Wednesday, April 5, 2017

पुस्तक-परिचय लेख- कथा संग्रह - कॅप्सूल कथा by मीनाक्षी

पुस्तक परिचय -
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
-------------------------------------------------------
कथा संग्रह - कॅप्सूल कथा by मीनाक्षी
अनुभवी आणि गुणकारी कॅप्सूल -------------------------------------------------------------------------
इंटरनेट आणि फेसबूक माध्यमातून लेखन करणारे ... हे सगळे लेखक आणि कवी नवोदितच असतात असे नाही ,दर्जेदार लेखन करणारे अनेक लेखक-कवी फेसबुकवर लेखन करीत असतात .या लेखनास वाचक प्रतिसाद भरपूर लाभात असतो,..-या लेखनात असलेली वाचनीयता "हे एक प्रमुख कारण आहे.अशाच साहित्यिक मंडळीत नियमित लेखन करणाऱ्या एक लेखिका आहेत मीनाक्षी आडे -(दामले ).

त्यांचा पहिला कथा संग्रह - कॅप्सूल कथा by मीनाक्षी ", या वेगळ्या शीर्षकाने नुकताच प्रकाशित झाला आहे.
या कथा संग्रहात एकूण ३० कथांचा समावेश आहे..यातील काही कथा हे ललित लेख आहेत असे वाटेल.या कथा शब्द्संखेयेच्या दृष्टीने अतिशय आटोपशीर अशा आहेत ,त्यामुळे हा संग्रह वाचक एका बैठीकीत पूर्ण वाचू शकेल असा सुटसुटीत झाला आहे
या कथालेखनातून आपल्याला जीवन विषयक अनुभव वाचावयास तर मिळतातच ..आणि या कथानकाच्या ओघात ज्या व्यक्तिरेखा दिसतात ,भेटतात ..त्या आपल्या सभोवताली वावरणार्या आहेत "हा या लेखनाला असलेला "सामान्य -तत्वाचा स्पर्श "आहे असे मला वाटते.त्यामुळे कथानकातील प्रसंग,घटना ,हे अनुभवणारी ती माणसे ..कुणे परकी न वाटता .आपल्याच परिघातील ,परिसरातील वाटणारी आहेत..यामुळे त्यांच्या भावनांशी वाचक भावनिक पातळीवर सह्तेने जोडला जातो "याचे श्रेय लेखिका मीनाक्षी आडे यांच्या शैलीदार लेखनास दिले पाहिजे .
लेखिका म्हणून मीनाक्षी आडे यांनी कथातील व्यक्तिरेखा -चित्रण खूप आत्मीयतेने केले आहे असे म्हणावेसे वाटते.
उदा- आयुष्याची परीक्षा - परशा आणि नाईकमास्तर ,
दळण -कथेतील दिन्या आणि सुन्याची जोडी ,
कल्पतरू सम तो - कथेमधील - नेहा ,नेहाची आई सीमा -आणि तो "-सचिन...
कथा रातराणी मधील "नीमा, राजीनामा कथेमधली - सावनी ,"
सावर रे ...कथेमधली अपर्णा आणि रिक्षावाला ..किशन ...
दूर तो किनारा -मधली जोडी - क्षितीज आणि मनस्वी ,
या कथा मधून लेखिकेने त्यातील व्यक्तिरेखांच्या भावनाना ,प्रश्नाना न्याय देण्याचा प्रयत्न मनापासून केला आहे. आणि या व्यक्तींना सहानुभूती मिळावी "हा लेखिकेचा हेतू नाहीये हे सुद्धा जाणवेल "
ललित लेखनाचा बाज असलेले हे लेखन ओघवते असे आहे निवेदन शैली आकर्षक आहे ..यातील व्यक्ती संवादातून व्यक्त होतात -ते संवाद भावपूर्ण ..आणि आपल्या मनाला स्पर्श करून जाणारे आहेत.
लेखिका मीनाक्षी आडे यांचे लेखन पुस्तकरूपाने येण्याचा हा पहिला प्रयत्न आहे, लेखनाचा नाही ".हे आवर्जून सांगावेसे वाटते
आपल्या लेखनास मान्यवर साहित्यकांचे अभिप्राय प्राप्त होणे ,हे लेखकासाठी आनंदाचे असते .हा आनंद लेखिकेला मिळालेला आहे.
या संग्रहास प्रस्तावना - लेखिका व समीक्षक -डॉ.वसुधा वैद्य , नागपूर यांची आहे, आणि
"ब्लर्ब "-अभिप्राय दिलाय तो प्रसिद्ध साहित्यिक -श्री.विजय तरवडे , पुणे यांनी.
यासोबत मला आवर्जून उल्लेख करायचा आहे तो एक आणखी अभिप्रायाचा - -जो आहे लेखिकेच्या जेष्ठ बंधूंचा - डॉ.अरविन्द दामले ,यवतमाळ यांचा -
आपल्या शुभेच्छा -मनोगतात ते म्हणतात - कॅप्सूल कथांपैकी -आधुनिक थेरपी ,तिच्या काही कथा , आठवणी , सीताफळ " या सर्व गोष्टी सहज सुंदर सोप्या भाषेत .कसलाच बडेजाव बोजडपणा न दाखवता सहज सुंदर डौलात चालतात अन कधी कथा संपली हे पण कळत नाही. इतकं आपण त्यात गुंतत ही जातो.
वाचक हो- यापेक्षा वेगळं असं आणखी काय सांगायला हवं का ?
लेखिका मीनाक्षी आडे यांच्या लेखनास अनेक शुभेच्छा.
--------------------------------------------------------------------------------------
पुस्तक -परिचय -
अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२
----------------------------------------------------------------------
कॅप्सूल कथा by मीनाक्षी
(कथा संग्रह )
मीनाक्षी आडे - सुरत (गुजरात )
मो-८९८०००१२७२
पृ -११२ , मूल्य-रु .११० /-
-----------------------------------------------------
प्रकाशक -
नंदिनी पब्लिशिंग हाउस
सिंहगड रोड-पुणे .
मो-९४२२०३७७१४
------------------------------------------------------

No comments:

Post a Comment