पुस्तक -परिचय लेख-
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
------------------------------ ----------------
कविता आनंद देणारा प्रातिनिधिक कविता संग्रह -
"काव्यानंद "
------------------------------ ------------------------------ -------------------
रसिक हो नमस्कार ,
कवितेची आवड असणारे रसिक वाचक आणि कविता लेखनाची आवड असणारे कवी .यांच्या भेटीचा आनंदयोग जुळून आलाय तो फेसबुकवरील सर्वपरिचित समूह "काव्यानंद प्रतिष्ठान "यांच्या प्रातिनिधिक कविता संग्रहाच्या उपक्रमामुळे .समूह - संचालक श्री .सुनील खंडेलवाल आणि त्यांचे सहकारी .यांचा कविता-विषयक जिव्हाळा "काव्यानंद संग्रहामुळे पुस्तकरूपाने सिद्ध झालेला आहे.याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन.
यातील सहभागी कवी इंटरनेट व फेसबुक या माध्यमातून आपापल्या कविता-लेखनाने वाचाकंना परिचित झालेले आहेतच त्यांच्या कविता हाच त्यांचा परिचय आणि त्यांची ओळख आहे असे म्हणूयात.
कविता हणजे मनाची अभिव्यक्ती असते..कवी एक माणूस म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून समाजात वावरतांना अनेक जीवनानुभव घेत असतो त्याचे संवेदनशील कविमन कवितेतून व्यक्त होत असते .जीवन -अनुभवणे किती वेगवेगळ्या पातळीवरचे असते ".हे कवीची कविता सांगत असते ."
याची प्रचीती या संग्रहातील कविता नक्कीच देतात.
काव्यानंद - संग्रहात अनेक कविमित्र आपल्या कवितेतून व्यक्त झालेले आहेत "एका अर्थाने .हे"कवितेचे प्रतिनिधी आहेत ",अनेक भाव-भावनांच्या कविता यात वाचावयास मिळतात .सामाजिक वैचारिक ,प्रेम- वात्सल्य या भावना, ,निसर्ग आणि माणूस "यांच्यातील नाते " अशा विविध विषयावरील कविता आहेत."याशिवाय "आई" हा सर्वप्रिय विषयावर देखील कविता संग्रहातील कवींनी केल्या आहेत .
कवी आशावादी असतो असे म्हणतात .कारण जीवनातील श्रेयस त्याला अपेक्षित असते ..अशा "आशावादी कविता "या संग्रहात आहेत.त्यामुळे .निराशेचा तीव्र असा सूर "या कवितेत आहे असे फारसे जाणवत नाही.
सहभागी कवींच्या सर्वच कविता मी मनापसून वाचल्या ..आणि जाणवले .हे मित्र उत्तम लेख्न-क्षमता असलेले कवी आहेत,हा संग्रह म्हणजे त्यांच्या कवितेचा आणि प्रतिभेचा आरंभिक -अविष्कार आहे..म्हणूनच ..अधिक सराव आणि अभ्यासाने त्यांनी जाणीवेने कवितेने लेखन चालू ठेवल्यास ..त्यांच्या कविता अधिक सकस होण्यास नक्कीच मदत होईल.
सहभागी कवी आणि कवियत्री यांची संख्या लक्षणीय आहे ..त्यासाठी कविता संख्या - असे नियोजन आहे .सर्वच कवी -मित्रांच्या कवितांचा इथे सविस्तर उल्लेख करणे सहज्तेचे नाहीये .
मला भावलेल्या काही कविता अंश देतो आहे ..त्यावरून संगर्हतील कवितांचे आशय-स्वरूप याची कल्पना येऊ शकेल.
१. फुलत्या कळीन न खुडणे
पाळावया हे बंधन आहे
क्रांतीज्योती सावित्रीला ,
हेच खरे तेंव्हा वंदन आहे....(सावित्री....अनिल लांडगे , पृ.३ )..
२.
"निसर्गाचे अनेक अविष्कार आहेत
त्यातील एक अनमोल अनुभूती,कलाकृती
म्हणजे पौर्णिमेच्या रात्रीचे सुरेख आकाश ......(पौर्णिमेच्या रात्रीचे आकाश -सौ.अनिता सास्तूरकर ,पृ.८ ),
३- आई असे प्रथम गुरु
तिचे बोट पहिली काठी
तिच्या स्पर्शाने आयुष्य सुरु
प्रत्येक जन्म अपुरा आईच्या सेवेसाठी ...(आई ...संजय पाटील , पृ..२१ )
४."वीज नभातून आज गर्जते
आकाशाचे गूढ गाणे
अमृत होवुनी अवनीवरती
बरसतात नवे तराणे ...(अमृतधारा ..विवेकानंद पोटे, पृ..२२ ),
५."थोरामोठ्यांना नमस्कार
ह्यांच्या हिशेबात नाही बसत
वृद्धाश्रमात त्यांची अडमिशन
करतात मात्र हसत हसत .....(बदल - अशोक कुमावत , पृ- २७ )
६. तुझ असणं नसणं
मजसोबत जोडलेल आहे
कारण तू आणि मी
आता एकच आहे ....(अस्तित्व ..प्रकाश साळवी , पृ- २८ ),
७. तुझ्यामुळेच आई
जगाला माझी जाणीव आहे
रोज मात्र जगतांना
सतत तुझी उणीव आहे ...( आईची माया - सुनील खंडेलवाल , पृ-४५ )
८. "कारण मी विसरते नेहमीच
तू आहेस क्षितीजपल्याड
अन मी तुझ्या आठवा सोबत
एकटीच क्षितिजाअल्याड...(क्षितिजा पल्ल्याड,- राणी कदम , पृ.६३),
९. दर्द जीवाला तूच दिला, साह्ण्याचे बल तूच दिले
दु:खः जरी खोल दरी , पंखी उरी बळ तूच दिले ...(मन माझे तुझ्या स्मरणात ..निसर्ग विश्व , पृ.६६),
१०." मनातल्या मनातही
वसे शब्दांचेच गाव
जसे कोरून राहते
तुझे हृदयात नाव ..( काही शब्द साधे सोपे - ऋचाकर्वे , पृ- ७२ ,)
११. विनंती माझी सर्व मातांना , आठवा आपली आई व बाळपण
जाणून घ्या भावना लेकरांच्या व समजून घ्या त्यांचे कोवळेमन ...(कोवळे मन ..गीता विस्वास केदारे , पृ ७९),
आणि ...
या शिवाय काही कवींच्या कविता शीर्षकाचा आवर्जून उल्लेख करतो आहे.
१.-विवेकाचा आनंद जन्माला - मंजिरी पांढारकर , २. लेक वाचवा - सौ.अनघा पतके , ३. ओसाड - कमलेश शिंदे , ४.चामड्याची कुलपं - सुनंदा पाटील
५- वसंत ऋतूत - धनंजय पाटील ,
६ -राधा कृष्ण -प्रियांका कुलकर्णी , ७ -मन- सौ.अनुपमा जाधव ,
८ -पोलीस- कविता शिंदे , ९ -व्यसन - शैलजा वायझडे, ,१० नयनी नभ दाटला - सुनील बिराजदार
११ -आई - निवेदिता गवई, १२ -प्रयत्नांती परमेश्वर - सुनिता महाबळ.
१३ सोबत- सुरज ,१४ विचाररूपी सुंदर फुल -श्रद्धा जोशी.१५ क्षण गहिवरला - भालचंद्र बालटे. १६-पिता- मनीषा भुरके मोकाशी- मनस्वी कविता.
जेष्ठ कवी-संत -चित्रकार .श्री.वि.ग .सातपुते -तथा विगसा (अप्पा )-यांच्या भावकविता या संग्रहाचे आकर्षण आहेत ,,या सर्वांच्या सोबत माझ्या कविता आपल्या अभिप्रायार्थ देता आल्या याचा मला आनंद वाटतो.
शेवटी एक महत्वाचे -
या कवितेची समीक्षा व त्यावरची टीका " यांचे इथे प्रयोजन नाहीये ..पण याचा अर्थ असा नाहीये की. या निकषावर या संग्रहातील कविता पास होतील ", .. स्वतहा कवींनी त्या दृष्टीने विचार करावा
तूर्तास -सर्वांना लेखन शुभेच्छा.
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------
पुस्तक -परिचय लेख-
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२
------------------------------ ----------------
कविता आनंद देणारा प्रातिनिधिक कविता संग्रह -
"काव्यानंद "
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ----------------
प्रकाशक - सुनील खंडेलवाल
काव्यानंद प्रतिष्ठान -पुणे
संपर्क - ८८०५०११९७४
मूल्य-रु.१२५/- पृ- ९८
------------------------------ ------------------------------ ------------------
