Wednesday, August 13, 2014

दखलपात्र - अग्रलेख संग्रह . पुस्तक -परिचय -

दुसऱ्या- आवृत्तीच्या निमित्ताने ---
"- एका संपादकाची -"दखलपात्र "-वाटचाल.
दखलपात्र - अग्रलेख संग्रह .
पुस्तक -परिचय -
लेखक - अरुण वि . देशपांडे - पुणे .
मो- ९ ८ ५ ० १ ७ ७ ३ ४ २
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
वृतपत्र विक्रेता ते संपादक आणि प्रकाशक , असा प्रवाही प्रवास करणारे
घनश्याम पाटील , हे उत्तम लेखक आहेत. त्यांच्या लेखणीचे मनोज्ञ -रूपदर्शन ",
घडवणारे त्यांच्या अग्रलेख" लेखनाचे पुस्तक " दखलपात्र " या शीर्षकाने गेल्यावर्षी
प्रकाशित झाले . या लेखनाचे वाचकांनी यथोचित स्वागत करून, भरभरून अभिप्राय दिले .
या प्रतिसादाची "दखल प्रकाशकांना घ्यावी लागली ,आणि या लेख-संग्रहाची "दुसरी -आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे . या निमित्ताने या लेख-संग्रह बद्दल थोडेसे.

मासिक -साहित्य चपराक " आणि "साप्ता- चपराक ",या दोन नियतकालिकांचे
संपादन करणाऱ्या घनश्याम पाटलांनी या " अग्रलेखांचे - लेखन केलेले आहे , त्यांचा विविध लेखांचा
समावेश या "दखलपात्र " संग्रहात करण्यात आलेला आहे. आपल्या या लेखनातून त्यानी
"वर्तमानाची ठळकपणे नोंद घेतली आहे. आहे ,
या लेखनातून व्यक्त होतांना , आपले मत , आपली खंत मांडतांना ,मनातून
दाटून आलेला विषाद , वाटणारा आनंद, आणि समाधान "," या विविध भावना शब्दरूपात वाचणे
म्हणजे संपादक घनश्याम पाटील यांच्या व्यक्तीमात्वातील विविध भाव- गुणांचे दर्शनच घडून येते.
आपल्या आजूबाजूस नित्य घडणाऱ्या घटना , प्रसंग, त्यासाठी प्रत्यक्ष्य -
अप्रत्याक्ष्यपणे जबाबदार असणाऱ्या सर्वांना " संपादक - घनश्याम पाटील,
यांनी आपल्या "अग्रलेखांचा विषय बनवले आहे.
आपल्या लेखन -भूमिकेबद्दल ते म्हणतात - " माझ्या संस्थेचे घोषवाक्यही
"सामान्य माणसाचा उंचावलेला स्वर" ,असेच आहे.
त्यामुळे अग्रलेख लिहितांना अलिखित पूर्वसंकेत बाजूला सारून मी त्याची
मांडणी सुरु केली , आपल्या जिगरी दोस्ताशी ज्याप्रमाणे सहज -संवाद साधावा
त्या प्रमाणे अग्रलेखाची संवादी भाषा ठेवली
हे करतांना मनाला जे पटेल, रुचेल तेच लिहित गेलो. सत्य -असत्य ,
चांगले आणि वाईट अशी पडताळणी करून सत्याची वकिली केली .
एखाद्याला फक्त झोडपणे एवढाच आमचा उद्देश नाही ,त्यामुळे समजात जे काही
चांगले आहे ते स्वीकारण्याची , त्याचे भरभरून कौतुक करण्याची "गुण-ग्राहकता "
आम्ही दाखवली आहे.
"तत्व - तळमळ आणि तिडीक ", या त्रीसूत्री च्या आधारावर आमची संस्था उभी आहे.
आपल्या पत्रकारितेच्या प्रवासाची तपपूर्ती करणारे " संपादक -लेखक-प्रकाशक
घनश्याम पाटील -यांचे हे मनोगत या लेखनातून यथातथ्य व्यक्त झाले आहे .

जेष्ठ समीक्षक -लेखक प्रा ,डा. श्रीपाल सबनीस सर , यांची सार्थ अशी प्रस्तावना
या लेख- संग्रहास लाभली आहे. "दखलपात्र "- या संग्रहाचे मुल्य सर्वार्थाने वाढवणारी
ही प्रस्तावना आहे.
सबनीस सर म्हणतात - सांस्कृतिक मुल्य व्यवस्था आणि अंतरंगातील विसंवादाचा
या संपादकाने घेतलेला शोध कमालीचा प्रत्ययकारी व सत्यनिष्ठा रुजवणारा आहे. ",
अर्थात व्यक्ती -द्वेषापेक्षा व्यक्ती -दोषांवर व असभ्य प्रवृत्तीवर या अग्रलेखात
शाब्दिक हल्ला केल्यामुळे टीका विषय झालेली व्यक्ती सुद्धा दिलदारपणे टाळी देऊ शकते .
मात्र त्यांच्यात घनश्यामचा मूळ सांस्कृतिक हेतू जाणण्याची व पचवण्याची क्षमता हवीच.

संपादकीय -अग्रलेख अगदी आवडीने वाचणारे " असंख्य वाचक आहेत . या वाचकांसाठी
"दखलपात्र "-हा अग्रलेखांचा संग्रह म्हणजे एक वाचनीय पुस्तक आहे.
माझ्या मते , या संग्रहातील अग्रलेखांची ढोबळमानाने खालील प्रमाणे वर्गवारी
करता येऊ शकेल.
१. राजकारण , २. अर्थकारण , ३ सांस्कृतिक आणि साहित्य- कला क्षेत्र , ४,
सामाजिक समस्या आणि त्यावरील उपाय योजना.
यातील अग्रलेखांची शीर्षके -उदाहरण स्वरूप देतो।, जे मला विशेष वाटून गेलेले आहेत
.
. सदगुणांचा स्फोट अटळ ।! (पृ,२७ ), , नव्या युगाचा झंकार ।(पॄ ४३ ),
. अण्णा धन्यवाद ।(पृ ५८ ),मरणाचे स्मरण ठेवावे ।( पृ -७ ५ ) राजकारणातला
सुपर स्टार गेला …(पृ - ७ २ ), लोककवी मनमोहन …(पृ -११ ० )
, पुण्यभूषण सुधीर गाडगीळ ।( पृ- १२७ ), अखेर न्याय मिळाला …(पृ -१३० ). ,
ही राजभाषा असे…. (पृ -१४९ )…….
,अजब तुझे सरकार ।(पृ-१३३ ),
घनश्याम पाटील यांच्या लेखनात प्रभावी भाषा शैली ,विविध संदर्भांची खुबीने केलेली पेरणी ,
लेखन -विषयाचा अभ्यास, त्याबद्दलची तळमळ , साहित्यक आणि काव्यात्म उदाहरणे ,
वाचकांशी साधलेला आत्मीय संवाद , ही गुण-वैशिष्ट्ये या लेखनाला गुणवत्ता
बहाल करून देणारी अशीच आहेत.
लेखक -संपादक-प्रकाशक - घनश्याम पाटील यांच्या लेखन प्रवासास शुभेछा.
एकूण ४५ अग्रलेखांचा समावेश असलेला संग्रह - चित्रकार सुहास जगताप यांच्यामुखपृष्ठामुळे अधिक आकर्षक झालेला आहे.

----------------------------------------------------
दखलपात्र -"
अग्रलेख -संग्रह
ले- घनश्याम पाटील
प्रकाशक -
चपराक प्रकाशन
संपर्क - ९२२ ६ २ २ ४ १ ३ २
पृ - १७६ , मुल्य - रु. १३० / -
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Photo: दुसऱ्या- आवृत्तीच्या निमित्ताने ---

No comments:

Post a Comment