेवट ..कोणता असावा ? जो  वाचकांच्या मनावर परिणाम करणारा असेल.,
मला माझ्या या सगळ्या प्रश्नाची उत्तरं ..संवादिनी "कथा संग्रहातील ..संवादी" कथांच्या वाचनातून मिळते आहे.'

कथालेखन करणार्यांना "संवादिनी "कथा संग्रहाची    शिफारस     कथा -लेखनासाठी .एक स्टडी -प्रोजेक्ट  म्हणून करीन ,
या निमित्ताने  वाचकांच्या वतीने पुन्हा एकदा ..
कुबेर प्रकाशन , प्रकाशक - श्री.संतोष जगन्नाथ लहामगे, आणि संवादिनी "कथा संग्रहातील सहभागी कुबेरकर 
साहित्यिकांचे अभिनंदन करतो.

आजच्या लेखात  खालील तीन कथांचा आस्वादक परिचय करून देतो आहे.

१. कथा - पोरखेळ ", (पृ. ९४ ) ले- साधना मोरे -आरोटे - मुंबई 
-------------------------------------------------------------------------------------------------------
पोरखेळ " ही कथा .एका दुर्दैवी "ती "ची आहे . या नायिकेच्या वाट्याला दुर्दैवाचे दशावतार आलेले आहेत , तिच्या "पोरवयात 
नशिबाने तिच्या आयुष्यात ..हा "पोरखेळ " सुरु केला आहे. लेखिका साधना मोरे -आरोटे यांनी कथेतील "ती " ही व्यक्तिरेखा 
अतिशय चपखल शब्दातून उभी करतांना .."ती "च्या नशिबाचे भोग वाचून वाचकांच्या मनात सहानुभूती निर्माण केली आहे.

अशा कथेतील भावुकता कधी कधी अतिरंजित वाटण्याचा धोका आसतो आणि सगळीच कथा कृत्रिम वाटण्याचा संभव असतो ",
पण लेखिकेने  "पोरखेळ " कथेतील  "ती " ची दुर्दैवी कहाणी सांगतांना मनस्पर्शी लेखन शैलीत ही कथा   फुलवली आहे ".

पोरखेळ " मधली "ती " ही व्यक्तिरेखा ,मराठी सिनेमातील .." सोशिक -नायिकेची " आठवण करून देते ".

या कथेची सुरुवात -पाहू या -
जवळपास पंचाहत्तरी पार केलेली ती  !
पांढरे स्वच्ह नऊवारी पातळ , पांढरं स्वच्छ नीटनेटक पोलकं  आणि ...
..आणि पांढरं कपाळ....!
 हो .. असंच म्हणयचे त्याकाळी उपहासाने लोक...

लेखिकेने  -या पाच ओळीतच .. नशिबाचा "पोरखेळ " आणि त्या खेळाने जिचे आयुष्य उध्वस्त झाले ,
 त्या " ती " चे व्याक्तिरूप  वाचकांच्या डोळ्यासमोर उभे केले आहे.
 शब्द  किती अर्थवाही असतात "त्याचे हे उदाहरण आपल्या समोर ठेवावे  वाटले .
स्त्री विषयक सर्व भाव-भावना ..या कथेतून पाहण्यास मिळतात . जरूर वाचावी अशी ही कथा आहे.

लेखिका साधना मोरे -आरोटे यांना लेखन शुभेच्छा.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


२. कथा - अव्यक्त प्रेम , (पृ. ९९ ), ले- संध्या सु.हिंगे - गोवा 
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
ज्यांना त्यांचे इच्छित प्रेम मिळते ..ते नशीबवान असतात असे म्हणतात ", असे सुदैवी प्रेमी कमीच असतात म्हणून तर 
"प्रेमाची कोडे " सोडविणे अनेकांच्या नशिबात नसते . तसे पाहिले तर माणसाच्या आयुष्यात .."प्रेमाचे येणे " अकल्पनीय 
असेच असते . कधी योग्य वेळी तर कधी नको त्या वेळी " आयुष्यात प्रेम जडणे "  असे घडून जाते .

प्रस्तुतच्या
अव्यक्त प्रेम "या भाव-कथेतील अनुजाच्या वाटयाला आलेले प्रेम थोडे जगा वेगळेच आहे , म्हणूनच ते प्रत्यक्षात स्वीकारले जाणारे नाहीये ",
ही जाणीव ..अनुजाला आहेच ..कारण ते वास्तवातील कटू सत्य आहे. अनुजाची कहाणी वाचतांना आपल्याला हे कळून चुकते.
तेव्हा ..आपल्याला ..अनुजाच्या ..या -प्रेमाच्या भावने बद्दल वाटू लागते की.. खरेच ..माणूस कम-नशिबी असला की ..
सुख त्याच्या पासून लांब -लांबच राहते.

अनुजाच्या कथेतून लेखिकेने .. स्त्री - पुरुष  यांच्यातील  सुखाच्या बद्दल  -मन आणि शरीर , भावनिक आणि शारीरिक ..इच्छा आणि गरज , 
या बद्दल  वेगवेगळ्या दृष्टीकोनातून विचार मांडले आहेत ..
किती ही खुली जीवन शैली येवो , समाजिक - बंधनं " या नावाखाली ..
या सुखापासून  "एकट्या स्त्री ला  वंचितच ठेवले जाते , स्त्री या बाबतीत कधीच व्यक्त होऊ शकत नाही .. अव्यक्त भावना ..कधीच 
 बोलक्या करता येणार नाहीत ..हे  काटेरी सत्य .. मोठे बोचरे आहे.
लेखिका संध्या हिंगे ..यांची कथा नायिका -अनुजा . याच सामाजिक वातवरणात .रहाणारी आहे.
तिचे अक्त प्रेम ..ते सुद्धा .."एकतर्फी असलेले प्रेम",  कधी ही व्यक्त करू शकणार नाहीये .
अनुजाची ही अव्यक्त प्रेमाची शोकांतिका , वाचकांच्या लक्षात राहील अशीच आहे.

लेखिका संध्या हिंगे यांना लेखन -शुभेच्छा .

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

३.
कथा - सैलोमन काका  (पृ..१०४ ), ले- राहुल अरुण घायमुक्ते - पुणे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखक राहुल अरुण घायमुक्ते .. यांची कथा ..उत्तम असे व्यक्ती -चित्रण आहे . त्यांच्या भोवती फिरणारी कथा ..,त्यातील 
सगळी वर्णने , मनोगत , निवेदक सांगतो त्यातून .. आपल्या डोळ्यासमोर .कथेतील सैलोमन काका " अगदी 
हुबेहूब साकारून येतात . 
अतिशय समरसतेने हे लेखन झाल्यामुळे ..सैलोमन काका ..ही व्यक्तिरेखा .रसरशीत आणि 
जिवंत वाटू लागते .

लेखक -राहुल घायमुक्ते यांची लेखन शैली अतिशय प्रवाही आहे..कथा ओघवती आहे ..त्यामुळे .कथा वाचतांना 
कथेतील ..मी , आणि सैलोमन काका यांच्या सोबत आपण ही त्या वातावरणातील एक भाग बनून जातो .
 आणि सैलोमनकाकांच्या सोबत त्यांच्या ऑफिसात , वाड्यात , जुन्या घरात , सध्याच्या रहात्या बंगल्यात जाऊन सगळे काही 
पाहतो . ...हा लेखन ओघ , वेगवान कथनक ..अनुभवण्यासारखे आहे.

माणूस .आपले आयुष्य जगतांना ..किती पातळीवर .एक व्यक्ती म्हणून वागत असतो ..त्याचा स्वभाव , त्याचे वेळोवेळीचे 
वागणे ,घेतलेले  विसंगत निर्णय ,त्याचा जीवन विषयक दृष्टीकोन , असे खूप काही ..
 काकांच्या व्यक्तिरेखेतून लेखकाने अतिशय  सहृदयतेने रेखाटले आहे...ज्यातून माणूस कसा असतो  हे अनुभवणे खूप वेगळे आहे.

या कथेचा एकूणच बाजहा - "  माणूस , त्याचे  आयुष्य , जीवनानुभव " यावरती  चिंतनपर व्यक्त होण्यावर आहे , त्यामुळे ही 
तशी कथा गंभीर -आणि विचार-प्रवर्तक झाली आहे असे म्हणावेसे वाटते. 

"लाखो -करोडोंच्या संपत्ती पेक्षा  प्रेम ,आपुलकी  आणि मायेचे ते दोन शब्द  आपल्याला उंच झेपावण्यासाठी पुरेसे असतात ",
नाही तर लाखमोलाचा हिराही  त्याच कोळशाच्या खाणीत पडून रहातो .सैलोमनकाकांसारखा  !!
कथेचा हा शेवट ..कथेच्या चरित्र -नायकाला " खूप उंचीवर नेऊन ठेवतो.

लेखक -राहुल अरुण घायमुक्ते यांना लेखन शुभेच्छा .

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लवकरच भेटू पुढच्या लेखात .अजून काही कथा बद्दल सांगेन.

#संवादिनीकथासंग्रहपरिचयलेख - भाग -८ वा . 
ले- अरुण वि.देशपांडे .
९८५०१७७३४२ 


---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment