#संवादिनीकथासंग्रह -परिचय -भाग-६ वा -ले- अरुण वि.देशपांडे
कथालेखक -१.राहुल दत्तात्रय राजोपाध्ये २. राहुल करुरकर ३. मीनाक्षी आडे
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ----------------------------
कुबेर समूह प्रकाशित .संवादिनी कथासंग्रहाच्या प्रस्तुतच्या परिचय लेखमालेमुळे ,या संग्रहाच्या वाचकांच्या संख्येत
लक्षणीय भर पडते आहे. हे जाणवले आहे.
याचे कारण म्हणजे..संवादिनी संग्रहातील कथासाहित्य वाचनीय आहे ",त्यासाठी
सर्व वाचकांच्या वतीने मी पुन्हा एकदा
या सर्व कथालेख्कांचे अभिनंदन करतो.
आजच्या या लेखात आपण ज्या कथांचा आस्वाद घेणार आहोत ..त्या कथांचे एक विशेष सांगावेसे वाटते ,ते म्हणजे-
या तीन ही कथा अगदी वेगवेगळ्या विषयावरच्या
आहेत . या कथा वाचून झाल्या नंतर वाचकांच्या मनात संमिश्र भावना दाटून येतील "असे मी म्हणेन.
कथा -१
शीर्षक - परतफेड
ले- राहुल दत्तत्रय राजोपाध्ये -सांगली
------------------------------ ------------------------------ -----------------------
पाउस आणि महापूर ही निसर्ग -आपत्ती तर आहेच . पण यात भर घातली आहे ती माणसाने .आपल्या स्वार्थापोटी ,हव्यासापोटी माणूस जे काही
करून ठेवतो आहे ..त्यामुळे हे संकट जीवघेणे होऊन बसले. ते कसे ?
लेखक राहुल राजोपाध्ये यांची "परतफेड " ही कथा " याच विषयावर व्यक्त होणारी आहे.
या कथेतील किशोर आणि सपना " हे
अतिशय सामन्य जीवन जगणारे जोडपे आहे,
हलाखीचे जीवन जगणार्या किशोरच्या आयुष्यात "सपना " येते आणि किशोर ..मोठी स्वप्ने
पाहू लागतो
अधिक सुखाच्या मागे लागलेल्या किशोरच्या,लोभापायी ..त्याची सारासार विचारशक्ती काम करीत नाहीये ..हे पाहून
सपना "त्याचे मन वळवायचा
प्रयत्न करते ..
अवैध धंदे ,त्यातील धोके ,त्यातून उद्भवणारे संकट ",याचा किशोर काही एक विचार न करता ..पुढे पुढे जातो खरा ..पण ,
निसर्ग आणि नशीब .यांचे तडाखे ..कसे आणि कधी बसतील ..हे सांगता येणे कठीण असते .
महापुरात ..किशोरचे सर्वस्व वाहून जाते , त्याची प्रिय पत्नी .त्याच्या डोळ्यासमोर महापुरात वाहत जाते,बेपत्ता होते , आणि
पूर ओसरल्यावर महापूर-ग्रस्तासाठीचे शिबीर सोडून किशोर ..घराकडे येतो ...आणि पुढे ?
मानवी स्वभाव आणि मानवी वृत्ती ..यामुळे माणूस स्वतःचे जीवन किती धोक्यात आणतो ,याचे उदाहरण किशोर या व्यक्तिरेखेतून
लेखकाने दाखवले आहे. "परतफेड " या शीर्षकात अजून एक अर्थ ..लेखकास सुचवायचा असावा ..असे मला जाणवले , तो म्हणजे.
जैसी करणी -वैसी भरणी " हा तो अर्थ .
किशोरच्या दुष्कार्माची परतफेड निसर्गाने केली खरी .पण..त्याची किंमत ? किती ?
आततायीपणे चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या किशोरला सावरण्याचा प्रयत्न करणारी सपना ,"
सपनाची ही व्यक्तिरेखा मनाला खूप चटका लावून जाणारी आहे.
त्यासाठी किशोर-सपना "ची कथा वाचायला हवी.
या कथेत .लेखकाने -महापुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे वर्णन मोजक्याच आणि परीणामकारक शब्दात केले आहे.
ओघवती अशी लेखनशाली
लेखकास लाभली आहे . त्यांच्या लेखनास हार्दिक शुभेच्छा.
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ -----------------
२.
कथा
शिर्षक- मुराद
ले- राहुल करुरकर - लंडन
------------------------------ ------------------------------ ------
कुबेर समुहातील अनेक सदस्य हे नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने विदेशात वास्तव्यास आहेत .या पैकी राहुल करुरकर आहेत ,
.संवादिनी संग्रहात .वेगळ्या विषयावरील ज्या काही कथा आहेत ..त्यातली .
राहुल करुरकर लिखित ."मुराद " ही कथा " ,तिच्या एकूणच कथा-रूपाने
वेगळी वाटणारी आहे.
अवयव -दान , अवयव -प्रत्यारोपण " हे विषय माहिती होण्यास सहज-सुलभ नाहीयेत ,याच विषयवार ही कथा आहे.
त्यात माहौल हॉस्पिटल , ऑपरेशन , ऑपरेशन -थियेटर " ,पेशंट,
रुग्ण , रुग्णसेवा , रुग्णाची नातेवाईक मंडळी " , डॉक्टर , त्यांचे निर्णय आणि मुख्य म्हणजे त्या त्या वेळी उद्भवणारी आणीबाणीची परिस्थिती "
या सर्व गोष्टी ..लेखक राहुल करुरकर यांच्या कथेची परिणामकारकता इतकी वाढवतात की.
या कथेतील -
आबिद आणि शायना हे एक जोडपे , आणि सतीश आणि अपर्णा हे दुसरे जोडपे ", यांना ज्या भयानक परिस्थितीतून जावे लागते आहे, ज्या
तणावाचा असह्य भार सहन करीत समोर आलेल्या संकटाशी सामना करायचा , त्यातून मार्ग काढायचा आहे "
सगळ काही फारच कठीण वाटणारे ,मानसिक आणि भावनिक स्ट्रेस आहेत, त्यांची अवस्था कशी असेल ?
वाचक सुद्धा या भयावह परिस्थितीचा साक्षीदार बनून ..आता पुढे काय होणार रे बाबा ..! असे नक्कीच म्हणेल.
आबिद-सायनाचा - जिगर का टुकडा "- मुराद ,, आणि सतीश -अपर्णाचा "बाळ " हे दोन अबोध नायक , या छोट्या जीवावर आलेले मृत्यूचे सावट "
आणि अशा प्रसंगी .वागणार्या , विचार करणार्या माणसांच्या भवती .ही कथा केंद्रित होते .
.माणूस , त्याची वृत्ती , असाह्यता , हतबलता ,आणि चिवट आणि दुर्दम्य अशी आशावादी वृत्ती ',यांच्यावर .ही कथा व्यक्त होत जाते .
आबिद -शायना , सतीश -अपर्णा " यांच्यातील भावनिक आंदोलने " कथेतून येणारा एक अकल्पनीय अनुभव ठरावा .
कथेतील प्रमुख व्यक्तिरेखा या भिन्न -धर्मीय व्यक्ती आहेत " म्हणून या कथेतला तणाव अधिक वाटणारा आहे का " ?
एक वाचक म्हणून मला असे वाटले नाही .
प्रसंगातून माणूस वेगळा दिसतो , वेगळा व्यक्त होतो , माणूस म्हणून त्यांच्यातील भावना
त्याचे व्यक्त होणे " यातच या कथेच्या विषयाचे आणि आशयाचे वेगळेपण आहे.
लेखक राहुल करुरकर ..याच्याकडून असेच सरस कथा लेखन होवो, यासाठी त्यांना लेखन -शुभेच्छा .
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ --
३.
कथा -
शीर्षक - घननिळा
ले- मीनाक्षी आडे- सुरत
------------------------------ -----------------------
ललित रम्य निबंध सुरुवात असावी अश्या ..घननिळा "कथेत .
आरंभी सुंदर असे निसर्गवर्णन आहे , सर्व परिचित असा श्रावणमहिना ,
त्यातला श्रावण सोमवार , या निमित्ताने शिवभक्त ,शिवदर्शन , श्रावणात सोमवारी भरणारी यात्रा " असा श्रावण -महिमा वाचावयास मिळतो .
या कथेचा नायक आहे "गजा "नावाचा किशोरवयीन मुलगा .
श्रावण-सोमवारची यात्रा " कथेच्या नायकासाठी खूपच महत्वाची आहे.
आपल्या धाकट्या भावासाठी -राजू साठी , बहिण -चिमीसाठी .मोटर आणि बाहुली "घेणे "गजाच्या आवाक्याबाहेरचे असते ,पण गजा हार न मानता
जत्रेतल्या सोमवारी ..महादेवाच्या मंदिरासमोर दिवसभर बसून राहतो .
.बेलपान आणि फुले " त्याचे पैसे जमा करून ठेवायचे पोते " हे दोन्ही सोडून तो अजिबात हलत नाही .
प्रतिकूल परिस्थिती माणसाला स्वप्ने पाहू देत नसते , मनातल्या इच्छा अपुर्या राहतात ,पण, म्हणून इच्छापूर्तीसाठी काहीच करायचे नसते का ?
झगडत , संकटाशी सामना करीत , अडचणीवर मात करून ..
आपल्या स्वप्नाची पूर्तता होणे "इच्छा पूर्ण होणे " हा झगडून मिळवलेला आनंद
काही वेगळाच असतो .
.हे सर्व मिळवतांना . गजाला काय काय भोगावे लागले ?,काय सहन करावे लागले ?
या सर्व प्रश्नांची उत्तरे ..
.हार न मानता , चिकाटीने , प्रयत्न करीत रहाणार्या गजाच्या कथेत मिळतात .
लेखिका मीनाक्षी आडे..यांनी कथेतून ..गजाची वेगवेगळी भावना -रूपं खूप छान दाखवली आहेत.
हिरमुसलेला गजा ,भूक लागल्यावर भाकरी नाही
म्हणून खूप पाणी पिऊन पोटाला गप्प ठेवणारा गजा ,
गोळा केलेला बेल ,पोत्यात जमा केल्यवर पळून जातांना ,तारेचा काटा ,मांडीत घुसून
रक्त निघाले तरी दुर्लक्ष करून पाळणारा गजा ,",
पैसे जमा झाल्याचे डोळे भरून पाहिल्यावर बाहुलीच्या दुकानाकडे पाळणारा गजा ".
ही कथा वाचल्यावर वाचक ... शाब्बास रे गजा " असे नक्कीच म्हणतील.
छान -नेटके असे लेखन " लेखिका मीनाक्षी आडे यांच्या अगोदर पुस्तकरूपाने प्रसिध्द झालेल्या साहित्यातून वाचकांनी
अनुभवलेले आहेच.
पुढील लेखन-प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा .
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ --------
#संवादिनीकथासंग्रह -परिचय -भाग-६ वा -
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
9850177342
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ -----
No comments:
Post a Comment