Thursday, February 3, 2022
पुस्तक- परिचय लेख - रंजक गोष्टींचे पुस्तक - जादूची झप्पी
पुस्तक परिचय लेख-
अरुण वि.देशपांडे -पुणे.
------------------------------------------------------
रंजक गोष्टींचे पुस्तक- जादूची झप्पी
-------------------------------
नमस्कार वाचक मित्रांनो ,खास करून बालमित्र आणि मैत्रीणीनो-
छान वाचायला मिळाले की आपले वाचक -मन खूप आनंदित होऊन जाते " ही गोष्ट एक लेखक आणि वाचक म्हणून मला माहिती आहे.
मित्रांनो तुमच्या वाचन-आनंदात खूप मोठ्ठी भर घालणारे ..एक छोटसे गोष्टीचे पुस्तक .."जादूची झप्पी "आले आहे.
या गोष्टीच्या पुस्तकाची लेखिका ..नववीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी आहे ..
जिचे नाव आहे..तनिष्का संजय डांगे.
यवतमाळ जिल्ह्यातील "पुसद " या गावी तनिष्का , तिच्या आई-बाबांच्या सोबत राहते. पुसद "या भागाचा परिसर
तसे म्हटले सामान्य परिस्थिती असलेला आहे, शहरी वातावरणापेक्षा ..ग्रामीण जन-जीवनाचा प्रभाव असणे अगदी
साहजिक आहे. अशा वातावरणात रहाणार्या या तनिष्काने तिच्यातील अंगभूत कलागुणाचा विकास केला आहे
तो तिच्या वाचन आणि लेखन यांच्या बळावर .
तिच्याठायी पुरेपूर आत्मविश्वास आहे, जो तिच्या नियमित लेखनातून जसा जाणवला ..तोच आत्मविश्वास आणि लेखन -
जिद्द " तिच्या या पहिल्या -वाहिल्या पुस्तकातील लेखनातून दिसला आहे. पुस्तक वाचून ..तुम्ही देखील माझ्या या
मताशी नक्कीच सहमत होताल .
शिक्षक आपले गुरु असतात ".या बाबतीत तनिष्का खूप भाग्यवान आहे.. तिचे बाबा श्री.संजय डांगे हे शिक्षक आहेत.
आणि तनिष्काची आई ..सौ.निशा डांगे ..या उपक्रमशील -कल्पक अशा शिक्षक आहेत ", त्याच बरोबर इंटरनेट आणि साहित्य-क्षेत्रातील आघाडीच्या साहित्यकारा आहेत.." हे यासाठी सांगायचे आहे की ..तनिष्काच्या साहित्यिक व्यक्तिमत्व घडवण्यात तिच्या लेखिका -आई ,आणि शिक्षक -बाबांचा मार्गदर्शनपर वाटा आहे.
सुप्रसिध्द बालसाहित्यिक श्री.एकनाथ आव्हाड ..हे विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत ..आणि याच साहित्यिक-शिक्षक गुरूंची
प्रस्तावना ..तनिष्काच्या"जादूची झप्पी "पुस्तकाला असणे ..ही गुरुकृपाच आहे.
मित्र हो ..या पुस्तकातील दोन्ही गोष्टी ..हुशार सोफिया " आणि " सर्वश्रेष्ठ धनुर्धर " वाचताना ..हे लेखन एका छोट्या लेखिकेचे
आहे " असे अजिबात वाटत नाही .
हुशार सोफिया" ही गोष्ट लोककथेचा वारसा सांगणारी आहे. दुष्ट आणि सुष्ट प्रवृत्ती यांच्यातील लढाई जिकणारी सोफिया ,लेखिकेने ठळकपणे साकारली आहे.
तिच्या स्वभावातील गुण हे बालमनावर प्रभाव पाडणारे आहेत. मित्रांना एकत्र आणून "चेटकिणीला धडा शिकवणारी हुशार सोफिया"वाचकांना नक्कीच आवडेल .
"सर्वश्रेष्ठ धनुर्धर " ही गोष्ट वाचतांना वाचकांना"चांदोबा" मासिकातील गोष्टी आठवतील, अशा गोष्टींनी बोधप्रद शिकण्यास मोठीच मदत होते. नील आणि वीरसेन "यांच्यातील स्पर्धा प्रेरक शिकवण देणारी आहे".
ओघवती भाषा ,आणि सफाईदार लेखन शैली " लेखनासाठी आवश्यक असलेले दोन सर्वात
महत्वाचे गुण तनिष्का डांगे " या लेखिकेला लाभलेले आहेत.
हे पुस्तक ..तानिश्काने ..धाकट्या भावाला ..आराध्यला "अर्पण केले आहे . अशा गुणी दीदीचा रास्त अभिमान भैयास असणार.
चला वाचू या " या उपक्रमात पाणिनी प्रकाशन -ठाणे यांनी प्रकाशित केलेले ..हे पुस्तक वाचकांना आकर्षित करून घेणारे आहे.
लेखिका -तनिष्काने -
..मा. देशपांडे आजोबा " यांना, असे लिहून
आणि स्वाक्षरी करून "तिचे हे पहिले पुस्तक मला पाठवले .
मित्र हो ..माझ्या सारख्या वाचकास मिळालेली ..वर्ष ..२०२१ मधली अविस्मरणीय अशी भेट आहे.
तनिष्का ..या देशपांडेआजोबांचे आशीर्वाद -शुभेच्छा तुझ्यासोबत सदैव आहेत.
------------------ -------------
पुस्तक परिचय लेख-
-अरुण वि.देशपांडे-पुणे.
9850177342
--------------------------------
जादूची झप्पी
(बालकुमार कथा )
पृ- २० , मूल्य- रु. ४० /
ले- तनिष्का संजय डांगे
संपर्क - द्वारा - निशा संजय डांगे
8329065797
-------------------------
प्रकाशक - पाणिनी प्रकाशन - ठाणे
संपर्क - 9867873555
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment