Saturday, September 7, 2013

पुस्तक परिचय लेख- " कवितेच्या वाटचालीच्या पाउलखुणा - "राज्ज्योत ..."!

पुस्तक-परिचय "- "कवितेच्या  वाटचालीच्या पाउलखुणा -
                         "राजज्योत "
-------------------------------------------------------------------------------
असे म्हटले जाते की- "कविमन प्रत्येकात दडलेले असते, !" त्याच्या
शोधात ज्यांचा प्रवास सुरु असतो- ते कवितेच्या रूपाने जीवनाचे दर्शन
घडवतात. आपले अनुभव कवितेतून मांडण्याचा  त्यांचा प्रयत्न असतो.
अशाच एका कविमनाच्या व्यक्तिमत्वाचे दर्शन "-त्याच्याच कवितेतून
आपण घेणार आहोत.
निमित्त आहे- कवियत्री- ज्योत्स्ना राजपूत यांच्या नुकत्याच प्रकाशित
"राजज्योत "-या चारोळी संग्रहाचे.-त्याचा हा आस्वादक -परिचय.
"चारोळी" या प्रकाराने अलीकडे कवितेच्या लेखन प्रकारात
लोकप्रिय स्थान मिळवले आहे असे दिसते. चार ओळीतून
होणारे भाव-दर्शन प्रभावीपणे झाले तरच या चार-ओळी "
रसिकांच्या मनाचा ठाव घेऊ शकतात. अन्यथा हा येक
"शब्दांचा निर्जीव खेळ होऊ शकतो."
हा संभाव्य धोका "पत्करून ज्योत्स्ना राजपूत यांनी चारोळी
लेखन करून -त्याचा संग्रह देखील प्रकाशित केला आहे. त्यांच्या
या धाडसाचे आपण वाचक या नात्याने कौतक आणि अभिनंदन
करू या.
"राज ज्योत" या संग्रहात जवळपास सत्तर चारोळ्या आहेत.
स्व:":शी संवांद,, भावनाशील मनाला  अपेक्षा-भंगाच्या तडाख्यातून
सावरून घेण्याची समजूतदार वृत्ती, तो आणि ती" यांच्यातील
प्रेम-भावनेचे वेगवेगळी भावरंग, याचे दर्शन  घडवणाऱ्या चारोळ्यांची
संख्या प्राधान्याने जास्त आहे. दोन-चार चारोळ्या दोन वेळा वेगवेगळ्या
ठिकाणे दिसून येतात.
"अल्पाक्षरी रचना "-कवितेचे एक प्रमुख आणि प्रभावी
विशेष -रूप" मानले जाते.  त्या मुळे ओळी जरी चारच असल्या ,
तरी" अल्प शब्द-संख्या आणि अर्थवाही शब्द-रचना " या दोन मुळे
चारोळी- रचना " प्रभावी होते. प्रस्तुतच्या संग्रहात याचे काही उत्तम
उदाहरणे आहेत.
" तू  फुंकर घालशील म्हणून
  मी जखमही बांधत नाही
   तू फुंकर घातल्याशिवाय
   तीही स्वतःला सांधत नाही........." (पृ-४)
   आणि ....
   काही प्रश्न उत्तरासोबत
   सुखाने संसार मांडतात
   काही उत्तराच्या प्रतीक्षेत
   आयुष्यभर अश्रू सांडतात ..............."(पृ-३)
तुझ्या माझ्या प्रीतीने
रात्रही झाली बेधुंद
चंद्राची चालही मला
आज वाटते थोडी मंद...........(पृ-१३),
आणि...
 या काही वेगळ्या भाव-छटा असलेल्या रचना ,
अपेक्षाच ओझ वाहण्यात
आयुष्य सार सरलं
स्वताहासाठी जगण्याच आता
कारणच नाहे उरलं.......(पृ..१५),
वाटते आपणास कि
वाऱ्यावरही हा उडतो पतंग
रीझाविन्या माणसाचे मन
वाऱ्याशी हा लढतो पतंग......(पृ--८),
राजज्योत " हा कवियित्री ज्योत्स्ना राजपूत यांचा पहिला
चारोळी-संग्रह आहे." समरसून केलेले त्यांचे हे लेखन रसिकांना
सहजपणे भावेल असेच झालेले आहे. उत्तम कवितेच्या पाउलखुणा "-
घेऊन आलेल्या या संग्रहातून ज्योत्स्ना राजपूत यांच्या काव्य्गुणांची
झलक दिसून आलेलेलीच आहे. त्यांचा हा प्रवास अधिक आश्वासकपणे
सुरु राहो, अशा शुभेच्छा देऊया .
महाराष्ट्र वृतपत्र लेखक असोसिएशन " यांनी हा चारोळी संग्रह ,नागपूर
येथे झालेल्या "शब्द साहित्य संमेलनात - ५ एप्रिल-२०१२ रोजी प्रकाशित
केला आहे.
कवियित्री -ज्योत्स्ना राजपूत यांचा संपर्क पत्ता-
इ -१७ / बी-विंग, रूम.न .६ सेक्टर  १४,
सिडको कौलनी, नवीन  पनवेल -४१०२०६ ,
मोब. ९८६७०३०२८०.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय- अरुण वि. देशपांडे -पुणे.
मोब- ९८५०१७७३४२.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पुस्तक-परिचय "
पुस्तक-परिचय "

No comments:

Post a Comment