Wednesday, September 3, 2014

पुस्तक-परिचय लेख- सहज ..!

पुस्तक-परिचय -
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- ९८५०१७७३४२
---------------------------------------------------------------------------------
" सहज- (चारोळी संग्रह -
कवी -रमेश कलशेट्टी
-----------------------------------------------------------------------------------------
रसिक आणि कवी-मन असलेल्या व्यक्तीला आपणास जे जे सुचते ते शब्दातून व्यक्त करावेसे वाटणे स्वाभाविक असते . लेखन -माध्यम जर कविता असेल तर - कवी होणे सगळ्यांना आवडते .कविता -लेखनाच्या प्रांतात वावर असलेले सोलापूरचे कवी- रमेश कलशेट्टी - त्यांनी विपुल असे चारोळी -लेखन केले आहे .
आता ते - "- सहज - या शीर्षकाच्या चारोळी-संग्रह -स्वरूपात रसिकांना भेटत आहेत.
कवी -चारोळीकार - रमेश कलशेट्टी यांच्या या पहिल्या -संग्रहाचे आपण स्वागत करू या.

" सहज - या चारोळी संग्रहाचा हा परिचय....
" कच्च व्याकरण कच्ची भाषा
ट ला ट जुळवीत गेलो
कविता कळो ना कळो
मात्र मी कवी झालो ....(पृ..१४)
असे म्हणून या कवीला चालणार नाही , कारण कविता -रचना तंत्राचे भान ठेवून रचना केल्या तर याच रचना अधिक
सुबक-आणि नेमक्या होतील. हे त्यांच्या साठीच हितावह अशी गोष्ट ठरेल.
स्वतःच्या लेखन-भुमिके बद्दल अतिशय प्रांजळपणे कवी म्हणतो आहे -
"उपमा , यमक , अनुप्रास
सगळ माझ्या गावी नाही
साध ,सरळ , सोप लिहीण
बाकी काही नाही ......
ही भावना कौतक करण्या सारखी असली तरी , या पुढचा त्यांचा लेखन-प्रवास अधिक जाणीवेने करावयाचा असेल तर कवीचा लेखन-प्रवास अधिक जाणीवेने होणे आवश्यक आहे..
समाज-सेवा कार्यात रमणारे रमेश कलशेट्टी कविमनाचे असल्यामुळे सार्वजनिक जीवनातील अनुभव आपल्या चारोळ्यातून मांडावेसे वाटतात . जे पाहिले -ते लिहिणे -"हे इतके सोपे नसते .चिंतन -केल्याशिवाय हे शब्दरूप
पुरेसे प्रभावी होऊ शकत नाही ", असे या चारोळ्या वाचून सुचवावे वाटते.

कवी रमेश कलशेट्टी यांच्या प्रस्तुतच्या - सहज "- या संग्रहात२२० चारोळ्या आहेत. त्यात ही प्रेम-विषयक चारोळ्या अगदी भरपूर आहेत , या शिवाय इतर अनेक विषय - चारोळीतून येतात , या वेगळ्या आणि अर्थपूर्ण चारोळ्या म्हणजे कवी रमेश कलशेट्टी यांच्यातील कवीचे विशेष गुण आहेत."
या संग्रहात चारोळ्या विषयवार -विभागवार दिल्या गेल्या नाहीत त्यामुळे , प्रेम-विषयक चारोळी -गर्दीत ,कवीच्या चिंतनशील , आणि आशय दृष्ट्या अधिक छान अशा चारोळ्या दुर्लक्षित राहण्याची शक्यता वाटते.
मला भावलेल्या काही चारोळ्यांचा इथे आवर्जून उल्लेख करतो ---
" आपल्या जगण्याला कधीही
केलेल्या कर्माने भागा
आपोआप दिसेल प्रत्येकाच्या हृदयात
कुठे आहे आपली जागा ............(पृ- ८ )

संसारातील जोडप्यांनी सामंजस्य सोडून दिले आहे - म्हणून कवीला प्रश्न पडलाय की-

"भातुकलीच्या खेळातली
राजा अन राणी
मोठेपणी का आणतात
एकमेकांच्या डोळ्यात पाणी .......(पृ.१० )

यश-आणि अपयश - एकाचे प्रदर्शन केले जाते, दुसरे लपवून ठेवले जाते .या दोन्हीवर ही एक उत्तम रचना ..
स्पर्धेतला विजय
फक्त विजेत्याचा नसतो
खिलाडूवृत्तीने पराजय स्वीकारणार्या
प्रतिस्पर्ध्याचाही असतो ...... (पृ ..२१ )

आपल्या जीवनात नैतिक-मुल्यांची चाड बाळगलीच पाहिजे .आणि ही नैतिक -मूल्य आपले जीवन संपन्न बनवणारी असतात , ही चारोळी -त्यामुळे संस्कार-क्षम रचना आहे असे वाटेल..
" दोन प्रकारची भाकरी माहित मला
कष्टाची अन बुद्धिमत्तेची
कष्टाला लागते जोड प्रामाणिकपणाची
बुद्धिमत्तेला नितीमत्तेची ......(पृ ..५२ )
आई " हा कविता -विषय कवीच्या चारोळीतून आलेला आहेच..
आईची माया म्हणजे
कधीही न आटणारा झरा
मुलानंतर नातवंडावर
पांघरते ममतेचा पदर खरा ........(पृ ..६० )

रसिक हो, कवी रमेश कलशेट्टी यांच्या "सहज" या चारोळी संग्रहातील प्रेम-विषयक चारोळ्या सुद्धा वाचकांना आवडतील अशाच आहेत. काही चारोळ्या - निसर्ग -विषयक भावना व्यक्त करणाऱ्या आहेत.
जेष्ठ -पत्रकार श्री .अरविंद जोशी -प्रस्तावनेत या चारोळ्यांना "बहारदार किंचितिका "असे विशेषण बहाल करतात ,
"सहज " हा चारोळी संग्रह वाचून वाचकांना या -"किंचितिका - नक्कीच बहारदार वाटतील .
कवी -रमेश कलशेट्टी यांना यापुढे ही समाज-सेवाकार्यात व्यस्त असतांना अनेक कविता -विषय मिळत राहो ,
आणि त्यांची कविता समाज-प्रबोधन करीत राहो -अशा शुभेच्छा देतो.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय -
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- ९८५०१७७३४२
---------------------------------------------------------------------------------
सहज - (चारोळी -संग्रह )
रमेश कलशेट्टी
पृ- ६० , मुल्य- ५० /-
सोलापूर
संपर्क - ९८२३४३०९७१ .
---------------------------------------------------------------------------------
प्रकाशक -
श्रम साफल्य प्रकाशन
भगवान नगर -सोलापूर
संपर्क - ९३७३५७९१८९
---------------------------------------------------------------------------------------------
Photo: पुस्तक-परिचय -

Wednesday, August 13, 2014

दखलपात्र - अग्रलेख संग्रह . पुस्तक -परिचय -

दुसऱ्या- आवृत्तीच्या निमित्ताने ---
"- एका संपादकाची -"दखलपात्र "-वाटचाल.
दखलपात्र - अग्रलेख संग्रह .
पुस्तक -परिचय -
लेखक - अरुण वि . देशपांडे - पुणे .
मो- ९ ८ ५ ० १ ७ ७ ३ ४ २
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
वृतपत्र विक्रेता ते संपादक आणि प्रकाशक , असा प्रवाही प्रवास करणारे
घनश्याम पाटील , हे उत्तम लेखक आहेत. त्यांच्या लेखणीचे मनोज्ञ -रूपदर्शन ",
घडवणारे त्यांच्या अग्रलेख" लेखनाचे पुस्तक " दखलपात्र " या शीर्षकाने गेल्यावर्षी
प्रकाशित झाले . या लेखनाचे वाचकांनी यथोचित स्वागत करून, भरभरून अभिप्राय दिले .
या प्रतिसादाची "दखल प्रकाशकांना घ्यावी लागली ,आणि या लेख-संग्रहाची "दुसरी -आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे . या निमित्ताने या लेख-संग्रह बद्दल थोडेसे.

मासिक -साहित्य चपराक " आणि "साप्ता- चपराक ",या दोन नियतकालिकांचे
संपादन करणाऱ्या घनश्याम पाटलांनी या " अग्रलेखांचे - लेखन केलेले आहे , त्यांचा विविध लेखांचा
समावेश या "दखलपात्र " संग्रहात करण्यात आलेला आहे. आपल्या या लेखनातून त्यानी
"वर्तमानाची ठळकपणे नोंद घेतली आहे. आहे ,
या लेखनातून व्यक्त होतांना , आपले मत , आपली खंत मांडतांना ,मनातून
दाटून आलेला विषाद , वाटणारा आनंद, आणि समाधान "," या विविध भावना शब्दरूपात वाचणे
म्हणजे संपादक घनश्याम पाटील यांच्या व्यक्तीमात्वातील विविध भाव- गुणांचे दर्शनच घडून येते.
आपल्या आजूबाजूस नित्य घडणाऱ्या घटना , प्रसंग, त्यासाठी प्रत्यक्ष्य -
अप्रत्याक्ष्यपणे जबाबदार असणाऱ्या सर्वांना " संपादक - घनश्याम पाटील,
यांनी आपल्या "अग्रलेखांचा विषय बनवले आहे.
आपल्या लेखन -भूमिकेबद्दल ते म्हणतात - " माझ्या संस्थेचे घोषवाक्यही
"सामान्य माणसाचा उंचावलेला स्वर" ,असेच आहे.
त्यामुळे अग्रलेख लिहितांना अलिखित पूर्वसंकेत बाजूला सारून मी त्याची
मांडणी सुरु केली , आपल्या जिगरी दोस्ताशी ज्याप्रमाणे सहज -संवाद साधावा
त्या प्रमाणे अग्रलेखाची संवादी भाषा ठेवली
हे करतांना मनाला जे पटेल, रुचेल तेच लिहित गेलो. सत्य -असत्य ,
चांगले आणि वाईट अशी पडताळणी करून सत्याची वकिली केली .
एखाद्याला फक्त झोडपणे एवढाच आमचा उद्देश नाही ,त्यामुळे समजात जे काही
चांगले आहे ते स्वीकारण्याची , त्याचे भरभरून कौतुक करण्याची "गुण-ग्राहकता "
आम्ही दाखवली आहे.
"तत्व - तळमळ आणि तिडीक ", या त्रीसूत्री च्या आधारावर आमची संस्था उभी आहे.
आपल्या पत्रकारितेच्या प्रवासाची तपपूर्ती करणारे " संपादक -लेखक-प्रकाशक
घनश्याम पाटील -यांचे हे मनोगत या लेखनातून यथातथ्य व्यक्त झाले आहे .

जेष्ठ समीक्षक -लेखक प्रा ,डा. श्रीपाल सबनीस सर , यांची सार्थ अशी प्रस्तावना
या लेख- संग्रहास लाभली आहे. "दखलपात्र "- या संग्रहाचे मुल्य सर्वार्थाने वाढवणारी
ही प्रस्तावना आहे.
सबनीस सर म्हणतात - सांस्कृतिक मुल्य व्यवस्था आणि अंतरंगातील विसंवादाचा
या संपादकाने घेतलेला शोध कमालीचा प्रत्ययकारी व सत्यनिष्ठा रुजवणारा आहे. ",
अर्थात व्यक्ती -द्वेषापेक्षा व्यक्ती -दोषांवर व असभ्य प्रवृत्तीवर या अग्रलेखात
शाब्दिक हल्ला केल्यामुळे टीका विषय झालेली व्यक्ती सुद्धा दिलदारपणे टाळी देऊ शकते .
मात्र त्यांच्यात घनश्यामचा मूळ सांस्कृतिक हेतू जाणण्याची व पचवण्याची क्षमता हवीच.

संपादकीय -अग्रलेख अगदी आवडीने वाचणारे " असंख्य वाचक आहेत . या वाचकांसाठी
"दखलपात्र "-हा अग्रलेखांचा संग्रह म्हणजे एक वाचनीय पुस्तक आहे.
माझ्या मते , या संग्रहातील अग्रलेखांची ढोबळमानाने खालील प्रमाणे वर्गवारी
करता येऊ शकेल.
१. राजकारण , २. अर्थकारण , ३ सांस्कृतिक आणि साहित्य- कला क्षेत्र , ४,
सामाजिक समस्या आणि त्यावरील उपाय योजना.
यातील अग्रलेखांची शीर्षके -उदाहरण स्वरूप देतो।, जे मला विशेष वाटून गेलेले आहेत
.
. सदगुणांचा स्फोट अटळ ।! (पृ,२७ ), , नव्या युगाचा झंकार ।(पॄ ४३ ),
. अण्णा धन्यवाद ।(पृ ५८ ),मरणाचे स्मरण ठेवावे ।( पृ -७ ५ ) राजकारणातला
सुपर स्टार गेला …(पृ - ७ २ ), लोककवी मनमोहन …(पृ -११ ० )
, पुण्यभूषण सुधीर गाडगीळ ।( पृ- १२७ ), अखेर न्याय मिळाला …(पृ -१३० ). ,
ही राजभाषा असे…. (पृ -१४९ )…….
,अजब तुझे सरकार ।(पृ-१३३ ),
घनश्याम पाटील यांच्या लेखनात प्रभावी भाषा शैली ,विविध संदर्भांची खुबीने केलेली पेरणी ,
लेखन -विषयाचा अभ्यास, त्याबद्दलची तळमळ , साहित्यक आणि काव्यात्म उदाहरणे ,
वाचकांशी साधलेला आत्मीय संवाद , ही गुण-वैशिष्ट्ये या लेखनाला गुणवत्ता
बहाल करून देणारी अशीच आहेत.
लेखक -संपादक-प्रकाशक - घनश्याम पाटील यांच्या लेखन प्रवासास शुभेछा.
एकूण ४५ अग्रलेखांचा समावेश असलेला संग्रह - चित्रकार सुहास जगताप यांच्यामुखपृष्ठामुळे अधिक आकर्षक झालेला आहे.

----------------------------------------------------
दखलपात्र -"
अग्रलेख -संग्रह
ले- घनश्याम पाटील
प्रकाशक -
चपराक प्रकाशन
संपर्क - ९२२ ६ २ २ ४ १ ३ २
पृ - १७६ , मुल्य - रु. १३० / -
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Photo: दुसऱ्या- आवृत्तीच्या निमित्ताने ---

Friday, July 18, 2014

पुस्तक-परिचय -lलेख- माझी फेसबुकगिरी

पुस्तक-परिचय -
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- ९८५०१७७३४२
-------------------------------------------------------------------------
आभासी दुनिया आणि वास्तवातील दुनियेचा
धांडोळा घेणारे ललित रम्य लेखन -!
"माझी फेसबुकगिरी "-
----------------------------------------------------------------------------------------------------
 श्री .सचिन मधुकर परांजपे - लिखित  "माझी फेसबुकगिरी ", हा लेख-संग्रह नुकताच
वाचण्यात आला .
"फेसबुक " या मायानगरीत आनंदाने रमणारे असे प्रचंड आहेत.या माध्यमातून
आपल्यातील कलावंतास रसिकांच्या सामोर आणावे अशी इच्छा  असणे स्वाभाविकच आहे.
  या अशा धडपडीच्या भावनेला फेसबुकवर अजिबात अडथळा नाही,आणि म्हणूनच
"जो-तो आपल्या लेखन-क्षमता आणि मर्यादेप्रमाणे - लेखक-कवी  आणि साहित्यिक
म्हणून आपली साहित्यसेवा सदर करीत असतो..

लेखक -सचिन परांजपे यांचे प्रस्तुतचे लेखन हेही "फेसबुकवरील लेखन आहे",
 फेसबुक वरील वाचकांनी आणि मित्रांनी या लेखनास आपली पावती या अगोदरच दिलेली आहे .
हेच लेखन आता सर्व वाचकांच्या भेटीस "माझी फेसबुकगिरी " या लेख-संग्रहाच्या
स्वरूपात आले आहे. हे लेखन वाचल्यावर असेही म्हणता येईल की-
"फेसबुकवर सुद्धा छान ललित लेखन केले जाते."

या लेखनातला "मी " हा या लेखनाचा लेखक असला तरी, या "मी- मध्ये ,
वाचकाला स्वतःचे प्रतिबिंब आहे असा भास होतो, याचे कारण असे आहे की,
या संपूर्ण लेखनास "एक सार्वत्रिक भावनेचा स्पर्श आहे", म्हणून यातील लेखन-
-विषय , यातील व्यक्तीरेखा ",  फक्त लेखक सचिन परांजपे यांच्याच न वाटता त्या आपल्याही
परिवारातील परिचित आहेत असे वाटते. हे श्रेय लेखकाचे आहे.

प्रसंग आणि घटना -हे नित्यनियमित घडत असतात , या सर्वांना सामोरे जात असतांना
सामान्य माणूस   "नेमका काय करतो? , कसा व्यक्त होतो  ? ,! याची अनेक उदाहरणे लेखकाने
फार बारकाईने टिपली आहेत. त्यामुळे असेही जाणवते की -
हा लेखक  -माणसाशी एक नाते जोडून आहे ,आणि हे नाते ,जपून ठेवण्याची त्याची  असोशी ",
 या लेखनातील  भावपूर्ण असा धागा आहे.

साडेतीनशे पृष्ठांच्या या पुस्तकात -लेखक सचिन परांजपे यांनी भरभरून
लिहिले आहे .या लेखनात त्यांच्या मनातील खंत-विषाद , आस्था -अनास्था ,
विषमता आणि विसंगती , व्यक्ती आणि त्यांच्तील नमुने , नियती- प्रारब्ध ,
संचित ", जीवन आणि त्यातील सर्व प्रकारचे भले-बुरे अनुभव " अगदी प्रभावी
शैलीतून व्यक्त झालेले आहे.

या संग्रहातील कोणत्याही लेखांचे संदर्भ मी मुदाम टाळले आहेत कारण , हे लेख
आवर्जून वाचावे असेच आहेत . मला आवडलेल्या काही लेखांची शीर्षके देतो..
"बापमाणूस "- (पृ -१५ ), श्रीधराप्पा"- (पृ -२९) , "चैताली "- (पृ -४३ ),
मोहिते "-(पृ- ५५) ,  गणूभटजी "-(पृ- ६३ ), "सोफियासिंग "-( पृ- ७७ ),
"जाहिरात -एक प्रबोधन "-(पृ.१४२ ), "माहितीये मला "- (पृ- १५९ ) ,
मध्यमवर्गीय माणसांचे जग , त्यातील माणसे यांची अतिशय भावपूर्ण दर्शन
रसाळ अशा शब्दातून लेखक -सचिन मधुकर परांजपे यांनी केले आहे.

"माझी फेसबुकगिरी ", या संग्रहाने वाचनीय आनंद नक्कीच दिला आहे.या बद्दल मी
माझे प्रकाशक -मित्र आणि शब्दांजली प्रकाशनाचे -श्री .राज जैन यांना धन्यवाद देतो.
------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक परिचय -
-अरुण वि.देशपांडे -पुणे
संपर्क - ९८५०१७७३४२ .
----------------------------------------------------
लेख-संग्रह - "माझी फेसबुकगिरी ..!                                   
-सचिन मधुकर परांजपे .
संपर्क- ९८२३१२४२४२ .
प्रकाशक -
राज जैन -शब्दांजली प्रकाशन -पुणे.
संपर्क - ९८९२७३०९७९
पृ -३५० , किंमत - रु.३६० /-
-------------------------------------------------------------------------------------------------

Sunday, June 22, 2014

पुस्तक-परिचय लेख - वेगळे आकाश.

आज दि. २२ जून - रविवार - सामना -उत्सव- पुरवणीत -प्रकाशित -
माझा लेख-
--------------------------------------------------------------------------------------

Tuesday, May 6, 2014

पुस्तक-परिचय - मनाच्या अंगणात .

रसिक हो-
माझे नवे पुस्तक -
मनाच्या अंगणात "-(ललित लेख)
त्याचा परिचर करून दिलाय -कवी- सुभाष काळे यांनी.
---------------------------------------------------------------------------------------------
मनाचे अंतरंग उलगडणारे ललित -लेखन -
"मनाच्या अंगणात …।!
-------------------------------------------------------------------
लेखक-कवी- समीक्षक -बाल-साहित्यकार अशी ओळख असलेल्या
अरुण वि.देशपांडे , यांचे नवे पुस्तक- मनाच्या अंगणात "- नुकतेच वाचले.
२२ लेख असलेले हे लेखन "मन" या संकल्पने भोवती आहे असे जाणवते .

जगातील एकजात सर्वच व्यक्ती नव्हे तर व्यक्तिमत्वाच जनक असलेला
अत्यंत सुक्ष्मातीसुक्ष्म, निराकार , पण ब्रह्मांडात कुठेही ,केव्न्हाही विहार
करण्याची क्षमता असणारा आणि केवळ दोन अक्षरी लहानसे नामाभिधान
धारण केलेला शब्द- "मन".
आपल्या मनाला ", विविध परिमाण , अनेक पैलू आणि-कंगोरे असल्याने
"हे असे मन- "अंगण "- या संकल्पनेत कसे मावेल ? किंबहुना मनाचे अंगण -
मनाला पुरेसे होईल का ?
या जिज्ञासेने "मनाच्या अंगणात"-हे पुस्तक वाचण्यास घेतले .
अत्यंत गूढ विषयाच
आपल्या परीने सखोल चिंतन करून लेखक -अरुण वि.देशपांडे , "मन", या निरा
पण वास्तवात अस्तित्व असलेल्या सत्याशी तादात्म्य पावलेले आहेत आणि वाचकांनाही याची
प्रचीती देण्यात बरयाच अंशी यशस्वी झाले आहेत ", असे म्हणावेसे वाटते.

माणसाचे मन अत्यंत संवेदनशील असण्याकरिता प्रेम, नातेसंबंध , मैत्री ",
निमित्ताने संबंध येणाऱ्या व्यक्तींमध्ये दोष-शोधन " न करता त्यांचा आहे त्या
गुण-विविधते सहित स्वीकार करणे किती व्यापक आणि अक्षय आनंदाचा सोहळा
असतो", याचे विश्लेषण कमालीचे सुंदर ,तसेच वाचकास अंतर्मुख होण्यास आणि
आत्मचिंतन करण्यास प्रवृत्त करते .

या ललित-लेख संग्रहात एकूण २२ लेख आहेत- पैकी काही लेख-शीर्षके …
"मन-एक मित्र आपुला ", "निरोगी मनाचे रहस्य " , हे बंध नात्यांचे ",
घराचे घरपण ", मैत्री -एक चिंतन ", आपले भाव-विश्व ", इ…. .
या पुस्तकातील शेवटच्या काही लेखांच्या बद्दल असे म्हणावेसे वाटते की ,
बदलेल्या सामाजिक आणि वैयक्तिक जीवन-शैलीचे अत्यंत सूक्ष्म निरीक्षण
टिपले आहे .हे करतांना सर्व पातळीवरचा बदल " , हा स्वीकारायला हवा ही
अनिवार्यता जाचक न वाटता स्वागतार्ह कशी करता येईल याचे अनेक मार्ग
सोदाहरण दिले आहेत.

आपल्यात आणि आपल्या मनात बदल घडवणे हे सहजसुलभ नाही" असे
लेखकाने प्रांजळपणे कबूल केलेले असले तरी "हतबलतेचा , असहायतेचा किंवा निराशेचा
सूर कुठे ही आळवलेला नाही ." उलटपक्षी अत्यंत गंभीर अवस्थेतून मार्ग काढीत असलेली
कुटुंब-व्यवस्था , विवाह-संस्था आणि पद्धती " , संस्कार-मुल्यांचा ह्रास " यावर मूलगामी
चिंतन मांडले आहे.

विषयाचा समारोप करतांना लेखक अध्यात्मिक पातळी वरून अत्यंत मौलिक सूचना
करतो " दुक्ख देणाऱ्या अपेक्षा ठेवल्या नाहीत तर मनास सुख देता येऊ शकते.",किंबहुना
ते मिळते .-फक्त याचे अनुभूती घेता आली पाहिजे " असे सांगत शेवटच्या लेखात
व्यक्त केलेल्या मनोगतावर संत श्री ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचे आशय-शिंपण केले आहे".

"मनाच्या अंगणात " या संग्रहातील लेखनाच्या निमित्ताने लेखक -अरुण वि..देशपांडे
यांनी मनाच्या संदर्भात अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे ",
या बद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन
पुस्तक-परिचय -
---------------------------------------
सुभाष काळे - पुणे
संपर्क -९८९०४४१५९९
----------------------------------------
मनाच्या अंगणात -
-अरुण वि.देशपांडे .
संपर्क - ९८५०१७७३४२
पृ- १०४, मुल्य - रु..१२५/-
प्रकाशक - ज्ञान प्रकाशन- वितरण ,
१०७५ - सदाशिव पेठ -पुणे .
संपर्क - ९८२२२८०४२४ .
-----------------------------------------------------------------------------------

Saturday, February 1, 2014

पुस्तक- परिचय- योगजागृती - एक विचार ...!

पुस्तक-परिचय-

ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.

मो- ९८५०१७७३४२ .

-----------------------------------------------------------------------

"योगजागृती - एक विचार …!

उपयुक्त लेखन-उपक्रम -"

ले- प्रल्हाद बडवे …!

----------------------------------------------------------------------------

"योगजागृती - एक विचार -" या लेखनाचे पुस्तक -स्वरूप करणारे

लेखक -श्री .प्रल्हाद बडवे - हे लौकिक अर्थाने सेवानिवृत्त बँक-अधिकारी .

त्यांच्या सोबत काम करण्याचा योग माझ्या वाट्यास आला , आणि

हा सहवास-योग मैत्रीच्या रुपात अजूनही ताजा आणि टवटवीत आहे.

उमद्या आणि रसिक व्यक्तिमत्वाचे प्रल्हाद बडवे मित्र-परिवारात

लोकप्रिय असणे सहाजिकच आहे.

जून -२००९ पासून "योग मित्रमंडळ -औरंगाबाद ", हे केंद्र सुरु झाले,

आणि केंद्र-प्रमुख प्रा ,माहोरकर व श्री .गोपाळ कुलकर्णी या योग-शिक्षकांच्या

मार्गदर्शन लाभले , त्यानंतर नासिक येथील "योग विद्याधाम , आणि

मुंगेर (बिहार ) येथील "बिहार स्कूल ऑफ योगा , आणि स्वामी शिवानंद

आश्रम रिखिया( झारखंड ) येथे जाऊन आल्या नंतर .बडवे यांच्या मनात

प्रस्तुत विषयाला अनुसरून लेखन करून , पुस्तक रूपाने "योग-अभ्यास "

सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत घेऊन जावा असा मानस दृढ झाला असावा .

त्या दृष्टीने " योगविषयक जागृती व्हावी - असा प्रचार व प्रसार विषयक हेतू

त्यांच्या "योग जागृती - एक विचार " या पुस्तकाने नक्कीच पूर्ण झाला आहे.

"योगजागृती " या पुस्तकातील लेखनाचा उद्देश "जेष्ठ -वयस्कर लोकांना

व्हावा " म्हणून सोप्या व सुलभ योगिक क्रिया -व्यायाम , योगासने यांची

माहिती तर दिलीच आहे , शिवाय इतर अनेक विषयावरील उपुक्त माहिती

लेखक -प्रल्हाद बडवे यांनी आवर्जून दिली आहे.

८४ पृष्ठांच्या या मार्गदर्शक पुस्तकात एकूण १४ प्रकरणातून लेखकांने

योगविषयक मार्गदर्शन केले आहे. आणि हे समजावून सांगणारी भाषा -शैली

साधी आणि सुबोध आहे. तसेच योगासन - छायाचित्र" अधिक उपुक्त आहेत.

"सर्व वयोगटासाठी ३० मिनिटे योगाभ्यास ", हे समारोपा अगोदरचे

प्रकरण सर्वात अगोदर वाचावे असे सुचवीन. कारण अजूनही अनेक मंडळी

योगसाधना " म्हटले की अजूनही अनुत्सुक आहेत, त्यांच्या साठी हे अधिक

महत्वाचे आहे. कारण ३० मिनिटाचे नियोजन समजून घेतले तर नक्कीच

योगसाधने विषयी मनात अनुकूल मत होईल.

हे लेखन आणि पुस्तक खरे म्हणजे सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे,

यातील प्रकरणे -जेष्ठ -नागरिकांना जरी अधिक मदत करणारी असले तरीही

"योग आणि योगसाधना " या विषया बद्दल वाचकांच्या आणि नव्या साधकांच्या

मनातील गोंधळ कमी करू शकणारी अशी माहितीपूर्ण आहेत.

म्हणूनच लेखक -प्रल्हाद बडवे यांच्या पुस्तकाला एक सामाजिक मोल आहे .

ज्या जाणीवेने आणि उद्देशाने त्यनी "योगजागृती " हा एक विचार मानला आहे,

तो आपल्या सर्वांच्या हितार्थ असाच आहे.

त्यांच्या या कार्याला आपण ही यथाशक्ती हातभार लावला पाहिजे.

लेखक -आणि योगसाधक -प्रचारक आणि प्रसारक -असे बहुआयामी कार्य

करणाऱ्या मित्रवर्य -प्रल्हाद बडवे यांचे अभिनंदन करतो , आणि शुभेच्छा देतो.

-------------------------------------------------------------------------------------------

पुस्तक परिचय - अरुण वि.देशपांडे -पुणे .

मो- ९८५०१७७३४२

------------------------------------------------------------------------------------------------

लेखक - प्रल्हाद बडवे

संपर्क न. मो- ९४२३७५७१००

--------------------------------------------------------------------------------------------------------

"योगजागृती- एक विचार ...!

-प्रल्हाद बडवे

प्रकाशक - सौ. अंजली सुमेध बडवे ,

२३, सारंग ,

राधामोहन कौलनी,औरंगाबाद .

मो- ९८८१००८४००

पृ- ८४. मुल्य- रु. ८०/-

------------------------------------------------------------------------------------------------------------

Saturday, January 18, 2014

पुस्तक-परिचय- कथा- संग्रह...मनातल्या वावटळी ....!

पुस्तक -परिचय :
अरुण.वि.देशपांडे-पुणे.-
-------------------------------------
भावनिक कल्लोळाच्या कथा "-"मनातल्या वावटळी "-
----------------------------------------------------------------
पुस्तक रूपाने येणारे लेखन लेखक-कवीचे वाण्ग्मयीन व्यक्तिमत्व साकारणारे असते. याचा परिणाम वाचकांच्या
मनावरती दीर्घकाळ रेंगाळणारा असतो. त्यातच लेखक-कवीच्या "पहिल्या पुस्तकाची बात कांही औरच असते.असा
अनुभव लेखिका-प्रगती कोलगे त्यांच्या "मनातल्या वावटळी " या पहिल्या पुस्तकाच्या निमित्ताने घेतच असतील.
"ग्रंथाली "या मान्यवर संस्थेने प्रगती कोलगे यांचा कथा-संग्रह नुकताच -जुलाई -२०११ ला प्रकाशित केला आहे.
त्याचा हा स्वागतपर परिचय सानंद करून देतो आहे.
या संग्रहात एकूण ९ कथा आहेत.कथांमधील व्यक्तीरेखा वाचकांशी निवेदनातून संवाद साधतांना -आपापल्या जीवनतील
भावनिक घटना,प्रसंग ,व्यक्ती-संदर्भ आठवणी सांगतात.या निवेदनात्मक कथेतून एक समान भावनिक धागा आहे
असे जाणवते .हा धागा आहे तो "मनात कल्पिलेले असे कांही आणि वाट्यास आलेली जीवनतील वास्तव " यातील
तफावतीने उध्वस्त: मनाने आयुष्याला सामोरे जाताना -मनाची झालेली अवस्था ,भोगावे लागणारे ताण-तणाव ,विचार,आणि
भावना यांच्याशी करावी लागणारी यातानाकारक तडजोडी -आणि यामुळे सामाजिक व्यवहार -आणि भावनिक व्यवहार यातील
संघर्ष कराव्या लागणाऱ्या व्यक्तींची भावनिक ससेहोलपट -असे अनेकविध कंगोरे टिपणे आणि त्यावर भाष्य करणे -हे
लेखिका-प्रगती कोलगे यांचा पहिला लेखन-प्रयत्न जमून आलेला आहे.असे म्हणावेसे वाटते.
'कृष्णा( कान्हा देवकीचा की यशोदेचा),रागिणी (जनम पत्रिका आणि लग्न),माया (लादलेला संसार),वर्षा-(ओढ हक्काच्या -
संपूर्ण प्रेमाची),सुहास -(अज्ञात वास्तव).या काही कथांचे उल्लेख करावेसे वाटतात.
माणसांची नाजूक स्वप्ने,त्यांच्या कोमल भावना ,सहजीवनाची रंगबिरंगी चित्र, या सर्वांची झालेली निराशाजनक होरपळ
मनातली वावटळी "मधील कथांचे विशेष आहे.
कृष्णाचे दुखः: ,माधवीची कथा,वर्षाची व्यथा ,माणिकराव यांची अपेक्षा ,नितीनच्या अधुऱ्या प्रेमाची विफलता ,हे या कथा लेखनाचे
विषय आहेत.केवळ नशीब-आणि नियती यामुळे भोगावे लागणारे दुख:,त्यामुळे हे माणसे अगतिक,हतबल,आणि नैराश्यग्रस्त होऊन
जगण्याला सामोरी जात आहेत असे चित्र उभे राहते.त्यामुळे नकारात्मक भावनाचे सावट दाटून आले आहे ,असे वाचकांना जाणवेल.
लेखिका प्रगती कोलगे यांनी अतिशय समरसून लेखन केले आहे.आपल्या भोवती असलेल्या माणसांविषयी असलेलेल्या आस्था
त्य्नाच्या कथेतून दिसून येते.कथानकातील व्यक्तिरेखांना लेखिकेचे पाठबळ लाभल्यामुळे की काय ,या कथांमधून भावनिक-
आणि वैचारिक अशा दोन्ही भावनांचे चमकदार शब्दरूप पहावयास मिळते.
लेखिका प्रगती कोलगे यांचे या लेखन उपक्रम बद्दल अभिनंदन.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय-अरुण.वि.देशपांडे.-पुणे.९८५०१७७४२.
"मनातल्या वावटळी "-कथा संग्रह -लेखिका-प्रगती कोलगे
प्रकाशक :ग्रंथाली-मुद्रण सुविधा केंद्र
संपर्क :०२२-२४४७४८४३,

पुस्तक-परिचय - परीघावरच्या पाउलखुणा ...!

पुस्तक परिचय...||                           ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.

---------------------------------------------------------------------------------------
"परीघावरच्या पाउलखुणा -
मनाला व्यापून टाकणाऱ्या जीवनानुभावांचे
लेखन "
-----------------------------------------------------------
सांगोला -जि-सोलापूर चे ख्यातीप्राप्त साहित्यिक प्रा.डा.कृष्णा इंगोले
यांचे विपुल असे लेखन विविध लेखन  ग्रंथरूपाने प्रसिद्ध झालेले आहे.
तसेच अनेक ग्रंथांचे संपादन त्यांनी केलेले आहे.
"परीघावरच्या पाउलखुणा "-हे इंगोलेसरांचे नवे लेखन हे ललित गद्य लेखन
आहे.जीवन-अनुभवांचे हळुवार आणि भावनात्मक जाणीवाचे लेखन म्हणजे
ललितलेखन" असे म्हटले जाते. या प्रमाणे "परिघावरच्या पाऊलखुणा " मधील
लेख हे ललित शैलीतील आणि कथात्म असे असले तरी या लेखनाला महत्वाचे
असे विविध सामाजिक परिवर्तनाचे संदर्भ आहेत.
निखळ रंजनात्मक असे हे लेखन नसून व्यक्तीजीवनाची
वाटचाल करतांना ,सभोवतालच्या समाज जीवनातील
घडामोडींची,त्यातील बदलांची नोंद घेत असतांना ,लेखक  
ज्या भावनेने आणि वैचारीकतेने व्यक्त होतो, जाणिवांचे
हे  शब्दरूप अंतर्मुख व्हायला लावणारे आहे.या लेखनाचे
हे एक प्रमुख वैशिष्ट्य ठरावे.
विकासाच्या केंद्रस्थानी असणारी शहरे आणि या साठी
विन्मुख्लेला खेड्यातील माणूस-यांच्यातील भली मोठ्ठी तफावत
या लेखनाचा आस्थाविषय आहे."परिघावरच्या पाउलखुणा "
मधील लेखनातून हे प्रकर्षाने जाणवेल.
एका सामान्य माणसाच्या जीवन-प्रवासतील बऱ्या-वाईट,इष्ट -
 अनिष्ट  यावर लेखक फार सुंदर  भावनिक व्यक्त होतात. या
लेखनात कथा आणि ललित लेख वाचावयास मिळतात. एकूण १६
लेख आणि कथा यांचा समावेश या पुस्तकात केलेला आहे.
लहानसे खेडे आणि पुढारलेले शहर हा परीघ आणि यातील माणसांचे
चिंतनपर चित्रण लेखक  अतिशय समरसतेने करून जातात.
जुने-लोक ,जुने दिवस  या गोष्टी म्हणजे स्मरण रंजन करणाऱ्या
पण या लेखनात हेच विषय लेखकाचे चिंतन-विषय झालेले आहेत.
यात खंत आहे,विषाद आहे,चांगल्या गोष्टी नाहीश्या होत असल्या
बद्दलची जशी खंत आहे, त्याच बरोबर नव्या तंत्रज्ञानाचे स्वागत करणारी
भावना देखील आहे."
"कथा हुकलेल्या लग्नाची ", "जयंती ", विचका ", "पाणी " या कथा  आणि
"परिघावरून केंद्राकडे  जाताना ",आवटे आबा ", चुकलेल्या वाटा ", अशा
लेखांतून लेखक प्रा.डा.कृष्णा इंगोलेसर यांच्या लेखन शैलीचा सुरेख प्रत्यय
येतो.  बदल होत असतानाच्या प्रक्रियेचा परिवर्तनशील मनाने त्यांनी घेतलेला
समाजमनाचा ,समाज-व्यवहाराचा हा लेखन धांडोळा वाचकांना एक विचार आणि
अनुभव देणारा आहे.
माणसांच्या सह्वास्च्या आठवणीनी या "परिघा वरच्या  पाउलखुणा " वाचकांच्या
मनावरती ठळकपणे उमटतील हे मात्र नक्की.
औरंगाबाद च्या रजत प्रकाशन आणि प्रकाशक श्री अशोक कुमठेकर यांनी अतिशय
सुरेख पुस्तक करून लेखक -प्रा.डा.कृष्णा इंगोले यांच्या वाचकांना सुंदर भेट दिली आहे.
चित्रकर-कलावंत-सरदार  यांनी यथायोग्य मुख-पृष्ठाने भरच टाकली आहे.
"परिघा वरच्या पाउलखुणा " जरूर वाचावे असे पुस्तक आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
"परिघा वरच्या पाउलखुणा"
लेखक- प्रा.डा.कृष्णा इंगोले -------संपर्क-९९२२६१७६२१
प्रकाशक- रजत प्रकाशन,
११८-तिलक नगर -औरंगाबाद-
मो-९८५०१४००२५.
पृ.-१२८ , मु-रु-१३५/.  
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
                                        पुस्तकपरिचय- अरुण.वि.देशपांडे -पुणे
                                                मो-९८५०१७७३४२,
----------------------------------------------------------------------------------------------------------------

पुस्तक-परिचय - कादंबरी - टेन पर्सेंट ...!

श्री ||
पुस्तक-परिचय "                                        
  -अरुण.वि.देशपांडे -पुणे.
-मो.९८५०१७७३४२
---------------------------------------------------------------------------------------------
----" मनस्वी आणि जिद्दी माणसाच्या व्यक्तीमत्वाची
      शंभर टक्के कहाणी (  - टेन पर्सेंट ) " १० %-कादंबरी .
                             ***************
विलास एखंडे पाटील या लेखकाची टेन पर्सेंट " ही कादंबरी औगस्ट-२०११ मध्ये
प्रकाशित झालेली आहे. ३०३ पृष्ठांच्या  कादंबरीत "शिवा" या तरुणाच्या एका
मनस्वी जीवन प्रवासाची कहाणी लेखकाने प्रभावी आणि प्रवाही शैलीतून सांगितले आहे.
"शिकलेला , भल्या - बुऱ्याची समज असलेला ,मानवी मुल्यांची सजग जाणीव असलेल्या
तरुणाची -"शिवाची " ही कहाणी आहे.
खेड्यातून शहराकडेघेऊन जाणारा रस्ता आणि या प्रवासातील वळण वळणाने कराव्या
प्रवासाची कहाणी लेखक-विलास एखंडे पाटील तपशीलवार रेखाटली आहे.
प्रस्तावनेत असे म्हटले आहे की-
सरकारी व्यवस्थेतील लाचखोरीच्या पद्धती, त्या यंत्रणेतील मिंधेपणा ,त्या विषयाची मनात
चीड असतांना कराव्या लागणाऱ्या तडजोडी आणि या प्रवाहाच्या विरोधात पोहणारी काही
मोजकी माणसे भेटल्या नंतर मिळणारा दिलासा आणि वाढणारी आशा---"
हा अवकाश  लेखक विलास एखंडे पाटलांनी चांगला पेलला आहे.
"टेन पर्सेंट" कादंबरीच्या कथानका मध्ये गेल्या पन्नास वर्ष्यांच्या
सामाजिक , आर्थिक बदलावरचे  भाष्य आणि त्यातून मनावर झालेल्या
घात-आघात यांचे  "चिंतनपर " स्वगत  नायक -शिवाच्या मनोगतातून
व्यक्त होत गेलेले आहे.
लेखक विलास एखंडे पाटील आपल्या मनोगतात म्हणतात की -
या कथानकातील सारे काही काल्पनिक आहे.तो "कल्पना "विलास" समजावा .
विशेष म्हणजे हेच सर्व घटक कथानकाला प्रभावी करणारे ठरतील असे आहेत.
कहाणीच्या ओघात येणाऱ्या-शासकीय , निम-शासकीय  संथा ,त्यांची सगळी
कार्यप्रणाली ,त्यातील कार्यरत व्यक्ती- आणि व्यक्ती समूह , आणि या सर्वांशी
अपरिहार्यपणे जोडला गेलेला नायक-शिवा . त्याच्या जीवन कहाणीला संघर्ष -
कहाणी बनवणारे  ह्या व्यक्ती , "सेंट रौन" ही संस्था ,आणि सभोवतालचे विश्व
हे नायक-शिवा" इतकेच महत्वाचे आहे. हे सगळे इतके तपशीलवार पणे येते की
ही संस्था वाचकांच्या नजरेसमोर आकारून येते.
नायक -शिवा स्वतः त्याची कहाणी सांगतो आहे. जुन्या आठवणीत रमणारा शिवा,
वर्तमानातून बोध घेता घेता ,भूतकाळातील चुकांचा हिशोब करतो, आणि त्यातून
भविष्यात नव्या पद्धतीने काम करण्याची तयारी दाखवतो. शिवाचे हे असे घडत
जाणे म्हणजे " टेन पर्सेंट "कादम्बरीचेकथानक आहे.
"टेन पर्सेंट" कादंबरीच्या कथानका मध्ये गेल्या पन्नास वर्ष्यांच्या
सामाजिक , आर्थिक बदलावरचे  भाष्य आणि त्यातून मनावर झालेल्या
घात-आघात यांचे  "चिंतनपर " स्वगत  नायक -शिवाच्या मनोगतातून
व्यक्त होत गेलेले आहे.

सर्व सामान्य माणसांच्या भाव-विश्वात सर्वच गोष्टीना मोठे
भावनिक स्थान असते. शिवाच्या मनात- "शाळेचे दिवस,गावाकडचे
दिवस,गावातली माणसे ,महाविद्यालयीन जग, त्यातील मित्र ,शिक्षक ,सर,
आणि भेटलेली वडीलधारी माणसे यांचे तर स्थान महत्वाचे आहेच, त्या पेक्षा
त्याच्या संघर्षाच्या दिवसात जमेल तशी,जमेल तितकी मदत करणारया
सोबत्यांना अधिक जवळचे स्थान आहे.
मनाच्या हतबल अवस्थेत शिवा आपल्या जवळच्या माणसांच्या आठवणीने
विव्हल होऊन जातो, त्याची "ही आपली माणसे" त्याला संघर्ष करण्याचे सांगतात,
त्याला प्रेरणा देतात. शिवाचे हे "भावबंध" मोठे मनस्पर्शी झाले आहेत.
शिवाचे, मनोगत, शिवाचे स्वगत -या दोन्ही गोष्टी सुरेख ललित गद्य लेखनाचे
उदाहरण वाटवे असे सरस उतरले आहेत.
"टेन पर्सेंट" कादंबरी लेखन वाचकांना  जीवन -अनुभव देणारे वाटेल.
लेखक विलास एखंडे पाटील यांची कामगिरी हंड्रेड पर्सेंट आनंददायी अशीच झाली आहे.
जरूर वाचावी अशी ही कादंबरी आहे.
*********************************************************************************************
पुस्तक-परिचय "-----------------------------------
अरुण.वि. देशपांडे -पुणे.
-------------------------------------------------------------
१०%- " टेन पर्सेंट -
कादंबरी --पृ- ३०३- की-रु-२५०/-
विलास एखंडे पाटील - संपर्क- ०२०/२५६६०००१.
प्रकाशक- व्हिजन प्लस फौंडेशन - पुणे.
visionplus .foundation @ gmail .com
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

पुस्तक- परिचय*- माझ्या गझला - बदिउज़्ज़मा बिराजदार .

श्री ||                                               अरुण.वि.देशपांडे -पुणे.
पुस्तक परिचय "-                         
गझल -यात्रेतील एक दिलचस्प मकाम -
"माझ्या गझला "
-------------------------------------------------
मराठी गझल आणि कविता लेखनातील एक परिचित नाव
बदिउज्ज्मा बिराजदार -साबिर शोलापुरी",सोलापूरचे.
मराठी  गझल हिंदी मार्फत दाखल न होता सरळ उर्दूच्या
वाटेने मराठीत आली पण उर्दुचा प्रभाव न घेता मराठमोळ्या
रूपातच घडत गेली .या गझलच्या प्रवासात मुस्लीम मराठी साहित्यिकांचे
योगदान लक्षणीय आहे आणि यात कवी-शायर बदिउज्ज्मा बिराजदार
यांचे ही महत्वाचे योगदान आहे.
माझ्या गझला "हा त्यांच्या नवा संग्रह आहे. साठ गझलांचा समावेश
असलेल्या त्यांच्या संग्रहाचा हा परिचय.
आपल्या मनोगतात कवी म्हणतो आहे  की-
छंदोबद्ध रचनेच्या छंदात राहण्याचा छंद आहे म्हणूनच
माझ्या हातून "माझ्या गझलांची "निर्मिती झाली आहे."
समजातील माणसांच्या व्यथा ,आधुनिक माणसांच्या यथार्थ
संघर्ष ,सुख,आणि दुखः यांची कहाणी हा या संग्रह्तील गझलांचा
भावार्थ आहे.
गझल हा ताकदीचा काव्यप्रकार आहे असे म्हटले जाते.
आणि शायर बदिउज्ज्मा बिराजदार -साबिर शोलापुरी
यांच्या गझला या काव्य्प्रकारचा "बेहतरीन अविष्कार आहे.
वर वर पाहता हे "शेर " सभोवतालच्या वृत्ती,प्रवृत्ती, यावर
भाष्य करणारे वाटतील .पण अंतरंग उलगडले जाते आणि मग
त्यातील "पारलौकिक तत्व" आपल्या मनावर प्रभाव टाकते.
सभोवतालची विपरीत परिस्तिथी जगण्यातला आनंद
घालवून टाकणारी आहे .जीवनाच्या मांगल्याची चाड
नसलेल्या लोकांसोबतचे क्षण मनाला अधिकच वेदना देणारे
वाटतात. अशा वेळी कवी म्हणतो-
भामट्यान च्या  मैफलीला आज मी टाकून आलो
संगती ती दाम्भिकांची सर्व मी सोडून आलो ..(मैफलीला --पृ-२२)
दहशतीच्या वातावरणात जगण्याची भयावह सक्ती ज्यावेळी
होते त्यावेळी संवेदनशील मनाला होणाऱ्या वेदना ....
   -हुंदके दाबून येथे राहतो, पण दहशतीने
सावली पाहून आता चालतो,पण दहशतीने ....(हुंदके दाबून--पृ.२३)
    लागला ना अंत केव्न्हां माणसांचा
    वागणे ही  मज तयांचे ज्ञात नाही ---
कवी आपल्या प्रेरणेने या परिस्तिथी चा शोध गेतांना दिसतो -
का बेचीराग झाली पणतीत ज्योत ही
अंधारले कशाने मतितार्थ शोधतो.......(स्वार्थीच फार झाले..पृ-४३)
व्यथा ,खंत,खेद,विषाद, उपेक्षा -अशा भावनांचे गडद रंग या रचनेतून
दिसत असले तरी कवीची सामाजिक बांधिलकी  जाणवते.आणि
सभोवतालचा माणूस आणि कवी यांच्यातील आपले पानाचे नाते दिसते.
कवी बदिऊज्मा बिराजदार-साबिर- यांनी मोठ्या उत्कटतेने
या भावना आपल्या रचनेतून व्यक्त केल्या आहेत.माणूस आणि
त्याच्या व्यथा हा कवीचा काव्य-विषय आहे-त्यामुळेच तो म्हणतो- 
      डोळे भरून येती साबिर अशा व्यथेने
      हे शल्य आसवाना पण गाळता न आले.....(जे जे मनात..पृ-३०)
माझ्या गझला " या संग्रहात सामाजिक जीवन मनावरती  भाष्य
करणाऱ्या रचना अधिक प्रभावी आहेत. डा.राम पंडित यांनी कवी
बदिउज्ज्मा बिराजदार यांच्या गझलेची पाठराखण केली आहे.
गझला आणि कविता रसिकांसाठी "माझ्या गझला " हा संग्रह जरूर
वाचावा असाच आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------
-परिचय- अरुण.वि .देशपांडे-पुणे.
माझ्या गझला (काव्य संग्रह)
बदिउज्ज्मा बिराजदार-साबिर शोलापुरी"- मो-९८९०१७१७०३.
प्रकाशक- सुविद्या प्रकाशन
३७४-उत्तर कसबा--सोलापूर-४१३००७.
पृ-६२           कि-रु.६०/-
***************************************************************************************