Friday, November 8, 2013

पुस्तक-परिचय- अभिप्राय - मन डोह - विवेक जोजारे.

नमस्कार रसिक हो-
मन डोह" -या माझ्या कविता -संग्रहावर
मित्र- श्री.विवेक जोजारे -यांचा हा अभिप्राय ॥
-------------------------------------------------------------------------------
अभिप्राय -
------------------------------------
अरुण सरांनी मला त्यांचा २०११ साली प्रकाशित
"मन डोह " हा कविता संग्रह भेट दिला . मनातून आनंदलो .
वेळ मिळताच कविता संग्रह वाचायला घेतला ……
"मेंदीनक्षी" पासून "प्रार्थना" पर्यंत ……
एक से बढकर एक कविता ….
"पाऊससरी"त प्रेयसीच येण अन चिंब भिजवण …
"सखी आणि सागरकिनारा "यातील त्या आठवणी …
"गोड चेहर्यावरी तुझ्या"तील हसू पुन्हा फुलाव ….
"एकदा"…. एकदा तू विचारलस मला ….
आणि अश्या तजेलदार गुलाबी कवितांमधून
दिसणारी प्रेयसी ……
"माणूस"मधील चेहर्या आडचा माणूस ….
"ध्यासपर्व " तील शोध मनाचा …
"असा मी - असा मी " मधील धावत्या गतीत उद्याच्या..
कुठेतरी संपतो मी ………
"जगायचे ते कश्यासाठी"मधील ….
… वेळीच कळले असते ,
हे सारे घडले नसते ,
पडला नसता प्रश्न हि …
जगायचे कश्या साठी …………. ?
प्रत्येक कवितेतआपलासा वाटणारा…
सामान्य माणसाचा आवाज …
खूप खूप मस्त कविता …।
वाचल्या …।
मन प्रसन्न अन धन्य झाले …
धन्यवाद … Arun V. Deshpandesir
………………. विवेक ..
-----------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment