Friday, March 13, 2020

#संवादिनीकथासंग्रह - भाग-१ ला

पुस्तकपरिचय - भाग - १
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
--------------------------------------
#संवादिनीकथासंग्रह - परिचय भाग- १ला
------------------------------------------------------------------------
नमस्कार मित्र हो -
आज दि.१६-०२-२०२० - रविवार - लुम्बिनी गार्डन -येरवडा येथे आपल्या कुबेर समूहाचा - कुबेर -साहित्यिक कट्टा -पुणे.
हा उपक्रम संपन्न होतो आहे
आजच्या या कार्यक्रमात माझा सहभाग मी "पुस्तक-परिचय " लेख स्वरूपात सदर करीत आहे
कुबेर समूहाच्या -कुबेर प्रकाशन विभागाच्या वतीने प्रकाशक श्री..संतोष जगन्नाथ लहामगे यांनी प्रकाशित
केलेल्या कुबेर समूहाच्या .संवादिनी - या दुसऱ्या कथासंग्रहाचा - परिचय करून देतांना
त्यातील काही निवडक कथांवर माझे अभिप्राय-मनोगत व्यक्त करणार आहे.
मित्र हो - या निमित्ताने कुबेर -समूह आणि त्यातील उपक्रमाबद्दल थोडेसे सांगणे योग्य होईल -
आभासी म्हणवल्या जाणाऱ्या फेसबुक जगतातच नव्हे तर प्रत्यक्ष्य सार्वजनिक जीवनात आपल्या अनेक सामाजिक उपक्रमामुळे सर्वांना परिचित
असलेल्या कुबेर -समूह , आणि कुबेर फौंडेशन " या नावांना आता नामांकित वलय नक्कीच प्राप्त झालेले आहे.
समूह संस्थापाक श्री.संतोष
जगन्नाथ लहामगे यांच्या संकल्पना नुसार कुबेर समूहाच्या माध्यमातून ,कुबेरकर सभासदांचे
सामाजिक कार्य सर्वोतोदूर सातत्याने चालू असते.
कुबेर समुहात फक्त सामाजिक कार्य-उपक्रमच चालू असतात असे मात्र नाही .या अशा उपक्रमा बरोबरच
"कुबेर -समुहात साहित्य-कला -संकृती - संगीत -आध्यात्मिक - योगसाधना - पारिवारिक - अशा विविध विषयावर कुबेरकर
व्यक्त होत असतात .
तर अशा कुबेर -समूहातील लेखक-कवी सभासदांसाठी कुबेर विविध साहित्य-विषयक लेखन उपक्रमांचे आयोजन केले जाते.
समूहाच्या साहित्यिक- कट्टा "या उपक्रमातून कुबेरकर साहित्यिक आपल्या साहित्याचे सादरीकरण करीत असतात .
कुबेर समुहाने ..कुबेर दिवाळी अंक २०१७ साली सुरु केला ,२०१८ आणि २०१९ ,अशी सलग तीन वर्षे
कुबेर दिवाळी अंकास उत्कृष्ट दिवाळी अंक " पुरस्कार प्राप्त झाले आहेत./ होत आहेत .
दिवाळी अंका पाठोपाठ ..कुबेर प्रकाशन सुरु झाले ..आरंभ " या कथासंग्रहापासून या उपक्रमाचा आरंभ झाला .
या यशानंतर कुबेर प्रकाशनाने
कुबेर समुहातील कथा-लेखकांच्या निवडक कथांचा संग्रह - संवादिनी " नुकताच प्रकाशित केला आहे.
समुहातील कथालेखकांचा एक विशेष ", इथे सांगणे महत्वाचे ठरेल ते म्हणजे ..
हे सगळे लेखक साहित्यिक क्षेत्रात नावलौकिक असलेले आहेत.त्यांचे स्वतःचे स्वतन्त्र असे विपुल साहित्य पुस्तकरूपाने अगोदरच प्रसिध्द झाले आहे
एका अर्थाने संवादिनी "हा प्रथितयश कुबेरकर कथा-लेखकांचा "प्रातिनिधिक कथा -संग्रह आहे ".
कुबेर समूहाच्या -संगमनेर येथे झालेल्या वार्षिक -स्नेह संमेलनात -दि.०५ जानेवारी -२०२० रोजी "संवादिनी "या कथा संग्रहाचे प्रकाशन झाले .
प्रस्तुतच्या संवादिनी कथासंग्रहातील चाळीस कथांचा एक समान -धागा असल्याचे मला जाणवले .. संग्रहातील बहुसंख्य कथा या पारिवारिक चित्रण असलेल्या आहेत.
यातील व्यक्तिरेखा ,त्यांच्यातील नातेबंध , परस्पर - भावना आणि त्यातील जाणीवा , यांचे चित्रण या कथातून लेखक -लेखिकांनी केले आहे .
सामाजिक आणि आर्थिक जीवनस्तर, त्यातील विषमता आणि संघर्ष "या कथातून प्रभावीपणे चित्रित झालेला आहे.
संग्रहातील एकूण ४० कथा पैकी लेखिकांनी लिहिलेल्या २४ कथा आणि १६ कथा- या लेखकांनी लिहिल्या आहेत.
संग्रहातील कथांच्या बद्दल काही निरीक्षणपर मत नोंदवतो आहे -
------------------------------------------------------------------------
या कथा शब्द संख्या -मर्यादेने फार मोठ्या नाहीत .
कथेच्या शिर्षकानुसार कथा साकारल्या आहेत .त्यामुळे कथा भरकटलेली नाही ",हे महत्वाचे आहे.
कथा लेखनाचे तंत्र आणि मंत्र " काटेकोरपणे सांभाळून कथा लेखन करणे हे सोपे नसते , ,संवादिनी "मधील कथा , कथा -लेखन -तंत्राची
फार तोडमोड करणाऱ्या नाहीयेत ",
या सर्व कथा आटोपशीर आणि वाचनीय झाल्या आहेत हे नक्की.
कथा लेखकांनी .कथेतील आशयाची नेटकी मांडणी करीत ,कथेतील व्यक्तिरेखांच्या भावना वाचकांच्या मनापर्यंत पोचविल्या आहेत ,
वरील विवेचनावरून हे कथालेखन छान जमून आलेले आहे "असे म्हणता येईल."
संवादिनी "मधील कथेतील व्यक्तिरेखा ठळकपणे आपल्या समोर येतात ..या व्यक्ती ..आपल्याला परक्या न वाटता .आपल्यातीलच वाटतात .
कथा-लेखकांच्या लेखनातील सहजता ",व सफाईदारपणा यामुळे या सर्व कथा वाचक सलगपणे वाचू शकतो ",हे या लेखनाचे यश आहे.
आज मी या संग्रहातील सहा कथा- लेखकांच्या कथा बद्दल सांगतो आहे
.. हे सहा लेखक आपल्या सोबत आजच्या साहित्यिक कट्टा "उपक्रमात सहभागी झालेले आहेत..
आपल्या सर्वांच्या तर्फे मी त्यांचे अभिनंदन करतो.
१. संग्रहाच्या अनुक्रमणिकेत क्रमांक -३ वर असलेली कथा -शीर्षक - "वटपौर्णिमा (पृ.२० )-ले- लक्ष्मीकांत रांजणे ..
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
या कथेतील "पांडू आणि बायडी ", या जोडप्याच्या संसारिक अवस्थेचे चित्रण लेखकाने अतिशय सुरेखपणे केले आहे. वरकरणी त्रयस्थपणाने पाहणार्यांना
नवरा-बायकोची ही जोडी ",त्यांच्यातील नाते विसंवादी आहे असेच वाटते . अगदी परस्पर -विरोधी मानसिकता असलेले हे जोडपे आहे., सामन्य परिस्थितीचे
आयुष्य आणि त्यातील जगणे या नवरा-बायकोच्या वाट्याला आलेले आहे..
पांडू आणि बायडी " या दोन विसंगत व्यक्तींना लग्नाच्या बंधनाने एकत्र आणले आहे . लग्न, विवाह ,आणि वैवाहिक जीवन " या संस्काराबद्दल लेखक -
लक्ष्मीकांत रांजणे ' यांनी मौलिक असे चिंतनपर विचार व्यक्त केले आहेत ..ते म्हणतात ..
" नवरा-बायकोच्या भांडणाच्या मुळाशी "खोलवर एक प्रेमाचा धागा गुंतलेला असतो ", आणि हाच धागा दोघांना घट्ट बांधून ठेवतो.
कथानायिका - बायडीच्या मनात ..वटपौर्णिमा "या सणाच्या दिवशी आपला नवरा -पांडू " एक दारुडा आहे ", ही भावना अजिबात येत नाही ,
त्याचे कारण - नवरा-बायकोच्या नात्यात असलेला .हा प्रेमाचा घट्ट धागा ", त्यामुळे आपल्या दारुड्या नवऱ्याशी -पांडुशी त्याची बायको-बायडी "हिचे वागणे
तडजोड वाटत नाही .
बायडीच्या अशा वागण्याचे समर्थन लेखकाने मनाला भिडणाऱ्या शब्दात केले आहे,
ते असे ....
"तडजोड हा विजय नाही - की - तो पराभवपण नसतो ", तो असतो माणसातील सोशिकतेचा विजय".
वटपौर्णिमा "या कथेची नायिका बायडी ", ही व्यक्तिरेखा या छोट्याशा कथेला एका वेगळ्या उंचीचे परिमाण देणारी आहे.
२.कथा -शीर्षक - भिन्न ..की अभिन्न ? (पृ.५८ )- ले- वैशाली फाटक -काटकर
------------------------------------------------------------------------------------------------------------
या कथेत दोन व्यक्तिरेखा - निकिता आणि रंजना यांची ही कथा आहे. सुखसंपन्न आयुष्य जगणाऱ्या निकिता मैडम,आणि अभावग्रस्त आयुष्य
जगावे लागणारी रंजना .
वरकरणी या दोन व्यक्तिरेखा जशा दिसतात , आतून मात्र त्या तशा नाहीत . दोघीही निराशा आणि वैफल्याने ग्रस्त झालेले
मन सोबत घेऊन जगत आहेत . पण दोघींच्या सारख्या भावना ..त्याची कारणे वेगळी आहेत ..ही कारणे म्हणजे या कथेचा विषय आहे.
विपरीत परिस्थितीवर मात करून आपली जगण्याची लढाई रंजना आनंदाने लढते आहे ", आणि निकिता मैडमला रंजनाच्या अशाच स्वभावाचा हेवा
वाटायला लागतो . कारण मैडमच्या वैभवसंपन्न आयुष्याला -त्यातील जगण्याला "एक कमीपणाची झालर आहे ", ही खंत खूप वेदनादायक आहे ,
या भावनेमुळे मैडमना रंजनाच्या संसाराबद्दल असूया वाटू लागते , तिच्या मनाबद्दल आपल्या मनात हेवा-मत्सर "या भावना जागृत होतात ",याची जाणीव
निकितामैडमना अधिकच व्यथित करून टाकते .
स्वतःच्या सुरक्षित दिसणार्या जीवनातील "असुरक्षिता त्यांच्या मनाला अधिकच एकाकी बनवणारी आहे ",आणि ही जाणीव निकिताच्या मनाला खूपच
बोचरी आणि दुखदायी वाटणारी आहे.
हे कथा -दोन स्त्रियांची आहे यातील निकिता -यांच्याकडे सगळं असूनही ,हातात मात्र काहीच नाहीये ,आणि..
खूप काही नाही हे जाणवून देखील ..आहे त्यात आनंद मानीत ,मोठ्या हिम्मतीने जगणारी , न मोडणारी - न वाकणारी रंजना ",
ही रंजना "या कथेची लक्षवेधी नायिका ठरावी.
अशा या दोन व्यक्तिरेखा ठळकपणे वाचकांच्या मनात नक्कीच साकारून येतात .
लेखिका -वैशाली फाटक -काटकर यांची लेखनशैली कथेला रोचक बनवणारी आहे.
३.
कथा - शीर्षक - "सुटका "..(पृ..१२० ).ले- प्रल्हाद दुधाळ
---------------------------------------------------------------------------------------------------------
उत्तम लेखक म्हणून प्रसिध्द असलेली प्रल्हाद दुधाळ यांचे ललित लेखन संग्रहरूपाने प्रसिध्द आहेच. या लेखकाचे कथालेखन ही
प्रवाही आणि ओघवत्या शैलीतले आहे.
संग्रहातील त्यांची कथा सुटका - कथानायिका लता ", तिच्या आयुष्यात झालेल्या लग्नरूपी फसवणुकीमुळे तिला सोसाव्या लागलेल्या वेदनांची
करूण- कहाणी आहे.
आजकाल विवाह जुळणे , लग्न-जमणे या गोष्टी online -विवाह जमवून देणाऱ्या संस्थामुळे ,वेबसाईट मुळे सोपे झाले आहे .
या माध्यमातून
कशी फसवणूक होऊ शकते याची ही कथा आहे.
एका अर्थाने " एका महत्वाच्या सामाजिक गरजेच्या समस्येवर ही कथा भाष्य करते आहे ..ही समस्या येत्या काळात उग्र स्वरूपातील भीषण असे
संकट ठरू शकते ",असे सूचक कथानक "सुटका " या कथेतून लेखक प्रल्हाद दुधाळ यांनी मांडलेले आहे.
कौटुंबिक जीवनात भावनिक वातावरण , परस्परतील विस्वास , संकटकाळी असणारे आधाराची माणसे "या सर्व गोष्टी किती मोलाचे असतात ",
या कथेतून लेखकाने फार सुरेखपणे चित्रित केले आहे .
लतावरील संकाटात ..तिच्या सोबत असणाऱ्या इतर व्यक्तिरेखा म्हणूनच कथा -
नायिके इतक्याच महत्वाच्या ठरतात.
लताच्या मानेवरचे ओझे उतरवणे , या जोखडातून तिची मुक्तता होणे " हीच तिची "सुटका " आहे हे या कथेतून प्रभावीपणे व्यक्त झाले आहे.
रसिक -वाचक मित्र हो , कुबेर प्रकाशनच्या- या नवीन कथा संग्रहाचा परिचय वाचून इतर कथा वाचण्यासाठी आपण
संवादिनी "हा कथा संग्रह जरूर घ्यावा .
--------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक परिचय -
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२
----------------------------------------------------------------------------------------------
संवादिनी -
कथा -संग्रह
पृ.१९६ , मूल्य- रु.२५०/-
प्रकाशक -
कुबेर प्रकाशन
संतोष जगन्नाथ लहामगे,
संगमनेर
संपर्क - ९९२२१११६६६
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
भाग-२ रा लवकरच ....

No comments:

Post a Comment