Wednesday, May 27, 2020

#संवादिनीकथासंग्रहपरिचय - लेख -११ वा. ले-अरुण वि.देशपांडे

#संवादिनीकथासंग्रहपरिचय - लेख -११ वा. ले-अरुण वि.देशपांडे .
लेखिका - १. प्रतिभा टेकाडे  , २..गीता विश्वास केदारे , ३. स्मृती पाटील 
---------------------------------------------------------------------------------------------
नमस्कार मित्र हो., कुबेर प्रकाशनच्या 
संवादिनी या कथासंग्रहाचा परिचय करून देणार्या लेखमालेची वाचकांना सवय झालेली आहे ,
ही  गोष्ट  माझ्या या लेखन-उपक्रमास प्रोत्साहन
 देणारी आहे , त्यासाठी आपणा सर्व वाचकांचा
मी आभार आहे .

आजच्या लेखात आपण ज्या तीन कथांचा परिचय वाचणार आहात , त्या लेखिकांनी लिहिलेल्या या कथा आहेत. तसे पाहिले तर संवादिनी कथासंग्रहात लेखिकांनी लिहिलेल्या कथा संख्येने जास्त आहेत.

 १. या संग्रहातील कथानुक्रम२९.असलेलीकथा
भूक  (पृ.१५२ ) ले- प्रतिभा टेकाडे - बंगळुरू
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखिका -प्रतिभा टेकाडे या कवयित्री म्हणून देखील वाचकांना परिचित आहेत. त्यांच्या काव्य-रचना संग्राह -रुपात 
प्रसिध्द झाल्या आहेत . कथा आणि काव्य .साहित्याचे हे दोन्ही महत्वाचे प्रकार सहजतेने लिहिणे साध्य झालेल्या 
साहित्यिका - प्रतिभा टेकाडे .. यांनी लिहिलेली कथा .भूक ..
माणसाच्या आदिम भावनेवर भाष्य करते .  

भुकेला माणसाला .गरज असते ती फक्त चार घास पोटात जाण्याची ",
मग हे अन्न  आणि त्यातले पदार्थ ..ताजे की शिळे , उष्टे की चांगले ..या शंका त्याच्या भुकेल्या मनात येतच नसतात ,
त्याच्या पोटातली भुकेची आग शमली पाहिजे बस्स.!

अशा या भुकेचा " विषय लेखिका -प्रतिभा टेकाडे यांनी ..भूक " या कथेत अतिशय परिणामकारक रित्या मांडला आहे.
यातील प्रसंग खूप दुर्दैवी आणि दुखाचा आहे ..त्यामुळे कथेतील वातावरण करुण"वाटावे असे आहे .

 दोन व्यक्तींमधले  मालक आणि नोकर हे नाते किती ही व्यावहारिक असले तरी . काही माणसे आपल्या स्वभावामुळे अशी नाती सुद्धा 
कशी भावनिक आणि जिव्हाळ्याची बनवतात .. हे मोठ्या मालकीणबाई-आनंदी बाई आणि त्यांच्याकडे असणारी 
कामवालीबाई - रुक्मिणी "यांच्यात निर्माण झालेल्या नातेबंधाचे चित्रण लेखिकेने छान केलेलं आहे .

अशा आनंदीबाईंच्या आकस्मिक जाण्याने रुक्मिणीच्या समोर जी परिस्थिती निर्माण झालीय .
.त्याला रूपामैडम मुळे अधिक गंभीर वळण  लागते ..तिच्या मनातील आंदोलन  माणसांच्या स्वभावावर आहे.

भूक " आणि माणूस , ही लढाई तर आपण पाहतोच , या कथेतील आई- रुक्मिणी तिच्या दोन लहान ..भुकेल्या मुलांची 
भूक कशी भागवते .आणि त्या पसंगी तिच्या मनात काय विचार चालू असतात .. त्यासाठी कथाच वाचायला हवी आहे.

नेमकेपणाने केलेले लेखन "  लेखिका प्रतिभा टेकाडे यांचा लेखनविशेष या कथेच्या निमित्ताने जाणवतो.
त्यांच्या  लेखन-प्रवासास  शुभेच्छा .
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

२. कथानुक्रम -३० - कथा - प्रकाशमय झाली दिवाळी  (पृ.१५५ ) - ले- गीता विश्वास केदारे - मुंबई 
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
.विविध लेखन प्रकार सातत्याने लिहिणाऱ्या साहित्यकारा . विविध नियतकालिके , कवी-संमेलने आणि 
साहित्यविषयक संस्थामक कार्यात सक्रीय सहभाग असणार्या लेखिका,अशी ओळख  
मुंबईच्या गीता विश्वास केदारे यांची आहे.

प्रकाशमय झाली दिवाळी " ही त्यांची कथा ..समीर आणि मयुरी या जोडप्याच्या सहजीवनाची प्रेमळ भावनिक कथा आहे.
समीरच्या आयुष्यात मयुरी येते आणि त्याचे भावविश्व उजळून जाते ..त्यांच्यातील पती-पत्नीचे नाते लेखिकेने खूप छान 
शब्दात रंगवले आहे. 

समीरच्या अशा सुखी आणि आनंदी पारिवारिक जीवनाला ..अचानक ग्रहण "लागते ..आणि 
या घटनेमुळे उध्वस्त झालेला समीर ..वास्तवात तर जगत असतो ..पण, मानसिकदृष्ट्या तो मयुरीशी बोलत असतो,
हे आभासी जगणे "समीर आणि मयुरीच्या आयुष्यचे चित्र दाखवणारे आहे. 

समीर आणि मायुरीचे जीवन आनंदात सुरु असतांना ..त्याची ही जीवन कहाणी एक शोकांतिका कशी होते ?
याची कथा लेखिका गीता विश्वास केदारे वाचकांना हळव्या आणि भावूक शब्दात सांगतात .

कथेतील समीर ,मयुरी आणि या जोडप्याची मुलगी -परीराणी " या व्यक्तिरेखा वाचकांच्या मनावर प्रभाव पाडणाऱ्या आहेत.
लेखनाला शोभेल अशी चमकदार भाषा आणि शब्दरचना "कथेला वाचनीय बनवते 
शोकात्मक कथानकाची ही ..कथा प्रभावी झाली आहे.

त्यांच्या लेखन प्रवासास  शुभेच्छा 
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

३. कथानुक्रम - ३१ - कथा - आवेश (पृ.१५९ ). ले- स्मृती अभिजीत पाटील 
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
मुलांचे भावविश्व आणि त्यातील त्यांचे प्रश्न ,असणार्या समस्या ..याबद्दल लिहिणे हे प्रबोधन कार्य करण्या इतके महत्वाचे आहे.
- स्मृती अभिजीत पाटील - मुंबई .. या लेखिकेची 
आवेश " या शीर्षकाची कथा हे महत्वाचे कार्य करते .आवेश "नावाच्या छोट्या मुलाची ही छोटी कथा आहे ,
पण याचा आशय खूप व्यापक आहे. काही विषय ,समस्या असतातच अशा की,
त्यांचे होणारे परिणाम हे जास्त गंभीर आणि व्यापक असतात.

 महानगरातील जीवनशैली , त्याचा मुलांच्या जगण्यावर होणारा  -, -अनिष्ट परिणाम  कसा होतो आहे , 
या बद्दल सर्वांनी विचार करणे ही आजच्या आई-बाबांची , पालकांची गरज आहे "
याबद्दल गंभीरपणे विचार केला जावा असा इशारा  हे कथा देते ..हे या कथेचे मोठेच सामाजिक -संदेश कार्य आहे "

मुलांचा होणारा भावनिक कोंडमारा कस होतो ' हे सांगताना शेवटी लेखिका सांगते आहे की-
समाजात कित्येक आवेश आहेत. त्यांना मोकळं आकाश देणं , मुलांना त्यांचं शिक्षण हे हसत खेळत मिळवून देणं  उज्ज्वल 
भारताचा पाया भक्कम करण्या सारखे नव्हे काय ?
अशा वेगळ्या दृष्टीकोनातून या विषयाला कथेतून व्यक्त करणाऱ्या लेखिकेचे - स्मृती पाटील यांचे अभिनंदन केले पाहिजे.

त्यांच्या लेखन-प्रवासास शुभेच्छा 
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#संवादिनीकथासंग्रहपरिचय - 
लेख -११ वा.
 ले-अरुण वि.देशपांडे -पुणे.
९८५०१७७३४२ 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment