पुस्तक परिचय लेख-
अभ्यासात हुशार म्हणजेच हुशारी नसते
अरुण वि.देशपांडे .
------------------------------ --------
कविता संग्रह - "द्वैत "
प्रा - योगिनी देगमवार ,
आश्वासक वाटचालीचा आरंभ ...!
------------------------------ -----------------------------
प्रा.योगिनी देगमवार या कवयित्रीच्या कविता .."द्वैत " या शीर्षकाच्या कविता संग्रहात आपल्याला वाचण्याचा योग आला आहे. विशेष म्हणजे कवयित्रीचा हा पहिलाच कविता संग्रह " आहे ,या निमित्ताने त्यांचे अभिनंदन करून संग्रहाचे स्वागत करू या.
या संग्रहाच्या आरंभी कवयित्रीला .."आशीर्वाद आईचा " लाभला आहे.. आई कडून मिळालेल्या काव्य-प्रतिभेचा अविष्कार " आपल्याला या संग्रहातील कवितेतून झालेला आहे हे जाणवते.
कवयित्रीचे प्रेरणा -स्थान असलेले आदरणीय व्यक्तिमत्व डॉ.एस.व्ही .सालफळे यांची प्रस्तावना "द्वैत "संग्रहाला लाभली आहे . कवितेबद्दल आणि कवयित्री बद्दल अतिशय आपलेपणाने व्यक्त होणारी ही प्रस्त्वाना वाचकांना या कवितेबद्दल खूप छान सांगणारी आहे. उदा -
"ह्या संग्रहातल्या साऱ्या कवितांचा प्रवास त्रिभुवानातून झालेला आहे . ह्या कवयित्रीला ह्या कवितांनीच चिंतन करावयास लावले आहे. तिनेच "जग हे सुंदर , जगणे सुंदर " असा मंत्र दिला आहे. कृष्णाच्या भक्ती-गानातून एक सुंदर संगीत निर्माण झाले आहे .
कवयित्री योगिनी देगमवार यांच्या कविता खिन्न्तेकडून प्रसन्नतेकडे वाटचाल करणाऱ्या आहेत ..अंधारातून प्रकाशकिरणांकडे त्यांची धाव आहे "
अशा संपर्क प्रस्तावने पाठोपाठ ..
पहिल्या आवृत्तीच्या निमित्ताने कवी श्रीपाद प्रभाकर जोशी यांचे मनोगत या संग्रहात समाविष्ट केलेले आहे..
कवी - श्रीपाद जोशी म्हणतात -
" द्वैत " या कविता संग्रहातून ..योगेश्वर कृष्ण अनेक कवितात विविध रुपात प्रबळपणे भेटतो कृष्ण विषयक प्रीतीच्या अनुभक्तीच्या या कविता लय, ताल, संगीत, नाद आणि शब्दकळेनं नटलेल्या आहेत..
.
"द्वैत " संग्रहाचा ब्लर्ब - मजकूर प्रा. राजेंद्र राऊत सरांचा आहे.. ते म्हणतात ..
या पहिल्याच काव्य संग्रहात बहुतांश कविता ह्या कृष्ण प्रेमात चिंब चिंब भिजल्यात.
श्रीकृष्णाशी संवाद साधतांना त्यांच्या शब्दाला भरते येते . नादमधुरता , शब्दांची लयबद्ध मांडणी , छोट्या शब्दातील आशयगर्भता वाचकांचे चित्त चोरते .
.कवीच्या पहिल्या संग्रहावर इतके आश्वासक वाचायला मिळणे "खूप सुखद वाटणारे आहे. या दृष्टीने कवयित्री नशीबवान आहेत असे म्हणू या .
"द्वैत " संग्रहातील कविता या नवोदित कवीच्या आरंभीच्या वाटचालीच्या पाउलखुणा असतील " असा अंदाज करून जर वाचू लागलो तर ..
आपला अंदाज चुकीचा ठरेल .कवयित्री योगिनी देगमवार यांचे कविता लेखन खूप आश्वासक तर आहेच त्याच बरोबर त्यांची कविता आपली वाटचाल खूप दमदारपणाने करणारी आहे " हे लक्षात येते.
कृष्ण-भक्तीपर रचना "या संग्रहात विपुल असल्या तरी .हा काही अध्यात्मिक किंवा भक्ती -कवितांचा संग्रह नाहीये , इतर कवितांचा उल्लेख या ठिकाणी केला तर ..योग्य होईल असे मला वाटते.
कवयित्री योगिनी यांनी आपल्या कविता लेखनाबद्दल म्हटले आहे .."कधी थोडी वेगळी वाट चोखाळत , कधी आतील अभिव्यक्तीचा शोध घेत उत्स्फूर्तपणे मानवी वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केला आहे ";
कविता लेखनाचा कवयित्रीचा हेतू स्पष्ट आणि प्रामाणिक आहे यात शंकाच नाही.
तसे पाहिले तर या संग्रहातील त्यांच्या इतर कविता ..विषयाने फार वेगळ्या आहेत " असे म्हणता येणार नाही..पण या कवितेतून कवयित्री एक माणूस म्हणून तळमळीने व्यक्त होत आहे हे जाणवते . कवीने नुसते भाष्य केलेले नाहीये .तर त्यांच्या मनातील जाणीव, तळमळ हे सगळे या कवितातून अभिव्यक्त होते.
काही कविता उदाहरणे देतो...
स्त्री- जाणीवेची ही एक कविता ..
"बघू द्या तिला अंतर्मनात
होऊ द्या काही बोध
तिच्यातल्या " ती " चा
घेउ द्या जरा शोध ,
नकोय आता तिला
कौतुकाची थाप
समर्थ तिची ती
स्वतंत्र तिच्या विश्वात ...( ती ..पृ. ८१ ),
स्त्री-मनातली दुर्दम्य आशावाद आणि स्त्री -शक्तीला आवाहन करणारी ,विस्वास देणारी ही एक कविता..
"चल उठ आदिशक्ती
चल उठ नारायणी
करण्या उद्धार तू जगाचा
चल घे भरारी गगनी
चल घे भरारी गगनी .....( चल घे भरारी गगनी ..पृ..७३.),
पाउस आणि शेतकरी , शेतकर्याचे जीवन आणि पाउस , पावसाच्या लहारीपानाने उध्वस्त झालेल्या शेतकर्याचे दुखः कवयित्रीचे पण दुक्ख होऊन कवितेतून करुण-विनवणीच्या कवितेतून व्यक्त होते..
" अरे पावसा पावसा
आता एकच मागणे
बळीराजाचे संपव आता
हे लाचारीचे जिणे..... ( अरे पावसा पावसा ..पृ. ७० ),
एका शिक्षकाच्या ,गुरु आणि मार्गदर्शकाच्या भूमिकेतून मुलांना , नव्या पिढीला आपण सांगितले पाहिजे ..कवयित्री आपलेपणाच्या शब्दातून मुलांना सांगते..पालक आणि बालक दोघांनी लक्षात ठेवावा असा हा मोलाचा संदेश आहे..
अभ्यासात हुशार म्हणजेच हुशारी नसते
चित्र रेखाटण्याची कला देखील एखाद्यात असते
रंगबेरंगी रंगांनी ,रंगवा जीवनाला
कधीच लेखू नका कमी स्वतहाला ....( मुलांनो एकच सांगायचंय ... पृ.६५ ),
स्त्री -आणि तिच्या शिक्षणासाठी आयुष्यभर लढत राहिलेल्या "माय - सावित्री "बद्दल ची कविता ..
" सावित्री तू माय आमुची
लढलीस आमच्यासाठी
ज्ञानामृत हे शिक्षणाचे
लाविले आमच्या ओठी .... ( सावित्री ..पृ.५३ ),
मानवाच्या ठायी माणुसकी असावी , मानवतेचा विशाल अशा दृष्टीकोनातून ..कवयित्री मानवतेची लेणी शब्दातून साकारते आहे ..ही तळमळ मोठी भावणारी आहे..
" जाती, पंथ , धर्म सोडुनिया सारे
शब्द हीच लेकुरे कवितेठायी
चला पाहू आता बंधने तोडूनी
मानवतेची लेणी कवितेमाजी ...(पृ..४२ )...,
ही झाली इतर कवितांची उदाहरणे ... "
द्वैत " कविता संग्रहाचे खरे आकर्षण आहे ते.. कृष्णमय कविता .
कृष्ण-भक्ती , कृष्ण प्रीती , आणि कृष्ण-भक्ताच्या भक्ती-भावाचा अतिशय उत्कट , हृदयंगम असा शब्द-अविष्कार कवयित्री योगिनी देगमवार यांच्या काव्य- रचनेतून होतो.
कृष्ण -मिलन, कृष्ण -विरह .हा कृष्ण -आणि गोपी यांच्यातील भक्ती-नाते बंध ..या नात्यांचे विलक्षण असे भावूक दर्शन कवयित्रीच्या रचनेतून होते..
आजच्या भीषण अशा वर्तमानात कृष्णाला .."एकदा परत ये " अस बोलावणे किती महत्वाचे आहे..ते पहा..
" तुझ्या वस्त्रांची लांबी वाढवावी लागेल तुला
किती तरी पांचाली आज भोगतायत मरणकळा.....( एकदा परत ये ..पृ.२० ),
रसिक हो ..कवयित्री योगिनी देगमवार यांच्या कविता संग्रहाने खूप छान कवितांचा आस्वाद-आनंद दिला , अशा छान कविता-लेखनाबद्दल त्यांचे अभिनंदन व पुढील लेखन-प्रवासास शुभेच्छा.
या संग्रहाचे अनुरूप मुखपृष्ठ करणारे कलावंत चंद्रपूरचे श्री.सुदर्शन बारापात्रे यांचा उल्लेख करावा लागेल.
"द्वैत " काव्यसंग्रह ..अमरावतीच्या मेधा पब्लिशिंग हाउस व प्रकाशक संजय रा.महल्ले यांनी प्रकाशित केला आहे.
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ---------
पुस्तक-परिचय लेख-
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क- ९८५०१७७३४२
------------------------------ ------------------------------ -------------
द्वैत -
(कविता -संग्रह )
पृ.८८ , मूल्य- रु. ८० /-
प्रा.योगिनी देगमवार -चंद्रपूर
संपर्क - ९९७०१५५२७८
------------------------------ ------------------------------ ---------------------------
प्रकाशक -
मेधा पब्लिशिंग हाउस - अमरावती
संपर्क -९४२३६२२६६७
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ---------------
No comments:
Post a Comment