Friday, March 13, 2020

पुस्तक-परिचय लेख -भाग-३ रा . ले- अरुण वि.देशपांडे . पुस्तक- संवादिनी कथासंग्रह


#संवादिनीकथासंग्रह - परिचय - भाग-३ रा 

कथा -१.तेजस भातकुलकर ,२.विशाल पोतदार ,३. प्रसाद भि.देशपांडे
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नमस्कार मित्र हो -
या तिसऱ्या भागात खालील कथांचा आस्वाद -परिचय करून देतो आहे, या मुळे "संवादिनी"
कथा संग्रह तुम्ही नक्की खरेदी करून वाचाल.
आस्वाद परिचय लेखन-
-अरुण वि.देशपांडे-पुणे.
9850177342
-----------------------------------------------------
१.
कथा -शिर्षक-
प्रतीक्षा युगायुगांची ..(पृ.७ )..
ले- तेजस भातकुलकर-- वर्धा
---------------------------------------------------------------------------------------------
.एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून - वर्ध्याचे कुबेरकर तेजस भातकुलकर हे कुबेर समुहात सर्वपरिचित आहेत.
कुबेर प्रकाशनाने ..या संग्रहासाठी समूहातील साहित्यिकांच्या कथा मागवल्या होत्या .निवड समितीने या कथांना गुण-प्रप्तीनुसार
या कथांची निवड केली आहे .
या निवड-क्रमवारीत तेजस भातकुलकर यांची कथा -
"प्रतीक्षा युगायुगांची " सर्वाधिक गुण मिळवणारी कथा ठरली .
या बहुमानाने साहजिकच या कथेविषयी खूप उत्सुकता होती की..या कथेत नक्कीच काही विशेष असणार आहे ..
कथा वाचून झाल्यावर मनात एक प्रश्न उपस्थित झालाच ,तो म्हणजे-
कथा-तंत्र निकषानुसार ही कथा परिपूर्ण कथा "आहे का ?
मग ही कथा .या संग्रहात कशी आली ?
या प्रश्नाचे उत्तर कथेत माझ्या परीने मी शोधण्याचा प्रयत्न केला .
याचे उत्तर मला सापडले सुद्धा-
हे उत्तर आहे ते "- या कथेच्या विषयात आणि त्याच्या आशयात आहे, लेखकाने ललित लेखनाच्या शैलीत खुलवला आहे."!
.रुढार्थाने या कथेची नायिका " मोहिनी ", हे एक स्वर्गीय अशी अप्सरा आहे.
सौंदर्यवती मोहिनी - तिच्या स्वभावामुळे , अनावर भावनेमुळे अपराध करून बसते ..अशा अनावर भावना नियंत्रित करू शकलो नाहीत तर काय होते..?
याची ही कथा आहे..भावनांच्या भरात मोहिनी एका योगी-तपस्व्याची -तपो -साधना भंग करते ,परिणामी क्रोधीत योगी तिला शाप देतात आणि तिला मिळणार्या
शापामुळे ती या भू-तालावर येते .योगी महाराज मोहिनीला शाप देतात की-
"कामवासनेने ग्रस्त तुझा देहच तुझ्यासाठी संकट ठरणार आहे ",या पृथ्वीवरच तुला तुझे पुढचे जीवन व्यतीत करावे लागेल .समस्त पुरुष तुझ्या
देहासाठी आसुसलेले असतील आणि तुला कधीही मन:शांती मिळणार नाही ..."
शाप असला की त्याला उ:शाप असतो ..तसा तो मोहिनीला पण मिळतो .
शापित मोहिनीचे येणे आणि शापमुक्त होणे ...यातला कालखंड हजारो -शेकडो वर्षांचा आहे...एक स्त्रीच्या वाट्याला जे जगणे येते ,
त्यातील वेदना ,दुक्ख ,अवहेलना ..हे सारे त्यावेळी जसे होते. ते सारे आजच्या स्त्रीच्या वाट्याला जसेच्या तसे आले आहे ,उलट ही परिस्थिती
अति-भीषण ,भयावह अशी होते आहे .हा प्रवाहच या कथेचा आशय,आहे असे म्हणता येईल.
"मोहिनी "एक स्त्री-व्यक्तित्व न वाटता वर्षानु-वर्षे भोग भोगीत शाप-मुक्त होण्याची वाट पहाणारी दुर्दैवी स्त्री वाटते.
पुरुष , पुरुष -स्वभाव , स्त्री- आणि स्त्री -देहाविषयी त्यांच्या मनात असलेल्या वासनेच्या भावना .,हा वासना प्रवाह हजारो -शेकडो वर्षपासून वाहतो आहे ..
स्त्री म्हणजे -फक्त एक मादी आणि उपभोगाची वस्तू आहे असे मानणारे पुरुष ती या शापित जीवन-प्रवाहात पहात आली, अनुभवत आली
.हजारो वर्षे .होऊन गेली .यात काहीच बदल झाला नाही ,हे सत्य मोहिनी तिच्या शापित जीवनात अनुभवते .
या शापातून मुक्त होण्यासाठीची .योगीने घातलेली अट -ती अशा वातावरणात पूर्ण होणे किती कठीण आहे.?.ही भयंकर स्थिती मोहिनीचे दु:खः वाढवणारे आहे. .
ती अट- काय आहे ?, मोहिनीला शापमुक्त करणारा पुरुष तिला कधी भेटतो ? हे सर्व खूप रंजक आहे.
मोहिनीला आलेले जीवन-अनुभव सामाजिक जीवनाच्या विकृत -रूपावर प्रखर प्रकाश पाडणारे आहेत. मोहिनीच्या मनोगतातून व्यक्त केले गेलेले -
- हे भयानक वास्तव वर्तमानाला पुरेपूर लागू होणारे आहे , या विखारी -वृत्तीचे अस्वथ करून टाकणारे चित्रण " या कथेला सामान्य कथेपासून वेगळे ठरवणारे आहे.
लेखक तेजस भातकुलकर यांनी हे कथा लेखन ललित-रम्य निबंध - लेखन शैलीत आणि
अधिकांश लेखन निवेदनात्मक - वर्णनातून केले आहे .
त्यामुळे . परिसर -तपशील , व्यक्ती -रूप तपशील ,आणि इतर सविस्तर
तपसील वर्णनातून ही कथा पुढे पुढे जाते.
या कथालेखनाची भाषा, अलंकारिक - शब्द योजना " हे जरी खूप छान आणि वाचनीय असले तरी
या कलाकुसरीच्या मोहात लेखक जास्तच रमून गेले आहेत असे जाणवले .
यामुळे एक झाले ते म्हणजे --नायिका मोहिनीची कथा -,आणि तिची व्यथा झाकोळून गेली आहे असे म्हणावे वाटते.
अशी लेखन शैली नेहमीच अनुरूप ठरेल का? याचा विचार लेखक म्हणून तेजस भातकुलकर यांनी जरूर करून पहावा.
लेखकास पुढील लेखनासाठी लेखन शुभेच्छा.
-------------------------------------------------------
२.
कथा -शिर्षक-
जड झालेला रुपया- (पृ- १६ ), ले- विशाल पोतदार -सातारा
---------------------------------------------------------------------------------------------------
विशाल पोतदार यांनी आपल्या कथेतून दोन जिवलग मित्रांच्या 'सत्तर वर्षांच्या मैत्रीचा मोठा पट अगदी मोजक्या शब्दातून .आणि ते ही विषयापासून अजिबात न
भरकटलेल्या छोट्याश्या कथेतून अतिशय सुरेख फुलवला आहे.
या कथेतील महादेव .ज्याला महादू ..म्हादू असे म्हणतात ,आणि त्याचा मित्र दत्तू ..या दोघा मित्रांच्या बालपणीच्या काळात घडलेली घटना-
"गोऱ्या साहेबांच्या कडून दत्तूला बक्षीस म्हणून मिळालेला रुपया ..त्याच दिवशी हरवतो ....दत्तूला कुत्रा चावतो ..त्यात दत्तू
एका मोठ्या दगडावर आपटतो ...हा अपघात दत्तुचे जीवन दुक्ख्मय करणारा ठरतो , या अपघातात ..दत्तूची वाचा जाते .
खरे तर म्हादू..त्याला सापडलेला दत्तुचा रुपया ,त्याच्या जवळ आहे हे लपवून ठेवतो .पण आपल्या मित्राची अपघातात झालेली अवस्था पाहून .त्याला
रुपया आपल्या जवळ आहे "या विजयाचा आनंद होत नाही आणि महादू दत्तुचा .तो रुपया त्याला न देता
अंधारात भिकावून देतो ..फेकून दिलेला रुपया कुठे पडतो ? कुणालाच माहिती नसते .
दत्तुचा रुपया आपल्या जवळ होता ..हे न सांगणार्या म्हादुच्या मनात आपण मित्राला फसवले हे गोष्ट पुढे आयुष्यभर सलत राहते.
महादूच्या मनाला मत्सराचा एक क्षण ",पुढे आयुष्भर त्या जड रुपयाचे ओझे घेऊनच जगायला लावतो " त्याचीच ही कथा आहे.
पुढच्या काळात महादूला -तात्या आणि दत्तुंला बाबा "म्हणतात सगळे ..
या मित्रांच्या आयुष्यात पुन्हा अपघाताने .तो रुपया परत येतो ",त्या नंतर काय होते ?
कथेचा शेवट खूप परिणामकारक केला आहे . मनावरचे जड ओझे कसे हलके होते ..?
म्हदुच्या आणि दत्तूच्या मैत्रीची ही हृदुयस्पर्शी कथा आवर्जून वाचावी.
विशाल पोतदार यांना उत्तम कथा -लेखन जमले आहे ,याची प्रचीती "जड झालेला रुपया " या भावनिक कथेतून वाचकांना नक्कीच येईल.
त्यांच्या लेखन-प्रवासास शुभेच्छा.
------------------------------------------------------
३.
कथा - शिर्षक
-सर्कस
ले- प्रसाद भि.देशपांडे - बडोदा (गुजरात )
-----------------------------------------------------------------
साहित्यिकांच्या नव्या पिढीतील एक प्रतिभावान साहित्यिक म्हणून प्रसाद भि.देशपांडे ओळखला जातो.
उत्तम कवी असलेला प्रसाद तितकाच कसदार कथा लेखक आहे. हे त्याच्या साहित्य वाचनावरून जाणवते .
संवादिनी "संग्रहात ..त्याच्या "सर्कस " या कथेचा समावेश आहे.
या संग्रहात वेगळ्या विषयावरच्या मोजक्याच कथा आहेत ..असे मला जाणवले ..त्यात प्रसादच्या "सर्कस " कथेचा मी
उल्लेख नक्की करीन.
आपल्या समाज -मनाने काही गोष्टींच्याबद्दल काही एक निकष ठरवून ठेवलेले आहेत ..जसे माणूस,त्याचे रंग आणि रूप , त्याचे बाह्यरूप ,
या पेक्षा एखादा माणूस जर वेगळा असला ,तो दिसला की तो इतर माणसांच्या कायम कुचेष्टेचा विषय होऊन जातो .
बुटका माणूस, कुरूप माणूस , रंगाने काळाकुट्ट असलेला माणूस , अगदी ताडमाड उंची असलेला माणूस सुद्धा ,नेहमी चेष्टेचा ,
टिंगल -टवाळीचा विषय असतो.
शारीरिक व्यंग असलेला माणूस देखील यातून सुटत नाही. जणू धडधाकट आणि अव्यंग तेवढीच साजरी ,बाकी सारी हसण्यासाठी .
सर्कस " कथेचा नायक ..येशा ,,त्याची कमी उंची "हे त्याचे शारीरिक वैगुण्य ,त्यावर मात करून तो उत्तम कसरतपटू होतो ,
" उपजत विनोदबुद्धी -'या देणगीच्या जोरावर .. त्याला महत्वाचे स्थान मिळते .पण या सगळ्या मेहनतीचा काही उपयोग नाहीये .
हे कटू सत्य त्याला कळते ,ते..मंजुळा मुळे.., येशाच्या एकतर्फी प्रेमाचा ती ज्या पद्धतीने अवमान करते , हेटाळणी करते ,
त्यात तो अनाथ असल्याचा उल्लेख करते ,त्याची लायकी काढते , मंजुळा येशाशी अतिशय वाईट पद्धतीने वागते.
तिच्या कडून झालेला अपमान आणि उपहास मनात घेऊन येशा सर्कशीची दुनिया सोडून बाहेरच्या दुनियेत येतो..
हा या कथेला वळण देणारा महत्वाचा प्रसंग आहे..
नंतर मात्र ही कथा वेगळेच वळण घेते ..उत्तरार्धात -एखादा थ्रिलर -पिक्चर पाहतो आहोत .असे वाटणारे कथानक आपल्याला वाचण्यास
मिळते .
येशा हा व्यंग असलेला माणूस आहे, पण तो आहे संवेदनशील मनाचा ..म्हणूनच हार न मानता ,अन्यायाशी लढण्याची
त्याची कणखर मानसिकता लेखक प्रसाद भि.देशपांडेने प्रभावीपणे जाणवून दिली आहे.
नायक-येशा भोवती कथा फिरेल याची दक्षता लेखक घेतो ,त्यामुळे एक माणूस म्हणून येशा "वाचकांच्या मनावर ठसतो .
छान कथालेखनाबद्दल लेखकाचे अभिनंदन.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कथा-आस्वाद लेखन-
-अरुण वि.देशपांडे-पुणे.
9850177342
----------------------------------------
संवादिनी -
कथा -संग्रह
पृ.१९६ , मूल्य- रु.२५०/-
प्रकाशक -
कुबेर प्रकाशन
संतोष जगन्नाथ लहामगे,
संगमनेर
संपर्क - ९९२२१११६६६
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
भाग- ४ लवकरच ....

No comments:

Post a Comment