Friday, March 13, 2020

पुस्तक-परिचय - अंतस्थ मनात .परिचय ले- अरुण वि.देशपांडे

पुस्तक-परिचय लेख-
ले-अरुण वि.देशपांडे -पुणे.
९८५०१७७३४२
-----------------------------------------------------------
पुस्तक-परिचय -
कविता संग्रह -
----------------------------------------------
संवेदनशील मनाच्या सुस्पष्ट शब्द-चित्रकविता
अंत:स्थ मनात -
----------------------------
कविता -रसिकांच्या परिचयाचे कवी - व मित्र श्री.विजय जोशी यांचा तिसरा कविता संग्रह " अंत:स्थ मनात - ,
नुकताच प्रकाशित झाला आहे. त्यांच्या कविता इंटरनेटवर, आणि फेसबुक समुहात सातत्याने वाचणारा
त्यांच्या कवितेचा चाहता आणि , .त्यांना अजून प्रत्यक्ष्य न भेटलेला त्यांचा एक मित्र आणि वाचक आहे.
त्यांच्या कविता माझ्यापर्यंत येतात , तर कधीकधी मी त्यांच्या कवितांच्या शोधात असतो , याचे कारण
अगदी साधे आणि सरळ आहे " ते म्हणजे "या कवीच्या कविता मला आवडतात ".
"ओंजळ आणि मनतरंग ' अगोदरच्या दोन कविता संग्रहांनी कवी विजय जोशी यांच्या पदरात खूप काही टाकले आहे.,
ते किती विविध प्रकारचे आहे याबद्दल त्यांच्या परिचयातून कळून येते ..या गोष्टी वाटचाल सुखकर करणाऱ्या आहेत
,पण यापेक्षा ,
अधिक महत्वाचे हे आहे की ..
विजय जोशी या कवीचा कविता -लेखन प्रवास हा त्यांच्यस अधिकाधिक कविता -आकलनातुन" -आणि "अभ्यासातून होत आला आहे ,".
याचा त्यांना कसा आणि किती फायदा होतो आहे ,याचे खणखणीत उदाहरण म्हणजे प्रस्तुतचा त्यांचा
' अंत:स्थ मनात - हा नवा कविता संग्रह आहे.
मित्र हो -
या कविता किती अर्थपूर्ण आहेत , त्यांचे अंतरंग किती विविधरंगी आहे ,आणि विजय जोशी हे एक प्रतिभावान कवी आहेत "
हे सांगितले आहे ती कविता -क्षेत्रातील तीन नामवंतांनी ..हे आहेत-
१.जेष्ठ कवी - प्रा .अशोक बागवे -सर यांची विचक्षण अशी प्रस्तावना ,
२.कवी - सतीश सोळांकूरकर -यांच्या शुभेच्छा ,
३.कवी -लेखक - प्रसाद कुलकर्णी- यांच्या शुभेच्छा,
या मान्यवरांच्या मनोगतांना वाचल्यावर ..माझ्यासारख्य वाचकाने अजून वेगळे असे ते काय सांगावे ? नाही का ?
असे असले तरी ..या कवितेचा एक वाचक म्हणून कवी -विजय जोशी यांच्या कविता -संग्रहाने मला कसा वाचन आनंद दिला आहे
हे नक्कीच सांगावेसे वाटणारे आहे.
" अंत:स्थ मनात - हा संग्रह म्हणजे एक कविता -घर आहे अशी कल्पना करू या .
या घराला कवितांचे चार -चार अंगण लाभलेले आहेत ..
१.मुक्तशैलीतील कविता - मुक्तांगण , २. छंदोबद्ध रचना - (कवितांगण ), ३.मालवणीका व ४.गझलरंग ,
मित्र हो - कवितेच्या या एकेका अंगणात मी मनोसक्त बागडलो ,आणि मनापासून रमलो , हा कविता संग्रह वाचून झाल्यावर तुम्हाला
हाच अनुभव येईल हे नक्की .
ज्याला जे आवडेल त्याचा आनंद घ्यावा .अशा या कवितांच्या अंगणात मनाला खूप समाधान मिळते .
विजय जोशी हा कवी त्याच्या ..कवितेसाठी ,त्यातील शब्दांसाठी शब्दांचा उपासक झालेला आहे .त्याची भावना
अशी आहे -
" शब्दांची भक्ती करुनी
शब्दांना रिझवत गेलो
शब्दांची ओंजळ भरुनी
साहित्य पुजीत गेलो ..
अशा भक्तिभावाने आलेली कविता वाचकांना आवडणारी असणारच ना !
कविमन कवितेने झपाटून गेले की मग ..फक्त कविता ..कविता
आणि अशी अवस्था होऊन जाते ..
"लिहितो कविता गातो कविता
भाजतो कविता जगतो कविता ,
जीवन माझे व्यापून गेले
कविता कविता कविता कविता ...(कविता ..पृ..४६ ),
कवी आणि कविता .अशी एकरूपता मोठीच विलोभनीय आहे
सगळ्या विषयावर कवी सहजपणे व्यक्त होत असतो , स्वतहा बद्दल व्यक्त होतांना कवी म्हणतो ..

" मोकळं व्हायचं असतं त्याला
शब्दांच्या गर्भारपणातून
कवितेला प्रसूत करून ,
तेव्हा कुठे तो
मोकळा श्वास घेतो
प्रफुल्लीत मनाने ...(कवी ..पृ.४५ }
या कविमनाच्या अशा प्रफुल्लीत मनाचा अविष्कार असलेल्या अनेक कविता संग्रहात वाचावयास मिळतात .
२.माणसाच्या आयुष्यात अनेक गोष्टींचा अभाव असणे " हे नवीन नाही .. ही लढाई अशीच असते ना ?
" सुखाचं अवर्षण
संकटांची अतिवृष्टी
यांचा सामना करीत
आयुष्याच्या पिकाला
सुखाच्या लोंब्या
झुलू लागतात ...!!....(सुखाच्या लोंब्या..पृ...२८ )
३.
आपण आणि आपले आयुष्य म्हणजे एक न -उमजणारा असा प्रवास आहे, त्याची ही सुंदर रचना ..
"निघालो बाजारी ! सुख शोधण्यासी !
घरी पाह्ण्यासी ! विसरलो ...
मार्ग आयुष्याचा ! नास्तिक राहिला !
मग शेवटाला ! विठू विठू ! (आयुष्य ..पृ.५८ ),
४.आपल्या सर्वांचे जीवन यंत्रवत झालेले आहे, अशा मनाला ही कविता खूप भावणारी अशीच आहे ..
कारण अशी "पहाट " पाहण्याचे भाग्य फार कमी जणांना लाभत असते ..
" उन कोवळे
मंद गोजिरे
पंख फुलविती
पानां मधले
दवबिंदूचे
हिरे चमकती ... (रम्य पहाट ..पृ..६२ ),
५. आपल्या आयुष्यात श्री गुरूंचे स्थान अतिशय महत्वाचे आहे, त्या गुरूंचे स्मरण कवी करतो -
"तेजाचा प्रकाश ! गुरूचेच ठायी !
गुरुविना नाही ! ज्ञान जगी !
गुरु विश्व्यापी ! वसे ठायी ठायी !
सृष्टीचेच पायी ! चराचरी !! .... ( गुरु स्मरण ..पृ..६६ ),,
६. प्रेम करणाऱ्या दोन मनात राग-अनुराग , रुसवे-फुगवे ..म्हणजे प्रेमाचा लपंडाव असतो .अशी ही भाव कविता ..
जरी गर्दी मध्ये असतो
बसतो मी केविलवाणा
गळून सारा जातो
रुबाब ताठर बाणा
तू परत फिरुनी येता , खळी गालावरती खुलते ...(रुसतेस मजवरी जेव्न्हा ...पृ.७१ ),
७.गझल रंग या भागात ..शीर्षक नसलेल्या गजल आहेत ..
खालील काही शेर ..जे वेगवेगळ्या गजल रचनेतील आहेत..
" निर्मल जीवन झऱ्यासारखे देतच गेले मजला
आनंदाने घेतच गेलो नकार केला नाही ...(पृ..९३ ),
"का शोधसी सुखाला पैशात नित्यनेमे
या झोपडीत माझ्या आनंद वास आहे ...(पृ..९४ ),
आयुष्याचा रंगमंच हा इतका सुंदर
प्रत्येकाला इथे वाटते रंगावेसे ....(पृ..९६ ),
कितीक घे तू सुरेल ताना सुरावटीने ,
विना भैरवी मैफिल काही रंगत नाही ... (पृ..९९ )
मालवणीका .या प्रकारातील काव्य-गम्मत समजली की त्याचा आनंद अधिकच घेता येईल असे म्हणावेसे वाटते.
या संग्रहात शंभर कविता आहेत ..आणि इथे आठ-दहा कविता उदाहरणे देता आली ..म्हणजे परीच्यासाठी कवितांचे दहा टक्के प्रमाण
सुद्धा अंत:स्थ मनात - या संग्रहाची कल्पना येण्यास पुरेसे आहे.
या सर्व काव्य-रचना आणि त्यातील रचना सौंदर्याबद्दल सविस्तर वर्णन इथे वाचण्यापेक्षा संग्रह आणि कविता वाचून तेअनुभवणे
म्हणजे कवी विजय जोशी यांच्या काव्य -प्रतिभेला दाद देण्या सारखे होईल. तेव्हा " अंत:स्थ मनात - हा संग्रह जरूर वाचा .
कवी-मित्र विजय जोशी ..या छान संग्रहाबद्दल तुमचे अभिनंदन ,आणि पुढील प्रवासास शुभेच्छा .
मुखपृष्ठ चित्रकार श्री.रामदास खरे , ठाणे ..याच्या सुरेख कामगिरीचा कौतुकपूर्वक उल्लेख करतो.
अंत:स्थ मनात -कविता संग्रह .डोंबिवलीच्या अथर्व प्रकाशनाने आकर्षक स्वरूपात प्रकाशित केला आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक -परिचय -लेख
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२
-----------------------------------------------------------------------------
कवी - विजय जोशी
डोंबिवली (पूर्व ),
संपर्क - ९८९२७५२२४२
-----------------------------------------------------------------------------------
कविता संग्रह -
अंत:स्थ मनात -
पृ.११० , मूल्य- रु.१५०/-
प्रकाशक -
अथर्व प्रकाशन डोंबिवली
संपर्क - ७५८८४१४२३९
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment