कथा लेखकास अभिप्राय पत्र - कथा-शर्मिष्ठा - ले- सुरेश एस. वैद्य
-अरुण वि.देशपांडे
--------------------------------------------------------------------------------------------
मित्रवर्य श्री.सुरेशराव वैद्य
आपण आवर्जून पाठवलेली कथा "शर्मिष्ठा " ,वाचून झाली , ,
आपण सफाईदारपणाने लेखन करू शकणारे लेखक आहात , कुबेर समूहाच्या "आरंभ " कथा लेखन उपक्रमात त्याची प्रचीती मला आणि कुबेरकर वाचकांना सुद्धा आलेली आहे .
लेखकाच्या लेखन कौशल्याबद्दलची अशी माहिती असणे वाचकाला एक प्रकारे मदतच असते लेखकाच्या साहित्य्कडे आस्थापूर्वक पाहण्याची अनुकूल दृष्टी वाचकांच्या मनात अगोदर पासूनच असते , त्यामुळे लेखकाच्या लेखना बद्दल दुषित दृष्टीकोन निर्माण होण्याची शक्यता नसते .
सुरेशराव ..या सगळ्या गोष्टींचा फायदा तुमच्या लेखनाला नक्कीच झाला आहे,
शर्मिष्ठा "ही प्रस्तुत कथा ..वाचनीय आहेच याला कारण तुमची .कथा लेखन शैली ..जी एक वेगवान कहाणी सांगते . कथा वाचत असतांना .ही एखाद्या सिनेमासाठी ची मसालेदार कथा आणि पटकथा वाचतो आहे आहे असे वाटत होते , कारण ..सिनेमाची ..फिल्मी कथा ..ही वाचकांना आवडेलच " असे गृहीत धरून लेखक लिहित असतात अस्शीच लेखन-युक्ती तुम्ही शर्मिष्ठा ही कथा लिहितांना केली आहे असे मला वाटते ,
मैत्री ,मित्रांच्या मनात एकमेकाबद्दल असणारा स्नेहभाव , प्रसंगी असीम त्याग करण्याची तयारी . दोस्ती की खातीर काय पण .." हे सगळे गुण , आणि स्वभाव विशेष तुम्ही तुमच्या कथेतील व्याक्तीरेखातअगदी ठासून भरलेले आहेत..
विराज -शर्मिष्ठा , निखील -देविका या चार जोड्या, त्यांची जीवन कहाणी तुम्ही नायिका .शर्मिष्ठा हिला केंद्र साठ्नी ठेवून सदर केली आहे , या कथेत जे घडले आहे ते, लेखक ..निवेदन करून सांगतो ,त्यामुळे वाचकाला काय चालले होते हे फक्त समजते ,
विराज -निखील , शर्मिष्ठा आणि देविका ..या व्यक्तिरेखा समोर समोर येवून ,एकमेकाशी बोलत आहेत , असा प्रसंग या कथेत येत नाही .विराज -शर्मिष्ठा , देविका आणि निखील ..खरे तर या युगल जोड्या ,त्यांचे प्रेम आहे एकमेकावर , लग्न ठरलेले आहे .त्यांचे .आणि नियती (लेखकाने ठरवल्या प्रमाणे ) मोठच आघात या चौघांवर करते .
आपल्या जिवलग मैत्रिणी साठी -..शर्मिष्ठा साठी हे दोघे अतिशय कठीण असे निर्णय ..इतक्या सहजतेने आणि पटापट घेऊन टाकतात की..त्यांच्या मनोवृत्तीचे कौतुक वाटल्या शिवाय राहत नाही. देविका आणि निखील यांच्या सारख्या त्यागमूर्ती वास्तव जीवनात अतिशय दुर्मिळ आहेत ,म्हणूनच तुमच्या कथेतील व्यक्तिरेखा वाचकांच्या मनाला भुरळ घालणाऱ्या आहेत असे म्हणता येईल
कथानकात आढळणारे योगायोग , आकस्मिक आपतीकारक घटना , कथानकाच्या सोयीनुसार नायक-नायीकंना होणारे स्मृती -भृंश , विस्मरण , दाखवण्यात येणारे काल-मान , वर्ष -गिनती , या सगळ्या गोष्टीत सुसंगतपणा असायला हवा " याला महत्व न देता सोयीचे तेव्हढे सोयीने समोर ठेवायचे .त्यामुळे स्टोरी मनाला भिडली नाही ,तरीपण प्रेक्षक त्यात गुंतून जातो , तसेच तुमच्या शर्मिष्ठा "या कथेबद्दल म्हणता येईल .वाचक या कथेत गुंतून जातो याचे कारण तुमच्या लेखनाची फिल्मी शैली
शर्मिष्ठा "या मैत्रिणी साठी देविकाने खूप मोठा त्याग केला आहे . हे निर्णय घेतांना .देविका आणि निखील यांच्या मनाची काय स्थिती झाली असेल ? मनातील विचारांचे आंदोलन , घालमेल , प्रेम असतांना ,त्याचा त्याग करून दूर जायचे ..निखील च्या मनात काय काय चालू असेल ? आयुष्य उध्वस्त करणारे हे निर्णय .. व्यक्तीच्या मनाचा असा भावनिक वेध घेणे लेखक म्हणून तुमच्या कडून राहून गेले आहे "असे जाणवले
असो , कथा लेखनाचा तुमचा हा लेखन प्रयोग जमून आलेला आहे.वाचकांनी सुद्धा या कथेला खूप छान अभिप्राय दिले आहेत , यातून तुमच्या कथा लेखनास प्रेरक प्रोत्साहनच मिळणार आहे .तुमच्या लेखनाचा मी नेहमीच वाचक असणार आहे. तुम्हाला लेखन शुभेच्छा.
स्नेहांकित -
अरुण वि.देशपांडे -पुणे.
No comments:
Post a Comment