पुस्तक-परिचय लेख -
- -अरुण वि. देशपांडे
------------------------------------------------
ज्ञानगीता म्हणजे मनगाभारा उजळून टाकणाऱ्या रचना असलेला कविता संग्रह
रसिक-वाचक मित्र हो,
वर्तमानातले आपले जगणे..अतिशय विपरीत परीस्थितीतले झालेले आहे, हा प्रवास अनुकूल नाही हे आपण अनुभवतो आहोत, हताश ,हतबल, निराश..अशा नकारात्मक भावनांनी वेढून गेलेल्या मनाची अवस्था "अर्जुनासारखी " झालेली आहे, भगवान श्रीकृष्ण अर्जुनास साह्य करिते झाले ,त्यांनी अर्जुनाला गीतेतून-जीवन दर्श घडवले, ज्ञानाचा प्रकश दाखवला, तसेच काव्यारुपातुन सकल जनाच्या कल्याणार्थ..कवयित्री विजया पाटील, कराड यांचा कविता संग्रह- ज्ञानगीता,आपल्या सर्वासंसाठी संस्कार- दीप घेऊन आला आहे, हे मोठेच सुचिन्ह आहे.स्वतः कवयित्री या लेखनाचे प्रयोजन मोठ्या आंतरिक तळमळीने सांगित आहेत..
काजळल्या आत्मज्योती
मनी व्याधी, व्यथा, चिंता |
उजळाया काळजाला
साकारली ज्ञानगीता ||
मनी व्याधी, व्यथा, चिंता |
उजळाया काळजाला
साकारली ज्ञानगीता ||
-या सर्व काव्यरचना ..संस्कारक्षम तर आहेतच, याचा हेतूच समाज प्रबोधनाचा आहे हे जाणवते आणि जीवनानुभव गाठीशी असलेल्या परिपक्व आणि संवेदनशील कविव्यक्तिमत्वचा हा शब्द -अविष्कार आहे, हे यातील आशयावरून जाणवते. आपल्या मनोगतातून व्यक्त होतांना कवयित्री म्हणतात- स्वतःत रममाण झालेल्या माणसाला जागं करणं, वास्तवाचं भान करून देणं, कर्तव्याची जाणीव करून देणं आणि आपल्याला करण्यासारखं काहीच नाही असं समजून टी.व्ही, मोबाईल, यासारख्या गोष्टींच्या आधिन गेलेल्या युवा पिढीला कर्तव्यनिष्ठ बनविणे हे माझं आद्य कर्तव्य आहे, असे मी समजते आणि त्यातूनच ही "ज्ञानगीता" साकारली आहे. या मनोगताची सार्थ प्रचीती "ज्ञानगीता" मधील रचना आहेत. नव्या पिढीला, तरुणाईला इतक्या आपलेपणाने,तळमळीने कुणी वडीलधारे असे सांगणारे आहे " याचे खूप समाधान या रचना वाचून नक्कीच वाटेल, त्यासाठी कवयित्री विजया पाटील यांना धन्यवाद दिलेच पाहिजेत.
या संग्रहाच्या ब्लर्ब वरील अभिप्रायात व्यक्त होतांना जेष्ठ कवी-साहित्यिक -श्री.लक्ष्मीकांत रांजणे, वाई, यांनी जणू या लेखनाचे सार वाचकांना सांगितले आहे, ज्यामुळे या लेखनाचा उद्देश नेमकेपणाने मनाला भिडतो. ते म्हणतात -आजच्या विफल तरुण अर्जुनाला सडेतोड सवाल करणारी ही कवयित्री परिवर्तनशील असून हे नवे संस्करण समाजाच्या पुनरूथानासाठी मला खूप मोलाचे वाटते. सरळ सपष्ट आणि अतिशय आस्वादक अशी ही भावविभोर श्लोक रचना सर्वांसाठीच प्रेरक आणि ऊर्जादायी आहे. ज्ञानगीता नावाचं हे नवं चैतन्य घराघरात उजळाव, त्याची आभा सर्वदूर पसरावी अशी मी आशा करतो. कवी-साहित्यिक श्री.लक्ष्मीकांत रांजणे - यांच्या या उपयुक्त विवेचक अभिप्रायाने या लेखनाच्या मौलीकतेत भर पडली आहे, असे मला वाटते. या संग्राहातील रचना दोन विभागात आहेत. पहिल्या विभागातल्या रचना या श्लोक-स्वरूपातल्या आहेत.ज्यांना चारोळी "असेही म्हणता येते. यांची संख्या - १२५ आहे., आणि दुसऱ्या विभागात अभंग आहेत.त्यांची संख्या - २२५ आहे म्हणजे एकूण..३५०..रचना आहेत.यातून कवयित्री विजया पाटील यांनी समाजाचे, माणसांचे आणि युवा आणि नवीन पिढीचे प्रबोधन केले आहे. हे सांगणे सगळ्यांच्या भाल्यासाठीचे, प्रवासातील वाटचालीसाठी सोबत करणारी ज्ञान -शिदोरी आहे, भवताली गडद काळोख असतांना त्यातून मार्ग काढण्यासाठी मदत करणारा हा ज्ञान-दीप आहे. एक कवी म्हणून विजया पाटील यांनी केलेले हे लेखन-कार्य अतिशय मौल्यवान आहे.
तसे तर चारोळ्या हा लेखन प्रकार..सर्वांना भावणारा आहे. चटकन आणि पटकन मनाला भावणारा आशय लक्ष वेधून घेत असतो, आणि प्रस्तुत ज्ञानगीता मधील चारोळ्या -या मोठ्या अर्थपूर्ण अशा श्लोक रचना आहेत. त्यातील भावार्थ मनाला स्पर्श करणारा तर आहेच, तो विचार करायलाही भाग पाडतो,कारण त्यात..मानवाला, मानव-समूहाला..हा संदेश आहे .. व्यक्ती संपन्न होण्यासाठीचे जीवन-सूत्र..आचरणात आणून..सार्थक व्हावे. ही अपेक्षा आहे.अगोदर म्हटल्या प्रमाणे कवयित्री युवा पिढीला काय सांगते, कसे सांगते हे अतिशय महत्वाचे आहे.आपण सुद्धा हे भवताली सांगू शकलोत तर या ज्ञान-गीतेचा प्रसार केल्याचे कार्य आपल्या हातून नक्कीच होईल..काही रचना उदाहरण म्हणून उल्लेख करतो..
चांगले ते ऐकावया
मन जनांचे धजेना
म्हणुनिया छेडिते रे
जनजागृतीची वीणा..||१२३||..(पृ.३४)
मन जनांचे धजेना
म्हणुनिया छेडिते रे
जनजागृतीची वीणा..||१२३||..(पृ.३४)
२. कोणतेही कार्य करण्यासाठी हाताशी साधने असली तर कार्य वेगाने करता येते त्यासाठी..
स्थापा संवाद मंदिरे
मार्गदर्शी कार्यशाळा
कसे जगावे सुखाने
देई जगण्याची कला..||६७||..(पृ.२३)
मार्गदर्शी कार्यशाळा
कसे जगावे सुखाने
देई जगण्याची कला..||६७||..(पृ.२३)
कवयित्रीने हे महत्वाचे सांगितले आहे.
३.गोंधळून गेलेली युवा पिढी,तिला कार्य-प्रवण करायचे तर आरंभापासून आधार हवा असतो, मग सांगावे लागते की--
आधी करावी योजना
मग योजावा प्रकल्प
जिद्द-चिकाटी-ध्येयाने
पूर्ण करावा संकल्प.. ||६२|| ..(पृ.२२)
मग योजावा प्रकल्प
जिद्द-चिकाटी-ध्येयाने
पूर्ण करावा संकल्प.. ||६२|| ..(पृ.२२)
४. आपले व्यक्तिमत्व कसे असावे,ते अनुकरणीय,वंदनीय असावे..त्यासाठी काय करावे ?
वैज्ञानिक, साहित्यिक
तत्वचिंतक ही व्हावे
दया, शांती, प्रेम रूपे
आधी माणूसची व्हावे..||२९||..(पृ.१५)
तत्वचिंतक ही व्हावे
दया, शांती, प्रेम रूपे
आधी माणूसची व्हावे..||२९||..(पृ.१५)
वरील रचना वाचल्या की, या काव्य-संग्रहाच्या प्रस्तावनेतील ओळी आठवतील.. संत साहित्याचे अभ्यासक व परिवर्तनशील वक्ते श्री.इंद्रजीत देशमुख यांची प्रस्तावना या लेखनास लाभली आहे.या काव्याचे वैशिष्ट्य सांगतांना ते म्हणतात-ही कविता संस्कारक्षम माणूस कसा व्हावा ?, त्याच्या जीवनाची ध्येयं कोणती असावीत आणि त्यानं स्वत: जगून इतरांना आनंदी कसं करावं ? याचा बोध या कवितातून कवयित्रीने दिलेला आहे.डोळ्यात स्वप्नं, मनात जिद्द ,आणि मनगटात ध्येयं पूर्ण करण्याची धमक असणारी तरुणाई आज आपल्या देशाला हवी आहे, ही धडपड त्याच्यासाठीच !
या भावनेला अनुसरून काही रचना..काव्यसंग्रहाच्या दुसऱ्या विभागात आहेत त्यातील काही अभंग..छोटे छोटे..जे संख्येने २२५ आहेत. याची काही उदाहरणे देतो आहे ..म्हणजे ज्ञान गीता..नेमके काय देते..बघा..
१.
जगण्याचे ज्ञान
जगण्याचे भान
सांगे तत्वज्ञान
ज्ञान गीता..||२२५||..(पृ.७९)
जगण्याचे ज्ञान
जगण्याचे भान
सांगे तत्वज्ञान
ज्ञान गीता..||२२५||..(पृ.७९)
२. माणूस समजून घेणे हीच एक खरी सुरुवात आहे. नव्या बदलाची ..त्या साठी ..
माणूस आतला
समजून घ्यावा
जागे जाणते व्हा
माणसांनो..|| २२३ ||..(पृ.७९)
समजून घ्यावा
जागे जाणते व्हा
माणसांनो..|| २२३ ||..(पृ.७९)
३. तरुणाई बद्दल असा विचार करून,त्यांना सुनावणारी ही कवयित्री मला तरी एकमेव आहे असे वाटते.
'थ्रील' हवे वाटे
जिंदगीत ज्यांना
लढवा तयांना
सैन्यामध्ये..||२१४||..(पृ.७७)
जिंदगीत ज्यांना
लढवा तयांना
सैन्यामध्ये..||२१४||..(पृ.७७)
४.युवकांना चैतन्यदायी संदेश देणाऱ्या या दोन रचना मला दिसल्या..
विश्व सावराया
लागे जे कराया
सज्ज व्हा श्रमाया
युवकांनो..|| १७८||
लागे जे कराया
सज्ज व्हा श्रमाया
युवकांनो..|| १७८||
आणि..
ध्येय, जिद्द, स्वप्ने
उरी बाळगावी
श्रमाने लिहावी
यशोगाथा..||१८०||..(पृ.७० )
उरी बाळगावी
श्रमाने लिहावी
यशोगाथा..||१८०||..(पृ.७० )
५.माणसांच्या मनावर संस्कार करण्यासाठी आपल्याला किती थोर ग्रंथ आणि गुरु लाभलेत ते पहा ..
वाचा ज्ञानेश्वरी
तुकोबांची गाथा
रामायण, गीता
देती ज्ञान..|| १० ||..( पृ.३६)
तुकोबांची गाथा
रामायण, गीता
देती ज्ञान..|| १० ||..( पृ.३६)
शेवटी आयुष्याची सार्थकता झालीच पाहिजे ना..
धेयाविना नसे
अर्थ आयुष्याला
व्यर्थ मानवाला
जीवन हे..||५०||..(पृ.४४)
अर्थ आयुष्याला
व्यर्थ मानवाला
जीवन हे..||५०||..(पृ.४४)
थोडक्यात सांगायचे झाले तर, "ज्ञानगीता म्हणजे मनगाभारा उजळून टाकणाऱ्या रचना असलेला कविता संग्रह आहे". ज्ञानगीता या काव्य-रचनांनी खूप मोठे आत्मिक समाधान मिळाले. इतके सोपे,साधे रसाळ ,मन-स्पर्शी लेखन जणू सात्विक भाव दर्शन आहे. हा काव्य संग्रह कवी-मित्र -लक्ष्मीकांत रांजणे यांच्यामुळे माझ्या हाती आला त्यांचे आभार. कवयित्री विजया पाटील या प्रथितयश साहित्यकार आहेत. "ज्ञानगीता " हा काव्यसंग्रह त्यांच्या लेखन-प्रवासातील मैलाचा दगड ठरेल असा विस्वास आहे. त्यांच्या पुढील लेखन - प्रवासासाठी शुभेच्छा ! अनुजा शिंगटे यांनी केलेले संग्राचे मुखपृष्ठ अगदी साजेसे असेच झालेले आहे.परीसस्पर्श प्रकाशन प्रस्तुत "ज्ञानगीता " संग्रहाचे प्रकाशक आहेत.
-----------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय लेख -
अरुण वि. देशपांडे - पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२
-----------------------------------------------------------------------
ज्ञानगीता- काव्यसंग्रह
कवयित्री- विजया पाटील
पृ. ८०, मूल्य- रु. १५०/-
प्रकाशक- परीसस्पर्श पब्लिकेशन
टाळगाव, ता.कराड, जि.सातारा
मो.नं -९५ ५१ ७०१ ८०१
-----------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय लेख -
अरुण वि. देशपांडे - पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२
-----------------------------------------------------------------------
ज्ञानगीता- काव्यसंग्रह
कवयित्री- विजया पाटील
पृ. ८०, मूल्य- रु. १५०/-
प्रकाशक- परीसस्पर्श पब्लिकेशन
टाळगाव, ता.कराड, जि.सातारा
मो.नं -९५ ५१ ७०१ ८०१
