Saturday, January 18, 2014

पुस्तक-परिचय - परीघावरच्या पाउलखुणा ...!

पुस्तक परिचय...||                           ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.

---------------------------------------------------------------------------------------
"परीघावरच्या पाउलखुणा -
मनाला व्यापून टाकणाऱ्या जीवनानुभावांचे
लेखन "
-----------------------------------------------------------
सांगोला -जि-सोलापूर चे ख्यातीप्राप्त साहित्यिक प्रा.डा.कृष्णा इंगोले
यांचे विपुल असे लेखन विविध लेखन  ग्रंथरूपाने प्रसिद्ध झालेले आहे.
तसेच अनेक ग्रंथांचे संपादन त्यांनी केलेले आहे.
"परीघावरच्या पाउलखुणा "-हे इंगोलेसरांचे नवे लेखन हे ललित गद्य लेखन
आहे.जीवन-अनुभवांचे हळुवार आणि भावनात्मक जाणीवाचे लेखन म्हणजे
ललितलेखन" असे म्हटले जाते. या प्रमाणे "परिघावरच्या पाऊलखुणा " मधील
लेख हे ललित शैलीतील आणि कथात्म असे असले तरी या लेखनाला महत्वाचे
असे विविध सामाजिक परिवर्तनाचे संदर्भ आहेत.
निखळ रंजनात्मक असे हे लेखन नसून व्यक्तीजीवनाची
वाटचाल करतांना ,सभोवतालच्या समाज जीवनातील
घडामोडींची,त्यातील बदलांची नोंद घेत असतांना ,लेखक  
ज्या भावनेने आणि वैचारीकतेने व्यक्त होतो, जाणिवांचे
हे  शब्दरूप अंतर्मुख व्हायला लावणारे आहे.या लेखनाचे
हे एक प्रमुख वैशिष्ट्य ठरावे.
विकासाच्या केंद्रस्थानी असणारी शहरे आणि या साठी
विन्मुख्लेला खेड्यातील माणूस-यांच्यातील भली मोठ्ठी तफावत
या लेखनाचा आस्थाविषय आहे."परिघावरच्या पाउलखुणा "
मधील लेखनातून हे प्रकर्षाने जाणवेल.
एका सामान्य माणसाच्या जीवन-प्रवासतील बऱ्या-वाईट,इष्ट -
 अनिष्ट  यावर लेखक फार सुंदर  भावनिक व्यक्त होतात. या
लेखनात कथा आणि ललित लेख वाचावयास मिळतात. एकूण १६
लेख आणि कथा यांचा समावेश या पुस्तकात केलेला आहे.
लहानसे खेडे आणि पुढारलेले शहर हा परीघ आणि यातील माणसांचे
चिंतनपर चित्रण लेखक  अतिशय समरसतेने करून जातात.
जुने-लोक ,जुने दिवस  या गोष्टी म्हणजे स्मरण रंजन करणाऱ्या
पण या लेखनात हेच विषय लेखकाचे चिंतन-विषय झालेले आहेत.
यात खंत आहे,विषाद आहे,चांगल्या गोष्टी नाहीश्या होत असल्या
बद्दलची जशी खंत आहे, त्याच बरोबर नव्या तंत्रज्ञानाचे स्वागत करणारी
भावना देखील आहे."
"कथा हुकलेल्या लग्नाची ", "जयंती ", विचका ", "पाणी " या कथा  आणि
"परिघावरून केंद्राकडे  जाताना ",आवटे आबा ", चुकलेल्या वाटा ", अशा
लेखांतून लेखक प्रा.डा.कृष्णा इंगोलेसर यांच्या लेखन शैलीचा सुरेख प्रत्यय
येतो.  बदल होत असतानाच्या प्रक्रियेचा परिवर्तनशील मनाने त्यांनी घेतलेला
समाजमनाचा ,समाज-व्यवहाराचा हा लेखन धांडोळा वाचकांना एक विचार आणि
अनुभव देणारा आहे.
माणसांच्या सह्वास्च्या आठवणीनी या "परिघा वरच्या  पाउलखुणा " वाचकांच्या
मनावरती ठळकपणे उमटतील हे मात्र नक्की.
औरंगाबाद च्या रजत प्रकाशन आणि प्रकाशक श्री अशोक कुमठेकर यांनी अतिशय
सुरेख पुस्तक करून लेखक -प्रा.डा.कृष्णा इंगोले यांच्या वाचकांना सुंदर भेट दिली आहे.
चित्रकर-कलावंत-सरदार  यांनी यथायोग्य मुख-पृष्ठाने भरच टाकली आहे.
"परिघा वरच्या पाउलखुणा " जरूर वाचावे असे पुस्तक आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
"परिघा वरच्या पाउलखुणा"
लेखक- प्रा.डा.कृष्णा इंगोले -------संपर्क-९९२२६१७६२१
प्रकाशक- रजत प्रकाशन,
११८-तिलक नगर -औरंगाबाद-
मो-९८५०१४००२५.
पृ.-१२८ , मु-रु-१३५/.  
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
                                        पुस्तकपरिचय- अरुण.वि.देशपांडे -पुणे
                                                मो-९८५०१७७३४२,
----------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment