पुस्तक-परिचय लेख-
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
------------------------------ ------------------
पुस्तक परिचय -
कवितां प्रवासाचा - आश्वासक आरंभ "
कविता संग्रह , -आरंभ
------------------------------ ------------------------------ -------------
नमस्कार रसिक -वाचक मित्र हो -
कविमित्र - आदित्य जाधवच्या पहिल्या कविता संग्रह नुकताच प्रकाशित झालाय. या निमित्ताने प्रथम आपणा सर्वांच्या वतीने मी कवी मित्राचे अभिनंदन करतो.
आरंभ " कविता संग्रहाची प्रस्तावना लेखनाची जबाबदारी आदित्यने माझ्यावर सोपवली होती , ती जबाबदारी एक कविता -वाचक या भूमिकेतून
आणि मी स्वतहा: कविता लिहितो म्हणून "कवी " या ओळखीने थोडाफार जो परिचित झालोय , या दुसऱ्या भूमिकेतून ..-मी आदित्य जाधवच्या
कविते बद्दल लिहिले आहे , संग्रह वाचतांना आपण ही प्रस्तावना वाचालच.
प्रस्तुत "आरंभ " या कविता संग्रहात एकूण ७० कवितांचा समावेश आहे.
ग्रामीण -बोलीभाषा व त्यातील शब्द योजनेने या कवितेची शब्दकळा अधिकच शोभिवंत झाली आहे.
हे सर्व शब्द बहु-अर्थ शक्यता घेऊन आलेले आहेत .. .कविता पूर्ण वाचूनच त्यातील आशयाचा विचारपूर्वक अर्थ लावता येणे शक्य होईल.
या कवितेतून सामजिक नितीमुल्य , चालीरीती , जन-जीवन ,जन-समूह जीवनाचे दर्शन होते . , दिनमान , काल-चक्र " हे ही येतं ,हे कवितेतून मांडतंना कवी .सर्वांना अनेक
इशारे देतो , जे सूचक आहेत ," स्त्री-विषयक काही कवितेतून हे आपल्याला ठळक वाचावयास मिळते .
उदा- झरा (पृ.५ ) , मेणा "(१० ) ,, झळा " (पृ.२४ ), , काडी -माडी (पृ.२९ ), रात्र " (३० ), , "हा रंग नाही इथला " (पृ.३५ ), ,जोगवा (पृ.६० ), जळजळ (५० ), मृगजळ "(३३ ),
या कवितेत गूढता आहे ती अर्थांच्या अनेक शक्यतांची , यात व्यक्त होतांना कवी समाजमनाचे भान ठेवून .सांगतो आहे - हितकारक काय आहे ." हे सांगत असतांना ..
जे वाईट आहे, जे दूर करावे असे आहे " ते तसे करण्यातच सर्वांचे भले आहे
अशा कविता .. "सोळा आणे , उमाळा , पोरकी पाने , सुई दोरा , नकटा , फांदी , जळकुटे,
या काही कविता - टोकं , सावल्या ", वजीर , गाऱ्हाणे ", शिंपण ", " फकीर ", नीजधाम " , या आणि अजून काही कविता जशा दिसतात -तशा नाहीत ..,त्यातील अर्थ ,जीवन-सार आत खोलवर
सूर मारल्यावर दिसून येते .
या कवितेतील "कावळे " बघा ,
दोन कावळ्यांची शाळा
माझ्या दाराच्या मुळाशी
एकांताचे मग देणे
सारे डोहाच्या तळाशी ..(तळ .पृ ..१७) .
वरील रानभूल "असो वा चंद्र , किंवा तळ ..या कविता पूर्ण वाचून हाताशी काही लागत नाही ..कारण जे काही आहे ते " सारे डोहाच्या तळाशी " असणारे आहे, त्यासाठी कविता
पुन्हा पुन्हा वाचावी लागते .
पांगळा (पृ, स०) या कवितेत्तून माणसांच्या दर्शनी आणि अंतरीच्या वृत्तीवर कवी नेमकं व्यक्त होतो ..
लुप्त होईल "पांगळा
आम्ही डोळस अंधळे
सारे करुनिया पाप
नेसू अंगात सोवळे ..,
या संग्रहातील कविता .ज्यांना वास्तूरूप असे शीर्षक आहे . उदा. माडी ", शाळा , चांदण्याची गढी , काडी - माडी ", खोपा ", अंगण ", या कवितातून कवी व्यक्त होतांना आपल्या समोर एक
नवे जग खुले करून दाखवतो ..
अंगण ..(पृ..६२ )..
बाई ! अंगण परस
दोन्ही सांभाळ नेटाने
नको विसरू वादळा
येतं उघड्या दाराने ... (अंगण .पृ..६२ )..
कविता लेखन आणि आदित्य हा तसा आता एकरूपतेचा प्रवास आहे, सहजतेने कविता लेखन करणे आदित्यला जमू लागलय हे जाणवते आहे.
त्याच्या कविता "अष्टाक्षरी , अभंग आणि मुक्तछंदातल्या रचना आहेत.
सुचलेली कविता , कागदावर उतरवल्या नंतर आपल्याच कवितेवर पुनर-लेखनाचे संस्कार करण्याची त्याची तयारी ,त्यासाठी लागणारी -परिश्रम -भावना
मला नेहमीच कौतुकास्पद वाटत आली आहे.
सोशल -मिडीयावर आदित्यच्या कवितांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहेच , आता "आरंभ - संग्रहाच्या पुस्तक रुपात त्याची आलेली
कविता जाणकार वाचकांच्या पर्यंत जाणार आहे ..हे बाब या कवीच्या लेखन-प्रवासा साठी खूप उपयुक्त ठरणारी आहे.
आदित्यच्या कवितातून जीवन-अनुभव व्यक्त होतात या कवीची आगळी वाटणारी " शब्द-योजना -या शब्दांचे कविता रूप " पाहताक्षणी
जितके वेगळे वाटेल ..तितकेच वेगळेपण या कविता वाचून पाहिल्यावर जाणवेल हे नक्की.
समाजभान असणारा हा कवी त्याच्या कवितांमधून .शाश्वत जीवन-मूल्य , इष्ट -अनिष्ट , सुष्ट- दुष्ट , आणि मानवे स्वभावांचे विविध आणि सूक्ष्म
कंगोरे " अशा अनेक विषयावर मनापासून व्यक्त होतांना दिसतो.
निसर्ग-चक्र , जीवनमान , आणि मानवी -भाव-भावना, स्त्री -पुरुष , बाई-माणूस , बाप्या -माणूस " अशा विषयावर कविता लिहितांना कवीमनाची
उलघाल , खंत आणि वेदना , हे सर्व आदित्यच्या कवितांचे अर्थपूर्ण असे आशय आहेत , आणि या कविता वाचकाला अस्वथातेचा अनुभव जास्त
प्रभावीपणे देतील .
या कवी साठी त्याच्या भोवती असलेला माणूस अतिशय महत्वाचा आहे. याच तळमळीच्या भावने पोटी "आपल्या माणसाच्या चांगल्या आणि वाईट ,
स्वीकृत आणि त्याज्य" अशा दोन्ही स्वभाव -आणि गुण -अव-गुनानावर याची कविता स्पष्टपणे बोलते .
कवी आदित्यच्या प्रस्तुत संग्रहातील कविता ", हा त्याच्या कवी म्हणून सुरु झालेल्या लेखन प्रवासाचा आरंभ "झाला आहे , एक नवा आरंभ करणारा हा कवी
आणि त्याच्या कविता ..हे दोन्ही नवोदित नसले तरी ..
या प्रवासातील रुळलेले लेखन -प्रवासी नाहीत , या पुढील वाटचालीत आदित्य ची कविता अधिक ठळकपणे व्यक्त होईल अशी अपेक्षा बाळगू या .
आरंभ " मधील कविता वाचल्यावर वाचक या पुढे "-नवी पिढीच्या आश्वासक कवी"- मध्ये कवी आदित्य जाधवचा समावेश ..करतील ' या कवितेत याच्या खुणा
आहेत .
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ --------
पुस्तक-परिचय लेख-
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२
------------------------------ ------------------
कविता संग्रह , -आरंभ
कवी- आदित्य अ.जाधव
पृ.७० , मूल्य-रु.१५०/-
संपर्क-९४०४४००००४
------------------------------ ------------------------------ -
प्रकाशक-ललित कोलते
ललित पब्लिकेशन
आंबेगाव -पुणे-४६
संपर्क -८०८७२१८११३
------------------------------ ------------------------------ --------
No comments:
Post a Comment