पुस्तक-परिचय लेख -
ले- अरुण वि.देशपांडे - पुणे.
------------------------------ ------------------------------ --------------------
"परिसर उजळून टाकणाऱ्या कविता "
काव्यज्योत " कविता संग्रह .
बाल-कवयित्री कु.साक्षी सीताराम लाड
------------------------------ ------------------------------ ------------------------------ --------------
कवी ,कविमन आणि कविता ..या तीनही गोष्टीसाठी आवश्यक असते ते अनुकूल परिस्थिती ,प्रेरक आणि
मार्गदर्शक व्यक्तींचा सहवास ,
असे काहीसे पूरक असे वातावरण ..देशिंग-हारोली- या गावात असलेल्या श्री महालक्ष्मी हायस्कूलची
विद्यार्थिनी असलेल्या कु.साक्षी सीताराम लाड ..हिच्या मनातल्या कवीला कविता लेखनासाठी मिळाले आहे.
या शाळेत तिला प्रोत्साहन देणारे मार्गदर्शक भेटलेत , कवितालेखन करणार्या वर्गमैत्रिणी भेटल्या आहेत .
साहजिकच
कु.साक्षी या बाल-कवयित्रीच्या कविता लेखनाला एक खुले आकाश मिळाले , सुंदर सुंदर पक्षांचे थवे जसे
विशाल गगनात विहरू लागतात ..तशा या बाल-कवियीत्रीच्या कविता सर्वांना शब्दरूपात पहायला मिळू लागल्या .
मुळातच कविमन लाभलेल्या व्यक्तीला ..तो वयाने मोठा आहे म्हणून कविता लिहू शकतो ..असे मुळीच नाही ..
तर उपजत प्रतिभा , कविता लेखनाची उर्मी , , शब्दातून व्यक्त होण्याची धडपड , आणि मनात असलेली तळमळ ",
हे सगळं कवीच्या ठायी दिसत असते ".
असा एक कवी " आपल्याला साक्षी लाड सारख्या शालेयविद्यार्थिनी मध्ये दिसू लागतो ",आणि तिच्या कविता मधूनही जाणवतो .
नव्या पिढीच्या प्रगल्भतेचे एक छान उदाहरण म्हणून बाल-कवयित्री- साक्षी लाड हिचा उल्लेख करता येईल.
कवी अस्वथ मनाचा असतो ..त्याला जे दिसले ..त्याने जे पाहिले ..त्यातले काय वाईट आहे, काय मंगलमय आहे ..हे तो ज्या
पद्धतीने आणि ज्या अचूक शब्दातून सांगत असतो ..त्यालाच आपण वाचक- "कविता " असे म्हणतो .
बाल-कवयित्री कु.साक्षीच्या अशा अनेक कवितां
तिच्या " .काव्य ज्योत " नावाच्या संग्रहातून आपल्या भेटीस येतात " हे सगळे खूप
कौतुकाचे आहे.
श्री.वसंत पाटील सरांनी आपल्या प्रस्तावनेत ..साक्षीच्या कविता लेखनाबद्दल फार छान म्हटलेले आहे..
" साक्षीच्या कवितेत नवखेपण असले तरी तिची हळवी संवेदनशीलता तिच्या कवितेला निश्चित नवे आयाम देईल असा विश्वास वाटतोय."
साक्षी माती आणि नाती विसरत नाही " ,तिला शेतकऱ्यांची व्यथा , स्त्रियांची दुखे व्यथित करतात .
स्वप्नील मृगजळाच्या मागे न लागता वास्तव जगण्यातील प्रश्नांची तिला जाणीव आहे "
वाचक मित्र हो ..वरील विवेचन वाचून आपल्याला साक्षीच्या कविता -लेखन स्वरूपाची कल्पना येते .आणि उद्याची एक आश्वासक कवयित्री
आज विद्यार्थिनी असलेल्या साक्षी लाड या बाल -कवयित्रीत आपल्याला दिसू लागते .
साक्षीच्या मुख्याध्यापिका सौ .प्रतिभा सतीश भोसले आपल्या विद्यार्थिनीला शुभेच्छा आणि आशीर्वाद देतांना म्हणतात -
"भविष्यात मोठी झेप ,साक्षीला घ्यायची आहे.. शब्दांनी तिला भेटावे व तिने मायेने तिला जवळ घ्यावे ", हीच माझी तिला शुभेच्छा आहेत."
हे वाचून वाटते की - असे गुरुजन भेटलेली बाल-कवयित्री - साक्षी लाड सारख्या कलावंत मनाच्या विद्यार्थिनी खूप नशीबवान असतात.
साक्षीच्या महालक्ष्मी हायस्कूल मधल्या कवयित्री -शिक्षिका - सौ. सुरेखा निवास कांबळे यांनीही लेखन -आशीर्वाद दिला आहे .
तसेच शिक्षिका -मनीषा पाटील म्हणताहेत -
विविध विषय हाताळण्याची मुलींची हातोटी कौतुकास्पद आहे. कविता फुलत राहो, लेखनाच्या जाणीवा प्रगल्भ होवोत .याच शुभेच्छा आहेत.
स्वतहा कवयित्री आपल्या मनोगतातून म्हणते की -
हा माझा "काव्यज्योत पहिला काव्यसंग्रह आहे ",माझ्या सर्व कवितेवर मी खोलातखोल
विचार करून लिहिण्याचा प्रयत्न केला आहे ". साक्षीचा हा मनो-विचार तिच्या कवयित्री असण्याचे मोठे महत्वाचे लक्षण आहे.
कवी जितका खोल विचार करतो ,चिंतन करतो .तितकी कवीची कविता अगदी खूप आतून आलेली असते " ,
याची प्रचीती बाल-कवयित्री -साक्षी सीताराम लाड हिचा काव्य ज्योत कविता संग्रहातील ५० कविता वाचतांना वाचकांना नक्कीच येईल.
काही कवितांची उदाहरणे ..देतो म्हणजे ..कवयित्रीच्या कवीमनाचे प्रतिबिंब कसे स्पष्ट उमटले आहे हे दिसून येईल .
अत्याचार - ( पृ,१० ) या कवितेतून वास्तव समस्येवर कवयित्री प्रश्न विचारते आहे ..
------------------------------ ------------------------------ ------------------------------ -------
वंशाच्या दिव्यासाठी का
विजवता तुम्ही पणती
सुनो दुनियावालो
बेटी बोझ नाही होती ...
स्त्रीमन लाभलेली ही कवयित्री .स्त्री -विषयक कविता अगदी तळमळीने लिहिते .कारण तिच्या स्वतःच्या जाणीव तीव्रपणे व्यक्त होतात .
स्त्रीवर होणार्या अन्यायाबद्दल तिची ही कविता पुरेशी बोलकी आहे.
"उमलती कळी " (पृ. ११.)
------------------------------ -----------
"आधीपासून न्याय मिळाला असता तर
किती पुढे गेली असती मुलगी
मुलगी
असते स्वामिनी
जगू दे तिला
बनून मानिनी ...
------------------------------ ------------------------------ ---------------------
माणसा-माणसातला वाढ जाणारा दुरावा .हे पाहून कवी दुखी मनाने व्यक्त होतो -
आणि हताशपणे म्हणतोय ..
"विसरत चाललोय ..( प्र.१३ ) या कवितेत
------------------------------ -------------------------
विसरत चाललोय
माणसाशीच माणसा सारखे
वागायला व स्वतहा माणूस
म्हणून जगायला ..
आपले जगणे अर्थपूर्ण असावे असे सगळ्यांना वाटते .. ते नेमके कसे असते ते
"जगणं माझं (पृ. १७) .या कवितेतून कळते
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ---------
रडणाऱ्याला हसवण हे
कर्तव्य माझं
असचं आहे
जगणं माझं ..
माणसे सगळी सारखीच असतात "असे आपण म्हणतो खरे ..पण माणसातली विषमतेची दरी पाहून
कवयित्री म्हणते ..
"नशीब (पृ. २७ )
------------------------------ ------------------------------ -----------
देवा गरिबाला का दुखः
दे त्याला जरातरी सुख
श्रीमंताकडे आहे सुख
का गरीबाकडे फक्त आणि फक्त दुखः
आपण आपल्या आई-वडिलांच्या बद्दल मनात सदैव आदर बाळगला पाहिजे ,प्रेम असावे आपल्या मनात .
"आई-बाप " ( पृ.३१ ) या कवितेत .कवयित्री म्हणते ..
"साथ देणारी आई तर
खरा आधार बाप
जीवनाला आकार देणारी आई तर
जीवन घडवणारा बाप "
रसिक हो ..बाल-कवयित्री .कु.साक्षी सीताराम लाड हिच्या काव्य विश्वाची ही एक झलक वाचून ..तुम्हाला नक्कीच एक छान
कविता अनुभूती येईल.
तिच्या उज्वल कविता -लेखनास खूप खूप शुभेच्छा .
फिनिक्स पब्लिकेशन व प्रकाशक -प्रा.अर्जुन गोपाळ कर्पे (सर ) यांनी "काव्यज्योत "हा कविता संग्रह प्रकाशित केला आहे.
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ --------------------------
पुस्तक-परिचय लेख-
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
९८५०१७७३४२
------------------------------ ------------------------------ -----------------------
कवयित्री - कु.साक्षी सीताराम लाड
संपर्क-
७८७५२६९७६६
------------------------------ ------------------------------ ------------
कविता -संग्रह
काव्य ज्योत
पृ. ५४ .मूल्य- रु. ५०/-
फिनिक्स पब्लिकेशन
संपर्क-9096722790
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ----------------------------
No comments:
Post a Comment