पुस्तक परिचय लेख-
अरुण वि.देशपांडे -पुणे.
-----------------------------------------------------------------------
बाल-कविता संग्रह- थेंब फुले - "
सुंदर काव्य-पुष्पांची बाग !
-----------------------------------------------------------
मराठवाड्यातील बालसाहित्य लेखन क्षेत्रात .अनेक लेखक-कवी मंडळी मोठ्या जाणीवेने लेखन करतांना दिसून येत आहेत ,ही बाब
मोठी समाधानाची आहे. नव्या पिढीतले हे साहित्यिक ..शिक्षण -क्षेत्रातले असल्यामुळे .."एक शिक्षक-एक गुरु
आणि एक माणूस म्हणून " ते सतत मुलांच्या सानिध्यात आणि सहवासात असतात . याचा खूप मोठा लाभ त्यांना आपल्या लेखनासाठी
नक्कीच होत असतो.

नांदेड जिल्ह्यातल्या सावरगाव या लहानशा गावात असलेले श्री.एकनाथ डूमणे असेच एक शिक्षक .जे कवी पण आहेत - ,
त्यांचा बालकविता संग्रह - थेंब फुले प्रकाशित झाला आहे ,त्याबद्दल लिहितांना खूप आनंद होतोय ...

बालसाहित्य त्यात ही कविता म्हटले की त्यात कोणते विषय असणार,? तेच ते नेहमीचे ठराविक आणि .ओळखीचे विषय असणार ...
हो अगदी बरोबर आहे हे ..
पण ,एक गोष्ट अशी पण असते की ,सर्वांच्या नजरेला ज्या गोष्टी पडत असतात , त्याकडे पाहण्याची प्रय्तेकाची दृष्टी वेगळी असते, दृष्टीकोन वेगळा असतो
.हे लक्षात घेत आपण वाचन करीत गेलो तर . कवी- एकनाथ डूमणे यांच्या .थेंब फुले "या संग्रहामधील कवितांचा आनंद घेता येतो.

थेंब फुले - " या बाल-कविता संग्रहाला " कवीचे मनोगत ,नाही ", आणि कुणा मान्यवरांची प्रस्तावना नाहीये .." या दोन्हींचे नसणे ",जाणवत नसले तरी,
वाचक-सवयीने आपल्याला जाणवते की अरेच्या ..हे दोन पाने यात नाहीत ,पण , हा बदल छानच वाटला .

प्रसिध्द साहित्यिक श्री. दा.मा.बेंडे - यांनी मलपृष्ठावरील आपल्या शुभेच्छा- अभिप्रायात या संग्रहाविषयी उचित असे गौरवोद्गार व्यक्त केले आहेत.
ते म्हणतात -
एकनाथ डूमणे शिक्षक आहेत . या कवितेत बाल-विश्वाची बोली त्यांनी बरोबर पकडली आहे.. ग्रामीण जीवन बाल कवितेतून चितारण्याचा आणि
बालमनाचा कानोसा घेण्याचा , त्यांच्या कवितेने यशस्वी प्रयत्न केला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही..
कवितेसाठी निवडलेले आशय आणि विषय , आणि रचना बालवाचकांना पसंतीस पडणाऱ्या आहेत.

वरील मजकुरा वरून प्रस्तुत कविता संग्रहातील कवितांच्या स्वरूपा बद्दल कल्पना येण्यास नक्कीच मदत झाली आहे. पाहू या काही कविता उदाहरणे -
थेंब फुले " या कविता संग्रहात एकूण छत्तीस कविता आहेत.
पाऊस" म्हणजे बालमनाचा एक आवडता सोबती .. पाऊस आला आला म्हणता म्हणता तो येतो आणि जातो ,

त्याची ही शीर्षक कविता - थेंब फुले -(पृ.८ ),
थेंब पडती
टप टप टप
गारा वर्षती
रप रप रप
थेंब पडती
टप टप टप
गारा वर्षती
रप रप रप
थेंब फुले
होती जमा केली
दिसेनाशी झाली
सांगा कुठे गेली ?
*****
आजच्या नव्या पिढीला आणि बाल-मनाला ,आपल्या पारिवारिक नात्यांची पूर्णपणे माहिती नसते, कारण छोटी कुटुंबे .!
अशा वेळी कवी -एकनाथ डूमणे
मुलांना "नाते " (पृ ..१४ ) ,या कवितेतून आपल्या सभोवताली असणार्या अनेक नाते-रूपांची फार छान ओळख करून देतात. ही कविता पूर्ण वाचण्यात खूप मजा आहे.

आमच्याकडचे एका नाते
खरे तुम्हा सांगून जाते
बाबांचे बाबा पितामह
आईचे बाबा मातामह ...
**********
आजच्या ग्रामीण जीवनात आपले अनेक सोबती कमी झाले आहेत , वेगवान यंत्र आणि वाहने आपण वापरतो , पण ही येण्या अगोदर कोण आपले
"सोबती " ( ..२१ ) असायचे .त्याची ही सुंदर कविता आहे..

"शेत कामाला
राबताय कोण ?
आमच्या घरची
बैल दोन !
राबताय कोण ?
आमच्या घरची
बैल दोन !
काळीचे लेक
सच्चे कोण ?
बैलंच आमचे
दुसरे कोण ?
*******
आपल्या सर्वांच्या भाव-विश्वातली महत्वाची व्यक्ती "आई" असते , तिच्या विषयीची ही कविता
"पहाटेच सुरु
आईचे राबणे
माहितच नाही
जराही थांबणे
दुखनं खुपणे
इतरांचं पाही
तिचं सोसण का ?
समजत नाही .... ( आई ..पृ..३४ ),

आपल्या सभोवताली निसर्गाने दिलेल्या अनेक सुंदर गोष्टी आहेत, कवीने ते बरोबर टिपले आहे..
"झाडाच्या शेंड्याला
लागले बगळे
कौतुकाने किती
बघती सगळे
हिरव्या रंगाची
पानं असतात
बगळ्यांची फुलं
पांढरी दिसतात ......(बगळ्यांची फुलं .पृ..३६ ), "

या आणि इतर कवितातून परिसर दर्शन होते, अनेक मित्रांच्या भेटी होतात , मोठी माणसे काही तरी सांगून जातात ,
या अशा कवितेतून ..काही घेत राहावे ..ज्याने आपल्या मनाला काय वाईट आणि काय चांगले याची ओळख होण्यास मदत होते.
एक शिक्षक आणि एक कवी ..अशा दोन्ही रुपात एकनाथ डूमणे यांनी केलेले प्रबोधन उत्तम आहे.

मनी माऊ, " "उंदीर ", घोडा ", मुंगी ", "कोंबडा ", मेंढी " "सभापती " मावशी ""या कविता .गंमतीदार कविता आहेत ..
आजी, डॉक्टर मामा , परी , आई " या कविता मधून आपल्या आवडत्या व्यक्ती भेटतात.
"इशारा , थेंब फुले , ढग , पाउस , झाड " या कविता वाचतांना निसर्ग रूप दिसते ...
कवी - एकनाथ डूमणे यांनी लिहिलेल्या साध्या आणि सोप्या शब्दरचनेच्या या कविता वाचकांना नक्कीच आवडतील.
त्यांच्या लेखन प्रवासास खूप खूप शुभेच्छा .

प्रसिध्द चित्रकार प्रा.प्रमोद दिवेकर यांनी या कविता संग्रहाचे "आकर्षक ,सुंदर मुखपृष्ठ आणि आतील अनुरूप रेखाचित्रे केली आहेत ,
त्यांच्या या कामगिरीने "थेंब फुले " खूप सुरेख झाले आहे. त्यांचे अभिनंदन.
प्रकाशक -दादासाहेब काका जगदाळे यांच्या तेजश्री प्रकाशन -. यांनी हा बालकविता संग्रह प्रकाशित केला आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक परिचय लेख-
अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२
-----------------------------------------------------------------------
बाल-कविता संग्रह-
थेंब फुले - "
एकनाथ डूमणे
संपर्क - ९०९६७१३४१७
पृ..३६, मूल्य- रु.५०/-
------------------------------------------------------------------------------------------------------
तेजश्री प्रकाशन -
संपर्क - ८२७५६३८३९६
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:
Post a Comment