पुस्तक-परिचय
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
9850177342
------------------------------ -----------
मातृमहतीचे काव्यात्म -गद्य लेखन -
"आई "
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ----
"आई " या विषयावर नेहमीच लेखन केले जाते ,त्यात ही कवितेतून "आईच्या विविध रूपांचे दर्शन आपल्याला घडत असते , अशा या
परिचित विषयावर संपूर्ण एक पुस्तकच असावे ",असा योग लेखक द.गो.शिर्के या लेख-संग्रहाने आलेला आहे.
एकूण १८ लेखांचा "आई " हा संग्रह पुण्याच्या चपराक प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.
हे सर्व लेख "आई " संबंधित आहेत.या लेखांची शीर्षक योजना अगदी अनुरूप अशीच केलेली आहे .
वाचकाला आवडेल असे हे लेखन आहे ,याचे श्रेय लेखकाच्या भावनाप्रधान असलेल्या लेखन -शैलीला आहे , ओघवत्या आणि रसाळ भाषेत त्यांनी हे लेखन केले आहे.
लेखक हे शिक्षक म्हणून कार्यरत होते , त्यांच्या या भूमिकेचा या लेखनास खूप चांगला उपयोग झाला आहे "असे म्हणावेसे वाटते.
या लेखामधून त्यांना जे सांगायचे आहे ते सर्व वाचकांच्या मनावर पूर्णपणे बिंबवले आहे.हे या लेखनाचे यशच आहे.
हे लेख म्हणजे भावूक असे ललित निबंध आहेत , प्रत्येक लेखातून त्यांनी "आई" संबंधी कुणी कुणी काय काय व्यक्त केले आहे ",हे वाचकांना
सांगितले आहे, या साठी लागणारी सर्वसमावेशक दृष्टी ,आणि योय ते शोधून ते शब्दरूपात व्यक्त करणे " हे तसे अवघडसे कार्य आहे , आणि लेखक -
द.गो.शिर्के यांनी परिश्रमपूर्वक छानच सिध्द केले आहे , या अर्थाने लेख-स्वरूपात "आई" संबंधीचेच त्यांचे हे लेखन वेगळे आणि वैशिष्टयपूर्ण
ठरावे असेच आहे.
त्यांनी दिलेले कवितांचे काव्यांश केवळ अप्रतिम असेच आहेत ..या निमित्ताने नामवंत साहित्यिक-कवींच्या "आई" बद्दलच्या भावना आपणा
वाचकांच्या पर्यंत आल्या आहेत ,या उपक्रमाबद्दल द.गो.शिर्के सरांना धन्यवाद दिले पाहिजेत.
काही लेखांची ही शीर्षके ..लेखन-स्वरुपाची कल्पना देणारी आहेत.
"वात्सल्याचा अप्रतिम अविष्कार "-(पृ.१६ ), आभाळाची माया -(पृ.३९) ,"मराठी कवितेतील आई "-( पृ-५७ ), " काळी आई "- (पृ.६३ ).
"एक तीर्थक्षेत्र" -(पृ -७८ ), "श्यामची आई "- (पृ-८३ ), "मायेचा गाभारा "- (पृ -९७ ) ,
प्रत्येक लेखाची सुरुवात करतांना लेखक "आई" या संकल्पनेची- भावनेचे जणू शब्द-पूजा करतात ,अनेक उदाहरणे .जी विचारांची ,चिंतनाची आणि
कवितांची आहेत ..या सगळ्यातून एक वत्सल -प्रवाह आहे तो -आईच्या मायेचा . यातील अनेक लेखनातून "आईचे -अनेक रूपातील दर्शन
आपल्याला होते ..
दारिद्र्य आणि कष्ट , गरिबीमुळे सोसावी लागलेली अवहेलना , सर्वच गोष्टींचा असलेला अभाव ..यामुळे आपल्या मुलांच्या
वाट्याला आलेले जीवन ..हे सर्व सोसणे ..आईच्या आयुष्याचा संघर्ष आहे, तिनी जिद्दीने लढाई लढून ,संकटावर कशी मात केली ",हे सर्व
तिच्या मुलांनी "आपल्या आईबद्दल "जे व्यक्त केले ..ते सर्व वाचून आपले मन भरून आल्याशिवाय राहणार नाही.
"आई" म्हणजे देवता स्वरूप , देवाला जे देवत्व मिळाले आहे "त्याला सुद्धा "माउली -स्वरूप" मिळाले "हा मातृ-रूपाचा गौरवच आहे असे म्हणू या.
साधू-संत , विचारवंत , लेखक-कवी , कथा-कविता ..माध्यम कोणते ही असो, यातून "आई" बद्दल व्यक्त होणे सगळ्यांना भावनिक -कर्तव्य वाटते ,
कारण "आपण जे घडतो .जे आयुष्य आपल्याला मिळाले -ते देणारी जननी , माय, आई , माता " आहे, म्हणूनच तिच्याविषयी किती बोलू ,किती लिहू ?
असे वाटणे साहजिक आहे
. द.गो. शिर्के सरांनी आपल्या सगळ्या लेखातून याच सगळ्याना जे वाटले ..ते आपल्या पर्यंत आणले आहे.त्यांच्या लेखन-प्रवासास शुभेच्छा.
आदरणीय शामराव कराळे- प्रमुख कार्यवाह - अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला ", यांनी या पुस्तकास यथोचित प्रस्त्वाना दिली आहे .
हे पुस्तक वाचून मनाला मोठेच समाधान मिळेल हे नक्की.
प्रकाशक -श्री.घनश्याम पाटील आणि चपराक टीम यांचे या पुस्तकाबद्दल अभिनंदन.
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ---------
पुस्तक -परिचय -
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क -9850177342
------------------------------ ------------------------------ -------------------
आई
पृ -१०४ , मूल्य- रु.१०० /-
ले- द.गो.शिर्के
संपर्क -7588607138
प्रकाशक - घनश्याम पाटील
चपराक प्रकाशन कोथरूड -पुणे .
संपर्क - 020-25384909
mo- 7057292092
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ --------------
No comments:
Post a Comment