Monday, May 15, 2017

पुस्तक -परिचय लेख- कविता संग्रह- स्वप्नसखा "

पुस्तक-परिचय लेख-
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२
------------------------------------------------------
कविता संग्रह - " "स्वप्नसखा"
---------------------------------------------
कवयित्रीं- कस्तुरी देवरूखकर यांचा पहिला कविता संग्रह " स्वप्नसखा" प्रकाशित झाल्यापासुन कविता- रसिकांच्ची दाद मिळवतो  आहे ", कवीस सुखावह वाटावी अशीच ही विशेष बाब आहे.
.कवयित्री -कस्तुरी देवरुखकर यांचे कविता लेखन फेसबुक माध्यमातून जसे वाचकप्रिय झालेले आहे तितकेच ते नियतकालिकातून आणि दिवाळी-अंकातून लक्षवेधी ठरलेले आहे.
प्रेमभावना"  आशय असलेल्या भावपुर्ण कवितांचा "स्वप्नसखा " हा संग्रह आहे . हा स्वप्नातला सखा राहतोय ती आहे हळव्या प्रेमाची सुंदर अशी प्रेम-नगरी . याचे एकेक वैशिट्य सांगायचे झाले तर ..कवितांच्या शीर्षकातून सांगणे अधिक छान वाटणारे  असे ठरेल. या प्रेम-नगरात -"शरदाचे चांदणे "(पृ..१५),आहे, साहजिकच "चांदण्यांचा सडा"(पृ.२८) नेहमीच पडणार हे सांगणे न लगे .
स्वप्न्सख्याच्या या नगरीत ....ऋतू प्रेमाचा असतो (पृ.३५) ,आणि वेळ सुद्धा किती समर्पक असते ती- .."लाघववेळ "(पृ.४०) ,आणि त्या वळणावर ..(पृ..४९) , तिन्ही सांज ..(पृ..५१ ) असली तरी ती "सांज ओली"(पृ.५२ ) असते. प्रेमाला पोषक असेच वातावरण असते.
या सख्यासोबत  प्रेमाची अनुभूती "(पृ.२१ )घेतांना प्रेमाची गाठ .."हळूहळू  "रेशीम गाठ "(पृ.४४) "कधी होते हे कळत नाही.हे  " एक जग स्वप्नांचे "(पृ.६४) आहे त्यात "काव्य्नगरी "(पृ.६७) ,आहे ,आणि "शब्द्नगरी "(पृ ७०) सुद्धा आहे अशा भावानुकुल वातावरण असलेल्या  ,प्रेमाच्या नगरात .."प्रेमाचा पाउस "(पृ.६३ )  पडत असतांना .एका लयीत " रिमझिम सरी" (पृ.५८ ) पडतात ..पहा न किती रम्य अशा नगरीत स्वप्न्साखा राहतोय.
इतके मनोरम वाचल्यानंतर प्रश्न पडेल की हा "स्वप्नसखा " आहे तरी कसा ..
"डाव मांडला सारीपाटाचा
स्वतहा हरून मला जिंकवी
असा माझा तो स्वप्न सखा ..(स्वप्नसखा ..पृ..१० ),,,

अशा सख्या विषयी वाटणारी ओढ व्यक्त करणारी ही कविता बघा ..
 "ओढ लागते जीवा ,तुला भेटण्याची
पापण्यांना सवय झाली आहे 'तुझी छबी पाहण्याची ..(ओढ ..पृ.१८ ),
अशी ओढ म्हणजे सख्याच्या भेटीस व्याकुळ झालेला जीव ..त्याची ही भावना ..
"घन अबोल व्यथांचा ओथंबून येत ,
थेंब आसवांचा ओंजळीत मावेना
रातराणीचा गंध ही मनास भावेना ...(घन व्यथांचा ..पृ..२३ ),
सखी आणि तिचा सखा ..या दोघांना नेहमीच आठवत असते "त्यांची भेट " ,
"अशाच एका पैलतीरी
तू मला भेटला होतास
पहिल्याच भेटीत तू माझ्या
हृदयाचा ठाव घेतला होतास ...( भेट ..पृ.२६ ),
प्रेम ही भावना जशी हृदयात असते तशीच दोन व्यक्तींच्या मनांतली ती भाव-भाषा असते , या " हृदयीचे -त्या हृदयी "समजण्यासाठी शब्द कधी बोलके असतात ,कधी हेच शब्द -"नि:शब्द " होऊन जाणारे असतात . "स्वप्न्साखा "संग्रहात अशा  कविता आहेत ."सध्या-सरळ शब्दात भावना व्यक्त करणे , निर्मल आशय आणि  सुंदर सुबोध अशी अभिव्यक्ती " हे कवयित्री -कस्तुरी देवरुखकर यांच्या कविता -लेखनाचे ठळक गुणविशेष "आहेत असे नमूद करावेसे वाटते.
स्वप्न्सखा "कसा आहे हे तर आपल्याला कळाले..त्याची सखी कशी आहे ,तिची इच्छा ती अव्यक्त ठेवत नाही .तर ती मोकळेपणाने सख्याला सांगतांना म्हणते आहे..
"तुझा शब्द न शब्द एकाय्चाय
तुझं प्रत्येक गुपित मनात साठवायचंय
तुझ्या प्रश्नाचं उत्तर मला बनायचंय
थोड जिव्हाळ्याचं अत्तर तुला द्यायचय...(सखी ..पृ..४५) ,
ही सखी स्वप्न्सख्याला  प्रेमाची सत्यता ते पदोपदी देते आहे ,तिची ही प्रीती - भावना ,त्यातले सच्चेपण "अनेक कवितेतून प्रवाहित झालेले आहे.
त्याचे उदाहरण - एक कविता ..सखीच्या प्रेमाबद्दल ..पुरेशी बोलकी असणारी ...
"सख्या ही नुसती डायरी नाही
आपल्या प्रेमाचे स्वप्न पावलो पावली आहे..
लिहिते मी तुझ्या हृदयीच्या पानांवर ,
अन काव्याला आपल्या..
शब्द तार्यांची चांदरात भावली आहे ..!"डायरी ..पृ.५०) .
अर्पण,समपर्ण ", त्याग ", निस्सीम प्रेम-वृत्ती , प्रेमातली साथीदारावर असलेला दृढ विस्वास, प्रेम्पुर्ती साठी मनात असलेला निश्चय ,,अविचल अशी निष्ठा मनात बाळगणारी ..अशी सखी ..या कवितेतून आपल्याला दिसते ,ती भेटते ..तिचा स्वप्न्सखा  आणि ती " असे हे मनोरम भावविश्व ..कवितेतून या संग्रहात आपल्याला अनुभवता येते .कवयित्री कस्तुरी देवरुखकर  यांचे हे काव्यशिल्प भाव-रूपाने  जितके सुंदर झाले आहे तितकेच भावरूप शब्द्योजने मुळे ते मनस्पर्शी असे झाले आहे.
काही कवितांची शीर्षके - "अभिलाषा "(पृ.१३ ), स्वप्न किनारे "(पृ..१७ ), प्रेमाचे कोडे "(पृ.४८)  मोरपीस "(पृ.६०) ,मन पाकळी "(पृ.६५ ) नि:शब्द " ((पृ.७८ ), नाती "(पृ.८४ ), भावबंध "(पृ.८८ ), रंग प्रेमाचा "(पृ.८८).
भावव्याकुळ -कविता ,प्रेम-भावना व्यक्त करणारी कविता ..सखा आणि त्याचे सखी ..यांच्या स्वप्नवत .प्रीतीचीअनेकरंगी भावकथा आहे .."स्वप्न्सखा "हा संग्रह वाचून वाचक असेच अनुभवेल हे नक्की..
या संग्रहाचे सुंदर आणि अनुरूप असे मुखप्रुष्ठ करणारे चित्रकार -श्री.संतोष घोंगडे यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
संपादक -प्रकाशक  श्री .घनश्याम पाटील यांची संपर्पक प्रस्तावना संग्रहाचे आकर्षण ठरावी अशीच आहे.चपराक प्रकाशन यांनी "स्वप्न्सखा "कविता संग्रह प्रकाशित केला आहे..
कवयित्री -कस्तुरी देवरुखकर यांच्या कविता लेखनास खूप खूप शुभेच्छा.
------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय लेख-
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२
------------------------------------------------------
कविता संग्रह - " "स्वप्नसखा"
सौ.कस्तुरी देवरुखकर
पृ.८८ , मूल्य- रु.१००/-
-----------------------------------------
प्रकाशक -
चपराक प्रकाशन ,
शुक्रवार पेठ -पुणे -४११००२ ,
संपर्क -७०५७२९२०९२
------------------------------------------------------------------------------------------