पुस्तक-परिचय -
अरुण वि.देशपांडे -पुणे.
------------------------------ ------------------
संस्कार -कथा
श्यामच्या छान छान गोष्टी "
ले- नागेश सू. शेवाळकर
------------------------------ ---------------------
प्रकाशक दत्ता डांगे आणि इसाप प्रकाशन यांनी प्रसिद्ध लेखक श्री.नागेश सू.शेवाळकर यांचे कडून मुलांसाठी संस्कार-गोष्टी लिहून घेऊन मुलांची सुट्टी वाचनीय केली आहे ",
साने गुरुजी , श्याम आणि श्यामची आई " ,ही नावे मराठी माणसाच्या मनात आदरणीय ठरलेली व्यक्तिमत्वे आहेत.
श्यामची आई आणि श्याम " दोघांबद्दल किती ही वाचायला प्रत्येक पिढीतील वाचक आतुर असतो.
लेखक नागेश सू.शेवाळकर यांनी अतिशय आत्मीयतेने छोटय-छोट्या पाच-सहा छान गोष्टीचे लेखन बालमित्रांसाठी
केले आहे .
"प्राणीमात्रावर दया ", कळीचे फुल " , संस्कार श्रमाचे , " आधी केले मग सांगितले ", "वाचन आणि कृती ", "लाजीरवाणा ", अशा या सहा निवडक गोष्टीतून
" मोलाचे संदेश ,आणि संस्कार -धन मुलांना मिळाले पाहिजे हा उदात्त लेखन हेतू " सहजतेने साध्य होतो कारण मुळातच सानेगुरुजींचे साहित्य मातृ-प्रेमाचे महामंगल स्तोत्र आहे " असे आपण म्हणतो .
श्यामच्या छान छान गोष्टी " हे सोळा पानांचे चिमुकले पुस्तक ..आकाराने मोठे आहे , यातील मजकूर मोठ्या -ठळक अक्षरात आहे ..या पुस्तकातील सगळीच्या सगळी पाने रंगीत आणि यातील चित्र सुद्धा मोठी आहेत ..ही सर्व सजावट पुस्तकाला आणि गोष्टींना आकर्षक बनवते
या गोष्टीच्या पुस्तकाचे छान मुखपृष्ठ / सजावट भास्कर शिंदे आणि विजय चित्तरवाड या चित्रकार कलावंत यांनी केले आहे.
" महाराष्ट्र राज्य शासनाच्या "सर्व शिक्षा अभियान " २०१७-२०१८ "शिक्षणाचा अधिकार " या उपक्रमाअंतर्गत हे पुस्तक निवडले गेले आणि इसाप प्रकाशनास हे पुस्तक प्रकाशित करण्याचा योग आला श्यामच्या छान छान गोष्टी "या पुस्तकाच्या ऐंशी हजार प्रती" (८००००) निघाल्या आहेत .प्रकाशाक आणि लेखक दोघांसाठी ही मोठी गौरवाची गोष्ट आहे.
लेखक नागेश सू.शेवाळकर आणि इसाप प्रकाशन व प्रकाशक दत्ता डांगे यांचे या गौरवास्पद उपलब्धीबद्दल अभिनंदन करू या.
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ -----
पुस्तक-परिचय -
अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क- ९८५०१७७३४२
------------------------------ ------------
श्यामच्या छान छान गोष्टी
लेखक -नागेश सू.शेवाळकर
संपर्क -९८३४५४८१६६
पृ- १६ , मूल्य- रु. २८
प्रकाशक -
दत्ता डांगे - इसाप प्रकाशन
सहयोग नगर -नांदेड.
९८९००९९५४१
------------------------------ ------------------------------ ---------------
No comments:
Post a Comment