Tuesday, March 31, 2020

संवादिनी कथासंग्रह परिचय लेख - भाग-४ था



#संवादिनीकथासंग्रह - परिचय

भाग - ४ था - ले- अरुण वि.देशपांडे
कथा -लेखिका - १.. निशा डांगे , २..पूजा लबडे-देसाई , ३..अलका वेद स्वप्नाली
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
रसिक वाचक हो नमस्कार ,
पहिले तीन लेख वाचल्यावर तुम्हाला कल्पना आलीच असणार ..की कुबेर समूह प्रकाशित - "संवादिनी "
या कथा -संग्रहातील कथांच्या मध्ये विषय विविधता आहे, नाविन्यपूर्ण मांडणी आहे ,कथालेखनाचे हे दोन मुख्य
घटक या संग्रहातील कथांमधून तुम्हाला नक्कीच जाणवतील .
आजच्या लेखात ज्या कथांचा आस्वाद-परिचय करून देणार आहेत त्या कथा या 3 लेखिकांच्या आहेत .
यातील पहिली कथा -
----------------------------------
१.कथा -
शीर्षक - वाळवी - (पृ.२७ )- ले- निशा डांगे-यवतमाळ
----------------------------------------------------------------------------------------------
या संग्रहातील विस्ताराने सर्वात मोठी असलेली कथा , "वाळवी " .
एखाद्या मेलोड्रामा फिल्मची स्क्रिप्ट वाटेल . या कथेतील व्यक्तिरेखा ..मधुरा आणि तिचा नवरा - विठ्ठल ..
दोन टोकाच्या आणि परस्पर विरुद्ध असणार्या आहेत.
..मधुरा "या नायिकेसमोर तिचा नवरा - विठ्ठल "
खलनायक वाटणारा माणूस आहे, त्याची वर्तन पद्धती , त्याला फक्त मधुरेचा जणू सूडच घायचा आहे,अशी आहे.
पती म्हणून तो विजोड आहे .
पत्नी म्हणून मधुराशी असलेलेले त्याचे नाते ..केवळ " त्याच्या सुख-सोयीसाठीचे आहे "असे समजून वागणारा हा विठ्ठल .
मधुराच्या आयुष्याला लागलेली वाळवी " आहे असे नक्कीच वाटेल.
मधुरा आणि विठ्ठल ..यांच्यातील नाते ..हे मधुरावर सर्वाथाने एक लादलेले नाते आहे . नायिका -मधुरा ही व्यक्तिरेखा
असहाय ,हतबल, सारे काही सहन करणारी "स्त्री "आहे .अशा स्त्रिया आपल्या अवतीभवती असणे अगदीच अशक्य नाहीये "
लेखिका निशा डांगे .यांच्या वाळवी "या कथेतील सर्व व्यक्तिरेखा "टेलर -मेड "आहेत असे म्हणावे वाटते
"ज्या कथानाकानुसार बेतलेल्या आहेत असे म्हणू या...त्यामुळे त्या खऱ्या-खुऱ्या न वाटता फक्त कथेचा भाग आहेत वाटून जातात .
यातील प्रसंग आणि घटना यांचे अगदी क्रमाने येणे .म्हणजे नायिकेवर -मधुरेवर कोसळणारे एक एक यातनादायक प्रसंगच आहे.
मधुराच्या वाट्याला आलेले अखंड दुर्दैव .आणि यास कारणीभूत ठरलेला विठ्ठल .वाचकांच्या लक्षात लक्षात राहील..
लेखिका -निशा डांगे यांच्या लेखनातील सफाईदारपणा , भाषा आणि वर्णन-शैली , बारकाईने केलेले सगळे वर्णन या गोष्टीमुळे
वाचक "वाळवी " कथा समरस होऊन वाचतील .
लेखिका -निशा डांगे यांच्या लेखनास शुभेच्छा .
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कथा -२
शीर्षक -झाड ,(पृ.३८ ) ले- पूजा लबडे -देसाई ,पुणे .
---------------------------------------------------------------------------------------
संवादिनी कथासंग्रहातील - झाड "ही कथा - "एक वेगळी कथा आहे " असा उल्लेख करावा लागेल.
लेखिका -पूजा लबडे -देसाई यांची ही कथा आरंभापासूनच वाचकांच्या मनात मोठेच कुतूहल जागृत
करण्यात यशस्वी होते . ज्याला आपण वातावरण निर्मिती म्हणतो ते ."झाड "या कथेत छान जमून आले आहे.
चौधरी डेवलपर्स ",या संस्थेचे मालक मंगेशराव यांना वेड लागलाय ", झाड झालायं त्या बाबांचं " ,अशा वर्णनाने कथा पुढे सरकते ,
त्या वरून ही गूढ कथा वाटू लागते .. आणि घडणाऱ्या घटना या गुढतेत अधिकच भर टाकीत जातात . अशा प्रकारच्या कथेत
असणारे प्रत्येक पात्र आपल्या वागण्याने रहस्य वाढवत जाते.
आणि ही गूढता अधिक गहिरी कशी होत जाईल "याची काळजी घेत लेखिका पूजा -लबडे देसाई यांनी आपल्या छोट्या कथेत छान रंग भरले आहेत .
कथेचा पूर्वार्ध - आबासाहेबांच्या संपती आणि त्याच्या विल्हेवाट याबद्दलचा आहे,त्यांच्या आकस्मिक निधनाने या कथा विषयाची
गूढता अधिकच वाढते , हे सारे काही आबासाहेबांच्या संपत्ती मिळवण्याच्या हव्यासापोटी चालू आहे असेच वाटू लागते ..,
आणि अचानक ही कथा एका वेगळे वळण घेते . अनेक अनाकलनीय आणि संशयास्पद घटना घडत जातात , त्या सर्वांनाच
चक्रावून टाकणाऱ्या आहेत .
नवीन प्रोजेक्ट ,प्रोजेक्ट साईट , साईटसाठी ताब्यात आलेली जमीन ,प्रोजेक्टवर काम करणारी माणसे , यांच्यावर अचानक संकट
कोसळते , पण हे नेमके काय हे मात्र कळत नाही , माणसांचे गायब होणे , साईटवर आणि आजूबाजूला वेगाने उगवणारी
झुडूप आणि मोठी झाडं" हे काय आहे ?
या सगळ्या रहस्याचा उलगडा होतो त्यामागचे कारण अनपेक्षित आहे.
जे वाचून वाचक म्हणेन बापरे .हे असे असू शकते ?
त्यासाठी पूजा लबडे -देसाई यांची "झाड " ही कथा वाचायला हवी आहे.
त्यांच्या भावी लेखन प्रवासास शुभेच्छा.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
३.
कथा - शिर्षक- तो आणि ती ", (पृ. ४२ ), ले- अलका वेद स्वप्नाली
---------------------------------------------------------------------------------------------
कथा-लेखिका अलका वेद स्वप्नाली यांची"तो आणि ती " कथा अगदी ".कथेच्या फ्रेम मध्ये अगदी बंदिस्त आहे.पूर्ण कथा "तो आणि "ती"
यांच्या भोवती फिरते, विषयाला धरून हे कथालेखन असल्यामुळे कथेतील "तो आणि ती",या व्यक्तिरेखा ठळकपणे समोर येतात.
"तो आणि ती " , यांना व्यक्ती -नावे नाहीत , तरी यामुळे काहीच अडलेले नाहीये हे विशेष.
एका पती पत्नीच्या संसारिक जीवनातील "वादळ-वाटांची "ही प्रत्यकारी अशी भावनिक कथा आहे.
या कथेतील "ती " हे प्रधान -व्यक्तिरेखा आहे ,आणि तो" तिचा सर्वस्व आहे,हे तिच्या मनातल्या
भावनिक विचारांमुळे सतत जाणवते .
विसंवादात ही एक संवाद होत असतो जो , तो कसा एकमेकांना समजून घेण्याचा एक प्रवास आहे,.. हे या कथेेेतूून जााणवलेेेल सार आहे.
यामुळेच खरेतर "तो "आणि "ती "सावरले जातात याचे श्रेय एकट्या .. "ती " चे आहे.
या कथेतील "तो ला स्वतः बद्दल झालेली जाणीव - "यश मिळवायला शिकलो मी , पण अपयश
पचवायला शिकलो नाही ",हे जााणवण्याचे कारण-
'कसोटीच्या क्षणी या "तो च्या पाठीशी .."ती " भक्कमपणे उभी रहाते ," हे आहे.
स्त्री-व्यक्तिमत्वातील आणि कथा नायिका "ती " च्या
मनात असलेल्या वात्सल्य -भावनेचे उदात्त असे भावदर्शन " लेखिकेने "ती "च्या व्यक्तीमत्वातून
खूप छान घडवले आहे.
"ती " म्हणते लग्न म्हणजे खेळ नाही ..,जमलं नाही ,आवडले नाही , की डाव मोडायला ..
आपले कल्चर सुद्धा नेहमी हेच सांगत आले आहे.
कुटुंबातील सर्वांची एकमेकांना साथ-सोबत हवी तरच मोडलेले पुन्हा जोडले जाते .
वाचकांना एक भावनिक समाधान देणारी "तो आणि ती "ही कथा खूप आवडेल.
लेखिका -अलका वेद स्वप्नाली यांना लेखन शुभेच्छा
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संवादिनी कथा -परिचय - भाग- ५ वा लवकरच ...
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#संवादिनीकथासंग्रहपरिचय -भाग - ४ था -
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - 9850177342
------------------------------------------------------------------------------------------------

Like
Comment

No comments:

Post a Comment