पुस्तक-परिचय लेख-
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
------------------------------ -----------------------
कविता संग्रह- माझे तुला नि:शब्द शब्द ,
कवयित्री - पुष्पांजली कर्वे.
------------------------------ ------------------------------ -------------------------
शब्दातून व्यक्त होण्याचे माध्यम कविता ", आणि जेंव्हा कविता नि:शब्द करणारे शब्द घेऊन आपल्याला भेटते तेंव्हा शब्दांचे सामर्थ्य म्हणजे काय नि ते किती असते याची शब्दातीत प्रचीती येऊन जाते . कवयित्री पुष्पांजली कर्वे यांचा " माझे तुला नि:शब्द शब्द " या शीर्षकाचा कविता संग्रह नुकताच वाचून झाला ,अनेक कविता मनात रेंगाळत राहिल्या आहेत.एक छान कवितानुभूती दिली या कवितांनी.
कवयित्रीचा हा पहिला कविता संग्रह आहे म्हणून काही तो एका नवोदित कवीचा संग्रह आहे असे मुळीच नाहीये , कारण पुष्पांजली कर्वे यांचे कविता लेखन रसिक वाचकांच्या अगोदर पासूनच परिचयाचे आहे , लिहून झालेल्या कवितांचा प्रकाशित झालेला "त्यांचा पहिला संग्रह आहे" असे म्हणू या.
या संग्रहासाठी "चार शब्द " लिहिले आहेत जेष्ठ कवयित्री आसावरी काकडे , संग्रहाच्या ब्लर्ब वर या कवितेबद्दल लिहिलेले शब्द आहेत कविवर्य अशोक जी बागवे सरांचे .. या शिवाय मनोगतात ...
स्वताच्या कवितेबद्दल ..कवयित्री अगदी सविस्तरपणे व्यक्त होते ..,ही तीनही मनोगत आवर्जून वाचावीत अशीच आहेत ..कवी,कविता आणि कविता लेखन ..या बद्दल खूप समजून घेण्यासारखं वाचण्यास मिळतं .
इंटरनेट या माध्यमामुळे ..लेखक आणि कवी यांचे साहित्य मोठ्या वेगाने वाचकांच्या पर्यंत येत असते .आणि या लेखनास प्रतिसाद मोठ्या प्रमाणत मिळत असतो . कवयित्री म्हणते की " आपल्या स्वताच्या ब्लॉगवर -कविता शेअर करतांना त्यांच्या कवितांना -त्यातही ..प्रेम कवितांना खूप मोठा प्रतिसाद मिळत गेला , नव्या पिढीतील वाचकांनी अभिप्राय दिले ."
कवीच्या लेखन [-प्रवासातील हे मोठीच आनंददायक गोष्ट आहे.
कविता निर्मिती , कवितेचे मनातून कागदावरती उतरणे , रसिकांचा प्रतिसाद मिळणे ..हा अनुभव घेतलेल्या या कवयित्रीला आपला कविता संग्रह यायला हवा " असे वाटणे हा खरे तर महत्वाचा टप्पा ,यात देखील कवयित्रीला यश आले आहे असे प्रस्तुतचा कविता - संग्रह वाचून वाटले.
" माझे तुला नि:शब्द शब्द " ,
१४४ पानांच्या या कविता संग्रहात कविता संख्या १०१ आहेत , प्रेम कविता या जास्त आहेत ..त्यामुळे "प्रेम कवितांचा संग्रह " असे ठळकपणे म्हणता येईल .काही कविता सामजिक जाणीवेच्या , स्त्री"जाणीवेच्या आहेत., शेवटी ८ कवितांचा " कणिका " हा छोटासा विभाग आहे .
प्रेम कविता जास्त आहेत म्हणजे ..या कवितेत एक "तो "आहे आणि एक "ती " आहे ..आणि या कवितेतून "ती" व्यक्त होते ..प्रेम विषयी तिला काय काय वाटतंय ..हे सर्व शब्दरूप ..ज्याच्या साठी कविता आहेत..त्याला नि:शब्द "करून टाकतात .
कारण .
.शब्दांना माहिती आहे
आपल्या आतलं भांडण
तुझ्या माझ्या नजरेतलं
दाटलेलं नभांगण
नभांगण बरसातांना
शब्द असतातच कुठे
तेंव्हा फक्त तुझ्यामाझ्या
प्रेमाला मिठीच कोंदण ....( शब्दांना माहित आहे ..पृ..७४.,),
एकमेकांना शब्द दिले ,ते हवेत विरून जाणारे नाहीत ..ते कसे आहेत ...
याची जाणीव करून देणारी ही छान कविता..
" तुला दिलेले शब्द सहज दिलेले नाहीत
ती वचनं आहेत
मी ती कळ्यासारखी माळली आहेत
तू मोरपिसासारखे खोवून ठेव
जेंव्हा कधी माझी स्य येईल
उशाजवळ पसरून ठेव .... ( तुले दिलेले शब्द ...पृ..६७ ),,,
प्रेम भावनेचा आदर होत नसेल ..मन दुखावले जाते ..त्याची ही कविता ..
अन
गुंतलेल्या श्वासांना
धुरांच्या लाटांवर
सोडून द्यावे
अगदी तेव्हड्याच अलिप्ततेने
दूर लोटून देतोस..!
किती सहज सिगारेट
तुझ्या ओठांवर जळत असते ...!
अन मी ...?
आत अंतस्थी विझत असते ...! ...( सिगारेट ..पृ.८७ ),
कधी कधी ..प्रेम " म्हणजे नेमके काय ..? समजत नाही की उमजत नाही ..गोंधळच असतो सगळा ,
" खर तर साद प्रतिसादाची भाषा
उमजल्या शिवायच काही निर्णय
आपसूक होऊन जातात ...
त्यालाच " प्रेम " म्हणतात ..! (त्यालाच "प्रेम " म्हणतात ..पृ..५५ )
प्रेम म्हणजे आधार , प्रेम म्हणजे विस्वास ..आणि प्रेमात पडल्यावर "नवे वेड लागते " .
मग मनाची अशी अवस्था होणारच ,
" तू दिसला नाहीस की
किती शंका भीतीचे काळे ढग
मनात दाटायचे
मग मनातले डोळ्यातून बरसायचे .., . ( तू दिसला नाहीस की ..पृ.४७ ),.
.
आलेला पाउस , बरसणाऱ्या धारा .आणि प्रेमी जीवांच्या मनातला विरह यांचे अतूट असे नाते आहेच..
विरहाच्या कला मनाला सोसवत नाहीत ..मग असे होते या मनाचे..
" दाटुनी नभात जेव्न्हां
घन व्याकुळ रडले
साद माझीच ती
एक तू..
आक्रोश धारांत रे.... .( घन निळे ..पृ...४१ ),
अशा वेळी आठवतात त्या झालेल्या भेटी...
" किती भेटी झाल्या
मोजदाद नाही..
त्या थांबल्या वेळा तिथेच
थोड्या पापण्यात कैद
अन आलिंगनात काही ...! ( किती भेटी ...! पृ.१९ )
हे सारे विसरण्याच्या पलीकडचे आहे ..मनाच्या नि:शब्द अवस्थेत अनुभवावे असे...
....त्याची ही कविता अशी होते..
परि -
पाहून रंग
तुझा तृप्त
मनी अतृप्त
मी न राहते
ठाऊक असे मजला
आतला रंग , रंगातला ... .( सांग कसे विसरायचे ...पृ..२३ ),
अशा अनेक प्रेम कविता या संग्रहात आहेत..काही शीर्षके -क्षण काही वेचलेले " (२० ), उगवाव म्हणते तुझ्यातून ..(२५), , "आज कित्ती कट्टी दिवसांनी ..(२९ ), ऎक ना ..! (७९ ), " तू उमलतो ..(९२ ) ,
त्याच्या उबदार श्वासावर..." (६८ ), ," प्रेम तुझा रंग कसा ..? (६० ),
या कविता संग्रहात
स्त्री -जाणीव विषय खूप कविता आहेत..त्यांची शीर्षके -
स्त्री -जाणीव विषय खूप कविता आहेत..त्यांची शीर्षके -
"सखे " (१०७ ), " जिथे घराच्या भिंतीत ..(११६ ), "ती ...(पृ.११७ ), " एकेकीच्या अश्रुमागे (१२१ ),,
कवयित्री पुष्पांजली कर्वे यांच्या काव्य लेखनाचा भावसुंदर ,भावपूर्ण असा लेखन अविष्कार म्हणजेच त्यांचा हा कविता संग्रह आहे. , प्रेम भावना संयमित रुपात अधिक भावणारी असते " ,सावरणे , विस्वास असणे , उमजणे आणि समजणे ,समर्पण ..या आशयाच्या कविता आणि यातली भावपूर्ण शब्द योजना कवितेला अधिक अर्थपूर्ण बनवते, निर्मल भावपूर्ण कविता " असे या कवितांचे वर्णन करावेसे वाटते .
कवयित्री पुष्पांजली कर्वे ..यांच्या पाह्लिया कविता संग्रहाचे मन:पूर्वक स्वागत..आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ----------- पुस्तक-परिचय लेख-
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क- ९८५०१७७३४२
------------------------------ -----------------------
कविता संग्रह- माझे तुला नि:शब्द शब्द ,
कवयित्री - पुष्पांजली कर्वे.
९८९२६६७४८२
पृष्ठ - १४४ , मूल्य-रु.१५०/-
------------------------------ ------------------------------ ---
प्रकाशक - शारदा प्रकाशन
नौपाडा -ठाणे
संपर्क - ९८२०१७६९३४
------------------------------ ---------------------------
No comments:
Post a Comment