Thursday, December 22, 2016

पुस्तक परिचय लेख- काव्यानंद "काव्यसंग्रह.

पुस्तक -परिचय लेख-
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
----------------------------------------------
कविता आनंद देणारा प्रातिनिधिक कविता संग्रह -
"काव्यानंद "
-------------------------------------------------------------------------------
रसिक हो नमस्कार ,
कवितेची आवड असणारे रसिक वाचक आणि कविता लेखनाची आवड असणारे कवी .यांच्या भेटीचा आनंदयोग जुळून आलाय तो  फेसबुकवरील सर्वपरिचित समूह "काव्यानंद प्रतिष्ठान "यांच्या प्रातिनिधिक कविता संग्रहाच्या उपक्रमामुळे .समूह - संचालक श्री .सुनील खंडेलवाल आणि त्यांचे सहकारी .यांचा कविता-विषयक जिव्हाळा "काव्यानंद   संग्रहामुळे पुस्तकरूपाने सिद्ध झालेला आहे.याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन.
यातील सहभागी कवी इंटरनेट व फेसबुक या माध्यमातून आपापल्या कविता-लेखनाने वाचाकंना परिचित झालेले आहेतच त्यांच्या कविता हाच त्यांचा परिचय आणि त्यांची ओळख आहे असे म्हणूयात.

कविता हणजे मनाची अभिव्यक्ती असते..कवी एक माणूस म्हणून आणि एक व्यक्ती  म्हणून समाजात वावरतांना अनेक जीवनानुभव घेत असतो  त्याचे संवेदनशील कविमन  कवितेतून व्यक्त होत असते .जीवन -अनुभवणे  किती वेगवेगळ्या पातळीवरचे असते ".हे कवीची कविता सांगत असते ."
याची प्रचीती या संग्रहातील कविता नक्कीच देतात.

काव्यानंद - संग्रहात  अनेक कविमित्र आपल्या कवितेतून व्यक्त झालेले आहेत "एका अर्थाने .हे"कवितेचे प्रतिनिधी आहेत ",अनेक भाव-भावनांच्या कविता यात  वाचावयास  मिळतात .सामाजिक  वैचारिक ,प्रेम- वात्सल्य या भावना,   ,निसर्ग  आणि माणूस "यांच्यातील नाते " अशा विविध विषयावरील कविता आहेत."याशिवाय "आई" हा सर्वप्रिय  विषयावर देखील कविता संग्रहातील कवींनी केल्या  आहेत .

कवी आशावादी असतो असे म्हणतात .कारण जीवनातील श्रेयस त्याला अपेक्षित असते ..अशा "आशावादी कविता "या संग्रहात आहेत.त्यामुळे .निराशेचा तीव्र असा सूर "या कवितेत आहे असे फारसे जाणवत नाही.
सहभागी कवींच्या सर्वच कविता मी मनापसून वाचल्या ..आणि जाणवले .हे मित्र उत्तम लेख्न-क्षमता असलेले कवी आहेत,हा संग्रह म्हणजे  त्यांच्या कवितेचा आणि प्रतिभेचा आरंभिक -अविष्कार आहे..म्हणूनच ..अधिक सराव आणि अभ्यासाने त्यांनी जाणीवेने कवितेने लेखन चालू ठेवल्यास ..त्यांच्या कविता अधिक सकस होण्यास नक्कीच मदत होईल.

सहभागी कवी आणि कवियत्री यांची संख्या लक्षणीय आहे ..त्यासाठी कविता संख्या - असे नियोजन आहे .सर्वच कवी -मित्रांच्या कवितांचा इथे सविस्तर उल्लेख करणे सहज्तेचे नाहीये .
मला भावलेल्या काही कविता अंश देतो आहे ..त्यावरून संगर्हतील कवितांचे आशय-स्वरूप याची कल्पना येऊ शकेल.

१. फुलत्या कळीन न खुडणे 
    पाळावया हे बंधन आहे 
क्रांतीज्योती सावित्रीला ,
हेच खरे तेंव्हा वंदन आहे....(सावित्री....अनिल लांडगे , पृ.३ )..
२.
 "निसर्गाचे अनेक अविष्कार आहेत
त्यातील एक अनमोल अनुभूती,कलाकृती
म्हणजे पौर्णिमेच्या रात्रीचे सुरेख आकाश ......(पौर्णिमेच्या रात्रीचे आकाश -सौ.अनिता सास्तूरकर ,पृ.८ ),
३- आई असे प्रथम गुरु
    तिचे बोट पहिली काठी 
    तिच्या स्पर्शाने आयुष्य सुरु
    प्रत्येक जन्म अपुरा आईच्या सेवेसाठी ...(आई ...संजय पाटील , पृ..२१ )

४."वीज नभातून आज गर्जते 
आकाशाचे गूढ गाणे 
 अमृत होवुनी अवनीवरती 
  बरसतात नवे तराणे ...(अमृतधारा ..विवेकानंद पोटे, पृ..२२ ),
५."थोरामोठ्यांना नमस्कार
    ह्यांच्या हिशेबात नाही बसत 
    वृद्धाश्रमात त्यांची अडमिशन
    करतात मात्र हसत हसत .....(बदल - अशोक कुमावत , पृ- २७ )
६. तुझ असणं नसणं 
    मजसोबत जोडलेल आहे
    कारण तू आणि मी 
    आता एकच आहे ....(अस्तित्व ..प्रकाश साळवी , पृ- २८ ),
७. तुझ्यामुळेच आई
    जगाला माझी जाणीव आहे
    रोज मात्र जगतांना 
    सतत तुझी उणीव आहे ...( आईची माया - सुनील  खंडेलवाल , पृ-४५ )
८. "कारण मी विसरते नेहमीच 
     तू आहेस क्षितीजपल्याड 
      अन मी तुझ्या आठवा सोबत 
       एकटीच क्षितिजाअल्याड...(क्षितिजा पल्ल्याड,- राणी कदम , पृ.६३),

९.  दर्द जीवाला तूच दिला, साह्ण्याचे बल तूच दिले
     दु:खः जरी खोल दरी , पंखी उरी बळ तूच दिले ...(मन माझे तुझ्या स्मरणात ..निसर्ग विश्व , पृ.६६),

१०." मनातल्या मनातही 
      वसे शब्दांचेच गाव
      जसे कोरून राहते 
      तुझे हृदयात नाव ..( काही शब्द साधे सोपे -  ऋचाकर्वे , पृ- ७२ ,)

११. विनंती माझी सर्व मातांना , आठवा आपली आई व बाळपण
      जाणून घ्या भावना लेकरांच्या व समजून घ्या त्यांचे कोवळेमन ...(कोवळे मन ..गीता विस्वास केदारे , पृ ७९),

आणि ...
या शिवाय काही कवींच्या कविता शीर्षकाचा आवर्जून उल्लेख करतो आहे.
१.-विवेकाचा आनंद जन्माला - मंजिरी पांढारकर , २. लेक वाचवा - सौ.अनघा पतके ,  ३. ओसाड - कमलेश शिंदे , ४.चामड्याची कुलपं - सुनंदा पाटील 
५- वसंत ऋतूत - धनंजय पाटील ,
६ -राधा कृष्ण -प्रियांका कुलकर्णी  , ७ -मन- सौ.अनुपमा जाधव ,
८ -पोलीस- कविता शिंदे , ९  -व्यसन - शैलजा वायझडे, ,१० नयनी नभ दाटला - सुनील बिराजदार 
११ -आई - निवेदिता गवई, १२ -प्रयत्नांती परमेश्वर - सुनिता महाबळ.
१३ सोबत- सुरज ,१४  विचाररूपी सुंदर फुल -श्रद्धा जोशी.१५  क्षण गहिवरला - भालचंद्र बालटे. १६-पिता- मनीषा भुरके मोकाशी- मनस्वी कविता.

जेष्ठ कवी-संत -चित्रकार .श्री.वि.ग .सातपुते -तथा विगसा (अप्पा )-यांच्या भावकविता या संग्रहाचे आकर्षण आहेत ,,या सर्वांच्या सोबत माझ्या कविता आपल्या अभिप्रायार्थ देता आल्या याचा मला आनंद वाटतो.
शेवटी एक महत्वाचे - 
 या कवितेची समीक्षा व त्यावरची टीका " यांचे  इथे प्रयोजन नाहीये ..पण याचा अर्थ असा नाहीये की. या निकषावर या संग्रहातील कविता पास होतील ", .. स्वतहा कवींनी त्या दृष्टीने विचार करावा 
तूर्तास -सर्वांना लेखन शुभेच्छा.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक -परिचय लेख-
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२ 
----------------------------------------------
कविता आनंद देणारा प्रातिनिधिक कविता संग्रह -
"काव्यानंद "
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रकाशक - सुनील खंडेलवाल 
काव्यानंद प्रतिष्ठान -पुणे 
संपर्क - ८८०५०११९७४ 
मूल्य-रु.१२५/- पृ- ९८ 
------------------------------------------------------------------------------

Thursday, December 1, 2016

पुस्तक-परिचय - "हास्यगाथा "

पुस्तक परिचय - "
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
-------------------------------------------------------------------------
हास्यगाथा "- बहारदार विनोदी लेखन .
---------------------------------------------------------------------------
विनोदी -- लेखनाची उत्तम भट्टी जमली आहे  ",याची दणकेबाज प्रचीती आपल्या हास्यरसायन "या पुस्तकातून देणारे लेखक म्हणून शीलवंत वाढवे प्रसिद्ध आहेतच ,
.तसे पाहीलेतर  - .हास्यरसायन "या त्यांच्या" पहिल्याच कथा संग्रहाला -राज्य शासनाचा -  २००९-१० चा "दत्तू बांदेकर -हा विनोदी लेखनासाठीचा राज्य पुरस्कार" -प्राप्त झाला आहे.

अशा या लेखकाचे विनोदी लेखनाचे दुसरे पुस्तक "हास्यगाथा " नुकतेच प्रकाशित झाले आहे 
सहाजिकच प्रस्तुतच्या लेखनातून हमखास विनोदी शैलीतले लेखनवाचण्यास  मिळणार",  या अपेक्षेने वाचक हे पुस्तक हातात घेणार ..मग, .त्यांच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करणारे असे हे बहारदार विनोदी लेखन आहे" हे अगोदरच सांगावेसे वाटते.

"हास्यगाथा "- या विनोदी कथा संग्रहाच्या निमित्ताने वाचकांचे दोन फायदे झाले आहेत ते असे..
१.छान ,हलक्या-फुलक्या आणि मिस्कील विनोदी कथा वाचावयास मिळणार  हे तर आहेच , त्या सोबत ,भारदस्त असा -शब्द-बोनस मिळालाय .
२.डॉ. श्रीपाल सबनीस सर यांची प्रस्तावना  आणि जेष्ठ लेखक श्री.बाबाराव मुसळे यांचा अभिप्राय ,या स्वरूपात .
या दोन गोष्टी मुळे एक महत्वाचा फायदा असा झालाय  की..हास्यागाथा "मधील विनोदी लेखनाकडे बघण्याचा एक वेगळा  दृष्टीकोन वाचकास लाभतो आणि या लेखनास अधिक न्याय मिळतो "हे खूप महत्वाचे आहे असे सांगावेसे वाटते.असो.

प्रस्तुतच्या संग्रहात एकूण १२ कथा आहेत .यातील कथा आहेत "असे वाटणारे जसे काही लेख आहेत .तसेच काही लेख -कथा असल्याचा भास नक्कीच होईल.विनोद निर्मिती "हेच या लेखनाचे प्रयोजन आहे ..मग त्यासाठी जे रसायन लागते ..तो सगळा कच्चा माल " आणि त्यासाठी जमवावी लागणारी भट्टी " ही कुशलता लेखकास चांगलीच अवगत झालेली आहे. अशा प्रकारच्या लेखनास आवश्यक असलेली लवचिक शब्द्शैली ..लेखकास लाभलेली आहेच . .त्याचा पुरेपूर असा सफाईदार वापर या लेखनात केलेला आहे .
वर्तमानातील वास्तव ..आणि त्यातले त्याचे संदर्भ यांचा विनोद निर्मितीसाठी वापर करून घेता येणे "हे तसे सोपे काम नाही .कारण त्यातील अर्थ-निर्मिती विनोदास पूरक ठरवण्यासाठी  त्यातील विसंगती अचूकपणाने  टिपता येणे " हे नेमकेपणाने साधता आले तरच त्यातून  अपेक्षित विनोद निर्माण होईल अन्यथा हास्य-निर्मितीचा प्रयत्नच "हास्यास्पद "ठरण्याचा मोठा धोका लेखकाच्या समोर असतो .आपल्या लेखनाचे असे काही होणार नाहीये"  याचे अवधान जपणे  "या हास्यागाथा " चे लेखक शीलवंत वाढवे यांना छान जमले आहे .

ग्रामीण -जीवनाचा अनुभव घेत जगणारा हा लेखक आपल्या लेखनातून "नागरी जीवनमानाचे चित्रण करतांना .त्याच शब्दांचा वापर .विनोद निर्मितीसाठी करतो .त्यामुळे या लेखनातून एकाचवेळी ग्रामीण व नागरी अशा दोन्ही जीवनाचे जे चित्रण घडते .ते लेखकाच्या बहुश्रुत व्यक्तिमत्वाचे दर्शन आहे. तसे पाहिले तर .आपल्या दैनंदिन व्यवहारात   जेजे शब्द सर्रास आणि सहजतेने बोलले जातात त्याचाच वापर या लेखनात आहे..यातील व्यक्तिरेखा तीच भाषा बोलतात जी नेहमी आपल्या कानावर पडते . म्हणजेच असेही म्हणता येईल की ..बोलण्याच्या भाषेतून .शब्दातून लेखकाने विनोद निर्मिती केली आहे .
प्रसंगनिष्ठ विनोद , व्यक्तीनिष्ठ विनोद हे तर या लेखनाचे वैशिष्ट्य आहेच त्यापेक्षा या लेखकाची निवेदनशैली जास्त प्रभावी आहे ..याचे कारण हे  लेखक एक कलाकार आहेत , सादरीकरण कसे करायचे असते याची त्यांना उत्तम जाण आहे ..त्यामुळे त्यांच्या कथा ते वाचकासमोर जणू सादर करतात "असे वाटावे अशी सांगण्याची त्यांची पद्धत आहे.खुलवूनसांगणे,  ते अधिक रंजक -स्वरूपात सादर करणे .याचा मोठाच लाभ या संगर्हातील लेखनास झाला आहे.

या लेखनात उपहास आहे ,उपरोध आहे ..बोचरा उपदेश आहे ..चांगले तेच अधिक चांगले कसे आहे ",हे पटवून देण्यासाठी "वाईट गोष्टीला ठळक दाखवून " जनमानसात त्याचा कसा प्रभाव असतो" हे अनेक कथातून लेखक सांगतो.सामजिक कार्य ,सार्वजनिक जीवनातील घटना  या बरोबरच एक व्यक्ती म्हणून या सर्वांचा त्यातील वर्तन-सहभाग ..याचे खुमासदार शब्दरूप म्हणजे हे कथा -लेखन असे म्हणता येईल.
यातील कथानायक .स्वतहाचे स्वतंत्र असे जीवनविषय तत्वज्ञान अनेकवेळा सांगतो ..त्यातून इष्ट-अनिष्ट  याचीच नेमकी चर्चा उपरोधिक मनोगतातून व्यक्त केली जाते ."आत्मा-परीक्षण "असेही करता येते " याचा शोध रंजक आहे.

प्रस्तावनेत या संग्रहातील कथांचा सविस्तर परामर्श घेण्यात आलेलाच आहे",त्यावर इथे अधिक भर ती काय घालावी.
काही  कथांची शीर्षके -वानगीदाखल सांगतो-
१.निवडणूक (पृ.३१), २.तंटामुक्ती -(पृ-५७ ) ३- पासबुक, फेसबुक  आणि स्मार्ट माणूस -(पृ.१११ )
लेखक ग्रामीण भागातील प्रशालेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. या विषयावरील कथांमधून त्यांच्यातील लेखकास अधिक प्रभावीपणाने लेखन करता आलेले आहे हे जाणवते ..त्या कथा -अर्थातच उत्तम झाल्या आहेत.
१.पटपडताळणी - (पृ.१ ), आणि २.शाळा (पृ.३७)..यांचा उल्लेख करावा लागेल.
एकूणच हे लेखन विनोदी आहे हे तर खरेच ..त्याच बरोबर एका  चिंतनशील  व्यक्तीमत्वाने आजच्या विपरीत वर्तमानावर केलेले भाष्य आहे जे विचार करण्यास भाग पाडते.
अंतर्मुख करण्याचे विलाक्ष्ण असे सामर्थ्य विनोदी लेखनात असते" याची प्रचीती "हास्यागाथा " मधून नक्कीच येते.
लेखक शीलवंत वाढवे यांना आपणा सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक परिचय -
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२ 
-------------------------------------------------------------------------------------------------------------
हास्यगाथा 
(विनोदी कथा संग्रह )
शीलवंत वाढवे 
मो-७३५०८४८१२२ 
पृ.१२४ ,मूल्य- रु.१४०/-
प्रकाशक -
आत्मभान प्रकाशन -औरंगाबाद ,
मो-९४२२८६३६६५ 
-----------------------------------------------------------------------------------

Friday, October 21, 2016

लेख- पुस्तक-परिचय - "उत्तरा - (कविता संग्रह )



ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
-----------------------------------------------------------------------
-उत्तरा "(कविता संग्रह)
------------------------------------------------------------------
सोलापूरचे श्री.रमेश कलशेट्टी एक सर्वपरिचित व्यक्तिमत्व आहे.प्रभावी व्यक्तिमत्वाचा हा कवी - बहुभाषी आहे ",
कन्नड , तेलगु आणि मराठी "या तीनही भाषेतून त्यांचा सहज-संवाद चालू असतो.इंटरनेट आणि फेसबुकच्या माध्यमातून "आपल्या सातत्यपूर्ण लेखनाने लक्षवेधी कविता रचना करणारे कवी " असाही "रमेश कलशेट्टी यांचा परिचय करून देता येईल.
या अगोदर त्यांचे ..१. सहज , २.आभास हा ..असे दोन चारोळी संग्रह संग्रह प्रकाशित झालेले आहेत ,यावरून या कवीचा कविता प्रवास मोठ्या नेटाने चालू आहे हे लक्षात येते.चारोळी लेखन हा या कवीचा नित्य लेखनाचा लेखन प्रकार असला तरी..कविता लेखन उर्मी "कशी स्वस्थ बसू देत नाही ? त्यांच्या कवितेचा अविष्कार आपल्याला घडतो आहे तो ..त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या "उत्तरा " या कविता संग्रहातून.
या कविता-लेखनाला एक "लेखन-सूत्र आहे" ते कवीने त्याच्याच मनोगतातून व्यक्त करतांना म्हटले आहे की-
"उत्तरा " हे माझे एक स्वप्न होते. जे स्त्रीच्या प्रत्येक गुणाला दर्शविते. या कविता संग्रहाच्या माध्यमातून मी स्त्रीचे प्रत्येक रूप माझ्या अनुभवातून मांडण्याचे प्रयत्न केले आहे ."
प्रस्तुत संग्रह्तील कविता याच लेखन-सूत्राभोवती - विषय--सुत्राभोवती आहेत" हे संग्रह वाचतांना नक्कीच जाणवते .
उत्तर " या संग्रहात ५३ कविता आहेत .आणि यातील बहुतेक कविता विस्ताराने मोठ्या रचना आहेत ..आटोपशीर कविता असत्या तर अधिक प्रभावी असा हा कविता संग्रह झाला असता' "असे माझे जरी मत असले तरी ते कसे बरोबर नाही हे " संग्रहातील कविता वाचून नक्कीच कळून येते . या कविता कवीच्या वैचारिक चिंतनातून आलेल्या आहेत ..कदाचित त्यामुळे ..थोडक्यात व्यक्त होणे "हे या कवितेला मुळीच शोभणारे नाहीये " हे मात्र नक्की .
संग्रहातील अंतिम रचना "लिहिणे माझे "(पृ.६० ) .या कवितेत कवीच्या व्यक्त होण्याची अपरीयार्हता आहे , मनातली तळमळ आहे ..ते कसे ..बघा -
सोडून दिलेले असते मी लिहिणे
पण अशा काही घटना घडतात
अपमानित होऊन ही कर्तव्यपूर्तीसाठी
लेखणी धरयला पुन्हा हात शिवशिवतात ....(लिहिणे माझे ..)
हे असे होण्याचे कारण .कवीच सांगतो आहे ते "असाच मी " या कवितेतून (पृ..५९ )..
"जे आहे ते
तोंडावर बोलणारा
मरणाच्या भीतीने
सत्याची कास न सोडणारा ...
मनाची अशी निर्भीड होऊन सांगण्याची तयारी आहे म्हणूनच ही कविता सडेतोड शब्दात व्यक्त होते ..आडून आडून किंवा सूचकता " असा सोपा मार्ग या कवितेला भावत नाही "असेच म्हणता येईल.
"निर्भया "..(पृ..९ )..
मेणबत्ती विझेपर्यंत
आम्हा खूप राग असतो
फोटो काढून झाले अन
आम्ही आपले कर्तव्य संपले समजतो ...
देशाला हादरवून सोडणाऱ्या "निर्भया " आणि "अरुणा " या दोन दुखःद घटनांवर दोन -दोन रचना आहेत ."अरुणा ", आणि "निराधार . "अतिशय नेमकेपणाने कवी "या कवितेतून व्यक्त झालेला आहे.
उदा -काय लिहू ? ( (पृ.१० )
"सांग ना मुली काय लिहू ?
तुझ्या भविष्यावर
की न्यायाच्या प्रतीक्षेत
असलेल्या निर्भायावर ?
"स्त्री आणि तिचा पदर " दोन्ही बाहेर वावरतांना काय काय अनुभवत असतात "याचे अस्वथ करणारे चित्रण "पदर" या कवितेत आहे.
"आज ही तू नारी बंदिस्त आहेस
वावरते खुलेआम इथे फक्त नावाला
तुझे तुलाच माहित रोज किती टोचतात
वासनेने बरबटलेल्या नजरा या देःआला ...(पदर ..पृ..३४ ).
दुनिया (पृ..२५ ) ही कविता .संग्रहाच्या मलपृष्ठावर सुद्धा आहे .या कवितेचे हे दुहेरी प्रयोजन या साठीचे असावे की -
कवीचा एक माणूस म्हणून हर प्रहरी संबंध येतो आहे तो याच दुनियेशी .आणि या कवीला कवीला आलेले जीवनानुभव "चांगले नाहीत , मग कवीमनाची झालेली उद्विग्नता" या कवितेत व्यक्त होते ती अशी...
"माणुसकी हे इथे
भ्रम आहे प्रत्येकाचे
या पापी दुनियेत आता
जगायचे आहे कुणाला ..." (दुनिया )
मनाची अशी उध्वस्त अवस्था होणे "म्हणजे जगणे असह्य होऊन जाणे " ,पण म्हणून काही या दुनियेत आपले जगणेच सोडून देणे सोपे असते का ?, नाही ,- मुळीच नाही कारण .भावनिक जगणे सुद्धा माणसांची एक गरज असते ,त्यातून सहवासाने जुळून आलेले ऋणानुबंध .."हा ताण हलका करणारे असतात ..त्या भावनांची अशी कविता होते...
"कळत नाही कधी कधी
अशी काही नाती जुळतात
त्यांच्यातले ऋणानुबंध
निभावणाऱ्यानाच समजतात ...(ऋणानुबंध ..पृ..१३)
स्त्री आणि नारी " आपल्या संस्कृतीतले महत्वाचा घटक.पण, या तिच्या वाट्याला "भीषण असा वर्तमान आलेला आहे..तिच्या अवस्थेवर नेमकेपणाने बोलणारी ही कविता ..
"भरल्या बांगड्या बेदीच्या रुपात
पदराला दिले संस्काराचे नाव
उंबरा म्हणे लक्ष्मणरेषा यांची
त्या चौकटीतली तू एक सुवासिनी ...(नारी ..पृ..२८)
कवी रमेश कलशेट्टी यांच्या "उत्तरा " संग्रहातील कविता फक्त अशाच एक विषयाला स्पर्श करणारी आहे असे नाही ,तर,समाजिक समस्या आणि उद्भवलेले ज्वलंत प्रश्न यावरच्या कविता आहेत.स्त्रीचे "आई" हे रूप कवीच्या कवितेत असतेच .अशा दोन कविता ..१."अशीच असते आई ..(पृ.५४ ), आणि "आई ..(पृ..५७) याही संग्रहात आहेत .."या दोन्ही कविता छानच आहेत हे वेगळे सांगणे न लगे ".
रुक्ष आणि व्यवहारी दुनिया ..कवीला भेटली-दिसली हे असले तरी .."प्रेम ही अशी भावना आहे की जिचा स्पर्श मनाला झाल्यावर जादूच होऊन जाते ..आणि मग .हा कवी "प्रेमाची दुनिया .. "सारखी कविता हा कवी सहजपणे लिहून जातो.संग्रहातील
प्रेम-कवितांची शीर्षके .."प्रेमाच्या दुनियेत ","मिलन ", "तुला वटते ना ...", "राणी ""आठवांचा पाऊस "ई....!
जीवनातील कडू-गोड अनुभव ", स्वतहाचे मन आणि समाज मन यातील संघर्ष ,समाजाप्रती आपली बांधलकी असतेच असते " ही भावना "आणि हे विचार कवीला कविता लेखनास प्रेरणा देतात ..कवी रमेश कलशेट्टी यांच्या दोन चारोळी संग्रहां नंतर आलेला त्यांचा हा कविता संग्रह "उत्तरा "" त्यांच्या काव्यलेखनाच्या स्वप्नापुर्तीचा आरंभ आहे" असे म्हणू या . कारण त्यांनी मनोगतात म्हटले आहे की - "उत्तरा " हे माझे एक स्वप्न होते ", " हे असे न होता यापुढे ही या कवीला अशीच कविता-स्वप्नं पडत रहावीत ..आणि त्यांची कविता नित्यनेमाने आपल्या भेटीस येत राहावी "अशा शुभेच्छा देतो.
सुप्रसिद्ध चित्रकार -खालील खान यांनी चितारलेले सुरेख मुखपृष्ठ -उत्तरा "संग्रहास लाभले आहे.
नंदिनी तांबोळी , आणि नंदिनी पब्लिशिंग हाउस पुणे .यांनी हा सुरेख कविता संग्रह प्रकाशित केल्याबद्दल त्यांना धन्यवाद.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय -
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- ९८५०१७७३४२
--------------------------------------------------------------------------------
"उत्तरा "- कविता संग्रह "
कवी - रमेश कलशेट्टी
संपर्क -9823430971
----------------------------------------------------------------
उत्तरा "- कविता संग्रह "
पृ.६० , मुल्य- रु.६०/-
प्रकाशक -नंदिनी संतोष तांबोळी ,
नंदिनी पब्लिशिंग हाउस
सिंहगड रोड- पुणे -५१
संपर्क- ९४२२०३७७१४

Monday, August 22, 2016

माझा नवा पुस्तक-परिचय लेख- कविता संग्रह- जीवन खरचं सुंदर आहे



परीक्षण...पुस्तक -परिचय -
-अरुण.वि.देशपांडे -पुणे
संपर्क -९८५०१७७३४२
जीवन खरंच सुंदर आहे. (कविता संग्रह)
(कवी धनंजय शंकर पाटील.)
इंटरनेट आणि फेसबुकवर साहित्य लेखन करणाऱ्या लेखक -कवी मध्ये..सातत्याने विविध स्वरूपाचे लेखन करणारे -लेखक-कवी-चारोळीकार -धनंजय शंकर पाटील- मंगळवेढा , हे नाव वाचकांच्या चांगलेच परिचयाचे झाले आहे.
जानेवारी -२०१६ -म्हणजे या वर्षाच्या आरंभीच त्यंची एक नव्हे तर तीन पुस्तके प्रकाशित झालीत.
१." जीवन खरचं सुंदर आहे'- कविता संग्रह.
२.हृदयी वसंत फुलाला - चारोळी संग्रह
३.ती पुन्हा भेटली - कथा संग्रह
या पैकी - जीवन खरचं सुंदर आहे " या कविता संग्रहाचा परिचय करून देतो आहे.
इंटरनेट आणि फेसबुकवरील प्रकाशित साहित्याला वाचकांचा त्वरित प्रतिसाद लाभत असतो आणि यामुळे लेखक-कवींना लेखनास प्रोत्साहन मिळत असते..हे पाहूनच आपले साहित्य पुस्तक-रुपात प्रकाशित करावे असे साहित्यिकास वाटणे ' यात वावगे असे काहीच नाही.अशीच भावना कवी-लेखक धनंजय शंकर पाटील यांची आहे. जीवन खरचं सुंदर आहे "..त्यांचा हा पहिलाच कविता संग्रह
.....,या संग्रहातील कवितेचे स्वागत करतांना एक गोष्ट सुचवावीशी वाटते ..ती म्हणजे ..हा संग्रह --
"कवितेच्या शोधात निघालेल्या एक नवख्या कवीचा आहे ." .हे आपण वाचकांनी लक्षात घेऊन कवीच्या कवितांचे आस्वादन केले तर कवीच्या .पुढील लेखनास लेखन बळ देण्यासारखे प्रेरक कार्य होईल.
धनंजय पाटील हे लेखन करू शकतात हे त्यांच्या संग्रहातील कविता वाचून जाणवते. प्रस्तुत संग्रहातील कविता ..वाचून पहिली गोष्ट जाणवू लागते ती म्हणजे ..या कवीला जे दिसते ,, जे जाणवते त्यावर व्यक्त होण्याची त्याला एक प्रकारची असोशी आहे , अधीरता आहे.. यामागची त्यांची तळमळ आणि यामागची भावना निखळ आणि प्रामाणिक आहेत ,याविषयी दुमत असण्याचे कारण नाही.
"जीवन खरचं सुंदर आहे " कविता संग्रहात एकूण ५७ कविता आहेत.
मनोगतात कवी म्हणतो आहे की- "शब्द जणू जीवनच झाले ,शब्दांशी घट्ट मैत्रीचे नाते जमले ..यातूनच अनेक विषयावर काव्य निर्मिती झाली ", हे अगदी खरे आहे.. कारण.. या संग्रहात - प्रेम विषयक अनेक कविता आहेत ,तसेच सामाजिक संदेश, माणसाच्या मनात असलेल्या विविध भावना ,आजच्या वर्तमानावर व्यक्त होणारी कविता ..अशा विविध कविता धनजंय पाटील यांनी लिहिल्या आहेत.
या संग्रहातील अनेक कवितांमधून कवी-धनंजय पाटील अतिशय भावनिक होऊन व्यक्त होतात ,त्यांच्या कवितेचे हे सुरेख लक्षण आणि वैशिट्य आहे.या संग्रहातील -
मला आवडलेल्या काही कवितांचा उल्लेख जरूर करू इच्छितो...
१.मनातल्या आठवणींचा हा लपंडाव सारा ,
वाहतात कधी-कधी अश्रूंच्या धारा .
चित्त नाही थाऱ्यावर ,
मनात फक्त आठवणींचेच घर . ...(मनातल्या आठवणी ..पृ.६ )
२.शब्द ओठावरी येतात ,
मनातली भावना ,
सांगुनि जातात .
सुख , दु:ख्हांचे चक्र सारे
जीवनात वाहतात कधी-कधी ,
तुफानी वारे ........(मनातले काही .पृ.१४ )
३. आज आहे पैसा , घरदार ,
पर आई तुझ्या नसण्याने ,
मनाला वाटतो अंध:कार .....(आठवण मायेची ..पृ.२६ )
४. एकटे हे मन कधी रमून गेले ,
या कवितांच्या दुनियेत .
ते कधी कळलेच नाही ,
आता ध्यानी, मनी कविता आणि कविता .(पृ.२९ )
५. वाढल्या वाड्या अन वस्ती ,
वाटते मज घरटे बांधण्याची धास्ती
वृक्षतोड अमाप ही वाढली
जणू जगण्याची व्यवस्थाच मोडली ...(संघर्ष जगण्याचा ..(चिऊताई ) .( .पृ.५६ )
६. कर सामना ,संघर्षमय जीवनाचा ,
तोल ढळू देऊ नको मनाचा .
खडतर प्रवासात या अपयशी मार्गाच्या ,
सूर गवसेल तुला जीवनाचा ...(जीवन संघर्ष ..(पृ.६४ ),
कवी धनंजय पाटील यांच्या कविता लेखनाची झलक ..त्यांची आशावादी कविता --या पुढील लेखन प्रवासात अधिक जोमाने आपली वाटचाल करणारी असेल ..हे नक्की. धनंजय शंकर पाटील हे नुसते कवीच नाहीत तर ते कथाकार देखील आहेत ..साहित्यिक म्हणून त्यांची कामगिरी अधिकाधिक बहरत जावो अशा लेखन-शुभेच्छा त्यांना देतो.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक -परिचय -
-अरुण.वि.देशपांडे -पुणे
संपर्क -९८५०१७७३४२
-----------------------------------------
कविता -संग्रह -
जीवन खरचं सुंदर आहे
पृ.६४ , मूल्य-रु.६० /-
कवी - धनंजय शंकर पाटील
मंगळवेढा, जि-.सोलापूर
संपर्क -८३८०९१६१५५
----------------------------------------------------
प्रकाशक -
विजय बुक सर्व्हिसेस -
सुशीलनगर , विजापूर रोड -
सोलापूर .
संपर्क- ९०२१७२७३३२
------------------------------------------------------------------------

Monday, July 4, 2016

पुस्तक-परिचय लेख- कविता-संग्रह "आशय ".

पुस्तक- परिचय -  लेख -
आशय-संपन्न  कवितांचा संग्रह - " आशय ...!
-अरुण वि.देशपांडे 
------------------------------------------------------
कवितेच्या वाचकांना कवी- बाबू फिलीप डिसोजा - हे नाव गेली अनेक वर्षापासून परिचित आहे. मराठी कवितेत या कवीचे सातत्याने कविता-लेखन योगदान चालू आहे. "शब्द्झुला (१९१२ ), आवर्त -(२०१३ ) या  दोन संग्रहां नंतर प्रस्तुतचा  "आशय " हा संग्रह या कवीचा तिसरा कविता संग्रह आहे. 

ग्रामीण परिसरातील वास्तव्य तसेच नागरी आणि शहरी -जीवनमानाचा अनुभव ..या दोन्ही जीवन-अनुभवाचे सुरेख प्रतिबिंब कवीच्या रचनेतूनया संग्रहात उमटलेले आहे.
जानेवारी -२०१६ मध्ये  प्रकाशित झालेल्या आशय "  या संग्रहातील बहुतेक कविता - अगदी अलीकडच्या म्हणे २०१४-१५ या कालावधीतील आहेत .या दरम्यान नोकरी निमित्ताने कवीचे  वास्तव्य - निसर्गरम्य  ग्रामीण परिसरात होते ,याचा प्रभाव या दरम्यानच्या कविता लेखनावर आहे " .असे कवींने आपल्या  मनोगतात व्यक्त केले आहे.

१२५ पृष्ठांच्या या संग्रहात  एकूण -११५ कविता आहेत. "निसर्ग , अध्यात्म ,आणि  सामाजिक -चिंतनशील "अशा या कविता आहेत. याच क्रमाने संग्रहातील काही कवितांचा आस्वाद घेऊ या ..
कवीने - आपल्या कवितेतून निसर्ग व त्याच्या विविध छटा चितारल्या आहेत , कवी -मनास  या निसर्गाचे अप्रूप असणे साजेसेच आहे. संग्रहातील सुरुवातीच्या कविता ..निसर्ग-कविता " आहेत..यात पावसाच्या - कवितांची "हवीहवीशी बरसात आहेच "..कवितांची शीर्षके लक्षवेधी अशी आहेत.." सृजनसाद (१४) ," वर्षामेघ  (१५) , प्रतीक्षा पावसाची (२७) ", किमया (२९)" , " माती -(३०)  ", झुंजार कोकण (३२ )" ,गाव स्वप्नाचे -(३४ ) पाऊस आला आला -(३६), दूषण -(४३ ), खेडे (५८) " .वगरे ....!.
पाऊस-पडतांना बघणे "हे सुद्धा "एक पहाणे असते ..मुसळधार पाऊस- धुवाधार पाऊस, रिमझिम बरसणारा पाऊस.असा हा पाऊस आणि पाउससरी..यांच्या अनेक मोहक -कविता -"प्रारंभी  वाचावयास मिळतात .
उदा- 
पाऊस उतरला आभाळातून
अलगद सरींच्या शिड्या लावून 
भेटावा धरेस जीवन घेऊन 
मन मोहवी इंद्रधनू त्यातून ..."  सर " (पृ-१८)

माती आणि माणसाचे नाते ..एक विलक्षण असा भावबंध -आहे ....
गावाकडल्या मातीची ओढ ..कशी असते ..तिच्या विषयीचा हा जिव्हाळा .."या कवितेत "..
ऊब मातीची 
ओढ मातीची 
साथ मातीची 
सोडवेना 
पत मातीची 
प्रत  मातीची 
गत मातीची 
उज्वेना ......(माती- पृ-३० ),

निसर्ग सहवासात राहण्याचा योग खरोखरीच भाग्यकारक असतो असे म्हणयला हवे..याचे महत्व आजच्या नागरी-जीवनात जगणाऱ्यांना नव्याने उमजेल .. पहाट-वेळ कशी असते.. त्याची ही सुरेख कविता --
" फांकली प्रभा - एक प्रसन्नपण 
आसमंतात चैतन्य संचारण
पशुपक्षी चराचरी अवघे जन 
प्रकाशास्तव करिती सदा याचन ..".. (उष:कालच्या कळ्या ..पृ-३१ )

निसर्ग -भूमी कोकण .या भूमीच्या  सुंदर  अशा निसर्गाचे वर्णन तर आपण खुपदा वाचतो .निसर्ग-वैभव दिले आंदण" इतकेच नाही ..या शिवाय . आणखी एक " कोकण -विशेष  " कवी सांगतो आहे ."
संघर्षाने प्रेरित कणकण
अंतरी देशभक्ती विलक्षण 
अन्यायाविरुध्द लढे आजन्म 
वीर योध्याचे  कोकण ..... (झुंझार  कोकण ..पृ ..३२ )

माणूस आणि निसर्ग यांच्यातील दुरावा ..कशामुळे आले याचाही शोध हा कवी घेतो .आणि ..या दुराव्याचे .."दूषण" "माणसाला  देणे .हे आपल्याला पटणारे असेच आहे..
कवी म्हणतो- 
 निसर्गाची ती संगत सुटली 
घरटे मोडली झाडे पाडली 
बंगली झाली इमारत उठली 
धुराडी गिरण्यांची घरघर विमानांची 
माणसांची बजबज वस्ती माजली ....( दुषण..पृ..४३ )

आपली संस्कृती ,परंपरा , दिन-विशेष , सण-वार , आपली श्रद्धा -स्थाने "..हे सुद्धा कवितेचे विषय झालेले आहेत ..याचे कारण या सगळ्याशी एक भावनिक नाते आहे..जे सभोवतालच्या माणसांशी जोडले गेलेले आहे..
अशा कविता - उदा - पर्वणी (पृ-३२ ), शुभ दिवाळी (५४), गुढीमहात्म्य "(५५), "आराध्या-(६०) , "अवतार -(६१ ),
भक्तीवंदना (६३), ,तसेच ही आणखी एक कविता उदा -
पांडुरंग, हरी , विठ्ठल मुखी 
वैष्णवांचा जथा ये भीमेकाठी 
अवघे जन व्हावे इथे सुखी 
अंतरीचा भाव हा  नित्य  पाठी...(अंतरीचा भाव ..पृ-६४)
या कवितेत  सकल जनांचे कुशल व्हावे अशी कामना कवी करतो आहे.
जेष्ठ साहित्यिक आणि नामवंत शिक्षणतज्ञ - डॉ.न.म.जोशी यांची प्रस्तावना या संग्रहास लाभली आहे .सरांनी - कवी -बाबू फिलीप  डिसोजा यांच्या कविता-लेखनाचे अतिशय मर्मग्राही असे रसग्रहण करतांना .कवीच्या कविता लेखनाचे अनेक सुंदरसे पैलू उलगडून दाखवले आहेत. या विवेचनातील महत्वाचे  वैशिष्ट्य  सांगतांना जोशी सर म्हणतात -
""आशय " या कविता संग्रहाचे पाचवे आणि अत्यंत महत्वाचे बलस्थान म्हणजे "शैली ". शैली हा साहित्याचा आत्मा असतो. कविताशरीराला तो सौंदर्य तर प्राप्त करून देतोच ; पण आशयाची प्रत्ययकारी मांडणीही  त्यामुळे  होत असते."
जोशी सरांचे  विवेचन अधिक अभ्यासण्यासाठी हा कविता संग्रह वाचायलाच हवा ..असे सुचवावेसे वाटते..कारण या शैलीने कवितेला सुंदर शब्दालंकार चढविले आहेत. अनुप्रास आणि यमक या शब्दालंकार यांची रेलचेल या संग्रहात आहे.पण उपमा , उत्प्रेक्षा , रूपक , श्लेष  या अलंकारांनी ही कविता विणलेली आहे.

देश ,देशभक्ती , स्वातंत्र्य , स्व -स्वातंत्र्य , आपला तिरंगा ..या विषयावरील कविता एक वेगळेच भान देऊन जातात.
तिरंगा महती या कवितेत कवी म्हणतोय -
गगनी ध्वज फडके डौल काय वर्णावा 
अबाधित ठेवू एकता संकल्प अर्पावा 
देशभक्ती वारसाला खास हमी मागते 
आसमंती मुक्तकंठीं जयघोष गर्जावा .....(तिरंगा महती ..पृ.८१ )

आपल्याला स्वातंत्र्य  मिळाले आहे हे खरे ..पण हे नवे स्वातंत्र्य ..जबाबदारी वाढवणारे आहे.त्यामुळेच कवी सांगतोय-
" विस्वास संदेश नवा देऊ 
  या एकत्र विकासास आता
नव्या उंचीवर देशा नेऊ
ठेवला एकच ध्यास आता ..(नवे स्वातंत्र्य ...पृ-९८ )
महतप्रयासाने  देशास  "स्वातंत्र्य -पर्वणी "लाभली आहे .याचे भान ठेवणे गरजेचे आहे.. त्यासाठी याचे भान असायला हवे ..असे कवीला वाटते ..की....

हुतात्म्यांचे बलिदान करावे स्मरण 
व्हावा एकीने , नेकीने  वारसा जतन 
स्वातंत्र्याच्या पर्वणीला साजरी सलामी 
प्रिय आम्हास आमचे भारत वतन ..!..(स्वातंत्र्य पर्वणी ..पृ..८५ )
अशा प्रेरक रचना कवीच्या लेखन शैलीची प्रभावी उदाहरणे ठरवीत.

सामाजिक जीवनातील स्थित्यंतरे , त्यामुळे निर्माण झालेली चिंताजनक परिस्थिती ..हे वास्तव कवीला वेदना देणारे आहे..त्यातूनच कवीचे संवेदनशील मन व्यक्त होऊ लागते ..आणि मग त्याची कविता रुपे अशी आविष्कृत होऊ लागतात..
या कविता कवीच्या कविता -लेखन प्रवासात अतिशय महत्वाच्या ठरतील अशा चिंतनशील भावनांची अभिव्यक्ती आहे." असे म्हणता येईल.. काही उदाहरणे ...
समाजात झालेल्या - दुषित पर्यावरणावर कविता ..--

वर्षानुवर्षे हेच चालले आहे
शोषितांचे  शोषण चालले आहे 
जुजबी मलमपट्टी देखाव्याची 
व्रणास उकरणे चालू आहे 
सर्वत्र कोंडमारा घुसमटवी 
निव्वळ प्रदूषण चालले आहे ....( क्रमण...पृ.१२० )


कशात काही अर्थ उरलेला नाहीये कारण .दिसतो तो फक्त अनर्थ ..
विस्कळीत तटबंदी , वाढली घुसखोरी 
स्वार्थांध प्रवृत्ती झाले साव लुटून आता 
दोष कुणास द्यावा ,कित्त मागचा गिरवी 
निव्वळ संस्कृतीसूज , वाढ खुटून आता ...(अनर्थ ..पृ.१०८ )

अशा विपरीत परिस्थीत जगणारा माणूस ..त्याची अवस्था ..नेमकेपणाने मांडणारी ही कविता..

"एक भीती रोज मनात घेउनी जगतो
काळजावर दगड ठ्वूनी तो जगतो 
संपेल कधी ही अस्वस्थ दशा जीवनाची 
स्वप्ने उराशी , उद्याच्या आशेवर जगतो 
थांबेल श्वास कधी अवचित न सांगता
अस्तित्वाला नसो ग्रहण ,म्हणून जगतो ...( ग्रस्त ..पृ..९०)

अशाच आशयाच्या अनेक कविता वाचून वाचक नक्कीच अंतर्मुख होऊन वास्तवाचा विचार करू लागतात ..
काही शीर्षके -- समर्थन (९१ ), "निर्बंध (१२४) , "निर्वाणी "(१२१), सत्ताधीश " (८६) ,संभ्रम " (८३)
उल्लेखनीय अशा कविता आहेत.
आशय " या शिर्षका बद्दल कवी आपल्या मनोगतात सांगतात की-
आशय "म्हणजे विचारसार , आशय म्हणजे भावनांना दिलेले शब्दरूप , आशय म्हणजे मांडलेले तत्वज्ञान ..या संग्रह्तील कविता म्हणजे कवी -बाबू फिलीप डिसोजा ..यांच्या काव्य-प्रतिभेचा मनोरम आणि प्रामाणिक असा अविष्कार आहे.
कविता-लेखनाचा त्यांचा हा दमदार प्रवास त्यांच्या आगामी कविता संग्रहातून ही असाच अभियाक्त होवो याच शुभेच्छा देतो आणि आशय "कविता संग्रहाबद्दल रसिकांच्या वतीने अभिनंदन करतो.

आशय -कविता- संग्रहाचे अतिशय सुरेख असे पुस्तक रूप प्रकाशित केल्याबद्दल प्रकाशक - वेदान्तश्री प्रकाशन -पुणे यांचे अभिनंदन .तसेच "आशयपूर्ण " मुखपृष्ठाबद्दल  चित्रकार -विष्णू थोरे यांच्या कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख करतो.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक -परिचय लेख -
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२ 
-----------------------------------------------------
 
" आशय ...!
कवी- बाबू फिलीप डिसोजा 
संपर्क- ९८९०५६७५३६ 
------------------------------------------------------------------
प्रकाशक - वेदान्तश्री प्रकाशन -धनकवडी -पुणे- ४३ 
संपर्क - ९७६४१५७०३५
------------------------------------------------------------------------
आशय - कविता संग्रह 
पृ- १२८ , मूल्य- रू- १२५ /-
-----------------------------------------------------------------

Friday, June 17, 2016

" रिती ओंजळ :कविता -संग्रहास माझी प्रस्तावना

वाचक-मित्र हो-
फेसबुक व इंटरनेट या माध्यमातून कविता-लेखन करणाऱ्या नाशिकच्या कवयित्री -अनिता बोडके यांचा पहिला कविता संग्रह नुकताच प्रकाशित झालाय. त्यांच्या "रिती ओंजळ ",या कविता -संग्रहासाठी प्रस्तावना व ब्लर्ब -मजकूर लिहिण्याचा योग माझ्या वाट्याला आला . या निमित्ताने एका कवीच्या कवितेचा हा परिचय आपल्या अभिप्रायार्थ  सादर करीत आहे.:---
------------------------------------------------------------------------------------------------------------
| श्री ||

प्रास्तविक ....!

 पुस्तकरूपाने लेखक-कवी अधिक ठळकपणे आपल्या समोर येण्यास मोठीच मदत होते  .अशी अक्षर -भेट होणे हा एक छान असा आनंददायक वाचन- योग असतो.
हा माझा "-पहिलाच  कविता संग्रह आहे, आपल्या कविता आवडतील की नाही ?  याचे  स्वागत रसिक-वाचक कसे करतील ?, अशा अनेक प्रश्नांचे ओझेच जणू " कवीच्या मनात असते..आणि  सहाजिकही  आहे 
.
"रिती ओंजळ "या पहिल्या-वहिल्या संग्रहाबद्दल कवयित्री -अनिता बोडके यांच्याही मनात  अशाच भावना नक्कीच असणार..अशा ओझ्यातून मुक्त करण्यास त्यांचीच कविता त्यांना मदत करणार आहे",असे म्हणावेसे वाटते .त्यांच्या  कविता ..नवखेपणाच्या "आवरणातून नक्कीच मुक्त नाहीत ,हे जरी जाणवत असेले तरीही .जसा जसा हा लेखन-प्रवास दमदारपणे पुढे पुढे जात राहील..अनिता बोडके यांच्या कवितेला स्वतःची अशी आपली वाट सापडेल अशी ही आश्वासक रुपाची कविता आहे.,हे कवियित्री -अनिता बोडके यांनी लक्षात असू दावे.

कविता मनाला सोबत करणारी एक सोबती असते ..तिच्याशी मनातल्या भावना बोलून ..कवितेतून व्यक्त करणे "संवेदनशील मनास सहज सोपे वाटते ", याची  प्रचिती अनिता बोडके यंच्या कविता देतात 
आपल्या मनोगतात त्यानी म्हटलेच आहे..
सत्व पहाणर्या कसोट्याच्या क्षणी फक्त आणि फक्त कवितेनेच माझी सोबत केली .म्हणून तिचे धरलेले बोट कधीच सोडणार नाही.

. प्रेम-कविता जास्तीत जास्त असणे" .. कविता संग्रहाचे एक विशेष -स्वरूप असते , रिती ओंजळ -या संग्रहाचे असेच आहे. एकूण साठ- (६०) कविता पैकी बहुसंख्य कविता प्रेम-भावना व्यक्त करणाऱ्या आहेत. या कवितेतील साजणा -साजणी -यांच्या भावनेच्या या सर्व कविता आहेत..उत्कट -प्रेम ,समर्पणाची भावना ,प्रेमाची ,-असोशी ,सहवासाची ओढ.,एकमेकांच्या प्रेम बद्दलच्या अपेक्षा ,खंत ,विषाद .असे विविध भावना -या सर्व कवितेतून येतात 
काही कवितेतून -चमकदार ओळी नक्कीच  लक्ष वेधून घेतात ..

उदा-  गंधाळली पहा ही रातीस रातराणी 
        ही चांदणी  नभीची सखया तुझ्याच साठी .. | (सखया तुझ्याच साठी ),
      
         कान्हा तुझ्या प्रेमाची 
          झाली मजला बाधा 
          रंगात  तुझ्या रंगली 
           रंगली वेडी राधा ...(प्रेमवेडी राधा )
           
           कागद लेखणी अन 
            तुझ्या आठवांना घेऊन बसते 
           शब्दाशब्दातून मग कविता माझी हसते (कविता )
" विसरू कशी मी तुला " , साजणा तू " , ," झाले तुझी दिवाणी " , ,माझ्या प्रीतीफुला " ,कृष्णमय मीरा " ",सख्या तुझे प्रेम ," " सख्या रे,"
या अशा शीर्षकाच्या कविता वाचावयास मिळतात . असामान्य ,अलौकिक ,भव्य -दिव्य .असे या प्रेमात घडलेले असे काही नाही. या सध्या -सरळ ,भावूक मनाच्या तरल अशा भावनेच्या कविता आहेत ज्या आपल्या ..मना पर्यंत नक्कीच पोचतात.
रिती ओंजळ " संग्रहात .सामाजिक आशय ,चिंतनशील स्वरूपाच्या ,जीवन-अनुभव टिपणार्या अशा कविता आहेत 
"माय , "परक्याच धनं , कोंडमारा मनाचा "तुळशीची व्यथा " असेही जगू या , कुंपण ", महिला दीन " माझी मुलगी "
कवयित्री च्या मनाने सभोवत्ल्चे वास्तव जीवन जगतांना ही जगणे शब्दातून यतार्थपणे कवितेतून व्यक्त केले आहे.
.    या अशा आशयाच्या काही कविता  उल्लेखनीय अशाच आहेत.
    "सभोवताली काट्यांचा वावर असा की 
         इच्छा असूनही मज उमलता न आले ...|( मी एक कळी )

   "विखुरल्या भावना मझ्या 
          मनाची घुसमट  झाली 
          भरलेली असूनही ओंजळ 
          रितीच राहिली माझी   ..(शीर्षक कविता )

 "       घाव माझे मी जगापासून लपवते हल्ली 
          ठाऊक मला ,मीठ चोळतात माणसं ..( माणसं )

"         मागणे देवा तुझ्याकडे 
           फार काही नाही माझे 
           एक चांगला माणूस बनावा 
            माझा मुलगा ...( माझा मुलगा )

 "          पावलो पावली आहेत 
            वाटेवरती काचा 
           जपून टाक पाऊल सये 
            ही साधीसुधी वाट नाही ...(वाटेवरती काचा गं..)

"रिती ओंजळ " या पहिल्या कविता संग्रहाचे निमित्ताने कवयित्री -अनिता बोडके यांचे अभिनंदन .
कवितेला सखी सोबती मानणाऱ्या या कवियत्री कडून सातात्यांने अधिकाधिक सरस  कविता लेखन अपेक्षित नक्कीच आहे . त्यासाठी रसिक-वाचकांच्या वतीने लेखन -शुभेच्छा.
                                               *****************
अरुण वि देशपांडे -पुणे 
मो-९८५०१७७३४२ 
---------------------------------------------------------------------------------------------------

Wednesday, June 1, 2016

पुस्तक-परिचय लेख - नवरंग " (चारोळी संग्रह )

पुस्तक-परिचय लेख -
ले- अरुण वि.देशपांडे 
---------------------------------------------
-नवरंग - (चारोळी संग्रह )-संपादित .
-------------------------------------------------------------------------------
फेसबुक आणि इंटरनेटच्या माध्यमातून "साहित्य -प्रकाशनच्या " कार्याला अलीकडे खूप चालना मिळते आहे असे दिसून येते . अनेक  Whatsapp ग्रुपची यात आनंददायक अशी भर पडल्यामुळे उत्साहाने लेखन करणाऱ्या लेखक आणि कवींना अत्यंत उपयुक्त आणि प्रभावी माध्यम आणि व्यासपीठ उपलब्ध झाले आहे ही आनंदाची गोष्ट आहे.

अहमदनगर निवासी -श्री अरविंद कुलकर्णी संचलित व्होट्सअप ग्रुप -"साहित्य मंथन "हा ,चांगलाच परिचित असलेला समूह आहे.यातील सभासद समाजातील विविध क्षेत्रातील नामवंत आणि  परिचित व्यक्तिमत्व आहेत,  ही सर्व मंडळी  फेसबुक व इंटरनेटवरील माध्य्मातून  लक्ष्यवेधी अशी लेखन-कामगिरी करीत आहेत असे दिसून येते आहे.समुहातील गुणवंत कवींचा  "नवरंग "या शीर्षकाचा चारोळी संग्रह श्री.अरविंद कुलकर्णी यांनी साहित्य मंथन समूहासाठी २५ डिसेंबर २०१५ ला प्रकाशित केलाय.

कविता आणि चारोळी हे दोन्ही काव्य -प्रकार  जसे कवी -प्रिय आहेत तितकेच ते वाचक -प्रिय आहेत ,म्हणून चारोळी लेखन करण्याकडे  कवी-मित्रांचा ओढा  असणे सहाजिकच आहे असे समजावे.असे असले तरी .कविता असो व चारोळी "या दोन्हीतही "आशयाची अभिव्यक्ती " कशी झाली आहे हे महत्वाचे आहेच आहे.ज्याला अभियाक्त होणे जमले .त्याचे लेखन-भान अधिक सजग आहे  असे म्हणू या . एकच विषय ,एकच घटना ,एकच प्रसंग .."डोळ्यांनी पाहणारा ,आणि मनाच्या नजरेने पाहणारा ..एक बोलण्यातून आणि दुसरा शब्दातून व्यक्त होतो .तेव्न्हा  कवींच्या शब्दातले सामर्थ्य "आपल्याला जाणवल्या शिवाय रहात नाही. उत्तम आशयसंपन्न रचनेचे हेच वैशिष्ट्य असते.

"अल्पाक्षरी रमणीयता "हे कवितेचे विशेष असे लक्षणीय वैशिष्ट्य आहे.ते जसे कवितेला लागू आहे..तितकेच ते चारोळीला सुद्धा आहे.त्या दृष्टीने हे सगळे भान सांभाळून असणारी  चारोळी ,एखाद्या संग्रहातून वाचकाला भेटते ,त्यावेळी अर्थातच " वाचनीय असा आनंद मिळतो.
साहित्य -मंथन च्या  "नवरंग " या चारोळी संग्रहात याची प्रचीती नक्कीच येईल.
नवरंग -चारोळी संग्रहात .-महाराष्ट्रातील विविध भागात असलेले ही कवी-मित्र आहेत.- एका अर्थांने "विविधतेच्या मनोरम काव्य-छटा -म्हणजे नवरंग मधील-चारोळी रचना आहेत.
आकड्यातच सांगायचे झाले तर ..२३ कवींच्या -निवडक दोनशे चारोळ्यांचा समावेश या संग्रहात केलेला आहे.

हे रचनाकार या प्रमाणे --१. सुनील राजाराम पवार -सायन -मुंबई., २- डॉ. शरयू शहा- शिवाजी  पार्क -मुंबई ,
३- दिलीप शेषराव धामणे - हिंगोली , ४- अनिल रामचंद्र  हिस्सल- बुलढाणा 
, ५- रामराव सर्जेराव जाधव -शिरापूर-अहमदनगर , ६- डॉ.शिल्पा जोशी - दादर -मुंबई , ७- सौ. प्रिया  वैद्य -ब्रूकलेन-श्रेयसबरी -युएसए. 
८-  सौ. अंजना कर्णिक - माहीम -मुंबई . ९- सौ.जयश्री  पाटील - वसमतनगर -जि.हिंगोली. , 
१०- बालाजी रामचंद्र धोंडगे - पाटील - नांदेड , ११- गजानन विश्वनाथ पाटील -पवार - वरुड-देवी ,जी.हिंगोली ,
१२- सौ.कुंदा  अरविंद  पित्रे - दादर(प) - मुंबई. १३-  नागोराव सा. येवतीकर - येवती -जि.नांदेड .
१४- उत्कर्ष देवणीकर - उमरगा जि.उस्मानाबाद . १५ अरविंद रामचंद्र कुलकर्णी - अहमदनगर ,
 १६-सौ.सुलभा प्रकाश कुलकर्णी - बोरीवली (प)- मुंबई . १७- डॉ.सुप्रभा कुलकर्णी - अहमदनगर , १८- जयंत देशपांडे -        अहमदनगर ,
१९.गजानन  व्ही .वारणकर - तरोडा (खु)-नांदेड . २०- योगेश पुंडलिक देवकर - साखरखेर्डा -जि.बुलढाणा .
२१- सौ.जागृती सुधीर निखारे - कल्याण , २२- उमेश भास्करराव खमितकर - गुंजोटी -जि.उस्मानाबाद.
२३- नंदकुमार  सोवनी - बिबवेवाडी -पुणे .
या संग्रहाची सजावट समूह सभासदांनी केलेली आहे-
मुखपृष्ठ - डॉ.शिल्पा जोशी ,
सजावट - उत्कर्ष देवणीकर 
यांचे या कामगिरी बद्दल अभिनंदन .
वाचक मित्र हो- दोनशे चारोळ्या आहेत.संग्रहातील नेमक्या कोणत्या चारोळ्या उदाहरणासाठी घ्याव्या ? कोणत्या कवींच्या घ्याव्या ?..हा मोठाच प्रश्न माझ्या पुढे होता..या वर एक सोपा आणि साधा उपाय ,तो करावा , साहित्य मंथन  समूह , सहभागी कवी आणि ,प्रकाशक -संपादक -समूह संचालक  श्री.अरविंद कुलकर्णी यांचेशी संपर्क साधून "नवरंग "चारोळी संग्रह घ्यावा.
या संग्रहाने यातील  कवी-मित्रांना लेखनाची  नवी दिशा नक्कीच मिळाली आहे.पुढच्या प्रवासासाठी या सर्वांना तुमच्या वतीने लेखन शुभेच्छा देतो.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नवरंग"-चारोळी संग्रह .
पृ-५० .देणगी मूल्य -रु. ६०/-
साहित्य मंथन -परिवार 
अहमदनगर .
अरविंद कुलकर्णी -
संपर्क- 9689077239 
---------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय लेख 
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- ९८५०१७७३४२ 
------------------------------------------------------------------

Wednesday, April 13, 2016

पुस्तक-परिचय - हसरा गजरा - विनोदी कथा-संग्रह



हसरा गजरा " विनोदी-कथा-संग्रह-यात माझ्या "गंगेत घोडं न्हालं"
याकथेचा समावेश आहे.
यासंग्रहाचा परिचय-
-----------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय -लेख -
-अरुण वि.देशपांडे
-----------------------------------------------
विनोदी कथांचा टवटवीत - -संग्रह -
"हसरा गजरा "
--------------------------------------------------------------
साहित्यक -लेखक -कवी म्हणून परिचित असलेले डॉ.आनंद सराईकर ,तसे साहित्य- चळवळीतले एक उत्तम संघटक -कार्यकर्ते म्हणून देखील ओळखले जातात .त्यांच्यातील आणखी एका महत्वाच्या गुणाचा परिचय आपणा सर्वांना करून देण्याचा योग या लेखाच्या निमित्ताने आलेला आहे.
यावेळी डॉ.आनंद सराईकर यांची "संपादक " म्हणून त्यांच्याशी आपला परिचय होतो आहे.हा त्यांच्या पहिलाच प्रयत्ना आहे .आणि त्यांचे हे संपादित पुस्तक आपल्या सर्वांच्या हाती देण्यासाठीचे त्यांनी निवडलेले दिन-विशेष " बघा -"जागतिक मराठी दिन ,कविवर्य कुसुमाग्रज स्मृतिदिन आणि शिवांजली साहित्य महोत्सव .
हे सगळ संपन्न झालं ते २७ फेब्रुवारी -२०१६ रोजी शिवांजली साहित्य मोहोत्सवात ..याला म्हणावे खरा "अक्षर-योग."
हसरा गजरा " . विनोदी -कथा लेखनातील नामवंत साहित्यिकांच्या कथांचा हा संग्रह आहे.या संग्रहातील लेखक -मंडळी आपल्याला दरवर्षीच्या दिवाळी-अंकात नित्यनेमाने भेटत असतात .हसरा गजरा -दर्शनी रूपाने प्रातिनिधिक कथा-संग्रह आहे पण याचे वेगळे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे- यातील लेखक नवोदित वगेरे नसून..प्रसिद्ध आणि लोकप्रिय असे आहेत .
या संग्रहात महारष्ट्रातील २५ लेखकांच्या विनोदी कथांचा समावेश करण्यात आलेला आहे.या लेखकांची नावे व कथा -
१.कथा - श्वान निघालय लंडनला - विजय कापडी , २- माझी मराठी "दिन"चर्या - श्रीपाद कुलकर्णी ,
३.एका प्रेमाची हसरी गोष्ट - बंडा जोशी , ४- छडी लागे छम छम- सुभाष खुटवड ,
५-अहिल्येचा उध्दार- प्रा. साईनाथ पाचारणे ., ६- सोन्याची अंगठी - उत्तम सदाकाळ
, ७- कोणी उंदीर देता का उंदीर - सागर अचलकर,, ८- असहिष्णुता - डो.आनंद सराईकर ,
९- श्वान इज शान - संजय सांगडे , १०- देह गोदेतिरी- शरद पुराणिक , ११- ग्यारंटी- सचिन बेंडभर ,
१२- शिक्षणाच्या आयचा घो - दत्तात्रय साईतवडेकर, १३- जाचक संतती पालक संघ - पा - प्रतिभा सराफ ,
१४- शिव्यांमागचं तत्वज्ञान - हितेंद्र गद्रे , १५- गंगेत घोडं न्हालं - अरुण देशपांडे ,,
१६- एक दिवसाचा आमदार - हेमंत गडकरी , १७- बैल , मोबाईल आणि पोलिओ - दिलीप कचेरे
,
१८- माझा मधुचंद्र - विजय फडणीस , १९- मोहीम फत्ते - प्रा .कुंडलिक कदम ,
२०- वस्तीतील गस्तीची धिंग मस्ती - रंजन खोटे , २१- येस पप्पा - सौ.प्रमिला काटे , २२-गुरुजी - लक्ष्मण दिवटे
,
२३- चोर सापडला तावडीत - सुभाष कुरंदळे, २४- भरवशाच्या म्हशीला ..! सुभाष पाचारणे
२५- ईरसाल जावई- अनिल राऊत.
आपल्या जीवनात विनोदाचे स्थान हे किती महत्वाचे आहे,आणि विनोदी कथातून सुद्धा जीवनाचे ,आयुष्याचे ,जगण्याचे आणि यात महत्वाचा असणारा माणूस "या सर्वांचे एक नितळ चित्र या कथांमधून नक्कीच दिसेल
या सर्व विनोदी कथांना - पुस्तकरूपात आणण्याचे संपादन कार्य म्हणूनच जरा वेगळे आहे डॉ.आनंद सराईकर यांनी हे संपादन -कार्य खूप छान केले आहे. या बद्दल -.त्यांच्याच शब्दात सांगयचे झाले तर " गजरा सर्वांच्याच चित्तवृत्ती उल्हासित करण्याचे काम इमाने इतबारे करीतच असतो ..तद्वत हा आमचा दर्जेदार विनोदी कथासंग्रह .."हसरा गजरा " तुम्हाला प्रसन्न करील यात मुळीच शंका नाही...
या संग्रहाचे अनुरूप मुखपृष्ठ व आतील रेखाचित्र - चित्रकार घनशाम देशमुख यांनी केलेलं आहे.
सनय प्रकाशन -नारायणगाव यांनी "हसरा गजरा " प्रकाशित केला आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय -लेख -
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो -९८५०१७७३४२
-----------------------------------------------
विनोदी कथांचा टवटवीत - -संग्रह -
"हसरा गजरा "
संपादक - डॉ- आनंद सराईकर
पृ- २०८ , मुल्य-रु.२००/-
मो- ९८२२ ५३०२६६
-----------------------------------------------------
सनय प्रकाशन
आनंदवाडी , नारायणगाव , ता.जुन्नर ,जि. पुणे.
संपर्क- ९८६०४२९१३४
------------------------------------------------

Wednesday, March 2, 2016

पुस्तक-परिचय लेख- चांदोबाचा दिवा

 पुस्तक परिचय-" लेखक- अरुण वि.देशपांडे
---------------------------------------------
" चांदोबाचा दिवा " ... बालमित्रांसाठी धमाल बालकवितासंग्रह -
-----------------------------------------------------------------------
विजयकुमार देशपांडे हे सोलापूरचे कवी, गझलकार, चारोळीकार, त्याचबरोबर मिस्कील आणि हलकेफुलके लेखन करणारे साहित्यकार आहेत. विविध वर्तमानपत्रांच्या पुरवणी, मासिके आणि दिवाळी अंकातून यांचे साहित्य प्रकाशित झाले आहे. बालमित्रांसाठीही ते आवर्जून लेखन करतात. किशोर मासिकात कविता प्रकाशित, तसेच पुणे आकाशवाणीवरून त्यांचे बालकवितावाचन प्रसारित झाले आहे.
इंटरनेटच्या दुनियेत त्यांनी स्वतःचा वाचक-वर्ग निर्माण केला आहे.
"लेखन प्रपंच" या त्यांच्या ब्लॉगवर त्यांचे साहित्य उपलब्ध असते.
या वाटचालीत त्यांच्या ४० बाल -कवितांचा संग्रह "चांदोबाचा दिवा " या शीर्षकाने प्रकाशित झाला आहे., त्याचा परिचय मी करून देत आहे.
बालकवितांना आशयानुरूप रेखाटने आणि चित्र असणे, या कवितांच्या बालवाचकांसाठी खूप उपयोगाचे असते. "चांदोबाचा दिवा" या संग्रहातील कवितांच्या सोबत मस्त रंगी-बेरंगी आकर्षक चित्रांमुळे, हे पुस्तक सुरेखच झाले आहे.
बालमनाला आवडणाऱ्या विषयावरील कविता, कवी-विजयकुमार देशपांडे यांनी अतिशय सहजतेने लिहिल्या आहेत.
पक्षी-प्राणी, खेळ आणि खेळणी, आई-बाबा..आणि बाळाची दोस्त मंडळी- अशा कितीतरी विषयावरील कविता वाचनीय झाल्या आहेत.
काही कवितांचे उल्लेख आवर्जून करतो--
१. आकाश, आकाशातला चांदोबा ,चमचमत्या चांदण्या.. किती छान दृश्य असते हे.. या कवितेतील बाळ त्याच्या आईला म्हणते-
आई ग आई
चांदोबा -चांदण्या
ठेऊन अंगणात
रात्री छान खेळेन
त्यांच्या प्रकाशात... (शीर्षक कविता -पृ.४६)
२. खेळकर-खोडकर असा बाळ घरातला गुणीबाळ, कौतुकाने काही म्हणा, त्याला ते आवडत असते. या कवितेतील
लाडोबा- आहे घोडोबा.. तो म्हणतो..
घोडोबा मी घरी लाडका
खेळायला पुढे पुढे
शंभर टक्के परीक्षेत गुण
अभ्यासातही सदा पुढे ...(दोन पायांचा घोडोबा ..पृ.३८)
३. बाळाला खाऊ घालणे म्हणजे बाळाच्या आईसाठी सोप्पे काम मुळीच नसते ,अशावेळी बाळाचे दोस्त आले की अशी मजा येते..त्याची ही कविता -
बाळाची अंगत पंगत
पक्षी प्राण्यांची संगत
हातवारे बाळाचे
वाढत आहे रंगत .....(इवल्या इवल्या बाळाचे..पृ.२५)
४. चिऊताई आणि चिमुकला बाळ यांचे मैत्रीचे नाते खूप गोड असते. अंगणात येऊन गाणे म्हणणारी चिऊताई बाळाची आवडती आहे- यात आश्चर्य ते काय ?
दाणे पडले टप टप टप
चिमण्या गोळा पट पट पट
चिव चिव करता टिपती दाणे
टिपता टिपता म्हणती गाणे ...( चिव चिव गाणे ..पृ.१६)
५. बागेमधेे जाणे, तिथे मनमुराद खेळणे, फुलांनी बहरून गेलेल्या बागेत फेरफटका मारणे सर्वांनाच आवडते, ही कविता बागेत गेल्यावर, काय काय छान आहे हे सांगते..
बागेमधली विविध फुले
रंगामाधुनी कशी बहरती
रंग लेउनी मोहक अंगी
वाऱ्यावरती गंध पसरती ...(बागेमधला फेरफटका ..पृ..१४)
या शिवाय-- "ससा आणि कासव", "बंडू आणि परी", "अजबगजब", "ससे आणि जादुगार", "झुकझुकगाडी ", "माझे विमान", "शाळा ".. अशा अनेक कविता आहेत.. ज्यातून बालमनाचे भावविश्व साकारण्यात, कवी विजयकुमार देशपांडे मनापासून रमून जातात, जाणवत राहते .
साधीसोपी शब्दरचना, आवडते आणि परिचित विषय, कवितेला असलेला मायेचा, कौतुकाचा, वात्सल्याचा भावस्पर्श.. यामुळे विजयकुमार देशपांडे यांच्या या बाल-कविता लहानथोर सर्वांनाच खूप आवडतील- असा विश्वास वाटतो.
कवितेस अनुरूप रेखाटने चितारणाऱ्या कलावंत- कु.साक्षी संजय पुजारी यांच्या चित्रांचा उल्लेख करायला हवा. त्यांचे अभिनंदन ! प्रकाशिका- सौ. संयोगिता स्वामी व कुजबुज प्रकाशन लातूर.. यांनी हा सुंदर बालकवितासंग्रह प्रकाशित करून, बालमित्रांना कवितेचा खाऊ दिला आहे. त्यांना धन्यवाद !
["सखे तुझ्यासाठी" हा विजयकुमार देशपांडे यांचा चारोळीसंग्रह, या बालकवितासंग्रहासोबतच प्रकाशित केलेला आहे..]
------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय -
ले- अरुण वि.देशपांडे, पुणे
मो-९८५०१७७३४२
"चांदोबाचा दिवा" [बालमित्रांसाठी धमाल बालकवितासंग्रह]
------------------------------------------------------------------
"चांदोबाचा दिवा" (बालकवितासंग्रह).. कवी- विजयकुमार देशपांडे, संपर्क -९०११६६७१२७
पृ.४८, मूल्य- फक्त ४०/-

Saturday, February 27, 2016

आभाळमाया - (प्रातिनिधिक कविता संग्रह ) -स्वागत पुस्तकाचे - अरुण वि.देशपांडे -पुणे.

स्वागत पुस्तकाचे -
अरुण वि.देशपांडे -पुणे.
-------------------------------------
आभाळमाया -
(प्रातिनिधिक  कविता संग्रह ) 
संपादक - डॉ.अरविंद नेरकर 
------------------------------------------------------------------------
शब्द्गांधार " या सु-परिचित  दिवाळी-अंकाचे  संपादक अशी ओळख असलेले डॉ.अरविंद नेरकर एक उत्तम संपादक आहेत तसेच एक प्रकाशक देखील आहेत .
. अनेक लेखक -कवींच्या  साहित्याला  त्यांनी पुस्तकरूपात वाचकांच्या समोर आणलेले आहे.
. त्यांनी संपादित केलेला  आभाळमाया हा प्रातिनिधिक कविता -संग्रह डिसेंबर -२०१५ ला प्रकाशित झाला आहे.
२२ कवींच्या प्रत्येकी ६ कविता या प्रमाणे एकूण १३२ कवितांचा सुंदर शब्द-नजराणा असा हा कविता-संग्रह आहे"असे म्हणावेसे वाटते
. हे २२ कवी आणि त्यांच्या काव्य-प्रतिभेचे  विविध -रंगी स्वरूप ही एक छान अनुभूती आहे. कविता आणि त्यांचे आशय आणि विषय  यांची विविधता हे ही या संग्रहातील कवितांचे वैशिष्ट्य आहे. 
कवी मनास अभिव्यक्तीची ओढ असते ,आणि लिहिण्याची उर्मी कविता रूपातून येते ..यातील कवी  जे विविध वयोगटाचे प्रतिनिधी आहेत -त्यांच्या लेखनाच्या प्रेरणा अर्थातच वेगवेगळ्या आहेत. अनुभव, दृष्टीकोन ,जाणीवा यांचा परिणाम कवितेतून व्यक्त होतांना जाणवतो.
यातील सहभागी कवी या प्रमाणे आहेत-
१.जयश्री  जोशी --पुणे . २- चारुशीला  बेलसरे - -पुणे. ३- संजीवनी  औटी -पुणे , ४- श्रीनिवास  चंद्रात्रेय -तळेगाव दाभाडे ,

५-रवींद्र  गाडगीळ -पुणे , ६- विजयकुमार देशपांडे -पुणे , ७, शरद अत्रे -पुणे, ८-सुनंदा  कुलकर्णी -पुणे , ९-सुनिता भालेराव -डोंबिवली .

१०-भि.द .उशीर  उर्फ  रविकिरण- मुंबई , , ११- हेमंत परब -पुणे , १२- बाबू फिलीप डिसोजा -निगडी -पुणे.,

१३-उषा जोशी -पुणे, १४ -निर्मला जाधव -कोडोली -कोल्हापूर ,१५- गजानन प्रधान -पुणे, १६-मेधा थळे- नवे पनवेल.,

१७- पुरुषोत्तम बी.एम.कांबळे -वाशी- नवी मुंबई. १८-महालिंग शंकर मेणकुदळे- सातारा , १९-कल्पना मुकुंद  कांबळे-साळवे -दादर -मुंबई, 

२०-निर्मला केतकर -गोपालनगर -जि.वर्धा , २१- सुभाष गोखले -औंध-पुणे, २२-  रोहिणी  जाधव -बोरीवली-मुंबई.

या कवितेत लयबद्ध कविता आहेत, मुक्तछंद कविता मोठ्या प्रमाणात आहेत, गद्य -विधानात्मक  अशा रचना आहेत..या कविता ओळींच्या संख्येने  छोट्या -मोठ्या वाटाव्या अशा आहेत.यातून  कवींनी आपले जीवन -तत्वज्ञान मांडलेच आहे , याच बरोबर  काही चांगले घडावे ही अपेक्षा व्यक्त करतांना  आपल्या कवितेतून त्यांचे   मनापासूनचे  व्यक्त होणे "जास्त भावणारे आहे.
काही कवितांचे उल्लेख उदाहरणादाखल करतो आहे-..यामुळे संग्रहातील  कविता  किती विविधतेच्या आहेत याची  कल्पना  येऊ शकेल.

आपल्या जगण्याची लढाईत मन कितीही दुखी  झाले तरी ,आनंद तर शोधावा लागेल .त्यासाठी निरपेक्षपणे हे करता येईल.....कर्तव्य म्हणून...

१. तसा क्षण ही कुठेतरी भिजत 
पडलेलाच असतो
रुजून वर येण्याची त्याचीही वेळ 
ठरलेलीच असते
आणि म्हणूनच उगवण्याची वाट न बघता 
आपण आनंदाच्या बिया पेरायच्याच  असतात ...(कर्तव्य - जयश्री  जोशी )


विठूमाउली आणि त्याचे भक्त म्हणजे एक वेगळे नाते आहे श्रद्धा आणि भक्तीचा संगम विठूच्या दर्शनाची ओढ अशी असते त्याची की कविता ...
२.पंढरीच्या वाटेवर पाऊलेही चालती 
   भक्तजनांच्या मनात विठूनाम जागृती 
   मन शांतविते जगन्माऊली ती 
   भवसागर पार करी भक्तांची  नाव ती ...(विठूमाउली - चारुशीला  बेलसरे )

मनाची समजूत घालणारी ,जगण्याचे भान देणारी ही रचना ...
३.न व्हायचे सप्तसुरात  लुब्ध 
   न  इंद्रधनूच्या रंगात  बद्ध 
    मावळेल वेदना  मन क्षुब्ध
     हवा असा एक मायेचा शब्द ...(अपेक्षा - रोहिणी  जाधव )

नारी रुपाचे यथार्थ दर्शन या कवितेतून होते.....
४. आग आहे पाणी आहे
    लखलखती वीज  आहे
    बुरसटलेल्या विचारांनो 
    आजची मी आधुनिक नारी आहे ..( आदि- शक्ती..कल्पना मुकुंद कांबळे साळवे )

खंत ,विषाद मनात दाटून आल्यावर मनाची व्यथा अशा शब्दातच व्यक्त होते....
५.. वय उताराच झालं 
     नाव लागली  पैलतीरी 
      परि दोन पिढ्यात उभी 
     अजुनी  विचारांची दरी ...(कसा मी गप्प  राहू ..रवींद्र  गाडगीळ )

जगण्याने जे जे काही दिले त्यावर विचार न करता ,आयुष्य कसे जगावे याचे भान देणारी  कविता..
  ६.    कष्ट  संकटे कायम ती तर 
      मनी बनवूया होड्या कणखर 
      तरू सोबतीने भवसागर 
      आयुष्य मिळाले आहे सुंदर ...(आयुष्य मिळाले आहे सुंदर ..विजयकुमार देशपांडे )

माणूस आणि नसर्ग  यांच्यातील दुरावा चिंताजनक झाला आहे म्हणून या नात्याचं महत्व सांगणे ही एक जबाबदारीच ठरते ..अशी एक कविता ..
७.जीवनाचा आनंद घेण्यासाठी 
   अन जगण्याचा अर्थ 
   उमजून घेण्यासाठी 
   प्रत्येकानं निसर्गाशी 
    नातं जोडायला हवं ....(निसर्गाशी नातं ..शरद अत्रे )

८. पाउस नाही ..अवर्षण ..दुष्काळ , तहानलेली सृष्टी ..त्यासाठी ही प्रार्थना
    तृषार्त व्याकुळ धरा 
     मृगा तू बरस खरा 
     प्रतीक्षा ती बीजांतरी 
      सुजन नवल  जरा ....(वर्षायाचना ..बाबू फिलीप  डिसोझा  )

९/ आपल्या आयुष्यात येणाऱ्या माणसांचे महत्व असाधारण असेच असते  म्हणूनच त्यांच्या सहवासाचे क्षण मनात       असतात ..हा भावनिक असा अक्षय साठा असतो..त्याची ही भावूक कविता .
     एकटेपणात सावली 
     आणि भेटल्यावर पाउस पाडतात 
     नदीसारखे नितळ पाणी 
      समुद्रापर्यंत  ..वाहत आणतात 
      जिव्हाळ्याची  माणसं अशी 
       मनात साठून राहतात ...(साठवण ..मेधा थळे)

१०. कवीच्या मनात  कविते विषयीची कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता ..सुनंदा कुलकर्णी यांची..
कविता म्हणजे काय असते..? हे सांगतांना त्या म्हणतात ..
कविता म्हणजे माउली 
कविता म्हणजे सावली 
सतत  माझ्या पाठी असते 
जगण्याचे मला बळ देते.....( कविता म्हणजे काय असते..? .सुनंदा कुलकर्णी )

देशासाठी लढणारे सैनिक आमचे.हा तर देशाचा अभिमानाचा विषय ..या विषयीची ही कविता..
११.विनाश दाटता ऐसा 
कुणी कुणाचा नसतो 
तेथे सैनिक आमचा हा 
देव होऊनी येतो ....(सैनिक  आमचा ..भि.द .उशीर उर्फ रविकिरण )
राजकारण आणि त्यातील  पक्ष बदलू मंडळी यांच्यावर भाष्य करणारी ही मार्मिक रचना ..
१२. सरड्यासारखे रंग बदलण्याची 
किमया असते आमच्या अंगात 
बाजी अंगलट आली तर 
माफीनामा सदैव आमच्या खिशात ....(आम्ही आयाराम गयाराम ....गजानन प्रधान )
१३. निसर्गाशी फारकत घेणारा माणूस कसा आहे याचे वर्णन करणारी कविता अचूक चित्र उभे करते..

      जंगलातल्या मुक्यांना म्हणतो आहे रानटी 
      स्वतःच्या महालासाठी मोडतोय त्यांची घरटी 
       माणूस माणूस राहिला नाही झालाय जनावर 
       अनावश्यक स्पर्धेपायी झालाय अनावर ....(रानटी ..हेमंत परब )
वरील विवेचनात सर्वच कवींच्या  रचनांचे उल्लेख करणे  शक्य नाही, लेखन मर्यादा लक्षात घ्यावी ही विनंती.
आभाळमाया 'हा प्रातिनिधिक कवितासंग्रह असला तरी यातील कवी -मंडळीनी  कवितेचे प्रतिनिधित्व नक्कीच केले आहे .सर्वांच्या लेखन-प्रवासास  मन:पूर्वक शुभेच्छा .
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्वागत -पुस्तकाचे -
अरुण वि.देशपांडे -पुणे 
मो-९८५०१७७३४२ 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आभाळमाया -
(प्रातिनिधिक कविता संग्रह )-
संपादक -डॉ.अरविंद नेरकर 
श्रद्धा प्रकाशन ,
डी.एस.के "विश्व "
धायरी -पुणे- ११ 
पृ-१४४ , मुल्य-रु.१५०/-
संपर्क -९०११०२४१८४ 
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------