Aksharmitra-Arun V. Deshpande
Thursday, February 3, 2022
पुस्तक- परिचय लेख - रंजक गोष्टींचे पुस्तक - जादूची झप्पी
पुस्तक परिचय लेख-
अरुण वि.देशपांडे -पुणे.
------------------------------------------------------
रंजक गोष्टींचे पुस्तक- जादूची झप्पी
-------------------------------
नमस्कार वाचक मित्रांनो ,खास करून बालमित्र आणि मैत्रीणीनो-
छान वाचायला मिळाले की आपले वाचक -मन खूप आनंदित होऊन जाते " ही गोष्ट एक लेखक आणि वाचक म्हणून मला माहिती आहे.
मित्रांनो तुमच्या वाचन-आनंदात खूप मोठ्ठी भर घालणारे ..एक छोटसे गोष्टीचे पुस्तक .."जादूची झप्पी "आले आहे.
या गोष्टीच्या पुस्तकाची लेखिका ..नववीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी आहे ..
जिचे नाव आहे..तनिष्का संजय डांगे.
यवतमाळ जिल्ह्यातील "पुसद " या गावी तनिष्का , तिच्या आई-बाबांच्या सोबत राहते. पुसद "या भागाचा परिसर
तसे म्हटले सामान्य परिस्थिती असलेला आहे, शहरी वातावरणापेक्षा ..ग्रामीण जन-जीवनाचा प्रभाव असणे अगदी
साहजिक आहे. अशा वातावरणात रहाणार्या या तनिष्काने तिच्यातील अंगभूत कलागुणाचा विकास केला आहे
तो तिच्या वाचन आणि लेखन यांच्या बळावर .
तिच्याठायी पुरेपूर आत्मविश्वास आहे, जो तिच्या नियमित लेखनातून जसा जाणवला ..तोच आत्मविश्वास आणि लेखन -
जिद्द " तिच्या या पहिल्या -वाहिल्या पुस्तकातील लेखनातून दिसला आहे. पुस्तक वाचून ..तुम्ही देखील माझ्या या
मताशी नक्कीच सहमत होताल .
शिक्षक आपले गुरु असतात ".या बाबतीत तनिष्का खूप भाग्यवान आहे.. तिचे बाबा श्री.संजय डांगे हे शिक्षक आहेत.
आणि तनिष्काची आई ..सौ.निशा डांगे ..या उपक्रमशील -कल्पक अशा शिक्षक आहेत ", त्याच बरोबर इंटरनेट आणि साहित्य-क्षेत्रातील आघाडीच्या साहित्यकारा आहेत.." हे यासाठी सांगायचे आहे की ..तनिष्काच्या साहित्यिक व्यक्तिमत्व घडवण्यात तिच्या लेखिका -आई ,आणि शिक्षक -बाबांचा मार्गदर्शनपर वाटा आहे.
सुप्रसिध्द बालसाहित्यिक श्री.एकनाथ आव्हाड ..हे विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत ..आणि याच साहित्यिक-शिक्षक गुरूंची
प्रस्तावना ..तनिष्काच्या"जादूची झप्पी "पुस्तकाला असणे ..ही गुरुकृपाच आहे.
मित्र हो ..या पुस्तकातील दोन्ही गोष्टी ..हुशार सोफिया " आणि " सर्वश्रेष्ठ धनुर्धर " वाचताना ..हे लेखन एका छोट्या लेखिकेचे
आहे " असे अजिबात वाटत नाही .
हुशार सोफिया" ही गोष्ट लोककथेचा वारसा सांगणारी आहे. दुष्ट आणि सुष्ट प्रवृत्ती यांच्यातील लढाई जिकणारी सोफिया ,लेखिकेने ठळकपणे साकारली आहे.
तिच्या स्वभावातील गुण हे बालमनावर प्रभाव पाडणारे आहेत. मित्रांना एकत्र आणून "चेटकिणीला धडा शिकवणारी हुशार सोफिया"वाचकांना नक्कीच आवडेल .
"सर्वश्रेष्ठ धनुर्धर " ही गोष्ट वाचतांना वाचकांना"चांदोबा" मासिकातील गोष्टी आठवतील, अशा गोष्टींनी बोधप्रद शिकण्यास मोठीच मदत होते. नील आणि वीरसेन "यांच्यातील स्पर्धा प्रेरक शिकवण देणारी आहे".
ओघवती भाषा ,आणि सफाईदार लेखन शैली " लेखनासाठी आवश्यक असलेले दोन सर्वात
महत्वाचे गुण तनिष्का डांगे " या लेखिकेला लाभलेले आहेत.
हे पुस्तक ..तानिश्काने ..धाकट्या भावाला ..आराध्यला "अर्पण केले आहे . अशा गुणी दीदीचा रास्त अभिमान भैयास असणार.
चला वाचू या " या उपक्रमात पाणिनी प्रकाशन -ठाणे यांनी प्रकाशित केलेले ..हे पुस्तक वाचकांना आकर्षित करून घेणारे आहे.
लेखिका -तनिष्काने -
..मा. देशपांडे आजोबा " यांना, असे लिहून
आणि स्वाक्षरी करून "तिचे हे पहिले पुस्तक मला पाठवले .
मित्र हो ..माझ्या सारख्या वाचकास मिळालेली ..वर्ष ..२०२१ मधली अविस्मरणीय अशी भेट आहे.
तनिष्का ..या देशपांडेआजोबांचे आशीर्वाद -शुभेच्छा तुझ्यासोबत सदैव आहेत.
------------------ -------------
पुस्तक परिचय लेख-
-अरुण वि.देशपांडे-पुणे.
9850177342
--------------------------------
जादूची झप्पी
(बालकुमार कथा )
पृ- २० , मूल्य- रु. ४० /
ले- तनिष्का संजय डांगे
संपर्क - द्वारा - निशा संजय डांगे
8329065797
-------------------------
प्रकाशक - पाणिनी प्रकाशन - ठाणे
संपर्क - 9867873555
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Thursday, June 4, 2020
#संवादिनीकथासंग्रहपरिचय - लेख-१३ वा . ले-अरुण वि.देशपांडे .
#संवादिनीकथासंग्रहपरिचय - समारोप- लेख
------------------------------ ------------------------------ -----------------------------
लेख-१३ वा . ले-अरुण वि.देशपांडे .
------------------------------ ------------------------------ ----------
या भागातील लेखक-
१.राधा पंडित , २.संगीता चव्हाण , ३.शोभा दळवी . ४.हरीश दत्तात्रेय कांबळे -साळी
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ -------------
नमस्कार मित्र हो ,
संवादिनी कथासंग्रह -परिचय लेख " ,या उपक्रमाने खूप समाधान दिले .
आपल्याच परिवारातील गुणवंत साहित्यिकांच्या बद्दल , त्यांच्या कथा -लेखनाबद्दल
अभिप्रायपर व्यक्त होणे .."हे काम मला स्वतःला -एक पारिवारिक कार्य केल्याचा
आनंद देणारे वाटले आहे.
कारण कुबेर समूह एक मोठा परिवार आहे",या भावनेतून ", या समूहातले कार्य आणि उपक्रम संपन्न होत असतात .
अशा उपक्रमात माझा हा खारीचा लेखन-वाटा आहे", ही भावना मला मोठी सुखद वाटणारी आहे.
मित्र हो -आत्ता पर्यंतच्या बारा- लेखातून - ३६ कथांचा परिचय लिहितांना एक वाचक म्हणून , एक कथा लेखक म्हणून
मला खूप काही शिकायला मिळाले , कथा -या साहित्य प्रकारातील विविधता पाहून मन थक्क झाले . व्यक्ती तितक्या
प्रवृत्ती , आणि व्यक्ती तितक्या प्रकृती " या दोन्हीं उक्तींची प्रचीती मला या कथांच्या वाचनातून घेता आली.
कुबेर समुहाचा पहिला कथा-संग्रह .."आरंभ " असो ,आणि प्रस्तुत दुसरा संग्रह .संवादिनी .हा कथा संग्रह असो ,
दोन्ही संग्रहातील सगळ्याच कथा मला वाचावयास मिळाल्या आहेत याचे
कारण म्हणजे-
आरंभ "संग्रहाच्या संपादन -कार्यात मला सहभागी होता आले , आणि " संवादिनी" संग्रहाचे आस्वादन लेखन करता आले आहे.
हे सांगण्याचे प्रयोजन असे आहे की .. कुबेर समूहातील साहित्यिकांच्या लेखनाचा मी एक समग्र वाचक " नक्कीच झालो आहे.
हे सांगण्याचे प्रयोजन असे आहे की .. कुबेर समूहातील साहित्यिकांच्या लेखनाचा मी एक समग्र वाचक " नक्कीच झालो आहे.
मित्र हो-
संवादिनी "संग्रहाचा हा १३ वा लेख आता-"समारोपाचा लेख आहे",
म्हणून हे मनोगत व्यक्त करावेसे वाटले.
आजच्या या लेखात शेवटच्या चार कथांच्याबद्दल लिहितो आहे त्या खालील प्रमाणे -
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------
१.कथानुक्रम -३७ - कथा -शीर्षक - चिकूआजी , (पृ- १८० ), ले- राधा पंडित -ठाणे .
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ -----------------------------
माणसातील घट्ट अशा नाते-बंधाचे भावस्पर्शी चित्रण लेखिका-राधा पंडित ..यांनी चिकूआजीच्या व्यक्तिरेखेतून
मोठ्या मनस्पर्शी शब्दातून रेखाटले आहे.
ही कथा चिकुआजीची जीवन-संघर्ष कहाणी सांगते . कथा -फ्रेममध्ये अगदी बंदिस्त म्हणता येईल अशी ही कथा.चीकुआजीच्या भोवतीच फिरते , त्यांच्याबद्दल
जे सांगते ते खूप जिव्हाळ्याने सांगते . जिथे आपलेपणा असतो , तिथेच जीव लावला जातो. कधी हे पारिवारिक- नाते असते , कधी त्याचे स्वरूप मैत्रीतुन आणि सहवासातून जडलेले
भावनिक नाते असते . अशा नात्यांची हे कथा आहे.
लेखिका राधा पंडित यांच्या कथेतून हा भावनिक प्रवाह वाचकांना जाणवतो कुसुम आजीच्या नशिबात लौकिक अर्थाचे सगळे वैभव होते हे सांगतांना
..तिच्या दुर्दैवी नशिबाबद्दल ..कुसुम आजीची ही लाडकी नात ..भावव्याकुळ होऊन आजीची कहाणी सांगते .
काही व्यक्ती ..जन्मास येतात तेच .कम-नशीब घेऊन .मग ..त्यांचे आयुष्य ,दुर्दैवी असे म्हणवले जाते
..कुसुमआजीच्या वाट्याला असेच नशीब आलेले आहे, आणि भोग भोगणे ही तसेच ",
पण, नशीबासमोर हतबल न होणारी .
कुसुमाजी तिच्यातील कणखर वृत्तीच्या बळावर सगळ्या गोष्टीवर मात करीत हसतमुखाने जगत आलेली आहे .
लाडक्या नातीवरचे या आज्जीचे प्रेम ..चिकू या फळासारखे गोड आणि रसाळ आहे..चिकू म्हटले की गोड फळ, आणि त्या उलट "चिक्कू " म्हटले की वृत्ती ,
आणि ही कुसुमाजी " चिक्कू "नाहीये ..
ती मोठ्या मनाने सर्वांना आनंदच वाटत फिरणारी आहे, शापित कुसुमआजीच्या आयुष्याची ही रुपेरी किनार ..
लेखिका राधा पंडित यांनी खूप छान रंगवली आहे.
आपलेपणाच्या भावनेत चिंब भिजलेली कथा आणि यातील कुसुमआजी ,त्यांची लाडकी नात ..
दोघी वाचकांच्या मनात नक्कीच घर करतात.
लेखिका राधा पंडित यांना लेखन शुभेच्छा .
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ --------------
२. कथानुक्रम - ३८ - कथा -शीर्षक -निर्णय (पृ .१८३ ) , ले- सौ.संगीता चव्हाण - गोवा
------------------------------ ------------------------------ ------------------------------ --------------------
स्त्रीचे व्यक्तिमत्व एकाच वेळी किती स्वरूपात पहावयास मिळते ,? त्यासाठी लेखिका -संगीता चव्हाण यांची "निर्णय "
ही कथा जरूर वाचली पाहिजे . माणसाच्या मनाच्या दोन अनावर अशा भुका असतात ..एक असते शारीरिक सुखाची ..
या भूकेतच जीवनाची , जगण्याची इतिकर्तव्यता असते " असेच मानणारे आपल्या भवताली आहेत .कारण ."या शारीरिक
सुखापायी ..त्याच्या हव्यासापायी , लालसेपोटी .. स्त्री-पुरुषांच्या आयुष्यात वादळे आलेली आहेत ,संकटे उदभवली आहेत ".
पुरुषी-मनात स्वतःसाठीच फक्त
शारीरिक सुख "या भावनेची प्रबलता इतकी आहे की .."मानसिक सुखाच्या भावनेला .कवडीची किंमत द्यायची गरजच
नसते " ' या दृढभावनेतून ..स्त्री मनाची , आणि वैवाहिक जीवनात .पुरुष जोडीदार .आपल्या स्त्री जोडीदाराची कधीच कदर करीत
नाहीत "
अशा अत्यंत महत्वाच्या विषयावर ..लेखिका संगीता चव्हाण यांनी कथा लेखन केले आहे. "निर्णय " या कथेतील नायिका "ती "
एकाच वेळी सगळ्या स्त्री रूपाचे प्रतिनिधित्व करते आहे..तिच्या वैवाहिक जीवनाला बारा वर्षे झालीत , पण ती वनवास "भोगत होती .
लग्न होऊनही ..पतीने ..बायको म्हणून तिचा स्वीकार केलेला नाहीये ..किती जीवघेणी शिक्षा भोगावी लागली आहे "तिला ",
आणि तिच्या ..मनाची भावनिक गरज .दुसरी तिसरी नसून ..शारीरिक सुखाची भूक "आहे ..हे सुद्धा समजून न घेणारा नवरा असणारी
दुर्दैवी .पत्नी ..हे तिचे स्त्री रूप ..फारच क्लेशदायी आहे..
"सोडून जा " हे शब्द ऐकून मन बंद करण्यास प्रवृत्त होते .आणि दुसऱ्याच क्षणी तिचा जाण्याचा निर्णय " विरघळून जातो ",
या प्रसंगी "तिच्यातले ..कोणते "स्त्री -रूप " दिसते ? या साठी ही कथा वाचलीच पाहिजे .
मित्र हो .संवादिनी संग्रहातील कथा शब्द संख्येने दिसतात खूप लहान ..पण, त्यातील आशय ..मोठा गहन असतो ",
लेखिका -संगीता चव्हाण ..यांच्या निर्णय" कथेबद्दल असेच म्हणता येईल.
त्यांना लेखन शुभेच्छा .
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ---------------------
३. कथानुक्रम - ३९ .शीर्षक - ज्ञानोत्सव (पृ.१८५ ) - ले- सौ.शोभा दळवी - मुंबई
------------------------------ ------------------------------ ------------------------------ --------------------------
बाल-कुमार मित्रांसाठी असावी अशी ही छान -सुंदर- प्रेरक कथा आहे.. नीता नावाच्या गुणवंत मुलीची गोष्ट लेखिका शोभा दळवी
अगदी सहज शैलीत सांगितली आहे.
नीताला ..तिच्या शेजारच्या दहावीत शिकणाऱ्या अजिंक्य दादा मुळे "अभ्यास कसा केला पाहिजे ,
अभ्यास आणि पूर्वतयारी " हे किती महत्वाचे आहेत .हे देखील नीताला या दादामुळेच कळते
एका अर्थाने नीताला ..योग्य संगतीचा लाभ झाला , आणि खुल्या मनाने तिच्या मनाने या गोष्टीचा स्वीकार केला , विद्यार्थ्याचे
कर्तव्य " "ज्ञानोत्सव " ही कथा सांगते .
नीताच्या आचरणातून ..त्याचे फळ तिला काय मिळते ..त्याची ही सुंदर अशी बोध-कथा आहे.
लेखिका - शोभा दळवी यांनी या संस्कारक्षम कथेचे बाल-कुमार मित्रांसाठी अभिवाचन करावे , हे संस्कार -कार्य "त्यांच्या हातून होवो ,
यासाठी शुभेच्छा .
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ --------------------------
कथानुक्रम -४० . कथा -शीर्षक - अबोल - एक प्रेम कथा (पृ-१८८ )- ले- हरीश कांबळे - दापोली
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ --------------------
संग्रहातील बहुसंख्य कथा कमी शब्द- संख्येच्या त्याची सवय झालेली असतांना ..
ले- हरीश कांबळे लिखित ..अबोल..एक प्रेमकथा "
ही शेवटची कथा इतर कथांच्या तुलनेने ..दीर्घ अशी ..एक भावूक ..प्रेम कहाणी ..आहे.
... यातील नायक "तो ज्याचा असाच उल्लेख पूर्ण कथानकात लेखकाने
"तो " असाच
केला आहे .
"तो " म्हणजे राधेवरच्या एकतर्फी प्रेमात दिवाना झालेला , प्रेम-रोगाने पछाडलेला ..प्रेमवीर आहे.. त्यामुळे ..त्याचीप्रदीर्घ व्यथा
म्हणजेच ही कथा ,आपण वाचीत जातो ..
एकतर्फी -प्रेमाची .ही शोकांतिका आहे हे कथा -रहस्य (?) माहिती झाल्यामुळे
सहनशील वाचक-मित्र ही भूमिका स्वीकारून ही कथा वाचावी लागते .
"नायिका ..राधा " .तिचे वर्णन .. लेखकाने .प्रेमकथेत शोभावे असे अगदी यथोचित शब्दात केली आहे.
.त्यात पुन्हा , हा कथानायक "तो " ..राधाच्या "
प्रेमात (एकतर्फी ) इतका बुडून गेलेला आहे की
. एकतीस वर्ष नंतर ,त्याच्या प्रेमाची ओढ तीच आहे ..फक्त ..आता त्यात थोडी अपराधाची जाणीव आहे ..
ती म्हणजे .त्याच्यात उणीवाच उणीवा असून ही ..राधेवर प्रेम करण्याचा अपराध "तो -च्या "हातून घडला आहे.अशी त्याची भावना होत जाते ,
या अपराधाबद्दल राधेने त्याला माफ करावे " बस इतकेच .
कारण जीवनप्रवसात "तो " मध्ये खूप बदल होतात , त्यामुळे या जीवनाच्या प्रवासात तो पुढे खूप प्रगल्भ 'वगरेझालेला आहे असे लेखकच आपल्याला सांगतो..
आणि अचानक ..राधा आणि त्याची समोरासमोर भेट होणार ..तो क्षण ..
एकतीस वर्ष नंतर लाभला आहे ..या एकतर्फी ..प्रेमाचे काय होते ?,
राधा ..त्याला अपेक्षित असलेला प्रतिसाद कसा देते ..ही उत्सुकता
वाचक म्हणून आपल्याला असतेच ..त्यासाठी ,,हे कथा जरूर वाचावी.
लेखक हरीश कांबळे यांची ही लेखन शैली ..कथालेखना इतकीच -कादंबरी लेखनास अनुकूल आहे "असे सुचवावे वाटते.
लेखकाची ही कथा - जुन्या काळातील एखाद्या लोकप्रिय चित्रपटाची आठवण करून देईल ..अशी ..फिल्मी- स्टोरी नक्कीच झाली आहे.
प्रदीर्घ लेखन करण्याची क्षमता हरीश कांबळे या लेखकात आहे हे जाणवते ..त्यामुळे ..भविष्यात ..या लेखकाकडून एखादी बहारदार प्रेम -कादंबरी यावी अशी शुभेच्छा करू या .
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ -----------
#संवादिनीकथासंग्रहपरिचय - समारोप - लेख -
लेख- १३ वा
ले-अरुण वि.देशपांडे .पुणे.
९८५०१७७३४२
------------------------------ ------------------------------ ----------
Wednesday, May 27, 2020
#संवादिनीकथासंग्रहपरिचय - लेख -१२ -वा. ले-अरुण वि.देशपांडे
#संवादिनीकथासंग्रहपरिचय - लेख -१२ - वा. ले-अरुण वि.देशपांडे .
लेखिका - १. ऋतुजा उमेश कुलकर्णी , २..डॉ.जयश्री बारई- गिरडकर , ३. अंजली मराठे
------------------------------ ------------------------------ ------------------------------ --------------
नमस्कार मित्र हो -
संवादिनी कथा संग्रहातील कथांचे वाचन करतांना एक वाचक म्हणून मला या कथांनी खूप
वाचन -आनंद दिला . यातील कथा लेखकांनी आपल्या लेखन -गुणांचा परिचय कथेतून करून देत
कथा वाचनीय व्हावी " याचे लेखकीय भान ठेवले आहे ",हे सांगावेसे वाटते.
या वैशिष्ट्यामुळे संवादिनी कथा-संग्रहातील कथा वाचकांच्या स्मरणात दीर्घकाळ असतील "
आजच्या लेखात ज्या कथांबद्दल सांगणार आहे त्या कथा खालील प्रमाणे -
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ -----------------
१. कथानुक्रम -३३ -, शिर्षक- योगायोग (पृ.१६६ ), ले- ऋतुजा उमेश कुलकर्णी - रत्नागिरी
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ----
वामनराव आणि त्यांची पत्नी यांच्या सहजीवनाची ही कथा ..
हळव्या भावकवितेने कथेचा आरंभ होतो .
आणि कवितेच्या आशयातून कथेत काय असेल ? याचा अंदाज वाचकांच्या मनात सुरु होतो , ही प्रेम-कथा
आहे असे म्हणता येईल ,पण ती तरुणाईची नसून ..परिपक्व -समंजस अशा एका जोडप्याच्या सह-प्रवासाची आहे.
या सह-जीवनाच्या प्रवासात ..जोडीदाराचे अचानक मध्येच साथ सोडून निघून जाणे " हे संकट , वियोग , वामनरावांच्या
वाट्याला येणे . ही घटना चुटपूट लावणारी , मन व्याकूळ करणारी आहे. तसेच या कथेतील "योगायोग " असाच
चटका लावणारा आहे..
वामनरावांच्या संजीवानीचा हट्ट, तिचा संकल्प , तिची अट " त्याची पूर्तता कोणत्या योगायोगाने पूर्ण होते "
हे सगळे कथा वाचून जाणून घेण्याची गोष्ट आहे.
लेखिका ऋतुजा उमेश कुलकर्णी .यांची ही कथा आजकालच्या "अलक -अति लघुकथा " श्रेणीतली नसेल ही ,
पण, "योगायोग " या कथेला लघुत्तम कथा " असे सर्वार्थाने म्हणता येईल .
" मोजक्याच शब्दात -नेमकेपणाने लेखन "हे त्यांचे वैशिष्ट्य या कथेतून नक्कीच जाणवते
लेखिका- ऋतुजा उमेश कुलकर्णी या कथा -कविता -ललित लेखन सातत्याने करणाऱ्या साहित्यकारा आहेत,
वाचकांना त्यांचे लेखन परिचित आहे.त्यांना लेखन-शुभेच्छा .
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ -----------
२. कथानुक्रम - ३५ - शिर्षक - वळवाच्या पावसाची सर .. (पृ.१७३ ),ले- डॉ. जयश्री बारई- गिरडकर - नागपूर
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ----------------
कवितेची ,किंवा एखाद्या भावगीताची ओळ वाटावी असे हे काव्यमय कथा शिर्षक ..लक्ष वेधून घेणारे आहे.,
प्राध्यापक असलेल्या श्रीकांतची असफल प्रेमाची कथा -एक शोकांतिका आहे असे वाटू लागते , पण
कथानकातील अनपेक्षित वळणाने कथेचा आशय बदलतो आणि ती एक वेगळ्या प्रेमाची कथा होऊन जाते ,
प्रेमाच्या या नात्यास ..उदात्त भावनिक नात्यातील प्रेम " असे आपण म्हणू या.
श्रीकांत आणि प्राजक्ता .. कोवळ्या मनाची ,अबोध आणि स्वप्नाळू मने असणारी युवा -जोडी .
त्यांची भेट , सहवासाचे क्षण , श्रीकांतच्या मनात प्राजक्ता विषयीच्या निर्माण झालेल्या भावना " हा सगळा
भाग तरुण वयातील प्रेम भावनेचा रम्य-भावूक असा अविष्कार " लेखिका डॉ.जयश्री बारई यांनी सुंदर शब्दात
मांडला आहे
नंतरच्या एका प्रसंगाने .श्रीकांत आणि प्राजक्ताच्या आयुष्याला कलाटणी मिळते ..हा प्रसंग , ती घटना
कोणती ,?श्रीकांत स्वतःला क्षमा करू शकत नाही , असे काय झाले असावे ?
याची उत्तरे ही छान कथा वाचूनच मिळतील .
श्रीकांत -प्राजक्ता आणि स्पृहा ..तीनही व्यक्तिरेखा कथेचे आकर्षण -बिंदू आहेत. ललित-लेखनास अनुकूल असलेली
रम्य -वर्णनप्रचुर लेखन शैली लेखिकेस लाभलेली आहे .
श्रीकांतची ही कथा .खरोखरच ,,वळवाच्या पावसाची सर "
आहे, ज्यात आपण कोरडे राहूच शकत नाहीत , भिजणार हे नक्की .
डॉ. जयश्री बारई- गिरडकर यांच्या लेखन-प्रवासास शुभेच्छा .
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ -----
३.कथानुक्रम -३६ - शिर्षक - आदर्श (पृ. १७७ ), ले- अंजली आशुतोष मराठे - गुजरात
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------
आपल्या आयुष्याला , आपल्या जगण्याला अर्थपूर्ण करणाऱ्या व्यक्तींचा सहवास लाभणे हा खरोखर एक मोठा भाग्य-योग
असतो . संपन्न व्यक्तिमत्व आणि जीवनाचे सार्थक झाले " असे .. वाटणाऱ्या कर्मयोगी व्यक्ती सगळ्यासाठी
प्रेरक -आदर्श -उदाहरणे असतात .
आदर्श " या कथेतून .नेहा आपल्या सुधा आज्जीच्या आदर्श जीवनाचे मर्म जाणून घेते . समारंभ नंतर या दोघींचे
जे बोलणे चालू असते .ते संवाद विलक्षण मन-स्पर्शी आहेत.
लेखिका अंजली मराठे यांनी या कथेत ..आजी-आणि तिची नात
या नात्याचे सुंदर असे भावनिक पदर उलगडून दाखवतांना
सुधाआजीच्या आगळ्या-वेगळ्या आयुष्याची गोष्ट सांगितली आहे.
देशभक्ती ,देशप्रेम , देशाभिमान , देशासाठी त्याग "या प्रखर भावना सुधाआज्जीच्या कुटुंबातच होत्या , त्याचे सुरेख
वर्णन नेहा आणि सुधा आज्जीच्या संवादातून आपल्याला होते .
सैनिकाचे कुटुंब आणि त्या घराची धीरोदात सुधाआज्जी ...
हे सगळेच विलक्षन रसायन असलेली व्यक्तिमत्व आहेत हे आपल्याला जाणवते आणि मन भारावून जाते.
ताठ मानेने सलाम करणाऱ्या सुधाआज्जी समोर आपण आपोआप नतमस्तक
होऊन जातो..
सैनिक कुटुंबाची ही कथा वेगळेपणामुळे लक्षात रहाते.
कुमार -वयोगटातील बालमित्रांसाठी ही एक उत्तम अशी "आदर्श "कथा नक्कीच आहे.. हे वेगळेपण मला जाणवले .
लेखिका अंजली मराठे यांनी या कथेचे अभिवचन बाल-मित्रांसाठी जरूर करावे , खूप छान होईल हे.
इथे ही कथा ..मोठ्यांच्या कथा -संग्रहात आलेली असली तरी ..कथेचे "आदर्श -रुप " सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारे आहे.
लेखिका अंजली मराठे यांना लेखन -शुभेच्छा .
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ----------------------------.
#संवादिनीकथासंग्रहपरिचय -
लेख -१२ -वा.
ले-अरुण वि.देशपांडे -पुणे.
९८५०१७७३४२
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ --------
#संवादिनीकथासंग्रहपरिचय - लेख -११ वा. ले-अरुण वि.देशपांडे
#संवादिनीकथासंग्रहपरिचय - लेख -११ वा. ले-अरुण वि.देशपांडे .
लेखिका - १. प्रतिभा टेकाडे , २..गीता विश्वास केदारे , ३. स्मृती पाटील
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ---
नमस्कार मित्र हो., कुबेर प्रकाशनच्या
संवादिनी या कथासंग्रहाचा परिचय करून देणार्या लेखमालेची वाचकांना सवय झालेली आहे ,
संवादिनी या कथासंग्रहाचा परिचय करून देणार्या लेखमालेची वाचकांना सवय झालेली आहे ,
ही गोष्ट माझ्या या लेखन-उपक्रमास प्रोत्साहन
देणारी आहे , त्यासाठी आपणा सर्व वाचकांचा
मी आभार आहे .
आजच्या लेखात आपण ज्या तीन कथांचा परिचय वाचणार आहात , त्या लेखिकांनी लिहिलेल्या या कथा आहेत. तसे पाहिले तर संवादिनी कथासंग्रहात लेखिकांनी लिहिलेल्या कथा संख्येने जास्त आहेत.
१. या संग्रहातील कथानुक्रम२९.असलेलीकथा
भूक (पृ.१५२ ) ले- प्रतिभा टेकाडे - बंगळुरू
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ -
लेखिका -प्रतिभा टेकाडे या कवयित्री म्हणून देखील वाचकांना परिचित आहेत. त्यांच्या काव्य-रचना संग्राह -रुपात
प्रसिध्द झाल्या आहेत . कथा आणि काव्य .साहित्याचे हे दोन्ही महत्वाचे प्रकार सहजतेने लिहिणे साध्य झालेल्या
साहित्यिका - प्रतिभा टेकाडे .. यांनी लिहिलेली कथा .भूक ..
माणसाच्या आदिम भावनेवर भाष्य करते .
भुकेला माणसाला .गरज असते ती फक्त चार घास पोटात जाण्याची ",
मग हे अन्न आणि त्यातले पदार्थ ..ताजे की शिळे , उष्टे की चांगले ..या शंका त्याच्या भुकेल्या मनात येतच नसतात ,
त्याच्या पोटातली भुकेची आग शमली पाहिजे बस्स.!
अशा या भुकेचा " विषय लेखिका -प्रतिभा टेकाडे यांनी ..भूक " या कथेत अतिशय परिणामकारक रित्या मांडला आहे.
यातील प्रसंग खूप दुर्दैवी आणि दुखाचा आहे ..त्यामुळे कथेतील वातावरण करुण"वाटावे असे आहे .
दोन व्यक्तींमधले मालक आणि नोकर हे नाते किती ही व्यावहारिक असले तरी . काही माणसे आपल्या स्वभावामुळे अशी नाती सुद्धा
कशी भावनिक आणि जिव्हाळ्याची बनवतात .. हे मोठ्या मालकीणबाई-आनंदी बाई आणि त्यांच्याकडे असणारी
कामवालीबाई - रुक्मिणी "यांच्यात निर्माण झालेल्या नातेबंधाचे चित्रण लेखिकेने छान केलेलं आहे .
अशा आनंदीबाईंच्या आकस्मिक जाण्याने रुक्मिणीच्या समोर जी परिस्थिती निर्माण झालीय .
.त्याला रूपामैडम मुळे अधिक गंभीर वळण
लागते ..तिच्या मनातील आंदोलन माणसांच्या स्वभावावर आहे.
भूक " आणि माणूस , ही लढाई तर आपण पाहतोच , या कथेतील आई- रुक्मिणी तिच्या दोन लहान ..भुकेल्या मुलांची
भूक कशी भागवते .आणि त्या पसंगी तिच्या मनात काय विचार चालू असतात ..
त्यासाठी कथाच वाचायला हवी आहे.
नेमकेपणाने केलेले लेखन " लेखिका प्रतिभा टेकाडे यांचा लेखनविशेष या कथेच्या निमित्ताने जाणवतो.
त्यांच्या लेखन-प्रवासास शुभेच्छा .
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------
२. कथानुक्रम -३० - कथा - प्रकाशमय झाली दिवाळी (पृ.१५५ ) - ले- गीता विश्वास केदारे - मुंबई
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ -----------------------------
.विविध लेखन प्रकार सातत्याने लिहिणाऱ्या साहित्यकारा . विविध नियतकालिके ,
कवी-संमेलने आणि
साहित्यविषयक संस्थामक कार्यात सक्रीय सहभाग असणार्या लेखिका,अशी ओळख
मुंबईच्या गीता विश्वास केदारे यांची आहे.
प्रकाशमय झाली दिवाळी " ही त्यांची कथा ..समीर आणि मयुरी या जोडप्याच्या सहजीवनाची प्रेमळ भावनिक कथा आहे.
समीरच्या आयुष्यात मयुरी येते आणि त्याचे भावविश्व उजळून जाते ..त्यांच्यातील पती-पत्नीचे नाते लेखिकेने खूप छान
शब्दात रंगवले आहे.
समीरच्या अशा सुखी आणि आनंदी पारिवारिक जीवनाला ..अचानक ग्रहण "लागते ..आणि
या घटनेमुळे उध्वस्त झालेला समीर ..वास्तवात तर जगत असतो ..पण, मानसिकदृष्ट्या तो मयुरीशी बोलत असतो,
हे आभासी जगणे "समीर आणि मयुरीच्या आयुष्यचे चित्र दाखवणारे आहे.
समीर आणि मायुरीचे जीवन आनंदात सुरु असतांना ..त्याची ही जीवन कहाणी एक शोकांतिका कशी होते ?
याची कथा लेखिका गीता विश्वास केदारे वाचकांना हळव्या आणि भावूक शब्दात सांगतात .
कथेतील समीर ,मयुरी आणि या जोडप्याची मुलगी -परीराणी " या व्यक्तिरेखा वाचकांच्या मनावर प्रभाव पाडणाऱ्या आहेत.
लेखनाला शोभेल अशी चमकदार भाषा आणि शब्दरचना "कथेला वाचनीय बनवते
शोकात्मक कथानकाची ही ..कथा प्रभावी झाली आहे.
त्यांच्या लेखन प्रवासास शुभेच्छा
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ----------------------
३. कथानुक्रम - ३१ - कथा - आवेश (पृ.१५९ ). ले- स्मृती अभिजीत पाटील
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ----------------------------
मुलांचे भावविश्व आणि त्यातील त्यांचे प्रश्न ,असणार्या समस्या ..याबद्दल लिहिणे हे प्रबोधन कार्य करण्या इतके महत्वाचे आहे.
- स्मृती अभिजीत पाटील - मुंबई .. या लेखिकेची
आवेश " या शीर्षकाची कथा हे महत्वाचे कार्य करते .आवेश "नावाच्या छोट्या मुलाची ही छोटी कथा आहे ,
आवेश " या शीर्षकाची कथा हे महत्वाचे कार्य करते .आवेश "नावाच्या छोट्या मुलाची ही छोटी कथा आहे ,
पण याचा आशय खूप व्यापक आहे. काही विषय ,समस्या असतातच अशा की,
त्यांचे होणारे परिणाम हे जास्त गंभीर आणि व्यापक असतात.
महानगरातील जीवनशैली , त्याचा मुलांच्या जगण्यावर होणारा
-,
-अनिष्ट परिणाम कसा होतो आहे ,
या बद्दल सर्वांनी विचार करणे ही आजच्या आई-बाबांची , पालकांची गरज आहे "
याबद्दल गंभीरपणे विचार केला जावा असा इशारा हे कथा देते ..हे या कथेचे मोठेच सामाजिक -संदेश कार्य आहे "
मुलांचा होणारा भावनिक कोंडमारा कस होतो ' हे सांगताना शेवटी लेखिका सांगते आहे की-
समाजात कित्येक आवेश आहेत. त्यांना मोकळं आकाश देणं , मुलांना त्यांचं शिक्षण हे हसत खेळत मिळवून देणं उज्ज्वल
भारताचा पाया भक्कम करण्या सारखे नव्हे काय ?
अशा वेगळ्या दृष्टीकोनातून या विषयाला कथेतून व्यक्त करणाऱ्या लेखिकेचे - स्मृती पाटील यांचे अभिनंदन केले पाहिजे.
त्यांच्या लेखन-प्रवासास शुभेच्छा
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ----------------------------
#संवादिनीकथासंग्रहपरिचय -
लेख -११ वा.
ले-अरुण वि.देशपांडे -पुणे.
९८५०१७७३४२
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ --
Tuesday, May 12, 2020
#संवादिनीकथासंग्रहपरिचय- लेख - १० वा . ले- अरुण वि.देशपांडे
#संवादिनीकथासंग्रहपरिचय-
लेख - १० वा . ले- अरुण वि.देशपांडे
लेखक - १.सुहास कुलकर्णी , २.वृंदा कुलकर्णी , ३. राजश्री भावार्थी
------------------------------ ------------------------------ ------------------------------ --
नमस्कार वाचक-मित्र हो ,
कुबेरसमूह प्रकाशित -हा दुसरा संग्रह - संवादिनी ,
यातील चाळीस (४०) कथांचा परिचय करून देणाऱ्या
लेखमालेचा आजचा हा दहावा भाग सादर करतांना ,असे वाटते आहे - की -
कथा -कादंबरी म्हणजे आपल्या जीवनाचे अनेक रंग दाखवणारे साहित्य असते .लेखक आपले
जीवनानुभव , जीवन विषय दृष्टीकोन , आणि त्यातून आपले स्वताचे विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करीत
असतो .
कथा हा लेखन प्रकार या वैशिष्ट्यामुळे वाचकप्रिय आहे. संवादिनी " मधील कथा देखील अशाच आहेत.
या कथा लेखना वाचकांशी संवाद साधणाऱ्या आहेत " असेच वाचकांना वाटते .
संग्रहाचे संवादिनी "शीर्षक त्यामुळे समर्पक वाटणारे आहे .
या लेखात - खालील 3 कथांचा परिचय करून घेऊ या-
------------------------------ ------------------------------ ------------------------------
१.कथा - निकाल -(पृ.१४० ), ले- सुहास कुलकर्णी - मुंबई
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------
एस.टी.महामंडळातील कर्मचारी "अण्णा ", त्यांच्या सौभाग्यवती निर्मला -ज्या गृहिणी आहेत, या जोडप्याची
एकुलती एक कन्या रेवती यांची ही कथा आहे.
सुरक्षित जीवनशैलीच्या चौकटीत राहणाऱ्या कुटुंबाला ज्यावेळेस आजच्या विपरीत असुरक्षित
अशा वातावरणाच्या वाढत चालेल्या प्रभावाचा फटका बसतो
"आणि मोठेच संकट "समोर
उभे राहते .मग
अण्णा आणि त्यांचे कुटुंब या संकटाचा सामना कसा करतात त्याची ही थ्रिलर कथा आहे.
वाईट-प्रवृत्तीच्या माणसाना कुणाचा कसा छुपा वरदहस्त असतो " ही लपून न राहणारी गोष्ट
असते " पण ,म्हणतात न , सामन्य माणसाचा कुणी वाली नसतो ..याची जाणीव होते , मग, अशा संकटातून
बाहेर कसे पडायचे " ?
त्यासाठी जीवावर उदार होतात माणसे " आणि स्वताच्या कुटुंबाची सुटका करून घेतात .आणि प्रश्नाचा "निकाल " लागतो .
पण, त्यासाठी त्यांनी निवडलेला मार्ग ..योग्य की की अयोग्य ?
लेखक सुहास कुलकर्णी यांनी हाच विषय वेधकशैलीत मांडतांना - पोलीस ,पोलीस कारवाई ,
असामाजिक घातक घटक , त्यांच्याकडून महिलांना होणारा त्रास हे नेमकेपणाने मांडले आहे ,त्यामुळे हे लहानशी कथा
खूप लक्षवेधक झाली आहे.
लेखक सुहास कुलकर्णी यांना लेखन-शुभेच्छा .
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ --------------------
२. कथा - पाहुणा (पृ. १४४ ), ले- वृंदा पठाडे -कुलकर्णी - बोईसर
------------------------------ ------------------------------ ------------------------------ -
आपल्या संस्कृतीत ..अतिथी "हा देवोभव आहे . आलेला "पाहुणा " त्याचा उत्तम पाहुणचार " करायचा असतो "
या गोष्टी आपल्या विचार - आचार यांचा भाग आहेत . प्रत्येकजण आपल्या ऐपती प्रमाणे योग्य तो पाहुणचार "करीत असतो .
आपल्याकडे येणाऱ्या "पाहुण्यांचे अनेक प्रकार आहेत ,त्या त्या प्रमाणे "पाहुणचार केले जातात आणि त्याची बडदास्त ठेवली जाते .
प्रस्तुत संग्रहातील
पाहुणा " या कथेत जो पाहुणा आहे ..तो कोण ? यासाठी ही कथा आवर्जून वाचायला हवी . कथेच्या शेवटी लेखिका - वृंदा
पाहुणा " या कथेत जो पाहुणा आहे ..तो कोण ? यासाठी ही कथा आवर्जून वाचायला हवी . कथेच्या शेवटी लेखिका - वृंदा
पठाडे -कुलकर्णी या पाहुण्या बद्दल आपल्याला सांगतात. त्यामुळे इथे या पाहुण्याबद्दल तुम्हाला काहीच न सांगता उत्कंठा कायम ठेवणे योग्य ठरेल.
कथा व्यक्तीच्या मनातील पाहुण्या विषयी असलेल्या भावनिक आपलेपणाची आहे. हक्काच्या आणि जवळच्या आपल्या माणसा ला
आपण मनातले खूप काही ..मनापासून सांगत असतो.
अण्णा " ही व्यक्तिरेखा खूप छान रेखाटली गेली आहे. त्यांच्या व्यक्त होण्यातून वाचकांना -एक रसिक, बहुश्रुत ,आणि कुटुंब वत्सल
गृहस्थ भेटल्याची अनुभूती येईल .
अशी पारिवारिक कथा ..भावनावश करणारी आहे.
लेखिका वृंदा पठाडे -कुलकर्णी यांच्या लेखन-प्रवासास शुभेच्छा .
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ --------------------
३.कथा -मनोमिलन - (पृ.१४८ ) ले- राजश्री भावार्थी - पुणे.
------------------------------ ------------------------------ ------------------
आपले कौटुंबिक जीवनमान नाती आणि त्यातील संबंध यावरच चालते .कोण, कुणाला , कशा शब्दात , कोणत्या उद्देशाने बोलतो ?
त्या बोलण्यातुन मग "घडले -बिघडले "चा
खेळ चालू होतो.
या सगळ्यात गोंधळ न करता आपला भावनिक तोल सांभाळणे जमत असते " अशी माणसे ," खरी समजूतदार माणसे " असतात असे म्हणू या.
मनोमिलन ही कथा अशाच समजूतदार माणसांची आहे.
लेखिका -राजश्री भावार्थी "यांनी लिहिलेली ही कथा आहे.
रोजच्या दैनंदिन प्रसंगात आपणकौटुंबिक जीवनात वावरतांना इतरांशी कसे वागत असतो .आणि प्रत्येक प्रसंग त्यात आपले काय ?
असे - स्व-केंद्रित होऊन वावरत असतो. हे सगळे काही कथेतून अतिशय सध्या .सरळ आणि भावनिक शब्दातून लेखिकेने मांडले आहे.
शरयू " ही व्यक्तिरेखा ..प्रातिनिधिक आहे, आजूबाजूच्या घरात शरयुचे हे असणे , दिसणे सहज संभव आहे.
समजूतदारपणा , समंजसपणा हे गुण आपल्यातील "माणूसपणा " मोठाच करीत असतात.. हे शरयूला तिच्या मैत्रिणीनी
योग्यवेळी खूप छान समजावून दिले आहे. शरयू ला हे पटलेले आहे हे जास्त सुखद आहे .
लेखिका राजश्री भावार्थी यांनी हे अतिशय सुरेख लिहिले आहे.
कथेचे ओघवतेपण .मन प्रसन्न करणारे आहे.
लेखिका - राजश्री भावार्थी यांच्या लेखनास शुभेच्छा .
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ---------------------------
#संवादिनी परिचय लेख -
लेख- १० वा .
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
९८५०१७७३४२
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ --------------------------
पुस्तक-परिचय लेख - ले- अरुण वि.देशपांडे - पुणे- काव्यज्योत " कविता संग्रह .
पुस्तक-परिचय लेख -
ले- अरुण वि.देशपांडे - पुणे.
------------------------------ ------------------------------ --------------------
"परिसर उजळून टाकणाऱ्या कविता "
काव्यज्योत " कविता संग्रह .
बाल-कवयित्री कु.साक्षी सीताराम लाड
------------------------------ ------------------------------ ------------------------------ --------------
कवी ,कविमन आणि कविता ..या तीनही गोष्टीसाठी आवश्यक असते ते अनुकूल परिस्थिती ,प्रेरक आणि
मार्गदर्शक व्यक्तींचा सहवास ,
असे काहीसे पूरक असे वातावरण ..देशिंग-हारोली- या गावात असलेल्या श्री महालक्ष्मी हायस्कूलची
विद्यार्थिनी असलेल्या कु.साक्षी सीताराम लाड ..हिच्या मनातल्या कवीला कविता लेखनासाठी मिळाले आहे.
या शाळेत तिला प्रोत्साहन देणारे मार्गदर्शक भेटलेत , कवितालेखन करणार्या वर्गमैत्रिणी भेटल्या आहेत .
साहजिकच
कु.साक्षी या बाल-कवयित्रीच्या कविता लेखनाला एक खुले आकाश मिळाले , सुंदर सुंदर पक्षांचे थवे जसे
विशाल गगनात विहरू लागतात ..तशा या बाल-कवियीत्रीच्या कविता सर्वांना शब्दरूपात पहायला मिळू लागल्या .
मुळातच कविमन लाभलेल्या व्यक्तीला ..तो वयाने मोठा आहे म्हणून कविता लिहू शकतो ..असे मुळीच नाही ..
तर उपजत प्रतिभा , कविता लेखनाची उर्मी , , शब्दातून व्यक्त होण्याची धडपड , आणि मनात असलेली तळमळ ",
हे सगळं कवीच्या ठायी दिसत असते ".
असा एक कवी " आपल्याला साक्षी लाड सारख्या शालेयविद्यार्थिनी मध्ये दिसू लागतो ",आणि तिच्या कविता मधूनही जाणवतो .
नव्या पिढीच्या प्रगल्भतेचे एक छान उदाहरण म्हणून बाल-कवयित्री- साक्षी लाड हिचा उल्लेख करता येईल.
कवी अस्वथ मनाचा असतो ..त्याला जे दिसले ..त्याने जे पाहिले ..त्यातले काय वाईट आहे, काय मंगलमय आहे ..हे तो ज्या
पद्धतीने आणि ज्या अचूक शब्दातून सांगत असतो ..त्यालाच आपण वाचक- "कविता " असे म्हणतो .
बाल-कवयित्री कु.साक्षीच्या अशा अनेक कवितां
तिच्या " .काव्य ज्योत " नावाच्या संग्रहातून आपल्या भेटीस येतात " हे सगळे खूप
कौतुकाचे आहे.
श्री.वसंत पाटील सरांनी आपल्या प्रस्तावनेत ..साक्षीच्या कविता लेखनाबद्दल फार छान म्हटलेले आहे..
" साक्षीच्या कवितेत नवखेपण असले तरी तिची हळवी संवेदनशीलता तिच्या कवितेला निश्चित नवे आयाम देईल असा विश्वास वाटतोय."
साक्षी माती आणि नाती विसरत नाही " ,तिला शेतकऱ्यांची व्यथा , स्त्रियांची दुखे व्यथित करतात .
स्वप्नील मृगजळाच्या मागे न लागता वास्तव जगण्यातील प्रश्नांची तिला जाणीव आहे "
वाचक मित्र हो ..वरील विवेचन वाचून आपल्याला साक्षीच्या कविता -लेखन स्वरूपाची कल्पना येते .आणि उद्याची एक आश्वासक कवयित्री
आज विद्यार्थिनी असलेल्या साक्षी लाड या बाल -कवयित्रीत आपल्याला दिसू लागते .
साक्षीच्या मुख्याध्यापिका सौ .प्रतिभा सतीश भोसले आपल्या विद्यार्थिनीला शुभेच्छा आणि आशीर्वाद देतांना म्हणतात -
"भविष्यात मोठी झेप ,साक्षीला घ्यायची आहे.. शब्दांनी तिला भेटावे व तिने मायेने तिला जवळ घ्यावे ", हीच माझी तिला शुभेच्छा आहेत."
हे वाचून वाटते की - असे गुरुजन भेटलेली बाल-कवयित्री - साक्षी लाड सारख्या कलावंत मनाच्या विद्यार्थिनी खूप नशीबवान असतात.
साक्षीच्या महालक्ष्मी हायस्कूल मधल्या कवयित्री -शिक्षिका - सौ. सुरेखा निवास कांबळे यांनीही लेखन -आशीर्वाद दिला आहे .
तसेच शिक्षिका -मनीषा पाटील म्हणताहेत -
विविध विषय हाताळण्याची मुलींची हातोटी कौतुकास्पद आहे. कविता फुलत राहो, लेखनाच्या जाणीवा प्रगल्भ होवोत .याच शुभेच्छा आहेत.
स्वतहा कवयित्री आपल्या मनोगतातून म्हणते की -
हा माझा "काव्यज्योत पहिला काव्यसंग्रह आहे ",माझ्या सर्व कवितेवर मी खोलातखोल
विचार करून लिहिण्याचा प्रयत्न केला आहे ". साक्षीचा हा मनो-विचार तिच्या कवयित्री असण्याचे मोठे महत्वाचे लक्षण आहे.
कवी जितका खोल विचार करतो ,चिंतन करतो .तितकी कवीची कविता अगदी खूप आतून आलेली असते " ,
याची प्रचीती बाल-कवयित्री -साक्षी सीताराम लाड हिचा काव्य ज्योत कविता संग्रहातील ५० कविता वाचतांना वाचकांना नक्कीच येईल.
काही कवितांची उदाहरणे ..देतो म्हणजे ..कवयित्रीच्या कवीमनाचे प्रतिबिंब कसे स्पष्ट उमटले आहे हे दिसून येईल .
अत्याचार - ( पृ,१० ) या कवितेतून वास्तव समस्येवर कवयित्री प्रश्न विचारते आहे ..
------------------------------ ------------------------------ ------------------------------ -------
वंशाच्या दिव्यासाठी का
विजवता तुम्ही पणती
सुनो दुनियावालो
बेटी बोझ नाही होती ...
स्त्रीमन लाभलेली ही कवयित्री .स्त्री -विषयक कविता अगदी तळमळीने लिहिते .कारण तिच्या स्वतःच्या जाणीव तीव्रपणे व्यक्त होतात .
स्त्रीवर होणार्या अन्यायाबद्दल तिची ही कविता पुरेशी बोलकी आहे.
"उमलती कळी " (पृ. ११.)
------------------------------ -----------
"आधीपासून न्याय मिळाला असता तर
किती पुढे गेली असती मुलगी
मुलगी
असते स्वामिनी
जगू दे तिला
बनून मानिनी ...
------------------------------ ------------------------------ ---------------------
माणसा-माणसातला वाढ जाणारा दुरावा .हे पाहून कवी दुखी मनाने व्यक्त होतो -
आणि हताशपणे म्हणतोय ..
"विसरत चाललोय ..( प्र.१३ ) या कवितेत
------------------------------ -------------------------
विसरत चाललोय
माणसाशीच माणसा सारखे
वागायला व स्वतहा माणूस
म्हणून जगायला ..
आपले जगणे अर्थपूर्ण असावे असे सगळ्यांना वाटते .. ते नेमके कसे असते ते
"जगणं माझं (पृ. १७) .या कवितेतून कळते
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ---------
रडणाऱ्याला हसवण हे
कर्तव्य माझं
असचं आहे
जगणं माझं ..
माणसे सगळी सारखीच असतात "असे आपण म्हणतो खरे ..पण माणसातली विषमतेची दरी पाहून
कवयित्री म्हणते ..
"नशीब (पृ. २७ )
------------------------------ ------------------------------ -----------
देवा गरिबाला का दुखः
दे त्याला जरातरी सुख
श्रीमंताकडे आहे सुख
का गरीबाकडे फक्त आणि फक्त दुखः
आपण आपल्या आई-वडिलांच्या बद्दल मनात सदैव आदर बाळगला पाहिजे ,प्रेम असावे आपल्या मनात .
"आई-बाप " ( पृ.३१ ) या कवितेत .कवयित्री म्हणते ..
"साथ देणारी आई तर
खरा आधार बाप
जीवनाला आकार देणारी आई तर
जीवन घडवणारा बाप "
रसिक हो ..बाल-कवयित्री .कु.साक्षी सीताराम लाड हिच्या काव्य विश्वाची ही एक झलक वाचून ..तुम्हाला नक्कीच एक छान
कविता अनुभूती येईल.
तिच्या उज्वल कविता -लेखनास खूप खूप शुभेच्छा .
फिनिक्स पब्लिकेशन व प्रकाशक -प्रा.अर्जुन गोपाळ कर्पे (सर ) यांनी "काव्यज्योत "हा कविता संग्रह प्रकाशित केला आहे.
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ --------------------------
पुस्तक-परिचय लेख-
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
९८५०१७७३४२
------------------------------ ------------------------------ -----------------------
कवयित्री - कु.साक्षी सीताराम लाड
संपर्क-
७८७५२६९७६६
------------------------------ ------------------------------ ------------
कविता -संग्रह
काव्य ज्योत
पृ. ५४ .मूल्य- रु. ५०/-
फिनिक्स पब्लिकेशन
संपर्क-9096722790
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ----------------------------
पुस्तक-परिचय लेख- -अरुण वि.देशपांडे -पुणे. "जिव्हाळा "- कविता संग्रह .
पुस्तक-परिचय लेख-
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
------------------------------ ------------------------------ ---------------
अंतरीच्या जिव्हाळ्याच्या बोलक्या कविता -
"जिव्हाळा "- कविता संग्रह .
बाल -कवयित्री - कु. लक्ष्मी बनसोडे
------------------------------ ------------------------------ ---------------------
नमस्कार -
रसिक वाचक मित्र हो ,
------------------------------ ----------------------
पुस्तक-परिचय लेखन करणे माझ्या सारख्या कविता -वाचकासाठी एक कविता अनुभूती असते .
प्रत्येक कवी , त्यचे कवी -मन , आणि त्याला लाभलेली कवी-दृष्टी , त्याचा जगाकडे पाहण्याचा
स्वतंत्र असा दृष्टीकोन .. या सगळ्या गोष्टी कविता संग्रह वाचतांना जाणून घेतांना ,
दरवेळी एक नवा जीवन अनुभव घेत घेत आपल्यातला कवी रसिक संपन्न होत जातो .
अशाच एका कवयित्रीच्या अद्भुत काव्य-लेखन-प्रतिभेचा अविष्कार पुस्तक रुपात पाहण्याचा छान
योग माझ्या वाट्याला आले. या कविता संग्रहाचे शीर्षक आहे ..जिव्हाळा " आणि कवयित्रीचे नाव आहे-
कु.लक्ष्मी बनसोडे ., जी बाल-कवयित्री म्हणून परिचित झाली आहे.
शालेय विद्यार्थिनी असलेल्या या बाल - कवयित्रीच्या कविता संग्रहातील कविता वाचतांना एक जाणवले
की '' प्रतिभा " ही एक देणगी आहे ..जी जन्मताच लाभलेली असते ..म्हणूनच तिचा अविष्कार अगदी
सहजतेने होत असतो . "
अशा सहज आविष्कृत झालेल्या कवितांचा जिव्हाळा " हा कविता संग्रह जाणकारांचे
आणि वाचकांचे लक्ष वेधून घेईल असाच झालेला आहे. या बद्दल बाल -कवयित्री -लक्ष्मीचे अभिनंदन करू या .
पिढी दर पिढी .सगळेच बदलून जात असते ...आजची उमलती पिढी असो व तरुणाई असो ..
गेल्या पिढीतील याच वयोगटातील त्या कालच्या- उमलत्या पिढीच्या आणि तरुणाईच्या मानसिकतेत खूप मोठा
फरक आहे ..जो आपल्याला चिंतन करण्यास भाग पाडणारा आहे.आणि हे बदल जाणवून आपले मन थक्क होऊन जाते .
या नव्या पिढीची मानसिकता , विचार करण्याची पद्धत , आणि समोरच्या प्रत्येक गोष्टींचा अन्वयार्थ लावण्याची
धडपड मोठीच कौतुकास्पद आहे . अशा या नव्या पिढीची प्रतिनिधित्व करणारी ही कवयित्री आहे असे म्हणता येईल.
या कविता लेखनात एक सूत्र आहे - जे मोठे भावनिक आहे .. आपल्या जगण्यावर ज्यांचा सर्वाधिक प्रभाव असतो ,
ज्यांच्यामुळे आपण घडतो , सावरतो , जीवनाची वाटचाल सुकर आणि सुलभतेने करतो ..अशा आपल्या माणसांच्या
बद्दल अतिशय जिव्हाळ्याने कवयित्री आपल्या कवितेतून कृतज्ञता व्यक्त करते .
स्वतःच्या कविता लेखना बद्दल कवयित्री कवितेतूनच म्हणते -
"जो पर्यंत शेवटचा श्वास आहे
तो पर्यंत लिहिण्याची जिद्द आहे "
आणि जगण्याबद्दल ,आयुष्याबद्दल ही कवयित्री अतिशय जागरूक आहे - त्यामळे मनातील भाव-भावना , विचार -कल्पना
मांडण्याचा तिचा प्रयत्न आहे . आपल्या जीवनातील प्रवास कसा असतो व आजची वस्तुस्थिती कशी आहे "
हे काव्य संग्रहातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
कवीमनाची अशी वास्तवाशी असलेली बांधलकी " कवितेचे स्वरूप एक जाणीव -असलेली कविता असे होऊन जाते .
कवयित्रीची ही भूमिका प्रामाणिकपणे व्यक्त होते . तिच्या कवितेतील ठामपणा , विचारांशी बांधिलकी हे खूप विशेष आहे.
गंभीर , चिंतनशील ,वैचारिक आणि सामाजिक भान असलेली ही कवयित्री ..आणि तिच्या कविता एकेमेकास अनुरूप आहेत .
प्रसिध्द कवी श्री.दयासागर बन्ने -यांची प्रस्तावना -
कवयित्रीच्या कविते बद्दल अचूक व्यक्त होते .
धनापेक्षा मनाचा विचार , विचारपूर्वक आपल्या ओंजळीत देणारा काव्य संग्रह म्हणजे - जिव्हाळा "हा संग्रह .
निसर्ग ,सृष्टीबद्दल "जिव्हाळा " जपण्याचं भान ही कविता देते. प्रेमाचे उदात्त रूप म्हणजे विश्वबंधुता असा विशाल
विचार करणारी कविता आहे.
कवयित्री -लक्ष्मी बनसोडे ,देशिंग -हरोलीच्या श्री.महालक्ष्मी हायस्कूलची विद्यार्थिनी .
या शाळेतील तिच्या गुरुजनांनी तिच्या कविमनाला कविता लेखनासाठी खूप प्रेरणा दिली आहे.
श्री. मोहन रघुनाथ चव्हाण सर, कवयित्री - सौ.सुरेखा निवास कांबळे टीचर ,सौ. मनीषा पाटील -टीचर
यांनी देखील आपल्या शाळेतील या गुणी कवयित्रीला लेखन -शुभेच्छा दिल्या आहेत.
या संग्रहातील काही कविता अंश -उदाहरण म्हणून देतो -
नागरी जीवनाचे यथार्थ वर्णन करणारी एक कविता -
शहरी जीवन
फार बिकट
येथे कोणी कोणाची
पहात नाही वाट
सर्वांची असते
एक सारखीच गत ..( माझे मत ..पृ..३४ ).,
जगाचा पोशिंदा ..शेतकरी , हा बळीराजा , त्याबद्दलच्या कवितेत विचारलेला रोखठोक सवाल
"शेतकऱ्याला आत्महत्या करायला
भाग पाडता तुम्ही
सगळी शेतकरी असेच करायला
लागले तर काय खाल तुम्ही ..(शेतकरी कर्जमाफी ..पृ.३५ )
एकत्र कुटुंब ..विभक्त झाले .आणि काय हाल
झालेत. एका महत्वाच्या समस्येवर ही कविता -
"बाहेर व्हा घरातुनी
हे शब्द पडताच कानी
आईबापाच्या मनी
दुखाचा डोंगर कोसळी ... ( वृधाश्रामाची वाट..पृ..३७ ),
मुलासाठी अतिशय जिव्हाळ्याचे नाते ..ते कोणते ? त्याची कविता ..
"ज्यांच्या मुळे मी आज सन्मानाने जगू शकले
त्यांनी मला या जगात जगायला शिकवले
असे ते
म्हणजे माझे बाबा .... माझे बाबा
आणि फक्त माझे बाबा ....( असे ते ..पृ..२७ ),
माझी आई "ही कविता अतिशय हृदयंगम अशी आहे ..
घर हे मंदिर .आणि त्यातील देवता .आई .. किती छान ना !
"कृतज्ञतेचे प्रतिक ती
जणू मायेचा सागर ती
कृताज्ञेतेने वंदन करतो
देवतेस या घरराउळी ... (माझी आई ..पृ..९ )
राष्ट्र -रक्षणार्थ प्राणाची बाजी देणारे आपले जवान आपला अभिमान
त्यांच्या विषयी व्यक्त होणारी एक वेगळीच भावनिक कविता ..
"स्वतःच घालतो देशासठी धोक्यात बह्विश
ते आहे भारत मातेच्या जवानांचे आयुष्य " (जवानाचे आयुष्य ..पृ..११ ),
विद्यार्थिनी असलेली बाल-कवयित्री कु.लक्ष्मी बनसोडे
,शालेयजीवनात ती काव्य लेखन करते आहे आणि ..या बाल-कवयित्रीत उद्याच्या एका
एक परिपक्व ..जाणीवेच्या कवयित्रीचे असणे या संग्रहातील कवितातून जाणवणारे आहे..
३३ कवितांचा समावेश असलेल्या .जिव्हाळा .कविता संग्रह प्रकाशित केला आहे..फिनिक्स पब्लिकेशन यांनी.
बाल -कवयित्रीच्या कविता संग्रहाचे त्यांनी केलेले हे प्रकाशन कार्य अनुकरणीय असेच आहे..
बाल-कवयित्री - कु.लक्ष्मी बनसोडे ..हिच्या काव्य-लेखन - प्रवासास खूप खूप शुभेच्छा .
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------
पुस्तक परिचय लेख -
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२
------------------------------ ------------------------------ --
"जिव्हाळा "- कविता संग्रह .
कवयित्री - कु. लक्ष्मी बनसोडे
संपर्क - ८९९९९४५०६८८
------------------------------ ------------------------------ -------------------
जिव्हाळा - कविता संग्रह
कवयित्री - कु.लक्ष्मी बनसोडे
पृ. ४० , मूल्य- रु.४० /-
फिनिक्स पब्लिकेशन
संपर्क - ९०९६७२२७९०
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ----------------------------
Subscribe to:
Comments (Atom)