पुस्तक-परिचय -लेख-
ले- अरुण वि.देशपांडे.
-------------------------------------------------------------------
मुग्धायणी- कवितासंग्रह
"मंत्रमुग्ध करणाऱ्या रचना"
-----------------------------------------------
नियमित लेखनामुळे इंटरनेट, फेसबूक या माध्यमातून आता निशा डांगे"या कवयित्री म्हणून परिचित झालेल्या आहेत.याशिवाय
एक लेखिका ,आणि साहित्यक्षेत्रात एक कार्यकर्ता, कुशल आयोजिक- संघटक म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
"मुग्धायणी " या आकर्षक शीर्षकाने त्यांचा पहिला कविता संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. १२० पृष्ठांच्या पुस्तकात निशा डांगे"
या कवयित्रीच्या ७९ कवितांचा अविष्कार रसिकांना वाचावयास मिळतो. कवयित्रीची लेखन-निष्ठा आणि कवितेवर असलेली श्रद्धायुक्त
भावना " यामुळे या कविता लेखनासाठी कवयित्री म्हणून निशा डांगे घेत असलेल्या लेखन-परिश्रमांची कल्पना येते .
त्यांच्या कवितांचे "हे पहिलेच संग्रह-रूप असले तरी , त्यांचा लेखन-प्रवास मात्र नवखेपणाचा नाहीये , संग्रहातील ७९ विविध कविता
वाचून झाल्यावर जाणवते की या कवयित्रीच्या .. कविता .या लय , ताल ,यांचे भान सांभाळणार्या आहेत.
आपली कविता रसिकांच्या मनापर्यंत न्यायची असेल तर त्यासाठी . कवितेंत आशय नेमकेपणाने मांडता येणे साधले पाहिजे ",
निशा डांगे यांच्या कवितेने आशयभान जपलेले आहे.
मुग्धायणी" संग्रहातील कविता वाचून पाहिल्यावर कवीचे व्यक्त होणे "ही एक साधी गोष्ट नाहीये ,हे जाणवू लागते.कारण यात विविध
कविता प्रकार ,आणि भाव-भावनाचे अविष्कार व्यक्त झालेले दिसतील.
कविता सापडणे, तिची सोबत मिळणे, संवाद करणारे शब्द मित्र म्हणून मिळणे , आणि एक कवी म्हणून वाचकांशी भावबंध जुळणे"
कवीच्या वाट्याला येणारे हे भाग्ययोग .कवयित्री निशा डांगे यांच्या वाट्याला त्यांच्या कविता-लेखनामुळे आले आहेत .
कवयित्री -निशा डांगे यांच्या मुग्धायणी
या संग्रहातील कवितां बद्दल एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की- हे कविता लेखन त्यांनी मनातून ,समरस होऊन केले आहे.
मनातील सारे काही सांगण्यासाठी माझ्या शब्दातून मांडण्यासाठी
" माझी कविता आहे ना"! ही त्यांना त्यांच्या आतल्या मनाने दिलेली हाक आहे .
ही आंतरिक साद म्हणजेच रसिकांशी साधलेला संवाद म्हणजे निशा डांगे यांच्या कविता आहेत.
या संग्रहाचा आरंभ - त्यातली पहिली १७ पाने - ही कवयित्री निशा डांगे यांच्या कविता लेखनाबद्दल
मान्यवरांनी व्यक्त केलेल्या अभिप्रायपर मनोगतास दिलेली आहेत..
यात - आदरणीय डॉ. विजया वाड यांचे प्रास्तविक आणि मलपृष्ठावरचे समर्पक ब्लर्ब ,आहे .
तसेच अभिनेते भारत गणेशपुरे ..यांनी -कवितांची गाणी व्हावी "ही व्यक्त केलेली इच्छा आहे.
जेष्ठ साहित्यिक कवी "सुजन "(गझलकार- श्रीकृष्ण चंद्राकांत कीर ),यांनी कवितांच्या उल्लेखासाहित दिलेलेया रस-ग्रहण शुभेच्छा आहेत .
,"हिंदी-साहित्यिका -अनिता नाईक यांच्या शुभेच्छा ",मित्र-किशोर बळी यांच्या शुभेच्छा ,
या सोबतच
आम्ही लेखिका " या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष - मोहन कुलकर्णी ..यांनी कवयित्रीच्या कवितांचे ,लेखन प्रवासाचे केलेले कौतुक आणि आनंद " आहे.
याशिवाय कवयित्रीचे "जरासे मनातले .."हे मनोगत आहे.
ही अशी इतकी विविधता असतांना -मग .. माझ्या या परिचय लेखात ..मी पुन्हा कविता ओळींची उदाहरणे देणे " म्हणजे पुनरुक्ती करण्यासारखे आहे,
त्यामुळे या संग्रहातील कवितांची उदाहरणे देण्याचे टाळीत फक्त निशा डांगे यांचे "कवयित्री म्हणून त्यांच्या कवितांत मला जे जे जाणवले ते थोडक्यात
सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
लेखिका -कवयित्री - निशा डांगे यांच्या लेखन -प्रवासास शुभेच्छा
चित्रकार - अरविंद शेलार यांनी संग्रहाच्या शिर्षकानुरूप असे सुरेख ,आकर्षक असे मुखपृष्ठ केले आहे आहे.त्यांच्या कामगिरीला आदरयुक्त सलाम .
परीस पब्लिकेशन -सासवड , यांनी हा कविता संग्रह प्रकाशित केला आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक -परिचय
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - 9850177342
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कवयित्री -लेखिका
निशा डांगे
पुसद - जि.यवतमाळ
संपर्क- 8329065797
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मुग्धायणी-कविता संग्रह
निशा डांगे,
पृ. १२० , मूल्य- रू- १४०/-
प्रकाशक -
परिस पब्लिकेशन ,
सासवड , ता.पुरंदर , जि.पुणे.
संपर्क - 9049657965
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:
Post a Comment