कवयित्री- किरण पिंपळशेंडे यांच्या- कोवळी किरणं"या कविता संग्रहाचा परिचय करून देणारा लेख-
पुस्तक-परिचय - ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
---------------------------------------------------------------------------------------------
कविता संग्रह - कोवळी किरणं "
-किरण पिंपळशेंडे
"मनास तजेला देणाऱ्या कविता -"
----------------------------------------------------------------------------------------------------
कविमन हे कायमच अस्वथ असते , त्याची ही अस्वथता व्यक्त झाल्या शिवाय थांबत नाही , यासाठीच त्याची कविता
त्याला मदत करीत असते . भावनांचा कोंडमारा , विचारांची घुसमट ..हे कविमन नेहमी अनुभवत असते , याची परिणीती
मग कवितेतून अभिव्यक्त होण्यात असते.
हे सगळी लक्षणे कविमन लाभलेल्या आणि आता कवयित्री म्हणून ओळखल्या जाणऱ्या किरण पिंपळशेंडे यांच्या व्यक्तीमत्वात 'आहेत असे म्हणता येते .
शब्द-मोहिनी "हे त्यांचे पहिले पुस्तक .. (चारोळी संग्रह) प्रकाशित झालेले आहे . चारोळी लेखन "हे कवितेंच्या प्रवासाची एक आश्वासक
सुरुवात असते ", किरण पिंपळशेंडे यांची लेखन वाटचाल पाहिली असता लक्षात येणारी ही गोष्ट आहे.
आपण जे पाहतो ..ते पाहून विसरून जाणे "हा सामान्य माणसांचा स्वभाव असतो, पण कविमनाचे तसे होत नसते ..त्याची कविता त्याला
परिस्थितीची जाणीव देत असते , भाव्तालीचे भान त्याला देत असते ..हे सर्व तो कवितेच्या मदतीने कधी व्यक्त करतो .
.ही अंतरीची ओढ ,आणि त्याच्या मनाची असोशी
.कोणत्याच कवीला शांत बसू देत नसते .. असे असतांना कवयित्री -किरण पिंपळशेंडे ..यांच्याही मनाची होणारी "घुसमट "
ज्या कवितेतून व्यक्त होते ती कविता ..या संग्रहातील ..शेवटची कविता आहे..
या कवितेतून कवीमनाची अवस्था खूप स्पष्टपणे जाणवते..
" घुसमट मनातली माझ्या
सांगू कशी कुणाला मी
व्यथा जीवनाची माझ्या
मांडू कशी शब्दात मी .. (घुसमट ..पृ..८० ),
कवयित्री किरण पिंपळशेंडे .यांचे कविता लेखन ..इंटरनेटच्या माध्यमातून , फेसबुक समुहातून वाचकांच्या समोर नियमितपणे येत असते.
या माध्यमामुले .. कवयित्री म्हणून त्यांची ओळख झाली आहे ..या आभासी दुनियेबद्दल व्यक्त होणारी कविता ..
"फेसबुकची आहे आभासी दुनिया
ह्या आभासी दुनियेची भारीच किमया ..!!! (पृ..३५ )
या आभासी दुनियेने भारी किमया केलीय आणि त्यांच्या कवितेला रसिकांच्या पर्यंत नेले आहे.
शब्दकळा प्रसन्न झाल्याशिवाय ..शब्दाचे सामर्थ्य जाणवत नाही ..आणि शब्द "हेच कवीचे अस्त्र आणि शस्त्र असते ", या शब्दांची मोहिनी
कविमनाला कविता लेखनासाठी प्रेरणा देत असते.. अशा या शब्दांच्या बद्दल कविमनात अपार भाव असणे अगदी सहाजिक आहे.
मनोगतातील कवितेत कवयित्री म्हणते -
"शब्दच अस्तित्व अन
शब्दांनीच दिली ओळख मला ...!!
शब्दच जीवन अन
शब्दांनीच जगणे शिकवले मला ..!!!
अशी शब्द-सोबत लाभली की मग, काय विचारावे .. काय काय सांगू , कसे कसे सांगू , किती सांगू ? असे प्रश्न पडतात आणि एकेक कविता
शब्दरूपात येते. कवितेशी जुळलेले नाते आणि कवी कविता कालिहितो ..? याचे उत्तर स्वतहा कवयित्री देते आहे..
खरच कविता माणसाला वेडं बनवते,
का वेडा माणूस कविता बनवतो ..!
असे वाटून आता उपयोग ही नसतो ..ते कसे ते या ओळीत पहा...
जीवनावर लिहावी , नात्यावर लिहावी ,
निसर्गावर लिहावी का प्रेमावर लिहावी ..
पण मला ती कशावरही लिहावीशी वाटते ...! (कविता ...पृ..३२ ),
कविता लिहितांना विषयाचे बंधन नकोच आहे ,आणि ते नकोसे वाटणारे असते , कारण कविमन मुक्तपणे व्यक्त होण्यासाठी अधीर झालेले असते ..
जे पाहिले , जे दिसले , त्या नंतर मनात जेजे काही तरंग उमटले ..त्या विचारांना कविता रूप देणे " त्याशिवाय कविमन शांत बसत नाही ",
अशी भारावून जाण्याची सवय कवयित्री पिंपळशेंडे यांच्यातील कवयित्रीला खूपच आहे "
त्यामुळे त्यांची कविता आजूबाजूचे सारे काही दाखवते ..ते शब्दातून आपल्याला दिसत नाही . असे असले तरी कविमनाने काय पाहिले आहे '
याबद्दल कवयित्री अगदी आंतरिक तळमळीने सांगते .. हे सांगणे म्हणजेच .."कवयित्री किरण पिंपळशेंडे यांची कविता
आहे " अशी ओळख निर्माण करणार्या कविता या "कोवळी किरणं " संग्रहात आहेत.
"पण मला ती कशावरही लिहावीशी वाटते . , या स्वतःच्या भावनेशी कवयित्री अगदी प्रामाणिक आहे, याच निर्मल भावनेचा
स्पर्श या सगळ्याच कवितांना झाल्यामुळे हा कविता संग्रह " कोवळी किरणं या नावाला अधिक अर्थपूर्ण करणारा आहे असे म्हणावेसे वाटते.
या कवितेला आणखी एक भावनेचा लोभस असा स्पर्श झालेला आहे ..हे भावना आहे परस्पर जिव्हाळ्याची ,व्यक्ती विषयक , आणि विविध
नाते- संबंधाबद्दलच्या कवितेतून व्यक्त होतांना कवयित्री अत्यंत भावूकपणे या सर्वांच्या बद्दल व्यक्त होते .
काही शीर्षक .. "आईस अर्पण , सुरेश भाऊ , चंदना , गुरु , नवरा , घनश्यामकिरण ", जोडीदार "
या अशा अनेक कविता भावनिक हळवेपणा जपणार्या आहेत.
कोवळी किरणं " संग्रहात एकूण ६२ कवितांचा समावेश आहे, संग्रह वाचून झाल्यावर ..वाचकांच्या मनात काही एक विचार सुरु करणे "
ही प्रक्रिया या कविता नक्कीच पार पाडतात .
कवी -मनास तटस्थ राहता येत नसते ..सगळ्या जगाशी त्याची बांधिलकी असते " या व्यापक भावनेचे
स्वरूप मात्र वेगळे असते .. ही बांधिलकी कधी भावनिक असते , कधी वैचारिक तर कधी व्यावहारिक असते ..
असे असले तरी ..एक कवी म्हणून व्यक्त होणे "ही एक जाणीव कवीस असते , यातूनच मग त्याची कविता त्यास अभिव्यक्ती प्रेरणा देत असते.
त्या दृष्टीने कवयित्री -किरण पिंपळशेंडे भाग्यवान आहेत "असे मी म्हणेन . त्यांची कविता कायम त्यांच्या सोबत असते..
या कवयित्रीचा हा प्रवास यापुढे ही सजगतेने चालू राहावा यासाठी खूप खूप शुभेच्छा .
"कोवळी किरणं "हा कविता संग्रह अतिशय आकर्षक स्वरूपात प्रकाशित केल्याबद्दल शब्दश्री प्रकाशन पुणे ,व प्रकाशिका - सौ.चंदना सोमाणी ,
आणि सौ.वनिता कोरटकर यांचे अभिनंदन .
संग्रहाचे अनुरूप असे मुखपृष्ठ करणारे कलावंत - बुद्धभूषण साळवे यांचे अभिनंदन.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय -
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - 9850177342
--------------------------------------------------------------------
कवयित्री - किरण पिंपळशेंडे
संपर्क- 9960352905
------------------------------------------------------------------------------------
कविता संग्रह - कोवळी किरणं "
-किरण पिंपळशेंडे,
पृ.८० , मूल्य- १२०/-
प्रकाशक - शब्दश्री प्रकाशन , पुणे.
संपर्क -9623030870 / 8788987022
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:
Post a Comment